Tuesday 24 April 2012

हे ज्या पालकांना समजलं त्यांना जगाचं रहस्य समजलं.....नजर शाबूत असलेला बाप मुलाला एकदाच जन्म देऊन थांबत नाही.....आयुष्यभर तो जन्मच देत असतो.

मुलाला मोकळेपणी फिरून देणं, तो एक स्वयंभू जीव आहे हे जाणणं, त्याला त्याची स्व:ताची सुखदु:ख आहेत ह्याचं स्मरण ठेवणं, लोभ,मोह,माया ह्या मर्यादांनी तो स्वतंत्रपणे बांधला आहे ह्याची ओळख होणं आणि आयुष्याला सामोरं जाण्यासाठी त्याला सगळे मोकळे ठेवणं. हे जो बाप करतो , तो प्रतीक्षणाला त्याला नवीन जन्म देतो.

"आम्ही आमच्या लहानपणी असे नव्हतो" हि बकवास जो बाप करतो त्याला लहानपणी जसं काय करायचं हे समजलं नाही , तसंच बाप झाल्यावरही , कुणाचं उदाहरण द्यावं हे कळलेलं नाही . ह्या विधाना एवढा दुसरा अप्रबुध्द विधान कोणतंही असू शकणार नाही.
तू ते टाळू शकशील का?
प्रयत्न कर.
जाणीवेने जे बाप होतात , ते "प्राप्तेषु षोडशे वर्षे" ह्या शास्त्रवचानाची सोळा वर्ष वाट पाहत राहत नाहीत.

दिवस गेल्याची जाणीव , भले त्याला बायकोपेक्षा उशिरा होत असेल , पण येणारा जीव आपला 'मित्र' होऊ शकतो ,ते त्याला तेव्हाच कळतं.

Saturday 21 April 2012

परीस

परीस ( पारस ..............................
एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि
तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड
घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....

तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी
प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या
लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात ...

