Wednesday 23 January 2013

स्वर्गात बांधलेल्या गाठी

ती त्याला रेल्वे स्टेशनवर भेटली,आपल्या मैत्रीणीला रेल्वे स्टेशनवर सोडायला आली होती.तिला बघताच हा तिच्या चेहर्यात अशा प्रकारे हरवुन गेला की जसं भोवरा फुलाच्या सुगंधात हरवुन जातो.
एक वेगळाच मोह तिच्या चेहर्यात होता.
ती जाऊ लागली,तो तिच्या मागेमागे जाऊ लागला.पण अचानक ती गर्दीत कुठे गायब झाली हे कळलंच नाही त्याला,त्याने शोधायचा खुप प्रयत्न केला पण ती काही सापडली नाही.
थोड्या वेळानंतर त्याला लक्षात आलं की आपल्याला ज्या ट्रेनमध्ये बसायचं होतं तीची वेळ जवळ जवळ होत आली होती.गडबडीने तो प्लॅटफॉर्मच्या दिशेने धावलापण ट्रेनही निघुन गेली होती.
मुलगी ही गेली आणि ट्रेनही...
काही दिवस तो तिला विसरुच शकला नाही,तिच्या आठवणीत काही दिवस तसेच गेले.तो तिला जवळ जवळ विसरलाच होता कि,ती पुन्हा दिसली त्याला मंदिरात जाताना .
चालु एस टी तुन याने उडी मारली.आणि कधी मंदिरात जाऊन माहीती नसणारा हा,पहील्यांदा याने मंदीरात पाय ठेवले.तिथलं वातावरण खुपच मोहक होतं.
ती देवाला नमस्कार करत होती.हा ही तिच्या शेजारीच उभा राहुन प्रार्थना करण्याचा आव आणत तिच्याकडे चोरुन पाहत उभा होता.तिचं ते मोहक रुप पाहुन त्यानेही डोळे मिटुन देवाला प्रार्थना केली की,माझ्या आयुष्याची साथीदार म्हणुन मला हीच मुलगी मिळो.
त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा पुन्हा एकदा ती मुलगी निघुन गेली होती.तो पुन्हा एकदा तिला शोधतच राहीला,...
काही दिवसांनंतर त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.दोन तीन वर्षे मग अशीच निघुन गेली तो तिला थोडाफार विसरला होता.पण कुठेतरी याच्या मनातल्या भावना तिच्याप्रतीतशाच होत्या.
याच्या आईवडीलांनी याच्यासाठी मुली पाहण्यास सुरुवात केली,पण काही केल्या याला कुठली मुलगी पसंतच पडत नव्हती.त्यामुळे एक दिवस याच्या आईवडीलांनी याला वधु वर सुचक मेळाव्यात पाठवलं.
मनात नसतानाही आई वडीलांच्या आग्रहाखातर तो मेळाव्यात गेला.खुपच गर्दी होती तिथे,प्रत्येकजण एकमेकांशी ओळख करुन ओळख वाढवण्याचा प्रयत्न करत होते.हा मात्र तिथे एकाजागी शांत उभा होता.लक्ष लागत नव्हतं.
कधी एकदा ईथुन बाहेर पडतोय असं झालं होतं त्याला.
तेवढ्यात कोणीतरी मागुन त्याला हाक मारली,त्याने मागे वळुन पाहीलं,तर तीच मुलगी तिथे उभी होती,जिचा चेहरा हा मनात ठेवुन जगत होता.कोणीतरी शांत परिसरात शंखानाद केल्यावर जसा आवाज व्हावा.तसाच आवाज तिला पाहील्यावर याच्या हृदयाच्या तारा हेलावुन होत होता.
ती म्हणाली,माझं नाव साक्षी मी मुळची सातार्याची,पण मुंबईला जॉब करते.इथे माझे काका काकु असतात.मी पदवीधर आहे,तर ही अशी आहे मी तुमच्या विषयीही काही सांगाना.त्याला कायबोलावं हे समजतच नव्हतं,डोळे झाकुन पाहीलेलंस्वप्न डोळे उघडताच समोर दिसावं...अशी केविलवाणी अवस्था त्याच्या मनाची झाली होती.
पण किती दिवसांनी तो उत्स्फुर्तपणे बोलु लागला.ओळख वाढवली आणि शेवटी त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं.आणि ही गोड बातमी दोघांच्याही आई वडीलांनाही कळवली,बोलणी झाली आणि लग्नही अगदी थाटामाटात झालं.
भेटी नशिबात नव्हत्या पण साथ मात्र नशिबात होती....
मित्रांनो काहीजण असतात ज्यांच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात.
पण काहीजण असे असतात,त्यांच्या गाठी स्वर्गात तर बांधलेल्या असतात पण तो स्वर्ग त्यांनी स्वतःच्या हातांनी घडवलेला असतो.......


अस पण प्रेम ..........

