Tuesday, 31 January 2012

सात जन्म असतात का ?.............


खरच का ग आई......!!!!!!
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर पुढचा जन्म माग...तात का?
... ... ... ...
प्रत्येक सातव्या जन्मी मी सात जन्म मागणार आहे , तुमच्याच पोटी येण्यासाठी मी एक तरी तप करणार आहे………
प्रत्येक पुढचा जन्म माझी तूच आई व्हाविस , अणि जन्म घेण्याआधीच मला त्याची माहिती असावी………
तुझ बोट धरून मी इवली पवल चालेन, इवली इवली पाव...ल म्हणत प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन..…..
ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात पाणी मी बघितल आहे, पण तुला हसवान्या साठी मला परत जन्मा घ्यायचा... विस्तृतखरच का ग आई......!!!!!!
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर पुढचा जन्म मागतात का?
प्रत्येक सातव्या जन्मी मी सात जन्म मागणार आहे , तुमच्याच पोटी येण्यासाठी मी एक तरी तप करणार आहे………
प्रत्येक पुढचा जन्म माझी तूच आई व्हाविस , अणि जन्म घेण्याआधीच मला त्याची माहिती असावी………
तुझ बोट धरून मी इवली पवल चालेन, इवली इवली पाव...ल म्हणत प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन..…..
ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात पाणी मी बघितल आहे, पण तुला हसवान्या साठी मला परत जन्मा घ्यायचा आहे……..
देता असता आला तर माझ उरलेला आयुष्य दोघाना देइन, अणि पुढचा जन्म घेई पर्यंत तुझ्या मनामधे रहिन...….
खरच आई....……!!!!!!!!!!!!!!!

