Thursday 23 May 2013

प्रेयसीच्या चेहर्‍यावर हास्य पाहू इच्छित असाल


प्रेयसीच्या चेहर्‍यावर हास्य पाहू इच्छित असाल तर खाली दिलेल्या टिप्सचे पालन करा. त्यामुळे तुमची प्रेयसी आनंदीत होईलच शिवाय तिला आनंदी पाहून तुमचाही आनंद द्विगुणित होईल.

* तिच्या सौंदर्याची स्तुती करा.

* काही सेकंदांसाठी तिचा हात हातात घ्या.

* प्रेमळ चुंबन द्या.

* झोपेतून उठविण्यासाठी तिच्याच आवाजातली रेकॉर्ड केलेला आवाज ऐकवा.

* तुम्ही तिच्यावर प्रेम करता याची तिला वेळोवेळी जाणीव द्या.

* जर ती नाराज असेल तर तिला बाहूपाशात घेऊन ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे याची तिला जाणीव द्या.

* तिच्या छोट्या-छोट्या गोष्टीही लक्षात ठेवा. कारण प्रेमात हाही महत्त्वाचा भाग आहे.

* कधी कधी तिच्या आवडीची गाणे तिलाच ऐकवा. (तुमचा आवाज कितीही खराब असला तरी)

* तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतही काही वेळ घालवा.

* आपल्या कुटुंबातील व्यक्ती, आपले मित्र यांच्याशीही तिची ओळख करून द्या. यामुळे तिचा तुमच्यावरील विश्वास वाढेल.

* कधी-कधी तिच्यासोबत थोडी मस्तीही करा. (गुदगुल्या करणे, बाहूपाशात घेणे आदी)

* तिच्या केसांमधून तुमचा हात फिरवा. यामुळे तिला तुमच्या प्रेमाची जाणीव होईल.

* हसविण्यासाठी काही जोक्स ऐकवा.

* अर्ध्या रात्री तिच्या खिडकीजवळ एक छोटा दगड फेका आणि तिला सांगा की तुम्हाला तिची किती आठवण येते.

* तिच्याशी एकांतात वागता तसेच मित्रांसमोरही वागा.

* तिच्यावरील प्रेम नेहमी तिच्यासमोर व्यक्त करीत जा.

समोरच्याला वागण्याची एक संधी द्या!


आपण सगळ्यांपेक्षा वेगळेच आहोत, असे लग्न झाल्यानंतर प्रत्येकालाच वाटत असते. आपणच जगात सर्वात आनंदी, सुखी आहोत आणि आपल्यात कधी भांडण होणे शक्यच नाही; पण कालांतराने दोघांचे खरे रूप समोर यायला लागते. कडू गोळी साखरेच्या मुलाम्यात लपेटलेली, आणि साखरेचा मुलामा हळू हळू संपतोच. जिभेवर रेंगाळतो तो फक्त कडवटपणाच. नाती ही अशीच असतात का? दोघांमधले सामंजस्य का संपते? ती कुठे कमी पडते? त्याला का हे सगळे सांभाळून घेता येत नाही?

खूप कमी पुरुषांमध्ये सांभाळून घेण्याची ताकद असते. हळव्या मनाचे पुरुष फार कमी सापडतात. इतरांची काळजी घेणे हा गुण त्याच पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो. गमतीचा विषय म्हणजे असे पुरुष सगळ्यांचीच काळजी घेतात. त्यांना असंख्य मैत्रिणीसुद्धा असतात.

निसर्गाची कमाल म्हणा किंवा देवाची कृपा, जोड्या या परस्परविरोधीच तयार झालेल्या असतात. अती काळजी करणारी स्त्री असली की तिच्या वाट्याला नेहमी हेळसांडच येते. नव-याचे दुर्लक्ष, प्रेमाचा आणि काळजीचा अभाव. तिची अपेक्षा मात्र त्याच्याकडून कायम अशीच असते की त्याने कधी तरी माझ्यासाठी काळजीचे शब्द तोंडातून काढावे; पण कितीही प्रयत्न केले तरी तो आपला निर्विकार.

असेही पुरुष असतात जे घराची, मुलांची, बायकोची आपल्या सर्व कामात तडजोड करून काळजी घेत असतात. आणि त्यांच्या जोडीदाराच्या बाबतीत विचार केला तर त्या बायका ढिम्म असतात. जाऊद्या ना, तो करतोय ना, मग आपल्याला लक्ष द्यायची काय गरज? मजेची गोष्ट म्हणजे असे पुरुष सगळ्यांच्या आजारपणात स्वत:हून लक्ष देतात, काळजी घेतात. पण जेव्हा स्वत: ते आजारी पडतात तेव्हा त्यांच्या पार्टनरकडून त्यांना काळजीचा हात मिळत नाही.

love station
अति काळजी करणारी व्यक्ती स्वत:ला नेहमी सर्वगुणसंपन्न समजत असते. त्या व्यक्तीच्या मते तिला सर्वच जमत असते. अशा वेळेस समोरच्याने काही सांगितलेले त्याला पटत नसते. त्या व्यक्तीला आपल्या कार्यावर शंका घेतल्यासारखे वाटते. परिणामी या व्यक्तीचा पार्टनर अजूनच अलिप्त राहायला लागतो.