कॉलेज केव्हाचं सुरु झालंय.सर्व क्लास पुर्णपणे भरलेत.तिसर्या पिरेडची बेल वाजली.लाट मॅडमचा पिरेड संपला होता.मॅडम अजुनजायच्या होता.पौर्णिमा गडबडीने क्लासमध्ये आली,पावसाने चिँब भिजली होती ती.मॅडमांना काही सांगायची गरज नव्हती,पावसामुळे  उशीर झालाय असेल म्हणुन त्यांनी तिला बसायला सांगितलं आणि त्या निघुन गेल्या.प्रदीप पौर्णिमाला सारखं विचारत होता.एवढं भिजत यायची काय गरज होती?एक दिवस आली नसतीस तर चाललं असत
 ना....ती म्हणाली,हो पण तुला एक दिवस न बघणं चाललं मला चाललं नसतं.प्रदीप अलगद खाली बघुन हसला.किती प्रेम आहे तुझं माझ्यावर असं म्हणुन तिच्या हातावर हात ठेवला.तिचं अंग खुपच तापलं होतं.त्याला एकदम चटका बसला.अगं तुला तर खुप ताप आलाय आणि तरीही तु इथवर आलीस.तुला तर ना मी आता..,.पुढे काही बोलण्याच्या आतच कांबळे सर तिथे आले,प्रदीप लगेच आपल्या जागेवर गेला.आणि सर्वजण gd moning sir म्हणत उभे झाले...sit downपौर्णिमा सोडुन.... पौर्णिमाला उभं राहायला सांगितल्याबद्दल सर्वच आश्चर्यचकित झाले.प्रदीप जरा जास्तच आश्चर्यचकित झाला.....कांबळे सरःबाळ तुला इतकाउशीर का झाला?(सर थोडे कडक शिस्तीचे होते,त्यांनी तिला उशीरा येताना पाहीलं होतं)...पौर्णिमा सर पाऊस आला होता?..पाऊस आला होता तर यायचं नव्हतं कॉलेजला,हात पुढे कर....तिने हात पुढे केला सर तिला छडी मारणार तेवढ्यात प्रदीप ओरडला सर थांबा....ती वेळेवर आलीय हवंतर विचारा सर्वांना...हो का?मी प्रत्यक्ष पाहीलं नसतं यावर विश्वासही ठेवला असता कदाचित,..असं म्हणुन ते पुन्हा छडीमारणार तेवढ्यात तो पुन्हा मधी बोलला.आता ते चिडले आणि पहीला त्यालाच छडीने सरांनी हाणलं.प्रदीप ने पौर्णिमाला पुरपुर वाचवण्याचा प्रयत्न केला.पण तिसर्यावळी सर तिला मारताना तिने डोळे मिटले आणि धाड करुन खिडकीचे दार वार्याने धडकले गेले.तिने डोळे उघडले तेव्हा तिथे कोणीही नव्हतं.सर्व बँचेसमोकळे होते.बाहेर धो धो पाऊस पडत होता.तिच्या आईने लगबगीने छत्री घेऊन वर्गात प्रवेश केला.....मित्रा ंनो या कथेला इथे थोडा pause देऊया. आत्ता तुम्ही म्हणाल तिथे कोणीच नाहीये,सर्व कोठे गेले...सांगतो.. .पण हे सांगण्यासाठी मला तुम्हाला थोडं PASTमध्ये न्यावं लागेल.चला तर मग...एका वर्षापुर्वी...
आजपासुन बारावीचे एक्झाम्स चालु झालेत.प्रदीप आणि पौर्णिमा हे वेगवेगळ्या कॉलेजचे पण त्यांचा exam no एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये पडला आहे.त्यामुळे ओळख वाढवण्यासाठी प्रदीप सुरुवात करतो...हाय माझं नाव प्रदीप...तीःआणि माझं पौर्णिमा.,.तोः रागावणार नसशील तर एक सांगु का?तीःहो सांग ना.तोःतु खुप सुंदर आहेस.तुझ्या कपाळावर एक चंद्रकोर असती ना तर त्या चंद्रकोरीलाही तुझ्यामुळे शोभा आली असती.ती लाजुन थँक्स म्हणाली.त्याचा हा कॉन्फीडंस आणि स्पष्ट वक्तेपणा तिला खुप आवडला.अशी त्यांची मैत्री झाली.दोन तीन पेपर व्यवस्थित गेले पण एका पेपरच्या वेळी तिच्यापायात कोणीतरी कॉपी टाकली जे तिला कळलं नाही.त्यावेळेसच निरीक्षकांच्या नजरेत ही कॉपी पडल्यावर त्यांनी पौर्णिमाला जबाबदार धरलं.ती खुपच विनंती करुन त्यांना सांगत होती कि ही माझी कॉपी नाही।पण त्यांनी ऐकलं नाही शेवटी प्रदीपने तो आळ आपल्या डोक्यावर घेतला आणि तो म्हणाला,सर ही कॉपी माझी आहे आणि ती मीच हिच्या पायात टाकली होती.त्यामुळे त्या सरांनी पौर्णिमाला सोडुन प्रदीपच्या पेपरवर लाल शेरा मारला.पौर्णिमेला   माहीत होतं की हा खोटं बोलतोय कारण इतका स्मार्ट मुलगा कॉपी कसा काय करेल?पेपर संपल्यावर ते भेटले तेव्हा तिने स्पष्टच विचारलं.तु कॉपी केली नसताना ती तुझि कॉपी आहे असं का म्हणालास?...तुला वाचवण्यासाठी... .पण का?तु कोण आणि मी कोण आपलं नातच काय?दोन दिवसाच्या मैत्रीखातर कोणी असं करतं का?बरोबर आहे कदाचित.पण दोन दिवसाच्या प्रेमाखातर असं कोणीही करु शकतं,नाहि?...म् हणजे तुझं माझ्यावर प्रेम....हो तुला बघताक्षणीच झालं होतं ते पण प्रपोज असं करावं लागेल याची जरादेखील कल्पना नव्हती मला.बोल करशील माझ्याशी लग्न?तिला त्याची एक वेगळी पद्धत,स्पष्टपणे बोलणं आवडलं आणि तिनेपटकन हो म्हटलं।काहि दिवसांनी एकाच कॉलेजमध्ये त्यांचं अॅडमिशन झालं.त्यांचं प्रेम फुलत गेलं.पण एक दिवस कॉलेज भरलेलं असताना धो धो पडणार्या पावसाने कॉलेजच्या बिल्डींगचा एक भाग कोसळला.त्यामध्ये  चाळीस विद्यार्थी,विद् यार्थींनीचा मृत्यु झाला आणि 100 च्या वर जखमी झाले...प्रदीपचं नाव मृतांमध्ये होतं तर पौर्णिमाचं जखमींमध्ये होतं....होत्याच नव्हतं झालं.उकळत्या दुधामध्ये विरझण पडावं तसं त्यांच्या प्रेमामध्ये दुर्दैवाने उडी घेतली होती.पौर्णिमाचा जीव तर वाचला पण तिच्या मनावर या घटनेचा जबर मानसिक आघात झाला तिच्या पालकांनी यावर उपचारासाठी प्रयत्न केले पण तिने योग्य प्रतिसाद दिला नाही.....
तेव्हापासुन आजपर्यँत जवळजवळ रोज ती कॉलेजमध्ये येत असते.आजतर तिने कहरच केला 100 डिग्रीचा ताप आला असतानादेखील ती कॉलेजमध्ये पावसात भिजत आली होती.त्या खिडकीची दारे सुटलेल्या वार्याने धडकत होती,तिचे केस उडत होते.तीची आई छत्री घेऊन तिथे आली.आणि पौर्णिमाला भिजलेल्या डोळ्यांनी म्हणाली,कितीवेळा  तुला इथे आणायला यायचं बाळ.रोज तु न सांगता इथे येतेस.काय झालंय ते तरी सांग.आजपर्यंत तुला कितीवेळा समजावलं पण आज फणफणत्या अंगाने सुद्धा तु इथे आलीस.असं म्हणत त्या पौर्णिमाला घेऊन गेल्या.त्यांना माहीत होतं की हीला मानसिक आजार झालाय.पौर्णिमाल ा याची कल्पना दिला गेली असतानादेखील तिने उपचारास नकार दिला.हा माझा मानसिक आजाराच का असेना पणतो मला रोज भेटतो हेच माझ्यासाठी खुप आहे.उपचारानंतर तो मला कधीही दिसणार नाही म्हणुन आजपर्यँत ती उपचार न घेता तशीच राहीली...फक्त त्याच्यासाठी .,....मित्रांनो पौर्णिमाने प्रदीपवर केलेल्या नितांत प्रेमासाठी,त्या च्या एका भेटीसाठी तिला झालेल्या मानसिक आजारालाच तिनं आयुष्य बनवलं.म्हणुनच पौर्णिमेच्या आयुष्यात कायमची आमावस्या आली.


एक प्रेमकथाः

रिया कॉलेजला जात

असताना तिला कोणाचीतरी हाक ऐकु


,ती जागीच थांबली.एक मुलगा धापा टाकत


तिच्यापर्यँत आला..hi माझं नाव


शिरीष,तुला इथुन रोज जाताना पाहतो.तुला love


at first sight वर विश्वास आहे?...काय ?

(रिया खुपच दचकलेल्या आवाजात ओरडते).

ओरडु नको, मलाlove at first sight

ज्याला म्हणतात ना तेच झालंय तुझ्याशी.

रियाः मग मी काय करु? तोः frndship

रियाः आणि नाही केली तर.,


शिरीषः तु तुझ्या आयुष्यातील सुवर्ण


क्षणांना मुकशील।


रियाः असं! ठीक आहे मी करीन


तुझ्याशी मैत्री,बघुया तु काय करतोयस ते! पण


मला जर तुझ्याशी प्रेम झालं नाही तर?


शिरीषः फक्त सातच दिवसात तुला माझ्यावर


प्रेम होईल।


रियाः इतका over confidance,पडशी ल


तोँडावर


शिरीषः बघ पैज लावुन सांगतोय,फक्त


दिवसातला एक तासभर माझ्याबरोबर spend


करायचा.तुला आठवडाभरातच


माझ्याशी नक्की प्रेम होईल.नाही झालं तर


तुझी प्रत्येक शिक्षा मला मान्य असेल.


