Sunday 23 December 2012

हृदयस्पर्शी कथा :



एकदा एक गरीब माणूस थकून उशीरा घरी येतो आई नसलेले त्याचा ५ वर्षाचा मुलगा

त्याची दारात वाटचं पाहत असतो..

मुलगा - बाबा तुम्हाला एका तासाचे किती मिळतात हो..??


बाबा - त्याचं तुला काय करायचंय..

मुलगा - सांगा ना बाबा..

बाबा - २० रुपये..

मुलगा - मला १० रु हवेयत..

बाबा - चल जा झोप गपचुप..

मुलगा कोमेजुन गपचूप वाकळ अंथरतो
आणी उशी खाली डोक टाकतो..
बाबांचा राग शांत होतो..

ते मुलाकडे जातात आणी,
"बाळाहे घे तुझे १० रु"

मुलगा - ते पैसे घेतो आणी त्याच्या उशीत लपवलेली काही चिल्लर काढून मोजतो..

मुलगा - बाबा माझ्या जवळ २०रु.. आहेत मला तुमचा
एक तास विकत घ्यायचाय,
उद्या मला तुमच्या सोबत जेवण करायचंय,
उद्या लवकर याल ना...

गोष्ट थोड़ी मोठी आहे

गोष्ट थोड़ी मोठी आहे पण छान आहे... नक्की वाचा....

एक माणूस एकदा एका अरण्यात फिरता फिरता वाट चुकला. भटकत भटकत तो अरण्याच्या खूप आत पोहचला. अरण्याचा हा भाग एकदम निर्जन होता. तिथे एका परी अन एका भूताचे राज्य होते. दोघेही आपापल्या राज्याच्या व
ेशीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करीत होते.

वाट चुकलेल्या माणसाला बघून परी म्हणाली अरे मी ओळखते ह्याला! लहान पणी मी ह्याच्या स्वप्नात जायचे, हा खूप खूप आनंदून जायचा मला बघून! मग आम्ही खूप खूप खेळायचो, नाचायचो खूप खूप भटकायचो. हा तर अगदी हट्टच करायचा तू जाउ नकोस म्हणून. मला आठवतंय सगळं त्यालाही आठवेल!

तो ओळखेल मला नक्कीच! मला वाटतं माझ्याच शोधात आलाय तो इथे. मी त्याचं अगदी जोरदार स्वागत करील. त्याला माझ्या राज्यात नेईल, त्याला छान सगळीकडे फिरवील. मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करील. आम्ही खूप खूप मज्जा करू.

भूत म्हणले, मी ही ओळखतो ह्याला. मी ही जायचो ह्याच्या लहानपणी ह्याच्या स्वप्नात. तेव्हा हा खूप घाबरायचा मला, अगदी थरथर कापायचा, मला बघून ह्याला भर थंडीतही दरदरून घाम फुटायचा ह्याला कधी कधी तर दचकून झोपेतून उठायचा, मग पांघरुण ओढून गुडुप झोपायचा प्रयत्न करायचा.

परी म्हणाली, तुझं असंच रे तूला सगळेच घाबरतात, तो काही केल्या तुझ्या जवळ यायचा नाही.

भूत म्हणाले, नाही! तसं होणारच नाही. तो माझ्या राज्यातून पुढे जाऊच शकणार नाही .

परी म्हणाली, नाही! नाही तो नक्कीच येईल तू बघच. त्याला खूप खूप आवडायची रे मी!

भूत म्हणाले, ती फार जुनी गोष्टं तेव्हा तो फार लहान होता. आता तर त्याला तू आठवणार ही नाहीस.

परी म्हणाली, आठवेल आठवेल त्याला सगळं! किती किती गोड होतं ते सगळं! ते रम्य बालपण! त्या गोष्टी विसरतो काय कुणी?

भूत म्हणाले, तुला वाईट वाटेल पण तो तुला विसरलाय हे नक्की. आता तर तो तुझ्यावर विश्वास सुद्धा ठेवणार नाही.

परी म्हणाली, मग तो तुझ्या राज्यात काय म्हणून येईल तो तुलाही विसरला असणार ना? तो काय म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवील?

भूत म्हणले, तसं होत नाही कधीच तो मला नक्कीच ओळखेल तो मला विसरणार नाही कधीच.

परी म्हणाली, तो मला ही विसरणार नाही, बघ तू आता कशी आठवण करून देते त्याला तू बघच. माझा निर्माता आहे विश्वास. विश्वास कधीच खोटा ठरायचा नाही! तू बघच तो मला नक्कीच ओळखेल, लावतोस पैज!

