Monday 26 March 2012

एक रोप प्रेमाचं...

माझा एक मित्र आहे. कॉलेजमध्ये सर्व जण करतात तसे त्यानंही बरेच उद्योग केले. पोरींना भरपूर त्रास दिला. सरांची नक्कल केली. कॅंटीनचे पैसे बुडवले. "फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहिले. दर महिन्याला त्याच्या अंगावर नवा शर्ट असायचा. तो नेहमी म्हणायचा. "जन्माला आलोय तर फुल्ल ऐष करणार, प्रेमाबिमात नाही पडणार' त्यानं त्याच्या बाईकरवही "आय हेट गर्ल्स' असंच लिहिलं होतं. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यामुळं लाडातच मोठा झालेला. शिवाय त्याच्या सोसायटीत भरपूर मुली. त्यामुळे मुलींचं त्याला तसं काही सोयरसुतक नव्हतंच. पोरींशी बिनधास्त बोलायचा. अभ्यासात हुशार नव्हता; पण खेळाची कमालीची आवड होती त्याला. कायम खिदळत असायचा. पण... पण आज त्याच्या चेह-यावरचं हसू कुठल्या कुठं पळून गेलंय. तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. गोरीपान आणि देखणी मुलगी होती ती. कसलाही विचार न करता त्यानं तिला बिनधास्त प्रपोज केलं होतं. ती होस्टेलला राहायला होती. सहा महिने तो तिच्या मागं लागला होता.
खरं प्रेम केलं होतं त्यानं. त्यामुळं त्या मुलीनंही होकार दिला. त्याचा स्वभाव निर्मळ होता. पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात वाढला असला, तरी त्याच्यावर आई-बाबांचा धाक होता. त्यामुळं त्यानं प्रेमाविषयी त्यांना काही सांगितलं नव्हतं. त्याची हिंमतच होत नव्हती.
तो तिच्यासोबत नेहमी खडकवासल्याला फिरायला जायचा. खडकवासल्याच्या पुढे पानशेत रस्त्याशेजारी एका ठिकाणी ते गप्पा मारत बसायचे. एकदा ते असेच फिरायला निघाले तेव्हा त्याच्या प्रेयसीनं एका कॅरीबॅगमध्ये छोटंसं रोपटं घेतलं होतं. आपण बसतो ना, तिथं मी हे रोप लावणार, अशी तिची कल्पना ऐकून तो पोट धरून हसला होता. त्याच्या हसण्यानं ती रुसूनही बसली होती. कसंबसं तिचा रुसवा घालवत दोघं त्या ठिकाणी गेले. दोघांनी तिथं रोपटं लावलं. सोबत पाण्याची बाटली होती. त्या रोपट्याला पाणीही घातलं. आठवड्यात एकदा तरी त्यांची तिथं चक्कर व्हायचीच. दर वेळी ते दोघं त्या रोपट्याशेजारी गप्पा मारत बसायचे.
एके दिवशी ती गावी निघाली. तो आईसोबत मावशीकडे गेला होता. त्यामुळं त्या दोघांना भेटता आलं नाही. शिवाय ती दोन दिवसांनी परत येणार होतीच. त्यामुळं नको येऊ भेटायला, असं तिनंच सांगितलं होतं. घरी पोचल्यावर फोन कर असं सांगून त्यानं फोन ठेवला. तिचा फोन आला नाही, म्हणून त्यानं फोन केला; पण कुणीच उचलला नाही. घरी गेल्यानं मला विसरली वाटतं, असा राग मनात धरून त्यानंही परत तिला फोन केला नाही. दुर्दैवानं दुस-या दिवशी मला समजलं, तिचा अपघातात मृत्यू झाल्याचं. त्याला ही बातमी कशी सांगायची तेच सुचत नव्हतं. खूप धाडस करून मी त्याला सांगितलं. हळव्या मनाचा होता तो. जागेवरच खाली बसला अन्‌ मोठमोठ्यानं रडायला लागला. आवरणार तरी कसं त्याला? माझ्या गळ्यात पडून रडू लागला. क्षणाचाही विचार न करता त्यानं गाडी काढली. मला पाठीमागं बसवलं अन्‌ आम्ही तिच्या गावाकडं गेलो; पण काही उपयोग नाही. सर्व काही उरकलेलं होतं. तिथं त्यानं स्वत:ला सावरलं. तो तिथं रडला असता, तर तिथल्या लोकांना संशय आला असता. आम्ही तिच्या बाबांना भेटलो अन्‌ अर्ध्या तासात माघारी फिरलो.
मला वाटलं, आम्ही घरी येतोय. पण आमची गाडी खडकवासल्याकडं निघाली होती. मी काही बोललो नाही. पानशेत रस्त्याशेजारी त्यानं गाडी थांबवली अन्‌ एका झाडाला पकडून तो मोठ्यानं रडू लागला. त्यानंतर दररोज तो तिथं जात होता अन्‌ झाडापाशी बसून मुसूमुसू रडत होता. आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय. आता त्याचा स्वभावही बदलला आहे. एखाद्या शांत मुलाप्रमाणं तो वागतोय.
त्याच्या आई-बाबांना याविषयी काहीच माहिती नाही. तो घरात काही बोलतही नाही. फक्त रात्रीच्या वेळी तिनं त्याला दिलेली लेटर वाचतो. तिनं दिलेलं गुलाबाचं फूल आता सुकलंय. ते एकटक बघतो अन्‌ उशीत तोंड खुपसून रडतो. तो म्हणतो, ""ते झाडच आता माझं सर्वस्व आहे. त्या झाडाच्या पानाफुलांत मी तिला शोधतो. लोक झाडावर प्रेम करा असं म्हणतात;पण मी प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सांगीन, की तुम्हीही असं एखादं रोपटं लावा. तुमची "लव्ह स्टोरी' माझ्यासारखी अर्धवट राहणार नाही. खरं प्रेम असेल, तर ही निःस्वार्थी रोपं खूप काही देतात. मी स्वत: हे अनुभवतोय.''