नको बाबा, मी केलेले काहीच हिला /याला पटत नाही. त्याच्यापेक्षा काही न केलेले बरे आणि हा / ही दुर्लक्ष करतात म्हणून हे आपले मनातल्या मनात धुसफूस करत बसतात. तात्पर्य काळजी घेणारी व्यक्ती स्वत:च्या हातात सर्व अधिकार घेऊन बसते आणि त्याच्या अधिकारक्षेत्रात पार्टनरने केलेली लुडबूड त्याला चालत नाही. त्याला सल्ला किंवा मदत नको असते; पण सहकार्य मात्र हवे असते.

अंतर्मुख होऊन विचार करून तसेच एकमेकांशी संवाद साधून अनेक प्रश्न सोडवता येऊ शकतात. पण संवाद हा केवळ संवादच असला पाहिजे, त्या संवादात एकमेकांच्या त्रुटींवर बोट ठेवताना खूप काळजीपूर्वक वागले पाहिजे. नाहीतर याचा उलट परिणाम होऊ शकतो.

भारतात नाती तशी कमीच तुटतात; पण सर्वात मोठे स्वीकारण्याचे सत्य म्हणजे आपल्या भारतात दोघे एकमेकांबरोबर खूप तडजोड म्हणून किंवा घरगुती अडचणीमुळे एकमेकांच्या नुसते बरोबर राहत असतात. एकमेकांच्यात साथसोबत राहत नाही. हे असे नाते कायदेशीररीत्या तुटलेले नसले तरी मनाने ते फार आधीच तुटलेले असते. मन मारून लोकलाजेस्तव ते एकत्र राहत असतात. काही थोड्या लोकांनाच प्रेम अनुभवायला मिळते; पण त्यातही गडबड होणार नाही, याची शाश्वती नाही.

आपल्या जीवनसाथीचे आपल्यावर प्रेम आहे; अन्यथा ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करतच नाही, हा आपल्या सोयीने अर्थ काढून मोकळे होण्यापेक्षा समोरच्याला वागण्याची एक संधी द्या!

सत्य कथा

थोडा time काढून हि सत्य कथा नक्की वाचा..
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये आलेल्या भूकंपामध ये्
एक हृदयाला स्पर्श करून जाणारी घटना घडली.,
भूकंपानंतर बचाव कार्य ची एक
तुकडी एका स्त्री च्या पूर्णपणे उध्वस्त
झालेल्या घराची पाहणी करीत होते,
एका बारीक फटीमध्ये त्या स्त्री च मृतदेह दिसत होता पण
ते एका विचित्र अवस्थेमध्ये होत..
ती स्त्री तिच्या पायावर अशी बसलेली होती कि आपण
जसेमंदिरात देवासमोर बसून प्रार्थना करतो.,
आणि
तिने तिच्या हातात काही तरी वस्तू पकडलेली होती..
भूकंपाने त्या माऊलीची पाठ आणि डोक पूर्णपणे कामातून
गेलेले होते..
खूप मेहनत करून त्या बचाव
तुकडीच्या काही सदस्यांनी थोडी जागा करून आपला हात
पुढे केला या उमेदीने कि.,
ती जिवंत असावी परंतु त्या स्त्री च शरीर पूर्णपणे
थंडपडलेल होत..!!
ज्यावरून ते लोक समजले कि हि स्त्री मृत झालेली आहे..
त्या तुकडीने ते घर लगेच सोडले आणि शेजारच्या घराकडे
चालायला लागले..
बचाव कार्य करणाऱ्या तुकडीच्या प्रमुखाचे असे म्हणणे होते
कि.,
"माहित नाही मला त्या स्त्री च घर मला त्याच्याकडे
का ओढत होत.,
तिथ अस काही होत कि ते मला म्हणत होत
कि मी या घराला सोडून जाऊ नये मी माझ्या मनाच ऐकून
त्या घरी परत जायचं ठरवलं".
त्यानंतर पुन्हा सर्व तुकडी त्याघराकडे तो मातीचा ढीग
सरकवू लागली
आणि त्या प्रमुखाने त्या बारीक फटीमध्ये हात घालून पाहिलं
तर त्यांच्या हाताला काहीतरी जाणवल..!
आणि त्यांच्या तोंडातून शब्द निघाला..
"बाळ ...इथे एक लहान बाळ आहे"!!!
सर्व तुकडी सावधानतेने तो ढीग बाजूला करू लागली..
तेव्हा त्यांना त्या महिलेच्या शरीराच्या खाली एका टोपलीमध्ये
रेशमी कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं एक नाजुक बाळ दिसल..
तेव्हा त्यांच्या लक्षात आल कि या स्त्री ने
जीवनाच्या त्याग करून
आपल्या शरीराचा सुरक्षीततेखाली त्या गोंडसबाळाला जीवनदान
दिलं..
डॉक्टर पण तत्काळ आले तेव्हा ते बाळ शुद्धीत नव्हते..
मग त्याला त्या कपड्यामधून बाहेर काढताना त्यांना एक
Mobile दिसला त्याच्या Screen वर १ Massage
type केलेला होता..
तो Mobile एक एक करून त्या तुकडीच्या सर्व
सदस्याकडे फिरत होता प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येत
होत..
त्यात अस लिहिलेलं होत.....
.
.
.
.
.
.
.
"माझ्या बाळा तू जर वाचलास तर इतकच स्मरणात राहू दे
कि तुझी आई तुझ्यावर खूप प्रेम करत होती"
(आईच्या प्रेमापेक्षा या जगात दुसर कोणतच प्रेम नाही)
एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला.लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.

' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.

आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.

आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.

राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.

आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.

आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.

संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.

वडील स्तब्ध झाले.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.

पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?
आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना