मनाला स्पर्श करून जाणारी एक छोटी मनोव्यथा...
"मला तो अजिबात आवडत नाही. तो त्याचे मित्र खूप irretate करतात मला , मला तो आवडत नाही माहित असून सुधा त्याने माझा खूप वेळा पाठलाग केला माझ्याशी येऊन बोलण्याचा प्रयत्न केला ..मी त्याला
प्रत्येक वेळी उडवून लावलं तरी त्याच्यात किंचित हि फरक नाही पडला,खुपदा तो मला अचानक दिसायचा कधी भाजी मंडई मध्ये तर कधी बस stop वर माझ मत त्याचाविषयी कधीच चांगले न्हवते ,मला तो कधीच आवडला न्हवता , आवडत नाही आणि आवडणार हि नाही ,आज माझे college संपून ६ महिने झाले होते आज मी बँकेत गेले होते entrance exam ची पैसे भरण्याची आजची शेवटची मुदत होती आणि बँक मध्ये खूप मोठी रांग लागली होती , मी मनाशी म्हटले आज जर पैसे भरू नाही शकले तर १ वर्षे फुकट जाणार ,आणि माझ्या ३-४ लोकांच्या पुढे तो उभा होता , मी म्हटले ह्याला पण हीच वेळ मिळावी....माझा मूड खूप खराब झाला त्याला पाहून पण त्याचे माझ्याकडे लक्ष नवते आणि माझी खास मैत्रीण सुधा अजून आली नवती कुठे अडकली असेल मी विचार करीत होते ,पूर्ण अर्ध्या तासाने माझा number आला cashier ने पैसे
मागितले मी पैसे घेण्यासाठी पर्स काढली आणि मला धक्का बसला त्यात पैसे कुठे होते मी खूप गोंधळले माझा चेहेरा लाल झाला मला रडू कोसळले कारण आता पैसे भरण्यासाठी फक्त १५ मिनिटे राहिली होती, रांगेतले लोक खूप ओरडू लागले तेव्हा cashier च्या खिडकीतून कोणीतरी हात पुढे केला हातात ७५० रुपये होते cashier ने पण पटकन पैसे घेत माझा फॉर्म काढून हातात दिला हे सर्व इतक्या झटपट झाले कि मी पाहण्या शिवाय काहीच करू नाही शकले ,ती व्यक्ती म्हणजे तोच होता.... मला आता समजेना काय करावे thank you म्हणावे कि तू माझे पैसे का भरलेस विचारावे त्याला बहुतेक समजले कि मी काय विचार करतेय त्याने सरळ बाहेरचा रस्ता धरला , क्षणात तो निघूनही गेला मी विचार करू लागले कि इतक्या वर्षात त्याने कित्येक वेळा त्याने मला विचारले मी त्याचा तिरस्कार करताना सुद्धा,भलेही त्याचे मित्र इतके चांगले नसतील पण त्याने मला कधीही फारसा त्रासही दिला न्हवता इतक्या वर्षात मी त्याचा पहिल्यांदा विचार करीत होते ...माझी मैत्रीण हि आली इतक्यात तिला मी सर्व हकीकत सांगितली ...मक्ख मनाने मी घरी परतले , माझ्या मनाची अशी अवस्था झाली होती कि जी मलाच समजत नवती घराचा दरवाजा उघडला तर समोर टेबलावर विसरलेले ७५० रुपये दिसले ..खूप दिवस विचार केल्यानंतर मी निर्णय घेतला कि त्याला thank you बोलायचे म्हणून ...आज या घटनेला ३ वर्षे उलटून गेली आहेत पण thank you म्हणायला तो भेटलेला नाही खूप शोधले त्याला ,आता मला माझाच राग आहे त्याचवेळी thank you बोलायला हवे होते मी...मनात एक प्रकारची feeling आहे जी नाही व्यक्त करू शकत
मानस ओळखायला आपण इतकी मोठी चूक कशी करू शकतो....
हि note वाचायला मिळाली तर नक्की एकदा भेट मला thank you म्हणायचं तुला आणि माफ हि करायचं स्वताला..
दुसर्या विषयी न जाणता chukiche मत बनवणे योग्य नाहीये समजलंय मला
काही निर्णय वेळेनुसार बदलूही शकतात ...
please ..
भेटशील ना? ? ?
No comments:
Post a Comment