Saturday 16 June 2012

पायातल्या चपला काढल्यावर त्याने चपलांना नमस्कार केला. मी पाहत राहलो. तो म्हणाला, " ह्या चपलांनी मला इथपर्यंत येण्यास मदत केली, म्हणून नमस्कार." मुळातच हे सगळे का करायचे??? कृत्ग्न्य भाव जपण्याचा हा केवळ प्रारंभ आहे . निर्जीव वस्तूबद्दल तुम्ही हमदर्दी दाखवायला सुरवात केली तर त्यातूनच जित्याजागत्या माणसाचा आदर कारण हा सहजधर्म होईल
.................व. पु. काळे

पत्र लिहिण्यास कारण की....

पत्र लिहिण्यास कारण की....
माननीय,
मंत्री ,
महाराष्ट्र, भारत

विषय : इतका कमी शब्दात विषय मांडू शकत नाही ,त्यामुळे विषय वाचून पत्र फेकाण्यापैक्षा पूर्ण पत्र वाचावे ,
...

पत्र लिहिण्यास कारण की....
मी तसा बरा आहे ...
यंदा आपल्या कृपेने ,आत्महत्या कमी झाल्यात ..(जास्त जन उरलेच नाहीत आत्महत्या करायला ,आम्ही मोजके भित्रे बाकी आहोत फक्त ) ,
दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही.. माझा मुलाला कपडे पुस्तक खेळणी तर नाही पण त्याला एक वेळेचे अर्धवट जेवण देन्याइत्पत हिरवेगार दु:ख माझ्या शेतात
उगवले आहेत ...पावूस कमी झाला यात तुमची काहीच चूक नाही ... घामाने जितके पिकवता आले तेवढे पिकवले ...
उधार मागायला सावकाराकडे जावू शकत नाही ..पोरगी आणि बायको सोडून गहाण ठेवण्यासारखे आता काहीच उरले नाही ...
माझ्या पोरीला माझा सदरा दिल्या मुळे ती सध्या आनंदात तर म्हणता येणार नाही पण खुश आहे कारण तिचे अंग ती आता झाकू शकते ...
बायको माझी अगदी शांत आहे ..एक ही शब्द बोलत नाही .. बसल्या बसल्या कधी उगीच रडून देते बस ...
तरी तुमच्या अमाप संपत्तीतून आम्हाला काही उधार द्यावे ही विनंती ...
आमचे लचके तोडून जमवलेली ती संपत्ती आहे ..............


आपला ....



बाबा अजून काही लिहायचं आहे .. मी पोराकडे बघत होतो ..त्यानेच हे पत्र लिहिले मी सांगितले मोजक्या शब्दात होते की काय लिहायचे आहे ..
तो पत्र वाचत होतो तेंव्हा डोळ्यात पाणी आलेले ..स्वताचा राग ही आलेला ..आणि थोडे बरे ही वाटले की पोरग हुशार आहे ...
मी त्याला जवळ घेतलं ..तनु पण आली माझ्या जवळ म्हणाली बाबा मीच शिकवले आहे त्याला ..आम्हाला शाळेत बसू देत नाही ना ..तर मी त्याला शिकवते ...
मी तिला ही जवळ घेतले ...बायको भरल्या डोळ्याने अश्रू लपविण्याचा प्रयत्न करीत होती ...
तिच्या साठी मुलां साठी जगेल आयला ...
त्यांना पाहिले की एक विश्वास येतो मनात ....
मी म्हटले मल्हार ला अजून एक वाक्य टाक पत्रात शेवटी ..
तो बोललो सांगा बाबा ..म्हटले लिही

"पत्र लिहिण्यास कारण की ...
मी तसा बरा आहे ..
मी लढेल .. "

हे एकूण २४ तास मनात मी मरेल ही भीती असलेली माझी बायको सुखावली थोडी ....
आणि ओरडली ..
पुरे झाले आता ..
काम करत नाही काय नाही ..
ये तनु गिळायला वाड त्यांना ....

-- आभार : फेसबुक समीक्षक

व.पु.काळे

जो कुणी "मी खूप सहन केले,खूप सहन केले" असे ओरडून सांगतात
ते खरे तर जगाकडून सहानभूती मिळवत असतात.
जो सहन करतो तो कधी बोलत नाही.