एक सत्य

हि एक सत्य घटना आहे... मी यंदाच्या सुट्टीत माझ्या काकांच्या घरी गेलो होतो. त्याचं घर गावापासून थोडस दूर आहे. काकांचा दुधाचा व्यवसाय आहे, तिथेच त्यांच्या कडे काम करत असलेल्या मुलाची हि कथा आहे. त्या मुलाच एका मुलीवर खूप मनापासून प्रेम होत आणि त्यामुलीच सुद्धा. दोघेही एकाच जातीचे होते पण दोघांच्याही घरातून त्यांच्या लग्...नसाठी विरोध होता. ज्यादिवशी मुलीच्या घरच्यांना त्याच्या बद्दल कळाले तेव्हा त्यांनी त्या मुलाला खूप मार मार मारले आणि गावाच्या बाहेर नेवून फेकून दिले. मुलाच नशिब चांगल म्हणून तो बिचारा कसाबसा त्यातून वाचला. त्याच्या घरच्यांनी त्याला दुसऱ्या एका लांब गावात आपल्या नातेवायकांकडे उपचारासाठी आणून ठेवले. दोन महिन्यात तो बरा झाला, पण त्याला तिच्याशीच लग्न करायचं होत. त्याने तिला संपर्क केला आणि त्या दोघांच असे ठरले कि गावात त्या मुलाच्या मित्रांची मदत घेवून तिथून पळून जायचं. पण एक मोठी अडचण हि होती कि त्या मुलीला १८ वर्ष पूर्ण होण्यासाठी ३ महिने बाकी होते. त्या मुलाच्या मित्राने त्याला एक कल्पना सुचवली. तुम्ही इथून पळून जा, देवळात लग्न करा आणि तीन महिने मी सांगतो त्या ठिकाणी लपून राहा. माझ्या ओळखीच एक गृहस्थ आहेत ज्यांचा दूधाच व्यवसाय आहे आणि त्याचं घर सुद्धा गावापासून थोड लांब आहे. (ते म्हणजे माझे काका) तू त्यांच्या कडे नोकरी कर ते तुला माझ्या सांगण्यावर राहायला एखाध छोटास घर पण देतील आणि तुला नोकरी पण. ठरल्या प्रमाणे सर्व झाल देवळात लग्न करून त्या दोघांना त्याचा तो मित्र माझ्या काकांकडे घेवून आला. सर्व प्रकार सांगितला काकांनी राहायला घर आणि नोकरी पण दिली, तू मुलगी पण शिकलेली होती त्यामुळे तिनेही काकांच्या मुलाचा HOMEWORK घ्यायचं काम केल. पण त्यादिवशी प्रकरण काही वेगळाच वाटत होत. मी घरातून बाहेर बघितल तर तो मुलगा आणि ती मुलगी दोघ खूप टेन्शन मध्ये दिसत होती मुलगातर खूप घाबरला होता. आणि ती मुलगी खाली मन घालून उभी होती. ते दोघ माझ्या काकांशी काही बोलत होते. काकांना विचारल्यावर मला कळाले कि मुलीच्या घरच्यांनी त्या मुला विरुद्ध तक्रार नोंदवली पोलीस स्टेशनमध्ये, पोलिसांनी तपास करत त्या मुलाचा शोध लावला ज्याने त्या दोघांना पळण्यात मदत करून काकांकडे आणून सोडले होते. त्याची कसून चौकशी केली त्याला खूप मारल पण तरीही त्या मुलाने आपले तोंड नाही उघडले. पोलीस त्याला सतत त्रास देतच होते. पण त्या मुलाच्या सासूला माहित होते कि आपल्या जावयाने त्या दोघांना कुठे लपवून ठेवलेय ते. पोलीस सारखे आपल्या जावयाला त्रास देतायत हे पाहून तिने पोलिसांना खर काय ते सांगून टाकले होते. ह्याच सर्व टेन्शन मुळे ते घाबरले होते. पोलीस कधीही तिथे पोचले असते. त्यामुळे काका आणि काकांचा मोठा मुलगा दोघाही विचारात पडले होते त्या मुलीला १८ पूर्ण व्हायला अजून एक महिना बाकी होता. अजून एकाच महिना कसातरी लपून राहायचा होता. तितक्यात काकांना एक मित्राच घर आठवले जे औरंगाबादला होते. काकांनी त्यांना सांगितले कि तुम्ही आताच्या आता तिकडे निघा मी माझ्या मित्राला फोन करून सांगतो. तो तुमची सर्व सोय करेल एक महिना तिथे थांबा मग मी तुमच लग्न लावून देयीन आणि मग इथेच राहा माझ्याकडे. पण ते दोघेही खूप घाबरले होते अजूनही. त्यांनी कपडे भरले ब्यागेत आणि मीच त्यांना सोडायला गेलो त्यांना ST पकडून स्टेशनला जायचे होते आणि तिथून रात्रीच्या ट्रेनने औरंगाबादला. मी त्यांना माझ्याकडून जमेल तितक धीर देण्याचा प्रयत्न केला निघताना. खूप समजावलं आणि अजिबात टेन्शन घेवू नका आम्ही सर्व तुमच्या बाजूने आहोत सांगितले आणि निरोप घेवून मी निघालो. मी घरी त्यांना सोडून संध्याकाळी घरी आलो....आम्ही सर्व त्यांच्या बद्दलच विचार करत बसलो होतो. नंतर रात्री जेवायच्या वेळेस आम्ही एकत्र जेवायला बसलो पण काका जेवायला नाही आले. म्हणाले मी नंतर बसतो तुम्ही जेवा. आमच जेवून झाल्या वर मी काकांकडे आलो जेवायला काकी बोलावते आहे हा निरोप घेवून पण पाहतो तर काका रडत होते मी सर्वांना बोलावले सर्वजण काकांना विचारात होते कि नक्की काय झालाय तुम्ही का रडत आहात. काका म्हणाले रेल्वे पोलीस स्टेशन मधून फोन आला होता, एका झोडप्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केलीय. त्या मुलाच्या खिशात तुमच विझिटिंग कार्ड मिळाल, म्हणून कॉल केला जर तुम्ही ह्यांना ओळखत असाल तर लवकर स्टेशनला या. आम्ही सर्व सुन्न झालो काका काकी आणि सर्वच खूप रडत होतो. नंतर आम्ही स्टेशनला गेलो. प्रत्येक्षदर्शिने सांगितले कि ते रात्री ८ वाजल्या पासून प्लाटफार्म वर बसले होते आणि एकमेकांच्या मिठीत सारखे रडत होते, आणि खूप घाबरलेले होते त्यांना औरंगाबादला जायचं असे तो मुलगा एकदा बोलला. पण अजून काही बोलत नव्हते ते दोघ. आणि नंतर अचानक काय झाले आणि एक फास्ट एक्स्प्रेसच्या समोर त्यांनी धावत जावून उडी मारली. आणि सर्व काही संपल. मला तर काहीच समजत नव्हते.....अजून काय करायला पाहिजे होते म्हणजे ते दोघ सुखी झाले असते. माझी खूप इच्चा होती कि त्यांचा सुखाच संसार व्हावा. पण नियतीला ते मान्य नव्हते. मूळ कथा - अलोक अकसे खरच का आजही लोक मुलांना प्रेम विवाह करण्यास असे अडवतात आणि अशा प्रकारचा त्रास देतात. खरच खूप वेदना झाली मला हि कथा समजल्यावर. खरच मनापासून कोणी एकमेकांवर प्रेम करत असतील तर ह्या कुटुंबासारखी तुम्हीही त्यांना अशीच मदत करा हि तुमच्याकडे विनंती आहे. ह्यात खूप मोठ पुण्य आहे असे मला वाटते.