भूत म्हणाले, पैज नको लाउस कारण मला चांगला अनुभव आहे तू नक्कीच हारशील.

परी म्हणाली, नाही माझा विश्वास कधीच खोटा ठरणार नाही, तूच घाबरतो आहेस पराभवाला! म्हणून टाळतो आहेस ना?

भूत म्हणाले, ठीक आहे बघ प्रयत्न करून.

परी म्हणाली, सांग मी जिंकली तर काय देशील?

भूत हसले आणि म्हणले, जर तू जिंकलीस तर मी तुला माझे पूर्ण राज्य देऊन टाकील, अन मी कायमचा ह्या जगातून निघुन जाईल.

बघ हं! परी म्हणाली, वेळेवर शब्द फिरवायचा नाही.

नाही फिरवणार! भूत म्हणाले.

मग परी ने विश्वासाची आराधना केली, अन तिने गोड आवाजात गाणे म्हणणे सुरु केले, पक्षी ही आपल्या गोड गळ्याने तिला सुरात साथ देऊ लागले. परी ने मग हळू हळू नाचायला सुरवात केली. वारा मंद मंद शीळ वाजवून तिला साथ देऊ लागला, पानांची सळसळ सुरु झाली. आनंदानी झाडे अन वेली ही डोलू लागली. फुलांनी आपल्या पाकळ्या पसरायला सुरवात केली.वातातावरण प्रसन्न होऊ लागले माणूस ही आनंदी होऊ लागला. परी ने मग मनातल्या मनात दुप्पट जोमानी विश्वासाची आळवणी केली, आता सूर्याने वनावर आपली किरणे फेकली त्या किरणात माणसाला परी चे सोनेरी केस तिचे सुंदर डोळे दिसू लागले, हळूहळू त्याला तीची पूर्ण आकृती दिसू लागली. परी आनंदून गेली तिने त्याच्या स्वागता साठी हात पसरले.

माणसाला स्वता:च्या डोळ्या वर विश्वासच बसेना. भ! भ! भूत!! त्याच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले.

अचानक आकाशात ढग भरून येऊ लागले, विजांचा कडकडाट सुरु झाला, सूर्य ढगांच्या आड लपून गेला, अंधारून येऊ लागले, सोसाट्याचा वारा सुरु झाला, झाडे कडाकडा मोडून पडू लागली, माणूस भयानी घामाघूम झाला, त्याची दातखीळ बसली अन तो कोसळून गतप्राण झाला.

सर्व काही शांत झाले. परी धावतच माणसा जवळ गेली अन रडू लागली. ती भूताला म्हणाली, तूच जिंकलास. नेहमी तूच का रे जिंकतोस. मला सगळे का विसरून जातात?

भूत ही खिन्न झाले, त्यानी परीच्या खांद्या वर थोपटले. ते म्हणाले हे असंच होतं.नेहमीच! तुझा निर्माता आहे विश्वास, माझा निर्माता आहे भय. विश्वास काय अन भय काय हे ह्याच्याच डोक्यातून जन्म घेतात. हाच आपला मुळ निर्माता आहे, आपले वेगळे अस्तित्व नाही. पण!
पण! पण काय? परी म्हणाली.

हा मोठा झाला होता. अन जसा जसा माणूस मोठा होत जातो ना तसा तसा त्याचा विश्वास कमी होत जातो, पण! पण भय मात्र वाढत जातं. म्हणूनच मी जिंकतो. पण तू उदास नको होऊस, माझा शब्द अजून कायम आहे जेव्हा ही विश्वासाचा विजय होईल ना त्या दिवशी मी खरंच हे जग नेहमी साठी सोडून जाईल. भूत म्हणले.







Saturday 15 December 2012

आई-वडिलांवर प्रेम असेल तर हे वाचा............

आई-वडिलांवर प्रेम असेल तर हे वाचा नाहीतर Scroll करा !!




आई घराच मांगल्य असते तर बाप घराच अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला
खरच आम्ही कधी समजून घेतलेले आहे का ?

वडिलांना महत्व असूनही त्यांच्या विषयी जास्त लिहिलं जात नाही, बोललं जात न

ाही.
कोणताही व्याख्याता आई विषयी बोलत राहतो. संत महात्म्यानीही आईचचं महत्व अधिक
सांगितलं आहे. देवदिकांनीही आईचेच गोडवे गायले आहेत.. लेखकांनी कवींनी आईचं
तोंड भरून कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते

पण बापविषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही
तापट, व्यसनी, मारझोड करणाराच.