लक्षात नसलेला बाप //

लक्षात नसलेला बाप //
वडील , बाबा , पप्पा , ड्याडी , पिता
लिहिण्याना बोलण्याला खूप चांगल वाटत
पण आपण प्रत्येक जन सहज पणे नेहमी
जाणूनबुजून शब्द उच्चारतो तो म्हणजे बाप
होय होय बाप .......
आई घराच मांगल्य असते तर बाप घराच अस्तित्व
पण घराच्या या अस्तित्वाला खरंच आपण समजून घेतले आहे का ?
वडिलांना महत्व असूनही त्यांच्या विषयी जास्त बोलले जात नाही,
लिहिले जात नाही. कोणतेही व्याख्यता त्याच्या विषयी जास्त बोलले जात नाही
लिहित नाही . पण कोणताही व्याख्यता आई विषयी केवळ बोलत राहतो . संत महात्म्यांनी
आईचच महत्व अधिक सांगितलेलं आहे . देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतुक केले आहे .
चांगल्या गोष्टीना आईचीच उपमा दिली जाते .पण बापाच्या विषयी फारस बोलल जात नाही .
काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापत , व्यसनी , मारझोड करणारा ....समाजात असे १-२ % बाप असतील हि ..
पण चांगल्या पितयान बद्दल काय ..चांगल्या वडिलांबद्दल काय..
आई कडे अश्रुंचे पाठ असतात पण बापाकडे सय्यमाचे घाट असतात ...
आई रडून मोकळी होते पण सांत्वन वड्लानाच कराव लागत .आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त तन पडतो .
कारण सामाई पेक्षा सामीच जास्त तापते ना......... पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत . रोजच्या जेवणाची सोय करणारी आई
आपल्या लक्षात राहते पण आयुष्याची शिदोरी करणाऱ्या बापाला किती सहज विसरून जातो.
आई रडते पण वडलांना रडता येत नाही .स्वताचा बाप वारला तरी रडता येत नाही कारण छोट्या भावांना जपायचं असत .
आई गेली तरी रडता येत नाही कारण बहिणींना आधार व्हायचं असत .पत्नी अर्ध्या वरच सोडून गेली तरी पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो .
जिजाबाईनि शिवाजी घडवला अस आवश्य म्हणावं...पण त्यावेळेस शहाजी राजांची ऊलाताण घ्यायला हवी ..देवकीचं यशोदेच कौतुक अवश्य कराव ..
पण पुरातून डोक्यावरू पोराला घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा ...राम हा कौशल्लेचा पुत्र अवश्य असेल पण योगात तडफडून मेला तो पिता दाश्रात होता ..
वडिलांच्या ताचांकडे चपला झिजलेल्या पाहिलं कि त्याचं प्रेम कळत ..त्यांची फाटकी बनियन पहिली कि कळत आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियन ला पडली आहेत .त्यांचा दाडी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो .....मुलीला गाऊन घेतील मुलाला लुंगी घेतील पण स्वता मात्र जुनी पैजामा वापरायला काढतील .
मुलगा सलून मध्ये ३० ते ६० रुपये खर्च करतो ... मुलगी ब्युटी पार्लोर मध्ये १०० ते २०० रुपये खर्च करते ... पण त्याच घरातला बाप दडीचा साबण संपला तर पाण्याने
दडी करतो ..बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही . तो आजाराला मुळीच घाबरत नाही पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती असते.कारण पोरीच लग्न पोराच शिक्षण बाकी असत .घरात उत्पन्नाच दुसर साधन नसत ऐपत नसते तरी मुलांना जे शिक्षण हवे ते दिले जाते .ओढा तन करून दर महिना त्यांच्या शिक्षणाला पैसा पुरानला जातो. पण सर्वच नसली तर काही मुल अशी असतात कि तारखेला पैसे मिळताच मित्र मैत्रीणीना पार्ट्या देतात .न ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाला एकमेकांना हाक मारतात .
ज्या घरात बाप आहे त्या घरात वाईट नजरेने पाहण्याची हिम्मत होत नाही कारण घरातला करता जिवंत असतो.तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो.आणि घरच्याच कर्म बघत असतो .कुणाचा मुलगा होण टाळता येत नाही पण बाप होण्याला कोणाच टाळता येत नाही आईच्या असण्याला बापामुळे अर्थ असतो . कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला कि आई जवळची वाटते कारण आई जवळ घेते कवटाळते कौतुक करते . पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कुणाच्याच लक्षात येत नाही .चटका बसला . फटका बसला ठेच लागली कि आई ग हा शब्द बाहेर पडतो पण रस्ता ओलांद्तना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक मारतो तेंव्हा बाप रे हा शब्द बाहेर पडतो कारण छोट्या छोट्या संकटाना आई चालते पण मोठी मिठी वादळ पेलताना बापच आठवतो . सगळ्या मंगल प्रसंगी घरातील सगळे जातात पण मैता च्या वेळी बापालाच जाव लागत .कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जात नसतो पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना पण चक्कर मारतो .तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेंव्हा आई नाही बापच जागा असतो .वडिलांचा महत्व कोणाला कळत .. लहानपणी वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात .त्यांना एक एका वस्तूंसाठी तरसान लागत वडिलांना संजून घेते ती त्या घरातली मुलगी .सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या बापाबरोबर फोन वर बोलताना बदललेला आवाज एका क्षणात कळतो ...मुलगी वडलाना जनते जपते ....इतरांनी आपल्याला जनाव हि बापाची किमान इच्छा असते.

डोळ्यात पाणी आणणारी कथा!!!!