बाबा.............एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड.
मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही..!! ♥

तान्ह्या बाळाची डायरी

तान्ह्या बाळाची डायरी █
३ जून.
मी आईच्या गर्भात आहे.
आईने बाबांना हि गोड
बातमी दिली. बाबा खुश
... ... झालेत.
८ ऑगस्ट.
मला पिटुकले हातपाय,
डोके आणि पोट आहे.
१४ सप्टें.
माझ अल्ट्रास्कॅन
झाल.
किती छान! मी मुलगी आहे.
१५ सप्टें.
मी मृत झालेय,
माझ्या आईवडिलांनी मला मारलय.
का? कारण मी मुलगी होते
म्हणून?
सर्वांना आई हवी असते,
लग्नासाठी बायको हवी असते,
प्रेम
करायला प्रेयसी हवी असते,
मग पोटी,
मुलगी का नको असते?
समंजस बना, नुसते सुसंकृत
नको..
कारण
स्त्रीगर्भाची हत्या हा अत्यंत
हीन आणि अमानुष
गुन्हा आहे....

आई असं का ग केलंस?


आई, असं का ग केलंस?
(मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र..)
उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ
पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना.
... त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून
दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि
त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा
अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.
( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती
आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे
पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा असावी.
आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )
आई, असं का ग केलंस?
का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता
झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त
तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि
रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.
तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.
तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात
असूनही मी त्याला
हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने
ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच
असते!
कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी
ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली
आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ"
आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.
माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा,
तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास
सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....
त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या
आईला बघण्यासाठी मला अजून
सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....
मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर
पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग
तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती
काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.
दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर
काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट
फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."
थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो
पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.
दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे
जाऊन सुखरूप घरी येऊ दे."
मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या
मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....
नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....
आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत
जायचं आहे.
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या
कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.....
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे. 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.

तरुण मुलागा आणि त्याचे वडील


एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे वडील train ने जात असतात.त्यांच्या समोर एक नवीन
लग्न झालेलं कपल बसलेल असतं....
तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात.
त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल
वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय...
तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत...”
तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..” आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”
तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू
शकते....!!!!!!!

>>> श्रीमंत आणि गरीब - ज्याचा त्याचा दृष्टीकोन <<<

एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
... ...' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.

' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.

आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.

आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.

राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.

आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.

आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.

संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.

वडील स्तब्ध झाले.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.

पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?
आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना..

Saturday, 28 January 2012
एक हृदयस्पर्शी कथा....
तो अजुनहि झोपलाच होता,
वर टांगलेल सलाईन
वाऱ्या निशी हालत होत. त्यातून टपकनारे थेँब
त्याच्या रक्तात भिनत होते. झोप कसली येत
होती त्याला...?? उघड्या डोळ्याने तो एकाच
ठिकानी बघत होता. त्याची आई औषधे व गोळ्या घेवून आली, त्याला थोडे फार खाण्याची विनंती केली. पण
त्याने गप्प राहून नकार दिला,

आई गेल्यानंतर त्याने
एका हाताने औषधे व गोळ्या घेतल्या.........
घड्याळाच्या टोलानीँ त्याचे लक्ष वेधले. सहा वाजले होते,
त्याने चटकन चादर
बाजूला केली ' अरे बापरे ! क्लास तर संपून गेला असेल ' अंगात एवढेही बळ नसताना त्याने हातातली सुई खेचून
काढली. भळ-भळनाऱ्या रक्तावर कापसाचा बोळा पकडून
तो सायकल जवळ गेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष
नव्हत. भर पावसात
तो सायकल घेवून क्लासकडे गेला.
क्लास तर केव्हाच संपून गेला होता. बहूतेक सर्वजण घरी निघून गेले होते थोडी पावसाची भूर-भूर चालूच
होती....

ती आजून हि क्लासच्या बाहेर त्याची वाट पाहत
उभीच
होती. त्याला बघितल्यावर तिचे डोले चमकले.
तिला त्याचा राग आला होता, झपझप चालत
त्याच्याजवळ पोहचली. त्याच्या डोक्यावर छञी पकडून त्याचा कान धरला, "तू आजारी असताना इथं का आलास ?
आणि पून्हा छञी विसरलास, बापरे ! किती पाणी"
त्याच्या डोक्यावरून पाणी झटकत ती म्हणाली, "पूर्ण
ओला झालाय आणि मग सर्दी झाली म्हणजे मलाच
म्हणशिल......" अरे ! किती बडबड
करते मी ? जाऊ दे बरं, डाँक्टर काय म्हाणालें तब्येत कशी आहे?

दोघेही क्लासच्या बाहेर पायरीवर जाऊन
बसले.
तो अजूनही काकडत होता. तिच्या डोळ्यामध्ये त्यांचे
बावरलेलं मन स्वत:ची खोलवर रूजलेली प्रतिमा शोधत
होत. तिचे निरागस डोळे माञ सदैव
त्याच्याच चिँतेत बूडालेले दिसत होते. त्याच्या अतिभोळेपनाची तिला काळजी वाटायची,
त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून
तिलाही ठरवता आली नव्हती. त्याच्या कपाळावर तिने
हात ठेवला आणि ती दचकलीच,
" बाप रे ! किती भयंकर ताप आलाय तूला ! अन, तरी तू
एवढ्या पावसात मला भेटायला आला? तूला काही झालं म्हणजे? नाही मीच
वेडी आहेँ. मीच थांबते ना ! आता मी थांबणारच नाही, तू
बघच मी, थांबतच नाही ! असं द्रृष्ट लागण्याजोगे प्रेम
बघून त्याच्या डोळ्यांमध्ये
पाणी जमा झालं,बोलण्याचा प्रयत्न
करताच त्याला खोकला आला.

तिने त्याला न बोलण्याची विनंती केली. त्याचा हात आपल्या हातात
घेताच, तिने हातावरुन ओघळणारे लाल रक्त बघीतले.
ती यावेळी माञ चिडलीच, "तू हे काय केलंस? तू सलाईन
काढले ना? का स्वता:ला ञास करून घेतोस?
तुला होणाऱ्या वेदना काळजात सूई प्रमाणे घुसतात, जा !
मी बोलणारच नाही. अरे तुला काही झाले म्हणजे मी आणि माझे जीवन.............." त्याने तिच्या ओठांवर
हात ठेवला. पुढचे शब्द
काळजाला चिरणारे होते.त्याच्या डोळ्यातून थेँब
ओघळला. तिच्या निस्सिम प्रेमासाठी-
आणि तिच्यासाठी,तरीह
ी त्याच्या डोळ्यातल्या अश्रुनी तिला अस्वस्थ करुन टाकले. तिच्याहि डोळ्यांतून पाणी टपकत होते, "खरच,
इतक प्रेम करतोस का रे माझ्यावर...???

मग का असा ञास
देतोय? तुझ्या या वेडेपणानेच मला वेड
लावंल-तुझ-तुझ्या प्रेमाचंमी सुध्दा इतकी वेडी आहे ना-
मी थांबते म्हणून तर तू येतोस. दोघेपण अगदी वेडे आहोत.
तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली. तिचे डोके थापटत, तो माञ कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात हरवून
गेला होता, तिथे फक्त तिच्या बांगड्यांची किण-किण
आणि तिचा आवाज कानी येत होता. तेवढ्यात
त्याच्या सरांची थाप त्याच्या पाठीवर पडली, "
काय रे ? केव्हाचा आवाज देतोय-काय करतोय इथं एकटा ?
एवढ्या पावसात का बसलाय ? घरचे म्हणत होते तू आजारी आहेस म्हणुन "
सरांच्या आवाजाने तो भानावर आला.... त्याने मान
डोलवली. सर आत निघून गेले.

भरलेल्या डोळ्यानी किँचित मागे वळूनपाहिले.
क्लासमध्ये टांगलेल्या तिच्या फोटोची माळ
वाऱ्यानिशी हालत होती. ती क्लास मधली एक हूशार विद्यार्थीनी होती...!!! सर्व काही द्रृष्ट
लागल्या प्रमाने घडून गेलं होत.
स्वप्नाहूनही सुंदर अशा त्यांच्या दुनियेवर काळाने
अशी झडप घातली कि त्या दुनियेतील सर्व सुख काळ
आपल्या बरोबर घेऊन गेला होता. फुलांआडून
डोकवणाऱ्या तिच्या डोळ्यामध्ये घोर चिँता दिसून येत होती.

कोण समजून घेणार माझ्या या वेड्याला ? कोण
शिकवणार
याला माझ्याशिवाय जगणं? कोणी जपेल
का याला माझ्याप्रमाणे? असे अनेक प्रश्न तिला पडले
असावे. त्याचे मन माञ एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे
तिच्या सावलीमागेच पळत होतं, ते हेमानायला तयारच नव्हत की तिच अस्तित्व आता संपलय म्हणून. असे
सावल्यांचे खेळ-आभास त्याच्या जिवनाचा एक भागच
बनून गेले होते. ह्रूदयात जपून
ठेवलेल्या तिच्या आठवणी अश्रु बनुन क्षणा-
क्षणाला बाहेर पडत होत्या. तिची प्रतिमा डोळ्यामध्ये
भरून जड अंत:करनाने तो सायकल जवळ गेला. काकडंत- काकडत त्याने सायकल घेतली व घराकडे चालू
लागला आणि चालता-चालता बेशुध्द होऊन पडला......

हे
सर्व प्रेम होत कि वेड ! मी त्यावेळी हे सारे फार जवळून
बघितले होते. का कुणीतरी इतकही प्रेम करू शकत ? हे
असं कसं प्रेम होत जे म्रूत्युनंतर सुद्धा जिंवत होत?
खरचं त्याच्या वेडे पणाला म्रूत्युच्याही मर्यादा कमी पडल्या होत्या....
या अगोदर तो खुप चांगला असायचा,
क्षणोक्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा, पन
त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हास्य मी पहीलेच नाही.
आता त्याने आपल्या मनावर ताबा मिळवलाय.
सर्वाशी तो चांगला वागतो अगदी पूर्वीप्रमाणे. पण फरक एवढाच आहे की तो पूर्वी सर्वाशी बोलु शकत होता.
त्यावेळी आजारात त्याने आपली वाचा गमावली होती.
त्या दोघांच्या सुखासमोर स्वर्गसूद्धा फिका पडत
असावा म्हणून देवालाही हेवा वाटला आणि................

जे खरोखर चांगल घडत असतं तेथेच नशिब तोकडे पडते
हा प्रश्न तर फार पूर्वीपासून अनुत्तरीतच आहे. ...... असचं नेहमी का घडतं ? का ?

Tuesday, 24 January 2012

अनुभव कथा सासुबाई..........