रियाः interesting मान्य एकदम मान्य.ठीक


आहे ur time will start from


tomarrow..by


पहील्या दिवशी ते भेटले,तो तिच्यासाठी एक


गुलाब घेऊन आला होता.ते


तिला आवडलं.तिला ताज होटेल


दाखविण्यासाठी घेऊन गेला.मस्त वातावरणात


आणि एकमेकांच्या साथीत,आणि महत्त्वाचं


म्हणजे तो स्पष्ट व बोलका असल्याने तो तास


कसा निघुन गेला कळतंच नाही.अशा तर्हेने


तो रोज


मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी तिला फिरवायला नेऊ


लागला,बघितले लेच स्पॉट/ ठीकाणे त्याच्यासोबत


बघण्यातलं वेगळेपण तिला स्पष्ट जाणवु


लागलं.त्याच्यात ला बोलकेपणा,त्याची


सहजवृत्ती,त्याच


त्याच्या  स्वभावातला गोडवा तिला आवडु


लागला.त्याच्यास सोबत असलं की ती सगळं विसरुन


जायची.ती फक्त आणि फक्त

आनंदी दिसायची. वेगवेगळी  ठीकाणे पाहण्यात


सहा दिवस कसे गेले तिला कळलंच


नाही.तिला खरंच त्याच्यावर प्रेमझालं


होतं.तिला त्याची सवयच


लागली होती.तो उद्यानंतर कदाचित मला भेटणार


नाही हिची तिला हुरहुर लागुन


राहीली होती.तो फक्तमाझा व्हावा असं तिला वाटु


लागतं.त्याच्याव विषयी असलेलं प्रेम व्यक्त करुन


टाकावं असं तिला राहुन राहुन वाटत होतं.पण


त्या पैजेचाविचार करुन


ती स्वतःला आवरघालायची.आजसा तवा दिवस


तो तिला संध्याकाळी समुद्रकिनारी घेऊन


गेला.आणि त्याने तिला डोळे


झाकायला सांगितले.तिच्या घड्याळाचा हात


आपल्या हातात घेऊन त्या घड्याळात


बघतो.बरोबर 6.15वाजल्यावर तिला डोळे


उघडायला सांगतो.तिने डोळे उघडताच,मावळतिकडे


झुकलेल्या सुर्याचीएका आकारात पडलेली किरणे


आणि त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिँब पाहुन


तिचं मन प्रफुल्लित


झालं.तो देखावा तिनेतिच्या डोळ्यात भरुन


घेतला.याबद्दल शिरीषचे ती मनापासुन आभार


मानते.शिरीष दुःखी मनाने म्हणतो,आज


सातवा म्हणजे


शेवटचा दिवस,मला माफकर,मला खरंच तु


आवडतेस.मला तुझ्यासोबतवेळ


घालवायचा होता,तुला जाणुन घ्यायचं


होतं.म्हणुनच मी तुझ्याकडुन सात दिवसाचा वेळ


मागुन घेतला.आणि या सात दिवसात


पुन्हा एकदा मी तुझ्या प्रेमात पडलो.पण


मी याबद्दल confident


नव्हतो की तुला माझ्या प्रेमात पाडु शकेन


की नाही ते.या सात दिवसात माझ्याकडुन


तुला काही चुकीची वागणुक मिळाली असेल तर i


m sorry असं म्हणुन तो निघुन


जातो.ती त्याच्याकडे बघतच राहीली.


रात्री त्याचं हेच बोलणं तिच्या मनात घोळत


होतं.रात्रीचे 11.55झालेले असतात.तिने ठरवलेलं


असतं की,आजचा दिवससंपल्यावरच म्हणजे


बारा वाजुन गेल्यावरच त्याला फोनवर i love u


म्हणायचं.हातातल्या  घड्याळाकडे ती उशीरपासुन


बघत असते..बरोबर12.0 5झाल्यावर


ती त्याला फोन लावते.शिरीश  तु पैज


हारलास.कारण सात दिवस आत्ता पुर्ण


झालेत.खरंच मीया दिवसांततुझ्या प्रेमात पडले

पण तरीसुद्धा संयम ठेवला आणि ते


कधी मी बोलले नाही.आता तु सुद्धा तुझी हार


मान्य कर.


शिरीषःहो बाई हारलो मी आत्तातरी love u


म्हण


रियाःआता ठीक आहे,आत्ता बोलायला काहीच


हरकत नाही.I LOVE U SHIRISH,I REALLY


LOVE YOU SO MUCH..


शिरीषःreally u love mi?


रियाःyah


शिरीषःठीकेय मग मी सांगतो तसं कर ok...तु


तुझ्या bedroomमधुन hallमध्ये जा.


रियाःok गेले....पुढे काय?


शिरीषःhallमधल्य ा घड्याळात किती वाजलेत


बघ?


रियाः11.50.अरे पण हे कसं शक्य आहे?


माझ्या घड्याळ्यात तर 12.05झालेत.


शिरीषःआपण


जेव्हा समुद्रकिनारी गेलो होतो,तिथे मी तुला डोळे


झाकायला सांगुन तुझा हात


हाती घेतला होता ना,तेव्हाच मी तुझं घड्याळ


पंधरा मिनिटे पुढे केलं होतं.कारण


अशी परिस्थीती येणार हे


मला माहीती होतं.आताबोल झालं ना बरोबर,सात


दिवसाच्या आत तुला माझ्यावर प्रेम?


रियाः smart...vry smart उद्या भेट


तुला सांगते.


शिरीषः sorry bt everything fair in love


&war... ♥♥

शब्दा वाचून तिला सगळ काही कळते



ती: खूप दिवसा पासून काही तरी विचारायचं होता... विचारू का?

तो: permission काय घेतेस... विचार जे विचारायच्या ते...

ती: तू रोज कविता का करतोस?

तो: मनातल सगळ सांगण्यासाठी...

... ती: मग कवितेत का रडतोस?

तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी...

ती: कशी सुचते रे कविता तुला ? कसे सुचतात रे शब्द ?

भिडते रे मनाला कविता तूझी, अन वाचून होते, मी रे स्तब्ध...

तो: कशी सुचते ते मला माहित नाही, पण लिहितो मी काही तरी...

शब्द नसतात ग त्यात, रचत मी भावनांची रांगोळी ...


ती: कोणासाठी लिहितोस रे ह्या सगळ्या कविता ?


तो: आहे कोणीतरी ... जी माझी असून हि माझी नाही...


ती: ह्म्मम्म्म.... दिसते रे कशी? राहते रे कुठे?


तो: दिसते ती परी सारखी, अन राहते......