समाजात एक दोन टक्के बाप असतीलही पण चांगल्या वडिलांबद्दल काय?

आईकडे अश्रूंचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते
पण सान्त्वन वडिलांनाच करावं
लागतं आणि रडणार्यापेक्षा सान्त्वन करणार्‍या वरच जास्त ताण पडतो कारण
ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना ! पण श्रेय नेहमी ज्योतिलाच मिळत राहतं !
रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरिचि
सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो.
सर्वासमोर आई मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशित तोंड खुपसुन मुसमुसतो तो
बाप असतो .
आई रडते वडिलांना रडता येत नाही, स्वतः चा बाप वारला तरीही त्याला रडता येत
नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचा असतं. आई गेली तरीही रडता येत नाही, कारण
बहिनिंचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावर सोडून गेली तरी

पॉरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.

जिजाबाईंनी शिवाजी घडविला अस अवश्य म्हणावं पण त्याचवेळी शहाजी राजांची ओढतान
सुद्धा ध्यानात घ्यावी. देवकीच, यशोदेच कौतुक अवश्य करावं

पण पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा.

राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण पुत्रवीयोगाने तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता.

वडिलांच्या टाचा झिजलेल्या चप्लांकडे बघितलं की त्यांच प्रेम कळते. त्यांचे
फाटके बॅनियान बघितलं की कळतं "आमच्या नशीबाची भोक

त्यांच्या बॅनियानला पडलीत".त्यांचा दाढी वाढवलेला चेहरा त्यांची काटकसर
दाखवितो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला लुंगी घेतील पण स्वतः

मात्र जुनी पॅंटच वापरतील.मुलगा सलुन मध्ये वीस पंचवीस रुपये खर्च करतो, मुलगी
पार्लर मध्ये खर्च करते, पण त्याच घरात बाप दाढीचा साबण संपला म्हणून
आंघोळीच्या साबणाने दाढी करतो.अनेकदा नुसतं पाणी लावून दाढी करतो.बाप आजारी
पडला तरी लगेच दावाखान्यात जात नाही, तो
आजारपनाला घाबरत नाही पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला
भीती वाटते कारण पोरिच लग्न, पोरांच शिक्षण बाकी असतं, घरात उत्पन्नाच दुसरं
साधन नसतं.ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकल, इंजिनियरिंग ला प्रवेश मिळवून दिला
जातो, ओढतान सहन करून मुलाला दरमहिन्याला पैसे पाठविले जातात. पण सर्वच नसली
तरीही काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूम
मध्ये पार्ट्या देतात आणि
ज्या बापानी पैसे पाठविले त्याच बापाची टिंगल करतात.
आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या
घराकडे वाईट नजरेने कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला कर्ता
जिवंत असतो, तो जरी काहीही करत नसला तरीही तो त्या पदावर असतो आणि घरच्यांच
कर्म बघत असतो, सांभाळत असतो.कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही पण बाप होणं
टाळता येतं, पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई
होण्याला बापामुळे अर्थ असतो.
कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते,
कौतुक करते, पण गुपचुप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत
नाही. पाहितलकरणीच खूप कौतुक होतं पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणार्
या त्या बाळाच्या बापची कोणीही दाखल घेत नाही.

चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर 'आई गं' हा शब्द बाहेर पडतो. पण रस्ता पार
करताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक लावतो तेव्हा 'बाप रे' हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो. काय पटतय ना?

कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्वजण जातात, पण मयताच्या प्रसंगी बापलाच जावं
लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो,
पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा ऊशिरा घरी
येतो तेव्हा बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढे
लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उम्बर्ठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी
स्वतः च्या व्यथा दडपणारा बाप, खरच किती ग्रेट असतो ना?

वडिलांचं महत्व कोणाला कळतं ? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदर्या खूप
लवकर पेलाव्य लागतात, त्यांना एकेका वस्तुसठी तरसावं लागतं. वडिलांना खर्या
अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून
दूर असलेल्या मुलीला फोनवर
बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो, ती अनेक प्रश्न विचारते.
कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेऊन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या
बोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते. इतरांनी सुद्धा असच आपल्याला
जाणावं हीच बापची किमान अपेक्षा असते

आवडलं तर नक्की शेयर करा !!!!!

Tuesday 4 December 2012

प्रेमत्रिकोण.............