'आई, बटन तुटलंय ग शर्टचा...आणि बघ ना किती खराब झालाय तो...' महेश दारातून ओरडतच येत म्हणाला. महेशचा आवाज ऐकून तिने पटकन रिकाम्या डब्याचं झाकण लावलं. डाळ उरलीच नव्हती डब्यात. तसंच डबा बाजूला ठेवत ती महेशकडे वळली. महेश पोळीच्या डब्यात कालची उरलेली पोळी आहे का ते बघत होता. 'आई, पोळी नाही? ' महेशच्या प्रश्नावर तिला भडभडून आलं. कसनुसा हसत ती म्हणली. 'करणार रे पोळी. जा, तू बाबा आले का बघून ये'. 'कुठे गे...ले बाबा?' महेशचा पुढचा प्रश्न. तोंडावर आलेला उत्तर तिने थांबवलं, आणि सावकाश ती म्हणाली, 'तुला नावं शर्त आणायला.' महेशचा चेहेरा खुलला. तो नाचतच अंगणात जाऊन बाबांची वाट पाहू लागला.
तिने शेगडी पेटवली. तांदळाच्या डब्यात उरलेला मूठभर भात तिने कुकरमध्ये शिजवायला लावला. शिजवतानाच त्यात थोडे कांदे आणि मसाला घातला. कुकर व्हायची वाट पहात ती ओट्याजवळ उभी राहिली. कुकर नवर्याने हौसेने आणलेला. घरातला बाकीचं सगळंच मोडून झालं होता, तेवढा एक कुकर तिने अजून विकला नव्हता. बाकीचं समान असंच कुणी दिलेला लग्नात. तेव्हा जे कोणी यायचं काय काय घेऊन यायचं, आणि तीही आल्या-गेल्याचा करण्यात रमून जायची. पण मग २ वर्षात... तिला त्या दिवसाच्या आठवणीने गरगरल्यासारखं झालं. अजूनही तिला खोटं वाटायचं, एखाद्या स्वप्नासारखा. तिला मिठीत घेऊन गुदमरवणारा नवरा जेव्हा त्याचा एक थोटा हात आणि तुटका पाय घेऊन केविलवाण्या चेहऱ्याने घरी यायचा तेव्हा तिला उन्मळून जायला व्हायचं. अपघातातून सावरल्यावर तिने त्याला सरकारी दाखला आणून एखादी नोकरी करण्यासाठी सुचवला. महेश तेव्हा जेमतेम वर्षाचा होता. नवर्याने ऐकलं नाही. त्याचे मित्र यायचे आधी आधी, काही करण्यासाठी सुचवून पाहायचे. तो झिडकारायचा , म्हणायचा, 'पांगळा आहे म्हणून दया नको तुमची.' मग महेशकडे आणि दाराआडून पाहणाऱ्या तिचा निरोप घेऊन आलं माणूस निघून जायचा. काहीच सुचला नाही कि तो कुबड्यांवर स्वतःला ढकलत ढकलत निघून जायचा कुठेतरी. मग घरी यायचं घामाघून होऊन, तिच्याकडे बघायचाही नाही. भरपाईचे पैसे घराखर्चात आणि महेशाला शाळेत घालण्यात संपले. महेशाची शाळा सुरु झाल्यावर तिने उमेदीने स्वत नोकरी करू पाहिली. पण तिने आणलेलं काही तो खायचा पण नाही. महेशला सांगायचा कि तो काम करेल, त्याला खूप मोठा करेल. त्याला हसवायचा. आणि मग स्वताचे डोळे टिपत आकाशाकडे बघत बसून रहायचा. एक दिवस त्याने गाडीखाली जीव द्यायचा प्रयत्न केला. लोकांनी वाचवला, घरी आणला. तेव्हापासून तो अजून आक्रसत गेला. ती जवळ आली कि रडायचा. तुझ्या जीवावर जगतो, मरू पण शकत नाही आपल्या मर्जीने म्हणायचा. ती कामावर गेली कि निघून जायचा कुठेतरी. कोणाकडून तरी पैसे मागून महेशला काही घेऊन यायचा. एक दिवशी कोणीतरी म्हणाला कि जगतो कसा मस्त बायकोच्या जीवावर. ते जिव्हारी लागल्यागत घरी आला, आणि तिला नोकरी सोडायला लावली.
मग घर रिकामं होत गेला. महेशचा रिझल्ट लागला शाळेचा आणि आता ५वित प्रवेश घ्यायचा होता. भरायला पैसेच नव्हते. उद्यापासून शाळा सुरु होणार होती. महेश विचारायचा पुस्तक, वही, कंपासपेटी केव्हा घ्यायची. ती वेळ मारून न्यायची. मग बाबाकडे गेला कि बाबा त्याला काय काय सांगून रिझवायचा.
तिने कुकर उतरवला. ताटे घेतली. तेवढ्यात महेशचा बाहेर आवाज आलं, 'आई, बाबा आले. आणि मला नवा शर्ट आणि पुस्तक पण आणलंय.' गोष्टींचं पुस्तक घेऊन महेश तिला बिलगला. त्याच्या खांद्यावर नवर्याने नवा शर्ट पांघरला होता. तिला आवडणारा आकाशी रंग.... 'आणि बाबांनी हे तुला दिलंय. तिने पिशवी घेतली. त्यात एक फूल आणि डबा होता श्रीखंडाचा. तिने फूल ओट्यावर बाजूला काढून ठेवलं.
काल रात्री त्यांचं बोलणं झालं. तिने त्याला उरलेले पैसे दिले होते.
कुबड्या भिंतीच्या कडेला टेकवून तो खाली बसला. महेश त्याच्या बाजूला बसून पुस्तक वाचत होता. तिचे डोळे उगाच भरून येत होते. तिने ताटात भात वाढला. कडेला श्रीखंड वाढलं.
तेवढ्यात मनी आली दारातून आणि म्याव म्याव करत महेशच्या पायात जाऊन बसली. महेश तिचे लाड करत तिला गोष्ट सांगायला लागला. आणि ते वेडं मांजर पण मान त्याच्या मांडीवर ठेवून जसं ऐकायला लागलं.
किती दिवसाने ते गप्पा मारत मारत एकत्र जेवले. खूप दिवसांनी आज गोड खायला होतं. महेशने आवडीने श्रीखंड खाल्लं. आणि मनूने पण महेशच्या ताटातलं श्रीखंड खाल्लं. जेवण झाल्यावर गप्पा मारत ते तिथेच बसले. मनू महेशच्या मांडीवर गुपचूप झोपली होती. हळूहळू बाबाची गोष्ट ऐकता ऐकता बाबाच्या कुशीत महेश झोपून गेला. तिने ताटे उचलली. कुकर आणि श्रीखंडाचे रिकामे भांडे बेसिन मध्ये ठेवले. ओट्यावरचे फूल तिने हातात घेतलं आणि नवर्याकडे पाहिलं. तो भिंतीला मान टेकवून झोपला होता. त्याचा रापलेल्या गालांवर, खुरट्या दाढीत त्याच्या डोळ्यांतून ओघळलेले अश्रू लपले होते. तिने ते फूल घेतलं, आपल्या बाजूला ठेवलं आणि तिथेच लवंडून ती झोपली........
दुसर्या दिवशी पेपरात आलेल्या बातमीत अपंग तरुणाची बायको आणि मुलासह आत्महत्या एवढाच मथळा होता. त्यांची घरभर विखुरलेली स्वप्नं, त्यांच्या गप्पांचे आवाज, गोष्टीचं नव पुस्तक, एकदाच घातलेला आकाशी शर्ट, मरून पडलेलं मांजर आणि तिच्या कुशीत सापडलेलं कोमेजलेलं फूल ह्यांचा उल्लेख तसा महत्वाचा नसतोच म्हणा....
प्रियकर :- एक सांगू!
प्रेयसी :- सांगना
प्रियकर :- तुझे स्मितहास्य
खरच खूप सुंदर आहे! ♥♥
प्रेयसी :- मी एक सांगू!
प्रियकर :- सांगना!
... प्रेयसी :- हे स्मितहास्य फक्त
तुझ्यामुळेच अस्तित्वात
आहे!
ती एकदा आजीला म्हणाली

मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
... जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं
--

Tuesday 3 April 2012

त्याग कुणाचा मोठा?

त्याग कुणाचा मोठा?

त्याग कुणाचा मोठा?
अंधपती साठी डोळ्यावर पट्टी बांधणाऱ्या गांधारीचा त्याग मोठा ?
कि गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांना स्वतःचा अंगठा देणाऱ्या एकलव्याचा त्याग मोठा?
कोणतं दु:ख मोठं?
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्याचं दु:ख मोठं ?
कि व्यक्ती जग सोडून गेल्याचं दु:ख मोठं?
सुख कोणतं मोठं?
प्रेयसीच्या होकाराचे सुख मोठे?
कि पहिला पगार हाती धरलेल्या आईच्या पाणावलेल्या डोळ्यांमधले सुख मोठे?
सोनचाफ्याचा गंध जास्त सुखदायक कि देवाऱ्यातल्या अगरबत्तीचा गंध जास्त सुखदायक?
देवळातली प्रसन्नता मोठी कि झाडाखालच्या शांत सावलीतली प्रसन्नता मोठी?
आईची अंगाई जास्त सुरेल असते कि कोकिळेचे गाणे जास्त सुरेल असते?
लहान बाळाचा स्पर्श जास्त नाजूक कि मोरपिसाचा स्पर्श जास्त नाजूक?
फुलपाखरू जास्त सुंदर कि पहाटेचे आभाळ जास्त सुंदर?

तुलनेचा तराजू प्रत्तेक गोष्टीसाठी लागू नाही करता येत.
काही गोष्टी स्वत:च स्वत:चे एक वेगळे स्थान घेऊन जन्माला येतात.

एक होतं गाव

एक होतं गाव. महाराष्ट्र त्याचं नाव. गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले
होते. मराठी भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते. त्याचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे. आल्या- गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, ते सुरेल करायचे.