Friday 23 March 2012

एक दिवस असा होता की.................

एक दिवस असा होता की.................
एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वा...ट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

थंडीची उब थंडी वाढत चालली होती... बहिणीला स्वेटर घेण्याइतके पैसे भावाकडे नव्हते.. घरात कापड हि नव्हती.. जी पांघरता आली असती... मजुरीचे पैसे जेवण घेण्यात गेले होते... घरी आल्यावर ती म्हणाली "दादा अरे आज थंडी पडलीये रे खूप..." विनीत म्हणाला:आग हो तू एक काम कर... मला गरम होतंय ग... तू माझा shirt घाल आणि झोप... रात्र वाढली थंडी वाढली...विनीत च्या द|तानच्या कडकण्याच्या आवाजाने ती जागी झाली... आणि तिला माहित होत दादा बोलणारच नाही ... तिने एक स्वेटर विणल होत ते तिने हळूच अंगावर घटल त्याच्या,.... आणि सकाळी उठण्या आधी स्वेटर काढलं असं रोज चालायचं एक दिवस विनीत ने सकाळी उठल्य्वर म्हटलं "अग तुला माहितीये मला जराहि थंडी वाजत नाही रात्रीची...." :))) आणि ती मनातल्या मनात हसायची आणि म्हणायची "वेड्या दादाची वेडी हि माया..." ;) आयुष्यत दुसर्यांना ममता द्या ती तुमच्या कडे तशीच येते कि नाही ते पहा

जुन्या आठवणी एक वेगळाच आनंद देऊन जातात..

कधी कधी मला माझ्या जुन्या आठवणी एक वेगळाच आनंद देऊन जातात.. नाही म्हटलं तर थोडा का होईना - एक फ्रेश मुड.... तुम्हाला आठवतयं:

१. तो दुरदर्शनचा गोल-गोल फिरत येणारा लोगो
२. दुरदर्शनचा तो पट्ट्या-पट्ट्याच स्र्कीनसेव्हर
३. मालगुडी डेज
४. देख भाई देख
५. रामायण
६. मिले सुर मेरा तुम्हारा
७. टर्निंग प्वाइंट
८. भारत एक खोज
९. आलिफ लैला
१०. ब्योमकेश बक्षी
११. तहकीकात
१२. ही मॅन
१३. सलमा सुलताना - ती दुरदर्शनवरची न्युज रीडर
१४. विको टरमरिक, नहीं कौस्मेटीक.... विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम
१५. ट्वँ.........ग!
वाशिंग पाउडर निरमा.. वाशिंग पाउडर निरमा.
दुध सी सफेदी, निरमा से आयी...
रंगीन कपडेभी खिल-खिल जायें!
१६. आय ऐम कौम्प्लॅन बौय [शाहिद कपुर] आणि आय ऐम कौम्प्लॅन गर्ल [आयेशा टाकिया]
१७. "सुरभि" वाले रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ
१८. आणि त्यानंतरचे - "मुंगेरीलाल जे हसिन सपने", करमचंद, विक्रम वेता़ळ आणि असे बरे........च!