अनुभव कथा
सासुबाई
    ''अभिनंदन मि. काळे, तुमची मिसेस प्रेग्नंट आहे. तसे दोन महिने होऊन गेले आहेत. पण ह्या फार अशक्त दिसतात. तेव्हा वेळच्यावेळी चेकअप करत जा. आणि हे बघा मिसेस काळे मी काही औषध टॉनिक लिहून देतो ती घेत जा, मनावर कुठलेही दडपण ठेऊ नका, भरपुर खात जा, मि. काळे त्यांना आनंदीत ठेवण्याचे महत्वाचे काम तुमचे आहे''.  डॉ. मटकर हसत हसत म्हणाले.
    मी आई होणार ही किती सुखद भावना होती. लग्नाला दिडच वर्ष झाले होते. आमच घर तस लहान म्हणजे बैठच आहे. दोन खोल्या नंतर किचन मग संडास बाथरुम. आम्ही दोघे, ह्यांचे मोठे भाऊ, वहिनी त्यांचा एक मुलगा ह्यांची आई एवढी माणसे ह्या घरात राहतो. कसे ते विचारु नका. बाहेरील रुम ही रात्री आमची बेडरुम बनते, फक्त जायच्या यायच्या वाटेवर पडदा लावावा लागतो. पुढच्या रुममध्ये मोठे दिर-भावजय त्यांचा मुलगा किचनमध्ये आई झोपतात. मोठे दिरही सरकारी खात्यात कारकुन आहेत. आमचे हे एका प्रायव्हेट कंपनीत अकाऊंटस् डिपार्टमेन्टला आहेत तर मी ही एका कंपनीत टायपिस्ट म्हणून आहे.
    आमच्या माहेरची परिस्थीतीही फार चांगली नव्हती. त्यामुळे लग्न ठरवतांना काही गोष्टी ऍडजस्ट केल्या.  हे एवढंस घर एवढी माणस असे बघुनही ते मी ऍक्सेफ्ट केल.  इतक्यात तर काही आम्ही दोघे कुठे वनरुम कीचनचा ब्लॉकही घेऊ शकत नव्हतो.  त्यामुळे एक मुल लौकर होऊ द्यावे हा निर्णय आम्ही दोघांनी घेतला.
    ''घरी गेल्यावर काय सांगायच ?'' मी ह्यांना विचारले.
    '' - S- अजुन रिपोर्ट यायचाय म्हणून सांगु''.
    ''कां ? अस खोट कां सांगायचय ? ते आनंदित नाही होणार ?''
    ''अग तुला माझी आई म्हणजे काय आहे माहित आहे नं ? लगेच आज नको सांगुस'' ह्यांनी दरडावले.
    खरच - सासुबाई म्हणजे एक अजब चिज आहेत.  म्हणजे तशा त्या पेमळ ही आहेत पण खुप मुडी.  कधी एकदम प्रेमात येतील तर कधी छोटया छोटया कारणावरुनही रागावतील.  ह्यांचे वडील म्हणजे सासरे हे लहान असतांना अल्पशा आजारात गेले.  तेव्हापासून सासुबाईंनी काबाडकष्ट करुन ह्या दोन्ही मुलांना मोठे केले - पण ह्याचा एक मोठा तोटा असा झाला की त्यांच वागण असं बनत गेल की त्या सांगतील तेच घरात व्हायला हवं - कारण तेच बरोबर दोन्ही मुलांनाही त्यांनी ती आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत ह्याचीच दक्षता घेतली.
    ''काय - काय म्हणाले रे डॉक्टर ?'' घरात गेल्या गेल्या आईंनी ह्यांना वारले.  बघा म्हणजे हा असा प्रश्न खरतर त्यांनी मला विचारायला हवा, पण विचारला ह्यांना.
    ''रिपोर्ट येईल 1-2 दिवसात म्हणाले''
    ''कसले हल्लीचे डॉक्टर रिपोर्टवर विसंबतात.  माझ्यावेळी गोदुआल्याने नुसते हात पोटावर ठेऊन सांगितले की मला कितवा महिना आहे ते.  आणि अग माझी दोन्ही बाळंतपण, घरातच झाली - ह्याच घरात - आमच्या वेळी नव्हती थेट ही हॉस्पिटल्सची''.
    ''अग आई तुमच्यावेळी तशा सोई नव्हत्या म्हणून आणि आता आहेत तर त्याचा लाभ नको का करुन घ्यायला ?'' हे म्हणाले.