महाराष्ट्रात होता एक भाग. मुंबई त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले, की इथलेच होऊन राहत होते. "अतिथी देवो भव!' या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. अतिथी जास्त आणि यजमान कमी झाले. मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. मराठी आपली वाटत नव्हती. प्रश्‍न मोठा गहन होता; पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती. त्यांना एक युक्ती सुचली. दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली. त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील. सर्वांचाच, अगदी महाराष्ट्राचाही विकास होईल म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली. आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली. आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली. आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना, मराठी कोणीच बोलेना, बोली भाषाही बदलली. सगळ्यांचा नुसता काला झाला. शुद्ध, सुंदर मराठीचा लोप झाला.

अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर- माफ करा हं- आपल्या मम्मीबरोबर एकदा वाचनालयात गेला. चुकून त्याचा हात एका पुस्तकावर पडला. त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं, पानं फडफडली, आनंदित झाली. त्यांना वाटलं, चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल. इतक्‍यात त्या मुलानं विचारलं, (त्याच्या भाषेत) ""मम्मी, कोणत्या भाषेतलं पुस्तक आहे गं हे?'' मम्मी खूप सजग होती, मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती. पुस्तक परत जागेवर ठेवत म्हणाली, ""अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या आजोबांच्या वेळेस मराठी भाषा प्रचलित होती; आता नाही कोणी ती बोलत.''

पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली, पानांपानांतून अश्रू ठिबकले; पण हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं

Monday 2 April 2012

खरीखुरी घटना

खरीखुरी घटना
ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या
घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला
लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा
पोकळी असते.
तर, ही भिंत तोडताना त्य माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल
अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय
चिणला गेला आहे.त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं
कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षांपूर्वी हे घर नवीन
बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल
जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत
हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली? जे जवळजवळ अशक्य होतं.
त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष थेवून बसला,
की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की
तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या
खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक
झाला,गहिवरला. कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल
आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून न देता !
एक पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची
अशा प्रकारे काळजी घेतो,तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू
शकतो.तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी
आधार द्या-जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते,तेंव्हा. "तुम्ही" म्हण्जे
त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता.कोणतीही गोष्ट (नातं,
विश्वास...) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु
जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं.