८० आणि ९० सालचा काय काळ होता तो!
नो सिटबेल्टस् ... नो एअरबॅग्ज .... ट्रकच्या मागच्या 'फाळक्यात' बसणेही एक मेजवाणी असायची!
लहाण मुलांच्या त्या रंगबिरंगी "बाबा-गाड्या" ... "टॅपरप्रुफ बौटल टौप्स" चा आता-पता ही नाही!

सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्डचा तुकडा लाऊन त्याचा फटरररररार - मोटार सायकल सारखा - आवाज करत तासन् तास फिरायचे.. त्या सायकलच्या शर्यती... नो सेप्टी हेल्मेट्स, नो क्नी / एल्बो पॅड !

तहाण लागली की नळालाच तोंड लाऊन पाणी पिणे.. बौटल्ड वौटर - एक रहस्यच होते!

ते पोष्टाची तिकीटं... काडीपेटीचे कव्हर्स आणि बरंच काही जमा करण्याचा आणि जोपासण्याचे छंद!

सुट्टीच्या दिवशी, दिवसभर उनाडक्या - खेळ.. मात्र अंधार व्हायच्या आत घरी, ब-याचदा अगदी जेवणाच्याच वेळी!
खेळाच्या नादात अनेकदा पडलेले दात, खरचडले हात - पाय ... मात्र कुणीही तक्रार करायची नाही!
मित्रांसोबत चालत शाळेत जाणं... मोबाईलशीवायही आम्ही एकमेकांना नेहमीच शोधुन काढत असू! कसं? काही माहित नाही..!
खाण्यात अगदी केक, ब्रेड, चौकलेटस्, निंबुपाणी, साखरेचा तो आले-पाक... सगळं चालायचं... नो डायट - नथिंग!!
मित्रांना खेळायला बोलवाची ती ट्रीक - बेल न वाजवता अगदी चुपचाप मागच्या रस्त्याने जाणं...
बॅटच्या जागी ते लाकडी फळीचे क्रीकेट, त्या आट्या-पाट्या, सुरपारंब्या... डौक्टर - डौक्टर, लपाछपी ... असे किती तरी खेळ....
परीक्षेत नापास झालो तरी त्याच ग्रेडवर - वरच्या वर्गात ढकलला - अशी सोय..... नो नीड टु विजिट सायकॅट्रिस्ट, सायकोलोजिस्ट वा कौन्सेलर्स...
..... काय दिवस होते ते...!
स्वातंत्र्य, यश, अपयश , जबाबदा-या ... आणि या सर्वांसोबत एकमेकांबद्दल कमालीचा आदरही द्यायला अन् घ्यायलाही शिकलो..
................
.........................
................................

तुम्ही ही याच 'कालखंडातील' आहात का? .. हो..! तर मग मित्रांनाही याचा उल्लेख करा.... काय सांगावे कदाचित हे वाचुन तुम्हाला - तुमचा अन् मित्रांचा थोडा स्ट्रेस कमी होईल... नाहीच झाला तर वाढणार नाही हे मात्र नक्की...

एक कडवे सत्य

एक कडवे सत्य
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
आणि
सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे
.........."विश्वास"..............
प्रत्तेक क्षणाला कोणाचा ना कोणाचा कोणावर तरी विश्वास बसतो
आणि
कोणाचा ना कोणाचा कुणावरून तरी विश्वास उडतो."
जगात एकाच गोष्टीवर तुम्ही अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकता,
आणि ती गोष्ट म्हणजे "निसर्ग"
कारण तो स्तब्ध राहतो.
बदलतात ती माणसं.....

