Friday, 29 March 2013

*एक छोटीशी सुंदर कथा*एकदा एक १० वर्षाचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला.

तो टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारलं,

" आईस्क्रीम कोन केवढ्याला आहे...?"

वेटर म्हणाला,
" ५ रुपये, "

तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला.

नंतर...

त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला,
असं विचारलं.

वेटरने ञासिकपणे उत्तर दिलं,
" ४ रूपये, "

तो मुलगा म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कप द्या,

त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं,
बिल दिलं आणि तो गेला.

वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला...

आणि...

त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेलं...

कपाजवळ १रुपया त्याने टीप म्हणून ठेवला होता...

आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वीत्या लहान मुलाने त्या वेटरचा विचार केला होता...

त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती...

स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता.

मी प्रत्येक वेळी नाही म्हणत,

पण...

कधीतरी दुसऱ्यांचा विचार करावा...
सर्वजण एकसारखे नसतात ते आपापल्या परिस्थिती नुसार असतात...

म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं .................

*आयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं...
म्हणतात,प्रेम करणं सोप असतं ते व्यक्त करणं कठीण असतं,प्रेम पहाणं सोप असतं,ते समजून घेणं कठीण असतं..
आणि हेच समजून घ्यायचं होतं,
म्हणून,आयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं

असतो का प्रेमात खरच आनंद का नुसतच "I Love U" म्हणायच असतं?
विरहात त्याच्या  बुडून मरायच असतं की फक्त "I Miss U" म्हणायच असतं?
हेच बघायच होत  म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं

म्हणुनच त्याच्याजवळ  व्यक्त करणं ठरवल
आणि व्यक्तही केल होतं पण..............
त्याला "माझ तुझ्यावर प्रेम नाही" असं म्हणायला काहीच वाटल नव्हतं ,
असतात खरच अशी माणसं या जगात हे कधी मी पाहिलं नव्हतं...

झगडत होते त्याच्याकडून  ते 'I Love You" हे तीन शब्द ऐकण्यासाठी
कधी त्याच्या  आठवणीतं मरतहोते ,तर कधी मरुनच जगत होते ....
आणि कदाचित हेच माझ्या मनाला अनुभवयाच होतं .....
म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं!!!!!!

ति आणी तो

दोघे कॉलेजला जात असतात..
ति: मला आज खूप भिती वाटतेय रे..
तो: का..? कशाची..?
ति: मला सारखा वाटतंय कि तुझी सोबत आता नसणार मला...तू असं कर एकवेळ मला मिठीत घे. ( ति त्याचा हात हातात घेते..)
तो: अशी का वेड्यासारखी करतेस सगळे बघत आहेत..
ति: खरंच रे एक ना माझं, मला समजून घेरे प्लीज...
तो: चल वेडेपणा करू नकोस.(तो हात सोडवून घेतो अन्तिला थोडं दूर ढकलतो..)
खरंच तेवढ्यात मागून एक ट्रक येवून तिला चिरडतो....आणी त्या दोघांची सोबत तिथेच संपते...!
Please please dont ignore your partner's fillings....the result of the same may be very very painfull...!