मृगजळ




मृगजळ .... एक भास आपलेपणाचा
किती सहज बोलून गेला तो 'जरा आरशात बघ स्वतःला.... कशी दिसतेयस .... जरा नीट राहत जा इतर मुलींसारखी. किती जाडी दिसतेयस... आधी किती छान दिसायचीस .फक्त तुझ्याकडे पाहत रहावसे वाटायचे मला आणि आता माझे लक्ष दुसऱ्या मुलींकडे सहज जाते. तुला नाही आवडत आजकाल बघायला.'
हे ऐकून मी स्तब्धच झाले ...काय बोलावं सुचेना ...मला तर काय reaction द्यावी हे हि कळत नव्हते . मी काहीच न बोलता घरी निघून आले आणि उगाच आरशासमोर जाऊन उभी राहिले ...खरंच काय मी इतकी वाईट दिसते ? हा !! आजकाल मला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो रोजच्या गडबडीत ....पण म्हणून काय त्याने अस बोलावं ?
नकळत माझे डोळे भरून आले ....
तो हि खूप बारीक होता मी कधी त्याला बोलले नाही असं ... तो जसा आहे तसाच मला आवडतो ...
एखाद्याची उंची, जाडी, रंग, रूप का कोणाच्या हातात असते ? ते तर देवाने आपल्यासाठी ठरवून दिले आहे तसे आपण दिसतो ...मग त्याचे माझ्यावर प्रेम आहे कि माझ्या शरीरावर ?
हा तोच होता ना जो आधी माझी सौंदर्याची स्तुती करायचा, ज्याला आधी माझ दिसण, वावरणं आवडायचं ... आणि आज त्यालाच मी कशीतरी दिसतेय , माझ्याकडे बघवत नाही त्याला ...खरंच का मी इतकी वाईट आहे ?
माझ्यासोबत चालायलाहि त्याला लाज वाटत होती ....सारखा मागे नाहीतर पुढे चालत होता ...
आज याला माझ्यासोबत दोन पावलं चालायला लाज वाटतेय ...उद्या सात जन्म काय आणि कसा चालणार हा माझ्यासोबत ?
आपल्या जोडीदाराची लाज वाटते अशा माणसासोबत मला संसार करायचाय ... कसा करू मी ?
माझी पावलं तिथेच घुटमळली होती ....
काल खूप दिवसांनी भेटलो आम्ही. किती छान वाटत होत. आम्ही मस्त movie ला गेलो होतो कॉर्नर सीट .... अंधारात त्याने सहज माझ्या खांद्यावर हात टाकला . आधी मी गडबडून गेले ...मग थोडी स्थिर झाले. त्याने मला अजून जवळ घेण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मनात एक विचार आला ....ज्याच्यासाठी मी हे सगळ करतेय त्याला त्याची जाणीव खरीच आहे का ?
आज दोन वर्ष झाली मी घरातल्यानविरुद्ध उभे आहे त्याच्यासाठी. पण आमच लग्न? ते खरंच होणार आहे का कधी ?
विचारांनीच मन शहारून गेल .... अन अचानक माझी तंद्री भंग झाली. त्याने मला दूर लोटलं आणि तो चिडला माझ्यावर ' आपण इतक्या दिवसांनी भेटलोय तुला काहीच कसं वाटत नाही ...दुसरी एखादी असती तर माझ्या मिठीत कधीच विरघळली असती ...तुझ्या स्पर्शात तर काहीच जाणवत नाही मला. मी आवडत नाही का तुला ?' मी पुन्हा स्थब्ध ....आता कस सांगू याला माझ्या मनात काय चाललाय?
'दोन वर्ष झाली बघतोय तू कधी स्वतःहून हातही नाही पकडलास मग मिठीत येण तर दूरची गोष्ट आहे ...तू इतर मुलींसारखी नाही आहेस ...बघ जरा त्यांच्याकडे त्या बघ कशा त्यांच्या bf ला मिठी मारतात ...तुला नाही का वाटत त्यांच्यासारख करावस ? जराही मुलींची लक्षण नाही तुझ्यात...बिनडोक कुठची ...'
खूप लागले रे मनाला हे सार ... खरचं मला नाही का वाटत हे सगळ करावस ? मलाही वाटत रे , मलाही हव असत हे सगळ ... अशी भावनिक गुंतवणूक , शारीरिक जवळीक .....पण !! पण भीती वाटते रे मला ....उद्या आपलं लग्न झाल नाही तर याचा त्रास होईल रे मला ...तुम्हा मुलाचं काय ..सहज विसराल ....पण माझ ? मी तुझ्या शिवाय कधी कोणाचाही विचार करू शकत नाही ...इतक्या मुलांशी बोलते मी , मस्ती करते पण तुझी जागा खूप खास आहे रे इतरांपेक्षा वेगळी ...जी मी कधी कुणाला नाही देऊ शकत ...मी नाही कधी तुला माझ्या मित्रांसोबत compaire केल ...पण तू...तू तर माझीच जागा दाखवून दिलीस रे मला ....
मी आतापर्यंत तुझे सारे हट्ट, तुझे रुसवे , फुगवे ....सार सार काही पाहिलं ...हे खर तर मला करायला हव होत रे ....पण तुला सांभाळायच काम तर मीच करतेय ....
मला नाही का वाटत ....माझ्यावरही कुणीतरी जीवापाड प्रेम करावं ...माझ्यासाठी त्याने धावत याव ...माझे लाड करावे, माझे हट्ट पुरवावे....पण इथे तर सगळ उलटंच आहे. मला तर असं काहीच वाटत नाही कि माझ्या भावनांची साधी दखलही घेतली जाते ...मला काय हवाय ..काय नकोय ...
साधी विचारपूसही नाही...किती हा कोरडेपणा भावनांचा ..
मग आता तूच संग मी कशी येऊ रे तुझ्या जवळ ?
तुला तर माझ मनही अजून नीटस जाणता येत नाही ...
जिथे भावनिक गुंतवणूकच नाही होत आहे तिथे शारीरिक जवळीक तरी कशी होईल ?
सांग ना तूच सांग मला ....
किती बोलले मी पण फक्त मनात ...माझा धीरच झाला नाही त्याला काही बोलायला ....
फक्त डोळे भरून आले...आणि मनही

Sunday 1 April 2012

 

दोन हृदयं.