एका युवकाची….. अधुरी एक कहाणी

एका युवकाची आणि एक मुलीची ओळख झाली आपल्या Facebook माध्यमातून,,,,रोजच
online बोलन सुरु झाल…ते एवढे चांगले मित्र झाले कि एकमेकांशी गप्पा
मारल्या शीवाय ते रहात नसत…. या काळात अनेक वेळा भांडण आणि पुन्हा मैत्री
असे घडू लागले…किमान ३ ते ४ महिने हे असेच चालू होते…परंतु त्या युवकाने
तिला कधीच प्रेमाविषयी सांगितले नाही….
आणि एकदिवस चक्क त्या
मुलीने त्............याला विचारले. तू माझ्यावर प्रेम करतोस? दोघांनी
एकमेकांना समोरासमोर कधीच पाहिले नव्हते. फक्त फोटो पाहिले होते….तिच्या
त्या प्रश्नावर त्या युवकाने उत्तर दिले. हो. करतो मी प्रेम तुझ्यावर म
त्या युवतीने त्याला विचारले याआधी तू का नाही बोललास ? युवक म्हटला मला
माहित नव्हत तू माझ्यावर प्रेम करतेस का ते? पण मी तुझ्यावर प्रेम करतो असे
सांगितले आणि तू मैत्रीही नाही ठेवली तर? अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी
होकार मिळाला आणि रोजचा गुड मोर्निंग हा शब्द आय. लव. यु कडे वळला…..हळू
हळू फोन वर बोलन चालू झाल. आणि ओर्कुट वरील मैत्री एवढ्या छान प्रेमात
बदलली कि एकही दिवस किंवा एकही क्षण दोघांशिवाय न रहाण्याच्या शपथा हे दोघे
घेऊ लागले…
वेळ आली ती भेटण्याची दोघांनाही आतुरता होतीच
खरी….पण तीच त्याला नेहमीच आमंत्रण असायचं…हा मात्र कामामुळे जाऊ शकत
नव्हता….या प्रेमाची बातमी चक्क मुलीच्या आईला समजली पण कोणी एवढ मनावर
नाही घेतलं….त्या मुलानेही ठरविले कि आपण भेटायला जायचे….पुण्यातून तो
मुंबईकडे निघाला दोघांनाही एकीकडे प्रेमाचे अश्रू आणि पहिल्या भेटीची भीती
वाटू लागली…..भेटीचे ठिकाण ठरले वी. टी स्टेशन चे ते मोठे घड्याळ त्याच्या
खाली.. युवक तेथे पोहोचला त्याच्या आधी ती तेथे येऊन थांबली होती….दोघांनी
एकमेकाना पाहिलं आणि एकमेकांना कडकडून मिठीत घेतलं…कदाचित अस होईल हे
दोघांना माहित नव्हत पण हे नक्की समजल…त्याच तिच्यावर आणि तीच त्याच्यावर
खरच खर प्रेम होत… कुठे फिरायला जायचं हा प्रश्नाला भायखल्याची महालक्ष्मी
असे उत्तर मिळाले…आणि दोघे तेथून महालक्ष्मी च दर्शन घेण्यास गेले….काय
बोलायचं आणि काही नाही हे प्रश्न चिन्ह दोघांच्याही चेहर्यावर होत….फोन वर
आय. लव. यु ऐकू येणारे शब्द समोरासमोर आल्यावर लवकर कोणी बोलेना….शेवटी
युवकाने धाडस केले आणि बोलला…..महालक्ष्मी च्या दर्शनानंतर हाजीमलंग झाल
आणि गप्पा सुरु झाल्या….किमान ४ तास… ती युवती एका खासगी कंपनी मध्ये काम
करीत होती आणि ऑफिस वरून यायला वेळ होईल असे सांगून युवकासोबत फिरत
होती….शेवटी निरोप घेण्याची वेळ आली आणि…पुन्हा V.T. station वरून
दिवसभराच्या भेटीची सांगता झाली…..
दोघांनीही तो दिवस
आयुष्याच्या पानावर लिहून ठेवला. कधीच न पुसण्यासाठी….अशी हि पहिली भेट
झाल्यानंतर एक मेकांशी पुन्हा फोन वर बोलन चालू झाल… एवढ झाल कि एकमेकांनी
लवकरच पळून जायचं आणि लग्न करायचं अस ठरवलं… किमान पुन्हा ४ महिने हे प्रेम
प्रकरण चालू राहील आणि हा युवक तिच्याशीच नव्हे तर तिच्या घरातील सर्वांशी
बोलू लागला…..फक्त तिचे बाबा सोडून….दररोज तासान तास बोलन चालू असायचं….या
दोघात कधीच कसलंही भांडण नाही झाल…..ऑगस्ट मध्ये त्यांनी engagement
करायची अस ठरवलं….नोव्हेंबर २००९ या महिन्यात…..ते एकमेकांच्या बंधनात
अडकणार होते.. एक दिवस ते काहीतरी कारणास्तव बोलू शकले नाहीत….
दोघांनाही फार आठवण आली होती…सकाळी सकाळी या युवकाने तिला फोन केला पण तो
बंद होता आणि अकराच्या सुमारास तिच्या बहिणीचा फोन आला….कि ती काल रात्री
ट्रेन मधून पडली आणि हे जग सोडून गेली……युवकाला काय करावे सुचेना उठून
त्याने मुंबई गाठली आणि तिची अखेरची भेट ती सरणावर असताना घेतली…..
सारी स्वप्न त्या चितेत पेट घेत होती.. या नंतर किमान ७ दिवस या युवकाने
कोणाला काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर तो ठीक झाला परंतु कदाचित
अजून देखील एक फोन येईल अस वाटत असेल….. तो तिला विसरू शकेल ? अशी हि
आपल्यातीलच एका युवकाची….. अधुरी एक कहाणी

ही एक काल्पनिक गोष्ट आहे............