हम्म्म्म..... राहते माझ्या हृदयात...


ती: (रागावून) नाही सांगायचं तर तस सांग... पण फुकट पकावू नकोस ..


तो: चालेल सांगतो, पण तू आता रागाऊ नकोस...


ती आहे परी सारखी , फक्त माझ्यशीच बोलणारी...


मनातल सगळ काही फक्त मलाच येऊन सांगणारी...


दररोज मला भेटणारी, अन माझ्या समोर बसून,


फक्त मलाच पाहणारी ....



Saturday 12 January 2013

प्रेम हेच जीवन ♥



♥ एक छोटीशी प्रेम कथा ♥
दररोज सकाळी अंधेरी स्टेशनला मला एक कप्पल दिसायचे.
ते दर वेळेस हसी मज़ाक गम्मत-जम्मत करत राहायचे ... 
मला ते अनोळखी होते. 
पण त्याना कुठे तरी पाहिल्या सारखे वाटे.
सो मी त्याना मिस्टर. व मिसेस शर्मा हे नाव दिले...
मी दररोज सकाळी त्याना पाहयचो.
माझ्या दृष्टिने ते एक हॅपी कप्पल होते.
ट्रेन ची वाट पाहत ते गप्पा मारत बसत आणि कधि कधि शांत बसत.
मला त्यांचे जाम आकर्षण होते.
लोकल आली की मिसेस शर्मा या मिस्टर शर्माच्या गळ्यात बॅग घलून देत
आणि नंतर त्यांचा हाथ पकडून त्याना गाडीत चढायाला लावत..
लोकल गाडीत चढले के मग ते सीट वर बसत
मी सामोर बसुन किवा बाजुला उभे राहुन त्याना पाहत बसे…
गाडीत बसले की मिस्टर शर्मा पेपर कढुन वाचत बसायचे
मिसेस शर्मा थोड़या वेळात बॅग मधुन लोकरिचा लाल कलर चा गोळा काढून स्वेटर विनत बसायचया.
त्या स्वेटर विनत असताना कधि कधि मिस्टर शर्मा त्याना मदत करायाचे
किवा लोकरिचा गोळा जवल धरूण बसायचे.
नंतर मला कॉलेज मुळे नाही जमायचे जायाला..
एक दिवशी तब्बल 5 महिन्याने ते मिस्टर शर्मा दिसले पण एकटे होते.
सौ सोबत नव्हत्या मी जवळ गेलो विचारले "ओळखले का मला… ? "
ते बोलले " हो तो तूच ना जो आम्हाला घुरुन बाघयचा…? "
मला या वाक्याचा राग आला नाहि
मी : तुमच्या बरोबार त्या लेडीज
असायच्या त्या आज नाही का…?
मिस्टर. शर्मा: शी पास्ड अवे
मी क्षणभर सुन्न झालो … मनात आक़ाशाचे काळे ढग जमा झाले...
20 मिनिट शांततेत गेली.. लोक लोकल मधून उतरत होती चढत होती..
मी : नक्की काय झाले ?
ते: अरे तिला कॅन्सर होता पण माझ्या जवळ दररोज राहता यावे
म्हणून मला सोडयाला यायची ऑफीसला.....
ऑफीसला सोडले की जायची घरी..
बस ती त्याचयात खुश होती..
खूप प्रेम होते तिचे माझ्या वर आणि माझे तिच्यावर
दोन जीव एक प्राण होतो आम्ही....
कधी एकमेकांच्या पासून दूर राहिलो नाही.......
आज तिच्या शिवाय जगायला लागत आहे...
मी ठरवले होते तिच्या सोबतच मरायचे..
पण तिने माझ्या कडून वचन घेतले होते कि,
तुम्ही या मिळालेल्या जीवनात जगायचे आहे.....
पुढचा जन्म आपण दोघे एकत्रित घालवूयात....
मी तिच्या सोबत वेळ घालवण्यासाठी
तिला भेटायला रोज समशान भूमीवर जातो.
ती मला रोज भेटते.
तिच्या असण्याच्या भास मला होतो
ती माझ्या जवळच कुठे तरी आहे असे वाटते........
आणि बस आता जगतो आहे, तिच्या फक्त आठवणीत.....
कधी मरण येईल आणि कधी पुढचा जन्म मला मिळेल आणि कधी आम्ही भेटू वाट बघतो आहे...
मला काहिच सुचेना…
बांद्रा स्टेशन ला ते उतरले मला हसू की रडू कळत नव्हते ..
आणी इतक्या वेळा पासून मी त्यांच्या सोबत बोलत होतो
जेव्हा ते जात होते मी त्यांच्या कडे बघत होतो
तेव्हा माझ्या लक्षात आले त्या शर्माजिंनी लाल कलर चे स्वेटर घातलेले
दिसले ते पण अर्धेच होते एकच साईड ची बाही पूर्ण असलेले….
बस मला कळले पुस्तकातील प्रेम, मुव्ही मधील प्रेम जे पहिले होते
ते साक्षात माझ्या समोर होते.... ते प्रेम मी आज अनुभवले..
किती प्रेम शर्माजींचे पण त्यांच्या बायकोवर आहे....
आणि या सत्य प्रेम कथेचा खरच मी एक भाग होतो…
मित्रानो प्रेम करा अगदी मनापासून करा.....
प्रेम हेच जीवन.....
प्रेम करत राहा....