"किती व्यवस्थीतपणे माझ्या आजोबांनी माझी समजूत घातली."
दिनकर बालचिकित्सा तज्ञ आहे.त्याचे आजोबा अलीकडेच गेले.दिनकरचं आजोबावर खूप प्रेम होतं.मला तो नेहमीच आजोबांच्या गप्पा सांगायचा. ह्या भेटीत तो मला त्याच्या लहानपणी आपल्या आजोबांशी केलेल्या एका चर्चेची आठवण काढून सांगत होता.
मला म्हणाला,
"माझे आजोबा निवृत्त झाल्यावर आपल्या जुन्या घरी कोकणात येऊन राहिले.शाळेला सुट्टी असताना कधी कधी वेळ काढून मी आजोबांना भेटायला कोकणात त्यांच्या घरी रहायला जायचो.
आजोबांच्या झोपायच्या खोलीला लागुनच माझी झोपायची खोली होती.पण ती माझी खोली स्वयंपाकघराला लागून होती.
त्या माझ्या भेटीत एकदा मध्य रात्री स्वयंपाक घरातून भांड्यांचा आवाज आला.माझ्या आजोबांनी सफेद लेंगा घातला होता.वरती मलमलची पैरण होती.माझ्या आजोबांना त्या वयातही डोक्यावर भरपूर केस होते.ते विसकटलेले दिसत होते.
आजोबांनी पितळेच्या डब्यातून एक साखरेचा लाडू एका बशीत काढून घेतला.थोडं दुध कपात गरम करून घेतलं.
मी माझ्या बिछान्यावरून उठून स्वयंपाक घरात येऊन एका खुर्चीवर मिणमीणते डोळे करीत बसलो आणि त्यांना म्हणालो,
"आजोबा?मध्य रात्रीची तलफ काय?"
त्यांच्या चेहर्‍यावरचं हसू आणि दोन्ही गालावरच्या खळ्या खुललेल्या पाहून मला गम्मत वाटली.
"रात्रीचे दोन वाजले वाटतं!.काय थोडा लाडू खाणार?"
त्यानी गालात हसं ठेवूनच मला विचारलं.
"नको थॅन्क्स.एखादं फुलपात्र भरून पाणी पितो."
डोळे चोळत मी त्यांच्याकडे पहात होतो.
"आठवतं तू आणि तुझी बहिण माझ्या कचेरीत येऊन"
आजोबा मला आठवण काढीत सांगत होते.
"आणि तुझी आजी तुमच्याबरोबर,थालीपिठं,लोण्याचा गोळा आणि थरमॉसातून गरम कॉफी देऊन पाठवीत असायची?"
"आणि थालीपिठं खाऊन झाल्यावर मुखशुद्धी म्हणून ताज्या शहाळ्याच्या कातळ्या द्यायची."
मी आजोबांच्या आठवणीत भर घालून म्हणालो.
"तू शहाळ्याचं पाणी एका बाटलीत घेऊन यायचास.कधी तुझी आजी मला आवडतं म्हणून, कुळथाची पिठी उकड्या तांदळाचा भात आणि तोंडाला लावायला भाजलेला सुका बांगडा आणि त्यावर खोबर्‍याच्या तेलाचे दोन थेंब टाकून घेऊन यायचास?."
आजोबा आणखी आठवण काढून म्हणाले.
कुळथाची पिठी आणि सुकाबांगडा हे समिकरण त्यांच्या लय आवडीचं.पण अलीकडे त्यांना ते खायला मिळालं असेल का कुणास ठाऊक.
"तो तुमचा कार्डीआलॉजीस्ट काय म्हणाला?
असं मी विचारल्यावर मला आजोबा म्हणाले,
"माझं एक हृदय इतकं काही चांगलं नाही."
त्यांच्या जाड भुवंया जरा वर गेल्या.
"तो मठ्ठ स्नायु तितकासा चांगला नाही."
मला म्हणाले.
"आणि तुमचं दुसरं हृदय?"
मी लागलीच त्यांना प्रश्न केला.
चेहरा जरा प्रसन्न करून म्हणाले,
"मस्त! ते हृदय नेहमीच अर्ध्या भरलेल्या ग्लासातून पितं.मी अजून जीवंत आहे.मी खेडवळ आहे.तुझी प्रेमळ आजी अजून माझ्याबरोबर आहे.माझी दोन मुलं आहेत.तुम्ही नातवंडं आहात.हो! ते हृदय छान आहे."
मी थोडा मोठा झाल्यावर माझ्या आणि माझ्या आजोबांच्या आयुर्वृद्धिबद्दल विचार करायला लागलो.त्यांना काय वाटत असेल ह्याचा विचार माझ्या मनात यायचा.