प्रेमत्रिकोणः
मित्रांनो ही कहानी आहे अशा प्रेमवीरांची जे बालपणाचे मित्र तर होते,पण त्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रेमाला ते मैत्रीच समजत होते.या कहानीत देवदासही आहे,पारोही आहे आणि चंद्रमुखीही.पण तरीही ही कहाणी पुर्णतःवेगळी आहे जी नक्कीच

 तुम्ही याआधी कधीच अनुभवली नसेल।
शर्विल या कथानकाचा नायक,दिप्ती नायिका आणि मानसीला चंद्रमुखी म्हणायला हरकत नाही।
शर्विल आणि दिप्ती हे दोघे बालमित्रच शेजारी शेजारी असलेने त्यांची मैत्री ही खुपच गाढ होती।एकाच शाळेत एकाच वर्गात शिकायचे ते..शर्विल अभ्यासात कच्चा आणि आळशी असल्याने त्याचा घरचा अभ्यास खुपवेळा दिप्तीच करायची।पण तोहि दोस्ती निभावण्यामध्ये काही कमी नव्हता,एकदा ज्यावेळी दीप्ती तिची अभ्यास केलेली वही घरीच विसरुन आली होती,त्यावेळी शर्विलने त्याची वही जी तिनेच पुर्ण केली होती,ती तिला दिली आणि त्याने अभ्यासाची वही नसल्याने मॅडमचा मार खाल्ला होता।आज ते मोठे झालेत आणि अजुनही एकाच कॉलेजमध्ये,एकाच क्लासमध्ये शिकतात,त्यांची मैत्री अजुनही तशीच आहे,सदाबहार, अजुनही शर्विल आळशीचा आळशी आणि दिप्ती जशीच्या तशीच आहे,ही कायम कॉलेज टॉपर असायची आणि हा 35% जिँदाबाद,तेही तिच्याच पेपरमधलं उतरवलेलं,हा पण तो कॉलेजमधला एक नंबर डान्सर आहे,सर्व मुली तर याच्या लॉकींग पोपींग डान्सवर मरतात,दीप्तीलाही त्याचा डान्स आवडतो पण,हे तिला आवडत नाही।काही दिवसापुर्वी त्यांचा निकाल लागला त्यात दीप्तीला 96%आणि शर्विलला 48%मार्क्स मिळाले होते।दोघांनीही एकाच क्लासमध्ये अॅडमिशन घेतलंय।आणि आता या कथेची उपनायिका म्हणजेच या कथेची चंद्रमुखी म्हणजेच मानसी हीचि entry होते।मानसी एक मॉडर्न मुलगी आहे,जीन्स,स्कर्टस डोळ्यावर गॉगल,4व्हीलर गाडी,पर्स कायम पैशाने भरलेली,अशी ही मुलगी।तिचंही अॅडमिशन आज शर्विलच्या क्लासमध्ये झालंय.तिची Entry होताच,वर्गातली सर्व मुले तिच्याकडेच बघत असतात,शर्विलही।त्यामुळे सर्वमुली तिच्यावर जळतात.शर्विलला तर ती बघताक्षणीच आवडली होती।शर्विलने तिच्याशी मैत्री केली,एकमेकांसमवेत त्यांचा बराच वेळ जाउ लागला।त्यामुळे दीप्तीला ते आवडत नव्हतं,कारण नकळत ती त्याच्या प्रेमात पडली होती.एक दिवस कॉलेजच्या गॅदरींगमध्ये शर्विलचा डान्स पाहुन मानसी तर त्याच्या डान्सवर एकदम वेडीच झाली।इकडे शर्विल दीप्तीला म्हणाला माझं मानसीवर खुप प्रेम आहे,तिला प्रेमपत्र लिहावं म्हणतोय पण काय लिहावं हे कळतच नाहाये,मला मदत करशील?यावर काय reaction द्यावी हे दीप्तीला कळतंच नव्हतं।पण मैत्रीसाठी तिने निस्वार्थ भावनेने,थोडं दुखी मनाने ते प्रेमपत्र लिहीलं.दुसर्यादिवशी क्लासमध्ये ते पत्र तिने शर्विलच्या हातात हळुच कोंबले आणि मानसीला ते देण्याचा इशारा केला।तो खुप घाबरला होता,थरथरतच तिच्यासमोर जाऊन उभारला।तो पत्र द्यायच्या आतच मानसीने त्याच्या हातात एक चिठ्ठी दिली,व जायचा इशारा केला त्यानेही ते पत्र तिच्या हातात देऊन तिथुन काढता पाय घेतला।गंमत म्हणजे दोघांनीही एकमेकांना एकाचवेळी प्रेमपत्रे दिली होती।