Wednesday, 18 January 2012

कणा ...(एक आठवण)

मुलांनो, ............ (अत्यंत करडा आणि शिस्तीने भरलेला आवाज )

आज आपण कणा कविता शिकणार आहोत !
नीट ऐका नंतर मी त्या कवितेवर प्रश्न विचारणार आहे ...


मराठीचे मास्तर ओरडून सांगत होते प्रचंड गड़बड़ करणारा तो नववी चा वर्ग एकाएकी शांत झाला. आणि, मास्तरांनी कविता सांगण्यास सुरुवात केली अगोदर कविता ऐकल्या नंतर वाटल की काय मस्त गम्मत आहे? शब्द रचना ही मजेदार वाटली . शाळा सुटल्यानंतर घरी मुद्दाम मराठीच पुस्तक घेउन ती कविता वाचायला सुरुवात केली आणि काय सांगू मित्रांनो कुसुमाग्रजांच्या या कवितेने मला अक्षरश: वेड लावल. आज शाळा, संपून इतकी वर्ष झाली पण कणा कवितेशी माझी हि पहिली ओळख आजही मनात खोलवर रुजलीये . मदती साठी खिशा कडे जाणारा हात पाहून कवितेतला नायक जेंव्हा म्हणतो "कि पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला" काय सांगू ? "वाचणारा एकदम खल्लास " मित्रांनो हि भावना हि प्रतिक्रिया शब्दां पलीकडची आहे. या आणि अशा अनेक आठवणींच्या सागरात न्हाऊन सुद्धा मी कोरडाच राहतो आणि अशाच कुठल्या तरी एकांत क्षणी हा आठवणींचा सागर मला पुन्हा डुबक्या घेण्यासाठी खुणावतो तुमच्या पैकी बर्याच जणांनी कणा कविता वाचली असेल पण ज्यांनी हि कविता अजून वाचली नाहीये त्याना ह्या कवितेचा फक्त आनंद देण्यासाठी नाही. तर, इतके दिवस ते एका अमृत आनंदा पासून अनभीज्ञ होते याची जाणीव करून देण्यासाठी चा हा उपद्व्याप
आशा आहे सगळ्यांना आवडेल


कणा - कुसुमाग्रज
ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहन
गंगामाई पाहणी आली गेली घरटात राहन

माहरे वाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळया हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली होते न्हवते गेले
प्रसाद म्हणून पापण्या मध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा !

No comments:

Post a Comment