"व्यवहारी माणसांत, समाजात चांगल वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून. म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची. इथच यातना आहेत. एखादाच बदल असा असतो कि त्याचा मनाने स्वीकार केला जातो. बाकी सगळ लादलेल असत. प्

रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारख करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्याच प्रमाणात तो... समोरच्या माणसावर प्रेम करतो. ह्या स्वरूपाच प्रेम करण हे प्रेमच नाही. ही स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारे किती?

प्रत्येक माणसाच्या मनात त्याच एक जग असतं. ते उध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड. जे बाहेरचं जग मानतात ते आतून फुटतात. जे बाहेरचं जग उध्वस्त झाल तरी चालेल म्हणतात ते सुखी."

सर्वात जवळची माणसंच जास्त तर्हेवाईकपणाने वागतात, त्यांचं आपण मुळीच मनाला लाऊन घेऊ नये. परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करू नये ह्याचा धडा आपल्याला घरबसल्या मिळावा हा त्याचं सद्हेतू असतो. एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख निर्माणच होत नाही.

आईच्या आणि बापाच्या व्याख्येत जर सुस्वाद नसेल ,तर मुलं गुदमरतात...कोणत्या पाऊलवाटेचा पुढे हमरस्ता होईल हे प्रवासाच्या प्रारंभी सांगता येत नाह...ी....तेव्हा मुलाला चालू द्यावं.....आई बापांनी मुलाच्या मार्गात आडवं पडावं ते सावलीच्या रूपाने.

बाप मुलाला गाडी देऊ शकतो.
झोप देऊ शकत नाही.
आई जेवण देऊ शकते.
भूक देऊ शकत नाही.



व.पु.काळे

Friday 15 June 2012

व. पु, काळे

आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याला काही ना काही देऊन जातो, शिकवून जातो ...

जेंव्हा तो तहानलेल्या धरती वर पडतो... तेंव्हा तो मातीला एक वेगळाच गंध देऊन जातो... ओल्या मातीचा गंध...
'देण्यात' किती सामर्थ्य असतं हेच तो नकळत आपल्याला... सांगून जातो...

जेंव्हा तो झाडांच्या पानांवर पडतो... जास्त वेळ थांबत नसेलही तो तिथे... पण तरीही तो त्या पानांना अगदी टवटवीत करून जातो...
'ओझरता स्पर्श'... ओझरत्या स्पर्शाची ताकद दाखवून जातो तो आपल्याला ...
कारण त्यात 'लालसा' नसते... त्यात असते एक अनामिक 'ओढ'... अन तीच आपल्याला टवटवीत ठेवते...

अन जेंव्हा तो तिच्या चेहऱ्यावर पडतो... तेंव्हा ....
तेंव्हा राहतंच काय हो ;)...

तिच्या गालावरून खाली येतांना तर तो खुद्द बेभान होऊन जातो...
बेधुंद 'जगणं' काय असतं हेच तो आपल्याला सांगून जातो...

लेखक : व. पु, काळे

खरच प्रेमाला वयाचे बंधन नसते....






खरच प्रेमाला वयाचे बंधन नसते....

एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके
काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं
लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय.
डॉक्‍टरांसमोर त्या क्...षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली,
सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या
गृहस्थाशी गप्पा मारत होते.

... ""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?''
""नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या
हॉस्पिटलमध्ये जायचंय.''
""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?''
""हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.''
""अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही
करतील...?''
""नाही डॉक्‍टर. तिला "अल्झायमर्स' झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच
ओळखत नाही.'' आजोबा शांतपणे म्हणाले.

डॉक्‍टर चकित होऊन म्हणाले, ""आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर
नाश्‍ता करायला इतक्‍या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही
नसताना?''

त्यावर पुनः तितक्‍याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, ""डॉक्‍टर ती
मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे
ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.''

ऐकता ऐकता डॉक्‍टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला.
त्यांच्या मनात आलं, ""हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं
नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं,
उधळणं - त्या गृहस्थांसारखं.''