♥एक घडलेली सत्य कहाणी


♥काळजीपुर्वक वाचा:ही कहाणी केनियामध्ये घडली,आई वडीलांची परिस्थिती गरीबीची असताना देखील 

त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका 

मुलाला उच्चशिक्षण दिलं,इंजिनियरीँगमध्ये पदवीधर झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी त्याला शहरात पाठवण्यात आलं.शिक्षणपुर्ण 


होता होता एका श्रीमंत मुलीच्या तो प्रेमात पडला,लग्न करुन तो तिला आपल्या गावी घेऊन गेला कि जे एक खेडं होतं.आई वडीलांनी 


मुलाच्या पसंतीला मान देऊन मुलीला हसत हसत स्वीकारलं.आई वडील मुलगा आणि सुन आनंदाने राहु लागले,पण ऐशोआरामीच्या 


जीवनाची सवय असणार्या त्या मुलीला ग्रामीण जीवनाचा कंटाळा येऊ लागला.एक दिवस तिला वर्तमानपत्रात ज्युबामध्ये(सुदान या 


देशातील एक शहर) नोकरीसाठी vacany आहे असं कळलं,तिने नवर्याला सांगितलं,तिकडे जाण्यासाठी दोघांनी आईचा वडीलांचा 


आशिर्वाद घेतला,जाताना आई त्याला म्हणाली तु सर्वात यशस्वी होशिल पण तिथे गेल्यावर आम्हाला कधीही विसरु नको...ते दोघे 


निघुन गेले त्याला नोकरी मिळाली.आठवड्याला आई वडीलांना पैसे पाठवु लागला.पण बायकोच्या 

सांगण्यावरुन त्याने पैसे पाठवणे 

बंद केले.चाळीस वर्षे उलटली.तो न चुकता दर रविवारी चर्चमध्ये जायचा प्रे करायचा.आजही गेला पण पाद्रीने त्याला सांगितलं की आज 


तुझी प्रेयर देवाने मान्य केली नाही.त्याने पाद्रीला कारण विचारले पण ते त्यालाही माहीती नव्हते,मग त्याच्या नातेवाईकाने सांगितले 


की तु तुझ्या आई वडीलांना जाऊन भेटुन ये कदाचित तुझी प्रेयर देव मान्य करेल,तो केनियामधल्या आपल्या गावी गेला,गाव पुर्णतः 


बदलले होते,त्याला घर शोधता येईना.त्याने एका लहान मुलाला पत्ता विचारला,मुलगा पत्ता शोधुन द्यायला मदत करु लागला.वाटेत 


त्याला एक पडकं घर दिसलं,त्याने त्या लहान मुलाला ईथे कोण राहतं असं विचारलं.तो मुलगा म्हणाला,लोक म्हणतात इथे 40 


वर्षापुर्वी "आई वडील त्यांचा मुलगा आणि सुन राहायचे,पण एक दिवस मुलगा आणि सुन परदेशी निघुन गेले नोकरीसाठी,आणि 


त्यानंतर आता इथे फक्त एक आजी रोज रडत,विव्हळत पडलेली असते."तो एकदम शांत झाला आणि त्याने त्या घरात प्रवेश 


केला,एक म्हातारी विव्हळत पडली होतीँ,कन्हत होती,रडत पडली होती.सुरकुत्या पडलेल्या तिच्या चेहर्यावरुन एक अश्रु वाहत 


होता.आणि आवाजही न फुटणार्या तिच्या तोँडातुन ती म्हणाली,"देवा मी आता खुप म्हातारी आणि आंधळीही झालीय.माझा नवरा 


मरुन पाच वर्षे झाली,त्यामुळे मला हिँमत देण्यासाठी माझा नवराही नाहीये,मृत्युला जास्त वेळ टांगुन ठेवणं आता कठीण 


जातंय,माझी शेवटची इच्छा आहे की माझ्या मुलाला एकदा माझ्याजवळ पाठव....मित्रांनो हीच त्या म्हातारीची एकमेव इच्छा होती जी 


देवाने मान्य केली.मानवाचे शरीर जास्तीत जास्त ४५del(युनिट)चं दुखणं(दर्द)सहन करु शकतं,पण त्या आईने आत्तापर्यँत ५७ 


delपर्यँतचं दुखणं सहन केलं होतं,म्हणजे जवळजवळ एकावेळी बारा हाडे मोडण्याईतकं.हे कसं शक्य आहे?फक्त आणि फक्त ही ताकद 


मातृत्वातच असते.निष्कर्षःलग्न हे इतकं महत्त्वाचं नसतं की मातृत्वाचं नातं पुसुन टाकु शकेल.लग्न दुसर्यांदाही होतंच पण आई 


आपल्याला एकदाच मिळते,पुन्हा नाही...ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि जर ही कथा वाचुन तुमच्या मनातल्या भावना 


डोळ्याशी अश्रु बनुन जमा झाल्या असतील तर त्यांना कमेँटमध्ये उतरवा...