ही एक काल्पनिक गोष्ट आहे............
.
एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्यात वाद सुरु असतो.
लक्ष्मी मातेचं म्हणणं असं असतं, कि " जग चाललय तर ते फक्त माझ्यामुळे (पैशामुळे) ......... ज्या माणसाकडे पैसा नाही, संपत्ती नाही....... त्याला काही किंमत नाही. माणूस ओळखतो........ जाणतो....... आणि बोलतो ते फक्त पैशानेच. "
यावर विष्णू भगवान हसून म्हणतात कि " असं काही नाहीये. "
... पण लक्ष्मी माता येन केन प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते कि पैशालाच जास्त महत्व आहे.
तरीही विष्णू भगवान मान्य करत नाहीत म्हणून लक्ष्मी माता म्हणते, " ठीक आहे. मी सिद्ध करून दाखवते. मग तरी मान्य कराल? "
विष्णू भगवान हसून म्हणतात, " हो चालेल. "
त्यावर लक्ष्मी माता पृथ्वी वरील एक दृश्य दाखवते. - एक शोकमग्न अंत्ययात्रा चालली असते...............
लक्ष्मी माता आकाशातून धनाचा वर्षाव सुरु करते.... आणि लगेच अंत्ययात्रेतील सगळे लोक आपण कुठे जातोय हे विसरून पैसे गोळा करू लागतात.
लक्ष्मी माता भगवान विष्णूंकडे पाहत म्हणते, " पाहिलंत? पैश्या समोर माणूस आपण कोणाला तरी कायमचे गमावून बसलोय हे दुखः देखील विसरतो."
" अगं पण त्या चौघांच काय? जे मृत देहाला खांदा देऊन आहेत? ते तर नाही ना वाकले पैसे उचलायला? " विष्णू भगवान म्हणाले.
लक्ष्मी माता म्हणली, " ठीक आहे....... हे घ्या." एवढे म्हणून लक्ष्मी मातेने खांदा दिलेल्या त्या चौघांसमोर धनाचा वर्षाव सुरु केला.............
त्या चौघांनी प्रेत बाजूला ठेवलं आणि जमेल तितके पैसे गोळा करायला सुरुवात केली.
यावर लक्ष्मी मातेने आपण जिंकलो या अविर्भावात भगवान विष्णूंना प्रश्न केला, " आता तरी पटलं? "
" अजून ही एकजण बाकी आहे......... " दृश्याकडे पाहत विष्णू भगवान म्हणाले. " तो जो तिरडीवर झोपलाय.... तो तर नाही उठला पैसे उचलायला? "
लक्ष्मी माता म्हणली, " तो उठेल तरी कसा? तो मृत आहे. त्याच्या शरीरात आत्माच नाहीये. "
तत्क्षणी भगवान विष्णू म्हणाले, [ हे जरा काळजी पूर्वक वाचा! ]
" हेच तर सांगायचं मला, जो पर्यंत मी शरीरात आहे तो पर्यंतच तुला ( पैश्याला/संपत्तीला ) मान आणि किंमत. ज्या क्षणी मी मनुष्य देहातून अंतर्धान पावलो त्या क्षणी त्या मनुष्यासाठी पैसा मातीमोल. माणसा बद्दल हेच तर आश्चर्य आहे कि तो पैश्यासाठी जीवन पणाला लावतो पण मग तोच पैसा त्याचा जीव का नाही वाचवू शकत.........................? आयुष्य जगताना तो असा जगतो कि कधीच मरणारच नाही......... आणि मरताना असा मरतो कि कधी जगलाच नाही.........."
.
काय? खरय ना............?
मित्रांनो मला ही गोष्ट सुचन्यामागची कारणे अशी की, मी जेव्हा रोज ट्रेन ने प्रवास करतो....... तेव्हा मी पाहिलेले प्रसंग आणि अनुभव.
आणि फक्त ट्रेन चा प्रवास नाही, तर इतर अनेक ठिकाणीसुद्धा. माणूस पैश्यामागे धावतोय................... अक्षरशः धावतोय आणि दम लागून जीव सोडतो.
कमावलेला पैसा तुम्ही प्रेम करत असलेल्या जिवलगांना सुख संपत्ती देऊ शकतो, पण या खटाटोपात कायमचे दूर गेलेल्या कुणाच्या तरी बाबाला, दादाला, नवऱ्याला, मुलाला.............. नाही परत आणू शकत.
यावर नक्की विचार करा. आणि पैश्यापेक्षा सुद्धा लाख मोलाचा असलेला आपला जीव आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती यांची काळजी घ्या.