हृदय स्पर्शी प्रेम कथा ♥♥♥

हृदय स्पर्शी प्रेम कथा ♥
कुठे होतास तू, तुला अक्कल आहे का,गेले दोन तास मी सारखी तुला कॉल करतेय, बघ तुझ्या मोबाईल वर ७०-८०मिस-कॉल असतील.तुला कशी रे जरासुद्धा माझी काळजी नाही. काय समजतोस तू कोण स्वताला?
अग हो हो हो, किती ओरडशील मी तरी काय क...रू मला नाही जमल फोन उचलायला, काही प्रोब्लेम होता...
मला माहित आहे रे, तुला नेहमीच प्रोब्लेम असतात, खोटारडा आहेस एक नंबरचा, हल्ली खूप खोट बोलतोस माझ्याशी बसला असशील मित्रांबरोबर टवाळक्या करत आता लग्न झालाय तुझ लहान
नाहीस अजून.
सोड न राग आता ये न मिठीत, मला माहित आहे तुझा राग माझ्या मिठीतआल्यावर पटकन पळून जातो...चुमंतर.. ...
मी नाही येणार, सोड मला, मला नाही यायचय मिठीत... सचिन आणि सवी... एका वर्षापूर्वी दोघांचा प्रेम विवाह झाला,प्रेम खूप होत दोघांचएकमेकांवर पण सतत अशीच भांडण चालू असायची, जास्त गंभीर नसायचीपण.
कॉलेजपासून सचिन सवी वर खूप प्रेम करत होता, तिचाही त्याच्यावर खूप प्रेम होत, शिक्षण संपल्यावर सचिनला एक चांगली नोकरी मिळाली, स्वताच्या पायावर उभा राहिला आणि त्याने सविला डायरेक्ट लग्नासाठी मागणीघातली. तिने त्याला होकार दिला आणि त्याचं लग्न झाल.
"अग मला वाटल आपल्या सकाळच्या भांडणा नंतर तू आज तुझ्या आईकडे जाशील, आणि मग मी एकटाच असीन घरात,म्हणून मी तुला ऑफिस मधून निघताना कॉल नाही केला. आणि ज्यावेळी तुझा फोन येत होता मला वाटल अजून भांडशील त्यापेक्षा डायरेक्ट घरी जावूनच तुझा राग घालविण म्हणून हे बघ किती डेरी-मिल्क्सची चोक्लेट्स आणलीततुझ्यासाठी."
"मला नकोयत ती...आणि मी काय सारखी भांडतच असते कारे तुझ्याशी? मला काही दुसरे उद्योग नाहीत का? मलावाटल मी सकाळी जरा जास्तीच नाटक केली, तू रागावला असशील माझ्यावरम्हणून मी पण तुझ्या आवडीची चायनीज डिश बनवण्याची तयारी करून बसली होती, मला वाटल विचारव तुला, कि तू कधी येतोयस म्हणजे तुझ्यासाठी गरमागरम बनवल असत."
"आता हे मला माहित होत का, तूच एक एसमेस करून सांगायचास ना हे. मग मी ऑफिस मधून लवकर निघून आलो असतो माझ्या लाडक्या बायकोसाठी, आतातरी ये ना मिठीत.
नाही म्हणजे नाही.... मी नाय येणार जा." "त्यासाठी तर मी आलोय ना इथे..." "काय? तू मला मिठी मारण्यासाठी इथे आला आहेस का? मला आधी संग तू कुठे होतास इतका वेळ ते, अन तेही खर खर संग.....
"बर मग आईक. मी ऑफिस मधून थोडा अर्धा-पावून तास उशीरच निघालो, निघायच्या आधीपासूनच तुझा कॉल येत होता, मला वाटल तू आता रागावशील आणि मी लेट झालोय म्हणून अजून भाद्क्शील, म्हणून मी फोन नाही उचलत होतो. मी विचार केला
फटाफट drive करून अर्ध्या तासात घरी पोहचेन हे चोक्लेट्स घेवून. पण काय करू नेमका पावूस सुरु झाला. पावसाचा जोर इतका वाढला कि मला पुढच नीट दिसतही नव्हत, आणि तेवड्यात अचानक समोर एक ट्रक रस्त्यात बंद पडलेला दिसला पण मला काही कळायच्या आत माझी कार
त्या ट्रक वर जावून जोरात आदळली.
माझ्या कारचा पुढून पूर्ण चेंदामेंदा झाला आणि काचा माझ्या तोंडात आणि बाकी शरीरात घुसल्या, त्यावेळी पण तुझा फोन वाजत होता पण ह्यावेळी मला तो उचलायचा होता पण माझे हात निकामीझाले होते मी प्रयत्न करून सुद्धा फोन उचलू नाही शकलो. आणि पुढच्या पाच मिनिटात काय
झाले मला काहीच कळले नाही...
कोणी एक भला मोठा माणूस माझ्याजवळ आला आणि मला त्यातून अलगद उचलून वरती वरती खूप वरती घेवून गेला." सवी खूप जोरात किंचाळून झोपेतून जागी झाली, तिला पडलेलं हे भयानक स्वप्न होत. सवी खरोखरच झोपताना सचिनशी भांडून झोपली होती आणि तिला अशीचसवय
होती जर भांडण झाली असतील तर खूप फोन करत बसण्याची आणि अजून ते भांडण
वाढवण्याची.
तिने सचिनला एक घट्ट मिठी मारली आणि खूप रडायला लागली, तो झोपेतून जागा झालाच होता तिची किंकाळी आईकून. तो हि घाबरला होता आणि तिला विचारात होता...
"अग सवी काय झालाय, तुला बर नाही वाटत आहे का? काही खराब स्वप्न पडल का?
अग शोना बोलना....काय झाल? थांब मी पाणी आणतो तुझ्यासाठी." "हे घे पाणी, पी. आता संग काय झाल?" मी नाही वाद घालत बसणार यापुढे तुझ्याशी, आणि तुही नको माझ्याशीवाद घालू, आणि कधी झालाच ना एखाद भांडण तर त्या वेळी आपण ते फोन वरअजिबात नाही बोलायचं, खरतर मीच नाही करणार यापुढे कधी कॉल जर भांडण झालाच तर. सामोरा समोर बसून आपण भांडण मिटवू....
" i love u मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय एक सेकंद सुद्धा" असे बोलत तिने पूर्ण स्वप्न
सांगितले सचिनला...
"i love u tooo .......मी राहु शकणार आहे का कधी तुझ्याशिवाय...ब ावळट कुठली." ♥