सुंदर प्रेम कहाणी..♥♥♥♥♥♥


सुंदर प्रेम कहाणी..♥♥♥♥♥♥
रोज सकाळी बरोबर आठ वाजता मि. जॉन माझ्या स्टोअरमधे येतात. ते न चुकता रोज गुलाबाची ताजी 

फुले वीकत घेतात. तसेच माझ्या स्टोअरमधे मीळणारे काही मोजकेच पण ताजे खाद्य पदार्थ वीकत 

घेतात.बरोबर साडे आठ वाजता स्टोअरमधुन बाहेर
पडतात. गेली पांच वर्षे त्यांचा हा उपक्रम चालु आहे. उन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, बर्फ 

असो, त्यांच्या या प्रोग्रॅम मधे खंड पडलेला नाही. मधे त्यांची तब्येतबरी नव्हती तरी सुध्धा ते नीयमीतपणे 

येत होते. ते रोज गुलाबाची फुले घेतातम्हणजे नक्कीच आपल्या बायकोसाठी घेत असणार! त्यांचे त्यांच्या 

बायकोवर फारच प्रेम दीसते!
एक दीवशी जरा मोकळा वेळ होता तेव्हा मी जॉन साहेबांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. तसे ते 

फारमीतभाषी. कधी कोणाशी फारसे बोलत नाहीत. पण त्यांचा मुड पण जरा वेगळा दीसत होता.
” फुले कोणासाठी? बायकोसाठी वाटत!” मी प्रश्न केला

” बायको?” जॉनसाहेब क्षणभर गोंधळले व म्हणाले, ” नाही! मी अनमॅरीड आहे!“
“मघ ही फुले?” मी विचारले
” ती माझ्या मैत्रिणीसाठी!” जॉनसाहेब उत्तरले.

“मैत्रीण?” मी जरा खोचकसारखे विचारले.
” शाळेमधे असताना आमचे प्रेम प्रकरण होते. पण त्याला बरीच वर्षे झाली. मग तिचे लग्न झाले आणि मी 

अनमॅरीड राहिलो.” सहज सांगावे तसे जॉनसाहबांनी सांगीतले.
“तुमची मैत्रीण इथेच असते कां?” मी विचारले
“हो इथेच असते, हॉस्पीटलमधे!” जॉनसाहेब म्हणाले.
“हॉस्पीटलमधे?” मी म्हणालो.
“होय! गेली दहा वर्षे ती हॉस्पीटलमधे आहे. कार ऍक्सीडेन्टमधे तिचा नवरा गेला. तिच्या डोक्याला 

जबरदस्त मार लागला. त्यामुळे ती स्मृती हरवुनबसली आहे. कोणाला ओळखत सुध्धा नाही. मी रोज 

सकाळी बरोबर नऊ वाजता तिच्याबरोबर ब्रेकफास्ट घेतो.” जॉनसाहेब म्हणाले
” पण ती तुम्हाला तरी ओळखते कां?”मी जॉनसाहेबांना विचारले
“बहुतकरुन नसावी!” जॉनसाहेब म्हणाले. “तिला एव्हडेच ठाऊक आहे की रोज सकाळी नऊ वाजता 

कोणीतरी एकमाणुस तिच्याबरोबर ब्रेकफास्टघ्यायला येतो. याची तिला येव्हडी सवय झाली आहे की जर 

एखाद्या दीवशीमी गेलो नाही तर ती दीवसभर उपाशी बसते.“
जॉनसाहेबांच्या सामानाची पीशवी त्यांच्या हातात देताना मी त्यांना विचारले, ” पण तिचे तुमच्यावर प्रेम 

आहे कां?”
“ठाऊक नाही!” सामानाची पीशवी उचलताना जॉन साहेब म्हणाले, “पण माझे तिच्यावर प्रेम आहे ना!“
वयाच्या सत्तरीत सुध्धा आपल्या प्रेयसीवर निरपेक्षपणे प्रेम करणार्याल जॉनसाहेबांना बघुन माझे डोळे 

भरुन आले. माझे आश्रृ आनंदाचे होते, कृतज्ञतेचे होते की आणखी कशाचे होते माझी मलाच कळले 

नाही......

Friday 11 January 2013


मनाला स्पर्श करून जाणारी एक छोटी मनोव्यथा...