'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस

एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई.
एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे.
एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली. 'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ?
लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, 'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'.

आपण गुढीपाडव्याला नववर्ष का साजरे करतो ?

एखादी कृती करण्यापूर्वी ती का करावी ? त्यामागील शास्त्र, तसेच इतिहास काय आहे ?, या सर्व गोष्टी आपण पहातो. मग ‘सध्या लोक नवीन वर्ष ३१ डिसेंबर या दिवशी का साजरे करतात ? यामागे कोणते शास्त्र आहे कि इतिहास आहे ?’, असे प्रश्न तुम्हाला पडत नाही का ? कोणतेही शास्त्र किंवा इतिहास नसतांना केवळ पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणून आपण ३१ डिसेंबर या दिवशी नवीन वर्ष साजरे करतो. तेव्हा नववर्षाचा प्रारंभ कसा होतो, ते आपण पहातोच.
रात्री १२ नंतर डिजेचा कर्णकर्कश नाद, दारू पिणारे नाचणारे आणि भांडणे करणारे तरुण यांच्या सहवासात वर्षाचा प्रारंभ आपल्याला योग्य वाटतो का ? ते पाहून ‘खरेच हा नववर्षारंभ आहे’, असे आपल्याला वाटते का ? तुम्हीच याचा अभ्यास करा. मला सांगा, आपल्या दिवसाचा प्रारंभ दुःखाने झालेला आपल्याला आवडेल का ? नाही ना ? हिंदु संस्कृतीनुसार रात्री १२ वाजल्यानंतरचा काळ हा असुरांचा मानला जातो. मग अशा वातावरणात वर्षारंभ होऊच शकत नाही.
आपल्या हिंदु संस्कृतीनुसार आपण गुढीपाडव्याला नववर्ष का साजरे करतो, हे ठाऊक आहे का ? कारण या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. इतिहास पाहिला, तर याच दिवशी रामाने रावणाचा वध करून अयोध्येत प्रवेश केला आणि लोकांनीही त्या विजयाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढ्या उभारल्या. त्यामुळे आपण या दिवशी नवीन वर्ष साजरे करतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ साजरा करतांना आपण पहाटे अभ्यंगस्नान करून घरासमोर रांगोळी काढतो. हिंदु संस्कृतीप्रमाणे वेशभूषा करून प्रभात फेर्यांमध्ये सहभागी होऊन भजने म्हणतो, तसेच सनई किंवा तुतारी वाजवतो आणि शंखनादही करतो. मग मित्रांनो, तुम्हीच सांगा कोणत्या दिवशी वर्षारंभ साजरा करायला हवा ?
मित्रांनो, हिंदु संस्कृतीतील प्रत्येक दिवस आणि सण यांमागे काहीतरी शास्त्र अन् इतिहास असल्याने ते आपल्या जीवनातील आनंद द्विगुणित करतात. हिंदु संस्कृतीनेच विश्वाला आनंदी जीवन जगायला शिकवणारी जीवनपद्धत घालून दिली आहे. त्यामुळे अशा महान संस्कृतीने ठरवून दिलेला वर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करून आपणही आनंदी जीवन जगूया.
आपणही आपल्या मित्र-मैत्रिणींना गुढीपाडव्यालाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी सिद्ध होऊया.’
आता आपण इंग्रजी मासानुसार वर्षारंभ १ जानेवारी आणि हिंदु धर्मानुसार वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदा यांच्यातील चित्ररूप भेद पाहूया

Thursday 22 March 2012

v कुणीही कस दीसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी  नक्कीच महत्व आहे.
v  पाण्यात राहायचे तर माशंशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वताला मासा बनावे लागते.
v  वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते , प्रश्ना असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्‍या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
v  कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं...कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम उपग्रह  सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो.त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
v  समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो.पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
v  संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
v  वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
v  खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
v  सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
v  चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
v  तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
v  औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
v  गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
v  अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".
v  भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
v  आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो, तो खरा आनंदी व्यक्ती असतो.

गरज ...........