बाप................

एकदा एक वयोवृद्ध बाप आपल्या उच्च शिक्षित मुलासोबत घराच्या छतावरती बसला होता.
तेथे एक कावळा आला....
मुलाला बापाने विचारले, ते काय आहे?
मुलगा म्हणाला कावळा.
पुन्हा दुसऱ्यांदा बापाने विचारले, ते काय आहे?
मुलाने पुन्हा उत्तर दिले कावळा.
तिसऱ्यांदाही बापाने विचारले ते काय आहे?
मुलाने जरासे दात-ओठ खात म्हटले, कावळा............
मग ते दोघे घरात गेले. त्याला पुन्हा बापाने विचारले ते आत्ता आले होते ते काय ...होते?
मुलाचा संयम सुटला होता त्याने ओरडत सांगितले, समजत नाही का?
कावळा...... कावळा... कावळा.

पाचव्यांदा बापाने विचारले ते आपण पाहिले ते काय होते?
मुलगा आता मात्र जाम भडकला त्याने त्यांना सांगितले,
का टाईमपास करताय? तुम्हाला कितीदा सांगितले तो कावळा होता म्हणून,
तरी तुम्हाला समजत नाही का? का जाणून- बुजून त्रास देताय?
मग त्या वयोवृद्ध बापाने त्या मुलाला घरातील एक डायरी आणायला सांगितली.
त्याने ती आणली, त्यात हीच कथा लिहिली होती.
परंतु, ती थोडी वेगळी होती. त्या बापाच्या जागी एक लहान मुलगा होता.
त्याने बापाला एक-दोन नाही तर तब्बल 25 वेळा हाच प्रश्न केला होता,
आणि तितक्याच वेळा त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिले.
त्यांना त्याच्या विचारण्याचा मुळीच राग येत नव्हता,
उलट त्यांना त्या मुलाचा निरागस स्वभाव आणि त्याचे ते विचारणे आवडत होते.
तो बाप त्या मुलाचाच होता जो त्याला केवळ पाच वेळा विचारल्यावर त्यांच्यावर खेकसला.
फरक फक्त हाच, की मुलासाठी बापाने केलेले कष्ट,
त्यांनी सहन केलेल्या सर्व वेदना तो विसरला होता.
उलट त्याने वडिलांना केवळ दु:खच दिले.
लक्षात ठेवा. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी कितीतरी कष्ट केले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी केवळ दु:खच देत आहात?
आई-वडिलांना विसरू नका. त्यांनी केलेल्या कष्टांना विसरू नका.