"मला तो अजिबात आवडत नाही. तो त्याचे मित्र खूप irretate करतात मला , मला तो आवडत नाही माहित असून सुधा त्याने माझा खूप वेळा पाठलाग केला माझ्याशी येऊन बोलण्याचा प्रयत्न केला ..मी त्याला 
प्रत्येक  वेळी उडवून लावलं तरी त्याच्यात किंचित हि फरक नाही पडला,खुपदा तो मला अचानक दिसायचा कधी भाजी मंडई मध्ये तर कधी बस stop वर माझ मत त्याचाविषयी कधीच चांगले न्हवते ,मला तो कधीच आवडला न्हवता , आवडत नाही आणि आवडणार हि नाही ,आज माझे college संपून ६ महिने झाले होते आज मी बँकेत गेले होते entrance exam ची पैसे भरण्याची आजची शेवटची मुदत होती आणि बँक मध्ये खूप मोठी रांग लागली होती , मी मनाशी म्हटले आज जर पैसे भरू नाही शकले तर १ वर्षे फुकट जाणार ,आणि माझ्या ३-४ लोकांच्या पुढे तो उभा होता , मी म्हटले ह्याला पण हीच वेळ मिळावी....माझा मूड खूप खराब झाला त्याला पाहून पण त्याचे माझ्याकडे लक्ष नवते आणि माझी खास मैत्रीण सुधा अजून आली नवती कुठे अडकली असेल मी विचार करीत होते ,पूर्ण अर्ध्या तासाने माझा number आला cashier ने पैसे
मागितले मी पैसे घेण्यासाठी पर्स काढली आणि मला धक्का बसला त्यात पैसे कुठे होते मी खूप गोंधळले माझा चेहेरा लाल झाला मला रडू कोसळले कारण आता पैसे भरण्यासाठी फक्त १५ मिनिटे राहिली होती, रांगेतले लोक खूप ओरडू लागले तेव्हा cashier च्या खिडकीतून कोणीतरी हात पुढे केला हातात ७५० रुपये होते cashier ने पण पटकन पैसे घेत माझा फॉर्म काढून हातात दिला हे सर्व इतक्या झटपट झाले कि मी पाहण्या शिवाय काहीच करू नाही शकले ,ती व्यक्ती म्हणजे तोच होता.... मला आता समजेना काय करावे thank you म्हणावे कि तू माझे पैसे का भरलेस विचारावे त्याला बहुतेक समजले कि मी काय विचार करतेय त्याने सरळ बाहेरचा रस्ता धरला , क्षणात तो निघूनही गेला मी विचार करू लागले कि इतक्या वर्षात त्याने कित्येक वेळा त्याने मला विचारले मी त्याचा तिरस्कार करताना सुद्धा,भलेही त्याचे मित्र इतके चांगले नसतील पण त्याने मला कधीही फारसा त्रासही दिला न्हवता इतक्या वर्षात मी त्याचा पहिल्यांदा विचार करीत होते ...माझी मैत्रीण हि आली इतक्यात तिला मी सर्व हकीकत सांगितली ...मक्ख मनाने मी घरी परतले , माझ्या मनाची अशी अवस्था झाली होती कि जी मलाच समजत नवती घराचा दरवाजा उघडला तर समोर टेबलावर विसरलेले ७५० रुपये दिसले ..खूप दिवस विचार केल्यानंतर मी निर्णय घेतला कि त्याला thank you बोलायचे म्हणून ...आज या घटनेला ३ वर्षे उलटून गेली आहेत पण thank you म्हणायला तो भेटलेला नाही खूप शोधले त्याला ,आता मला माझाच राग आहे त्याचवेळी thank you बोलायला हवे होते मी...मनात एक प्रकारची feeling आहे जी नाही व्यक्त करू शकत
मानस ओळखायला आपण इतकी मोठी चूक कशी करू शकतो....
हि note वाचायला मिळाली तर नक्की एकदा भेट मला thank you म्हणायचं तुला आणि माफ हि करायचं स्वताला..
दुसर्या विषयी न जाणता chukiche मत बनवणे योग्य नाहीये समजलंय मला
काही निर्णय वेळेनुसार बदलूही शकतात ...
please ..
भेटशील ना? ? ?

अश्रुंची कहाणी................





एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......


'ए आपण असे कसे रे


ना रंग, ना रूप,


नेहमीच चिडीचुप,


आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,

दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,

कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,

किनारा ही नाही साधा या पापण्याला............

दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,

खुप विचार करून तो बोलला,

रंग-रूप नसला तरी,

चिडीचुप असलो जरी,

आधार आपण भावनांचा,

आदर राखतो वचनांचा,

सान्त्वनांचे बोल आपण,

अंतरीही खोल आपण,

सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,

दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,

आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,

बंधनात नाही कोणी बंधवु शकत,

उद्रेक आपण मनातील वेदनांचा,

नाजुक धागा वचनातील बंधनांचा,

भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,

स्वरबद्ध झंकार तनातील स्पंदनांचा ,

म्हणुनच,

आपले बाहेर पड़णे भाग आहे,

आपल्यामुळेच आज हे जग आहे.

अशीच आपली कहाणी.........

ऐकून ही अश्रुंची वाणी

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी......

आयुष्यात खुप माणसं येतात जातात .....







आयुष्यात खुप माणसं येतात जातात .....

काही माणसं मेहंदी सारखी असतात

कोरा असतो हात .... ती अगदी अलगदपणे हातावर उतरतात ......

त्यांची नाजुक नक्षी आणि तो मेंदीचा धुंद करणारा सुगंधही आपल्या जीवनात घेउन येतात....

खुप हरवून जातो आपण त्यांच्या रंगात... रंगत जातो....

आणि मग हलू हलू ... तो रंग... तो वास फिकट होंत जातो.....

आणि त्या माणसाचे अस्तित्व पण दूर होते आपल्या आयुष्यातून..

पुन्हा तो कोरा हात आणि मनात त्या रंग, सुगंधी, नक्षीदार आठवणी.....

तर काही माणस असतात ती तळ्यात पड़णlऱ्या दगडासारखी ....

शांत पाण्यात खळबलात माजवनारी......

ती पाण्यात पडताच तरंगावर तरंग येतात जीवनात .....

अनपेक्षीतरित्या येतात ही माणस ... धवलून काढतात जीवन....

मग कधी खालचा गाळ ही वरती येतो.... गधूळता वरती येते आपल्या जीवनातली.....

आपण सवारेपर्यंत तो गाळ जगासमोर येतो आणि ही माणस गायब होतात

त्या तलाताच खोल कुठेतरी

तर कधी काही माणस असतात मृग जला सारखी ......

त्यांच्या मागे आपण धावत असतो...ओढीने... l

पण ती तर मृगजळच ना....न हाती येणारी.....

तरीही त्या तहानलेल्या जीवाला दुसर काही दिसतच नाही..







कुणीतरी विचारले तिला..., " तो " कुठे आहे....??

हसत उत्तर दिले तिने ....

माझ्या श्वासात...,
माझ्या हृदयात...,
माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात तो आणि फक्त तोच आहे....

यावर पुन्हा विचारले गेले मग..., " तो " कुठे नाही......??

तिच्या ओल्या डोळ्यांनीच तिचे उत्तर दिले...

" माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात...." ♥♥♥