दु:खं, आनंद, जय, पराजय, हसु, आसु, जन्म, मरण, विरह-मिलन, सगळं तसच असतं .प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं, एवढच काय ते नविन. पुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हेच मरण.
समुद्राची ताकद टिटवीला समजत नाही.
आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही.
सुगंधाचं कोडं फ़ुलाला उमलत नाही.
पाणी म्हणजे एच टू ओ.इथचं सगळे थांबलेले आहेत.मुर्ख म्हणुन नव्हे तर जाणकार म्हणुन थांबले.
पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणुन.
कोणता आनंद क्षणजीवी नाही?
दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव. खाली उतरला की घास.
सुगंधाचं नातं नाकाशी.घशातुन आत गेल्यावर ति फ़क्त हवा.
खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेशी नसुन तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसीकता संपली.
इतर अनेक गरजांप्रमाणे "तृप्ती" जी एक गरज आहे.
जो गरजु आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो.व्यवहार नेहमी साधतोच असं नाही.तो सत्यासारखा कटू असतो.
ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटूता निर्माण होते.
सध्या एकच वर्तमान्काळ सांभाळ.

बिल गेट्‍स यांचे 11 नियम :-

.नियम 1.
जीवन चांगले असेलच असे नाही. त्याचा चांगला वापर करायला शिका.

नियम 2.
जग हे तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही. त्यासाठी आधी तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल.

नियम 3.
शाळेतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला कोणीच जास्त पगार देणार नाही किंवा तु्म्हाला कार व मोबाईल अशा सेवाही देणार नाही. यासाठी तुम्हाला आधी खूप मेहनत करावी लागेल व उच्च पदापर्यंत स्वत: उडी घ्यावी लागेल.

नियम 4.
तुमचे शिक्षक कडक आहेत, असा तुम्ही जर विचार करत असाल तर थोडे थांबा. तुम्हाला वरिष्ठ अधिकारी होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल.

नियम 5
मोठा बर्गर तुमच्या पुढे काहीच नाही. परंतु त्यासाठी तुमचे वडिल बर्गर लिपिंगसाठी दुसर्‍या अर्थाचा शब्द वापरतात तर त्याला चांगली संधी म्हणावी लागेल.

नियम 6
तुम्ही मनमिळाऊ स्वभावाचे नसाल यात तुमच्या पालकांचा काही दोष नाही. तुम्ही स्वतःत बदल घडवून आणले पाहिजेत. त्यातूनदेखील नवीनच काही तरी शिकायला मिळेल.

नियम 7
तुमच्या जन्मानंतर तुमचे आई-वडिल तुमच्याकडे जास्त लक्ष देत नसतील. पण आता ते तुमच्याविषयी अधिक जागरूकता दाखवित असतील. तुम्हाला त्यांची परिक्षा घ्यावीशी वाटत असेल तर रात्रीच्या वेळी तुमच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडा ठेवा.

नियम 8
तुम्ही तुमच्या जीवनात यश- अपयश पाहिले असेलच. पण झालेली चूक कोणीच मान्य करत नाही. काही शाळांमध्ये असे दिसून आले आहे की, 'नापास' हा शब्दच त्याच्या शब्दकोशातून पुसुन टाकला आहे. त्यामुळे जीवनात कधीही अपयशाचा जास्त विचार न करता यशाचीच कास धरली पाहिजे.

नियम 9
जीवनाला सेमिस्टरमध्ये वाटू नका. तसेच त्याला उन्हाळ्याची सुटी देखील मिळत नाही. त्यामुळे स्वत:ला शोधायचे असेल तर आधी आत्मविश्वास वाढविला पाहिजे.

नियम 10
टिव्हीवर जीवनाचे खरे दर्शन घडविले जात नाही. व्यक्तिला विविध टप्प्‍यातून काम करायला जावे लागते. त्याचवेळी जीवन काय आहे ते कळते.

नियम 11
आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.

थोडा विचार करा

१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा गरिबाला द्यायची असेल?,............. पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात .....
३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते ,.......... पण ३ तासाचा बकवास सिनेमा बघायला सोपे जाते.....
पूर्ण ...दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही .................... पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ......
... Valentine day la Item ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ शकतो.............................. पण Mothers Day १ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ शकत......
याला LIK & COMENT करायला खूप अवघड वाटते .......................... पण फालतूला LIK & COMENT करायला आपण आपले कर्तव्य समजतो ......
यावर थोडा विचार करा नाहीतर पुन्हा वाचा..!
--

आजची चांगली गोष्ट



रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात
त्या होत नाहीत. मग निराशा येते, राग येतो आणि आपली खूप चिडचिड होते. आपण रागावलो कीतो राग मित्रांवर किंवा घरच्यांवर काढला जातो. मग राग गेला की आपल्याला वाईट वाटतं,
आपण त्यांची क्षमा मागतो आणि ते आपल्याला माफही करतात. पण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. आपण ज्या कारणामुळे चिडलो होतो ती गोष्ट शुल्लक वाटू लागते.