त्या मध्य रात्री त्यांचा अर्धा लाडू संपता संपता मी त्यांना विचारलं.
ते खांदे उडवीत मला सांगू लागले,
"ते तसंच असतं.आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत यातना आणि पीडा असतात.अगदी तान्ह्यांना पोटदुखी असते,लुटुलुटु चालणार्‍या मुलांना पडण्याची भीती असते,विद्यार्थी दशेत टेस्टसची,कुमार वयात प्रिय आणि प्रियाबद्दल काळजी,तरुणाना काम आणि पैसा नंतर मुलांच्या काळज्या, शिवाय प्रत्येकाला दंगे धोपे आतंकवादी यांची भीती असते आणि हे असं चालायचंच.नुसता बदल आणि बदल.सवय होते.आणि पुन्हा बदल होत रहातो."
मी आजोबांना विचारलं,
"तुम्हाला कधी थकवा येतो का?"
"जर मला थकवा आला तर मी एक डुलकी काढतो.
आजोबांनी मला उत्तर दिलं.
"मला म्हणायचंय,म्हातारं व्ह्यायला होतंय म्हणून,जगण्याचा कंटाळा येतो म्हणून विचार येऊन थकवा येतो का?तुम्ही म्हातारे होत चालला आहात ह्याचा विचार येऊन मी उदास होतो"
मी आजोबांना म्हणालो.
"कदाचीत तुझी तुलाच भीती वाटत असावी."
ते म्हणाले.
"मला आठवतं मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो तेव्हा असे विचार आल्यावर चिंतामुक्त व्ह्यायचा प्रयत्न करायचो.असं हे होतच असतं.तसं लक्षात येणं जरा कठीणच असतं.आठवणी व्यतिरिक्त सर्वकाही जाऊ द्यायचं."
ते मला पुढे असं म्हणाले.
"मग मन एव्हडं भीत का असतं?"
मी आजोबांना म्हणालो.
मला म्हणाले,
"कारण तू अजून तेव्हडा मोठा झाला नाहीस.तुला जे माहित आहे त्यापेक्षा तुला जे माहित नाही ते जास्त भीतीदायक आहे."
किती व्यवस्थीतपणे माझ्या आजोबांनी माझी समजूत घातली.आता मी बालचिकित्सक तज्ञ म्हणून काम करीत असताना मी बर्‍याच आईवडीलाना पाहिलेलं आहे की ते आपल्या मुलांना रोग होऊन आजारी पडण्याच्या शक्यतेने किती चिंतातूर असतात.
आणि जेव्हा रोगनिदान होतं,अगदी धक्कादायक असलं तरी,ते समजल्याने त्यांचं मन थोडं चिंतामुक्त होतं.कारण दैत्याचं नाव सापडल्यामुळे तसं होत असावं.
"माझ्या खोलीतला तो भिंतीवरचा फोटो तू पहिलास ना?"
माझे आजोबा म्हणाले,
"तो माझ्या कॉलेजमधला माझा फोटो आहे.काळे भोर केस.तिच वेळ होती आम्ही निरनीराळ्या गावाला सहलीला जायचो.ब्रिटीशांना देशातून हाकलून द्यायची चळवळ चालू झाली होती.प्रत्येक दिवस रोमांचक असायचा.माझ्या आजोळी मी माझ्या आईला भेटायाला गेलो होतो.माझ्या आजोबांची ती शुश्रूषा करीत होती. आता मी जगाचा विचार करून जास्त शोधाशोध करीत नाही किंवा अर्थ काढीत बसत नाही.जे आहे ते आहे."
आजोबांनी उसासा सोडला.जणू आपलेच विचार बोलून त्यांना हायसं वाटलं असावं.
"माझी काळजी करू नकोस."
ते म्हणाले,
"किंवा तुझी पण.चिंतामुक्त होऊन आनंदी रहायला खूप गोष्टी आहेत.जमेल तेव्हडा लाभ घे.
नक्की तुला लाडू खायचा नाही?"
अलीकडेच माझे आजोबा हृदयविकाराचा झटका येऊन गेले.तो स्नायु कुचकामी झाला होता.पण त्यांच्या दुसर्‍या हृदयाने कशाशीही समझोता केला नाही."