दोघांचं प्रेम जमलं,एकमेकांना बाहेर भेटणं सुरु झालं,याला निवांत कुठेतरी बागेत भेटणं आवडायचं,तर तिला डान्सक्लब,पार्ट्यांमध्ये रमणं आवडायचं।इकडे शर्विलविना दिप्तीची अवस्था खुपच वाईट झाली होती,आपला जिवाभावाचा मित्र अचानकच आपल्यापासुन खुपच दुर जात होता,तिला मनमोकळं करायला कोणीही नव्हतं,तिला कळुन चुकलं होतं की आपलं त्याच्यावर प्रेम बसलंय।पण ती स्वतःच्याच मनाला समजावत होती की आपल्या प्रेमाला त्याच्या प्रेमाची साथ मिळाली हेच माझ्यासाठी सुख आहे।इकडे शर्विलला कळलं कि मानसी क्लबमध्ये पार्ट्यांमध्ये ड्रिँक घेते यावरुन त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि तु माझ्या आयुष्यात पुन्हा मला भेटु नकोस असं म्हणुन तो घरी निघुन आला.त्याला पुन्हापुन्हा दीप्तीची आठवण येत होती तिला सगळं सांगावंस त्याला वाटत होतं,तिच्यावर आपण केलेल्या अन्यायाची जाणीव त्याला झाली.रात्र खुप झाली होती त्याच्या मोबाईलवर एका unknown नंबर वरुन फोन येत होता,थोडा डिस्टर्ब असल्यामुळे शर्विल पुन्हापुन्हा फोन कट करत होता.फोन येणं बंद झाल्यावर तो झोपीला.सकाळी सहा वाजता दिप्तीचा फोन त्याला आला त्याने तो लगेच उचलला.दीप्तीची आई बोलत होती,हॅलो शर्विल,काल दीप्तीचा अॅक्सीडंट झालाय रे तिला गांधी हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केलंय प्लीज तु लवकर ये...फोन लगेच कट झाला..तो लगबगीने गांधी हॉस्पीटल कडे निघाला,मनात वाईट विचार येत होते,काय झालं असेल माझ्या दीप्तीचं?माझी दीप्ती....मी असं का म्हणतोय?काय खरंच माझं तिच्यावर प्रेम जडलंय?जाऊदे....शर्विल हॉस्पीटलमध्ये पोहोचताच दीप्ती कॉटवर पडलेली असते,तिला सलाईन लावलेलं असतं,डोक्यावर पट्ठी बांधलेली असते,ती अजुन बेशुद्धावस्थेत असते,शर्विल तिच्याजवळ जाऊन बसतो,आणि त्याने तिचा,हात हातात घेताच तिला शुद्ध येते,ति त्याच्याकडेच बघत असते.तो तिची माफी मागतो आणि म्हणतो,मी भावनेच्या भरात भरकटलो होतो मला माफ कर,मी मानसीशी सर्व संबंध तोडलेत,मला फक्त त्या मैत्रिणीची गरज आहे जी माझी काळजी घेते,माझ्या मनातलं ओळखते मला तुझ्याशी लग्न करायचं आहे,तु माझ्याशी लग्न करशील?तिच्या डोळ्यातुन एक अश्रु तिच्या गालावरुन खाली घरंगळत आला.शेजारी असणारी एक लहान मुलगी शर्विलला म्हणाली,अॅक्सिडंट नंतर दीदीने बोलण्याची शक्ती गमावलीय.काल तिचा शेजारी असलेल्या स्टॉपजवळ अॅक्सिडंट झाला,ती बेशुद्धावस्थेत होती,जवळ पडलेल्या डायरीमध्ये तुमचा नंबर मिळाला,पण तुम्ही काही फोन उचलला नाही.त्यामुळे दीदीला दवाखान्यात आणण्यास खुपच उशीर झाला आणि त्यामुळेच तिची वाचा शक्ती गेली.हे ऐकताच त्याची मान शरमेने खाली गेली व तोही रडु लागला,दीप्तीने त्याच्या हनुवटीला धरुन तीच मान अलगद वर केली,आणि इशार्यानेच न रडण्याचा ईशारा केला.त्याने तिला एकदम छातीशी धरलं,आणि खुप रडला,तिने शेवटी लग्नाला होकार दिलाय,दोघांचं लग्न खुपच साध्या पद्धतीने पण छान झालं.....
आज ते खुपच सुखी आहेत आजपाच वर्षानंतर त्यांना एक मुलगी ही आहे.