असं झालं की मला एक गोष्ट आठवते. एक माणूस देवाचे आभार मानत असतो. तो म्हणत असतो की "माझ्याकडे नवे बूट नव्हते म्हणून मी दु:खी होतो त्या वेळी तू मला एक माणूस दाखवलास ज्याच्याकडे
पाय पण नव्हते. मग माझी तकरार आपोआप मुकी झाली." थोडक्यात सांगायचं तर आपण छोट्या दु:खांकडे लक्ष देऊन त्यांना मोठं करतो पण छोट्या सुखांकडे लक्षच देत नाही. जसं बऱ्याच गोष्टी
आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत, तसं त्याहून कितीतरी जास्त गोष्टी आपल्याला खुश करायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या एक लहानशा दु:खाच्या नादात आपण त्या दहा खुश करणाऱ्या गोष्टींना विसरतो.

जर आतापर्यंतचे विचार पटले असतील, तर मनात एक प्रश्न पण आला असेल. आपण या लहान सुखांकडेलक्ष कसं द्यावं? काही मनासारखं नाही झालं तर त्याला पटकन मनातून बाहेर काढून जे आपल्याला
सुख देतं ते कसं करावं? याचं उत्तर माझ्या एका मैत्रिणींकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. त्या म्हणाल्या की आम्ही एकामेकांशी
बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काही नाही' आसं
म्हटलं की त्या 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायच्या. मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. त्या पण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून
सांगायच्या.

पण काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता
झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्यांच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही
लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट
गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली
पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.

तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जाताना पण 'आत देव आहे' या विश्वासाने नमस्कार करतो, तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा. अट फक्त एकच, की
तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे. हा प्रश्न स्वत :ला तर विचाराच, पण आपल्या मित्रांना किंवा घरातल्या व्यक्तिंना विचारा. उत्तर कितीही
शुल्लक वाटलं तरी नीट ऐका, तुमचं उत्तर पण सांगा. बघा तुम्हाला पण मस्त वाटेल आणि तुमच्या मित्रांना पण. हा प्रश्न खूप बाळबोध वाटतो, किंवा मित्र चेष्टा करतील असं वाटत असेल तर
आधी काही दिवस स्वत:लाच विचारा. मग एकदा तुम्ही रोजच्या दिवसाचा आस्वाद घेऊ लागलात की मित्रांना विचारा 'आजची चांगली गोष्ट काय?'

आता शेवटी मी मला आवडणाऱ्या काही साध्या-सोप्या गोष्टी लिहीतो. खाण्यावरून सुरूवात केली तर तेलकट तरी आणि तिखट मिसळ, आईस-क्रिम, उन्हात फिरून आल्यावर उसाचा रस, पुण्यातली
सुजाताची मस्तानी, पाऊस पडत असताना गरम गरम भजी, रात्री झोपायच्या आधी एक छोटं चॉकलेट, आईच्या हातचं जेवण, हापूस आंबा असे असंख्य पदार्थ आहेत. हे रोज एक एक करून खायचं असं
ठरवलं तरी वर्षाच्या 'चांगल्या गोष्टींची' यादी होईल. रेडिओ वर अचानक लागलेलं आपल्याला आवडणारं गाणं, हे पण एक वेगळंच सुख आहे. त्यात ते गाणं थोडं जुनं असेल आणि आपल्याला त्याचा विसर पडत असताना ते लागलं
तर मग अजूनच मस्त वाटतं. पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा सुगंध पण हृदयात सुकलेल्या भरपूर आठवणी परत ओल्या करून जातो. आपण नवी साडी किंवा नवा शर्ट घातला की होणारी प्रशंसा हे
पण एक छोटंसं सुखच आहे. अंघोळ करून स्वच्छ झाल्यावर अंगावर मारलेलं अत्तर, आपल्याला दिवसभर त्याच्या सुगंधाने ताजंतवानं ठेऊ शकतं. अशा कितीतरी लहान वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला खूप आनंद
देऊ शकतात, जर आपण त्यांना आनंद द्यायची संधी दिली तर…