    ''आणि हे बघ ती जर प्रेग्नंट असेल तर आधी टेस्ट करुन घे.  मला मुलगाच हवा - मुलगी चालणार नाही - मलाही दोन मुलच - मोठयालाही एक मुलगा - तेव्हा तुलाही मुलगाच हवा - बघ हो नाहीतर'', सासुबाईंच्या ह्या वाक्याने मला धडकीच भरली.  हे कसले बोलणे.  अजुनपर्यंत असला काही विचार माझ्या डोक्यातच आला नाही.  मला मुल होणार एवढयावरच मी खुष होते.  तो मुलगा की मुलगी हा विचारच माझ्या मनात आला नाही.
    माझ्या डोक्यात तिडिकच गेली, मी ताडकन बोलले, ''हे बघा मी कसलीही टेस्ट बिस्ट करणार नाही, आधीच सांगुन ठेवते.
    ह्यावर फक्त सासुबाईंनी रागारागाने माझ्याकडे बघितल.
    चार दिवसांनी ह्यांना परत विचारुन झाले काय आला रिपोर्ट ? तो पॉसिटीव्ह आहे अस ह्यांनी सांगितल्यावर त्यांची भुणभुण सुरु झाली.  तु टेस्ट करुन घे टेस्ट करुन घे. पण कधीही खंबीरपणे उभे राहणाऱ्या ह्यांनी ह्या बाबतीत मला आईला साफ सांगुन टाकल - असल आम्ही काहीही करणार नाही.
    बस त्या दिवसापासून त्यांच माझ्याशी वागणच एकदम बदलुन गेल. माझ्याशी मोकळेपणाने बोलेचनात.  मी म्हटले ठीक आहे - थोडे दिवस रुसवा धरतील.  मुल झाल की आपोआप बदलतील.  पण दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी सासु म्हणजे काय असते ते दाखवायला सुरुवात केली.  इतके दिवस नुसते गोष्टीत अशी खाष्ट सासु वाचलेली - तशीच आपल्या नशिबी आहे की काय ! पण नाही ह्या आधी त्यांनी खाष्टपणा कधी केला नाही.  आता एकाच घरात 3 बायका म्हटल्यावर कधी भांडयाला भांड वाजणार पण असा दुरावा त्यांनी कधीच दाखवला नाही.  त्या दिवशी संध्याकाळी मी ऑफिसमधुन येतेय तो ह्या सासुबाई स्वैपाकघरात.  नाहीतर आत्ता पर्यंत सकाळचा स्वैपाक मोठÎ जाऊबाई करायच्या, त्या घरातच असत.  त्यामुळे मला ऑफिसची घाई म्हणून त्या सकाळी करत मी संध्याकाळी.
    ''हे काय आज तुम्ही का करताय ?'' मी विचारले.
    ''आजपासून संध्याकाळचामीच करीन.  अग तुला आता जपायला नको का ? नाहीतर लोक म्हणतील घरात दोन दोन बायका असून हिला अडचणीच्या वेळी कामाला लावलात''.
    ''अहो लोक कशाला असल काही म्हणतील, अहो माझा तेवढाच वेळ जाईल उठ बसही होईल,  आणि हे काय ही भाजी कोणी आणली ?''
    ''मीच, आता तु संध्याकाळी येतांना भाजी नको आणुस, सरळ घरी येत जा.  मीच करेन सर्व.
    मला तर रडुच यायला लागले.  रात्रि मी ह्यांना हे सर्व सांगितले. सकाळी ऑफीसला जाताना ह्यांनी हलक्या आवाजात आईला सांगितले - ''अग आई अस काय करतेस, अजुन तिला होतय तो पर्यंत तिला काम करु दे की''.
    दिवस भर ऑफिसमध्ये तोच विचार.  एक स्त्रि ही दुसऱ्या स्त्रिचा - म्हणजे घरातलीचा इतका दुःस्वास का करते ? विचार करुन डोक बघिर झाल. मी पेग्नंट झाले काय आणि एका छोटयाशा गोष्टीवरुन सासुबाई इतके करतात काय ? एकदा वाटत की जाऊ दे त्यांच्या मनासाखरे करु, पण म्हटले कां ! ही फक्त माझी माझ्या नवऱ्याची खाजगी गोष्ट आहे.  आम्हाला ह्या घरात एवढाही हक्क नाही ? नाही, ह्यांना थोडा धडा शिकवलाच पाहिजे.     
    संध्याकाळी घरी येऊन बघतो तर त्या बाहेरच्या रुममध्ये होत्या.  म्हटले डोक ठिकाणावर दिसतेय.  मी कपड बदलले - फेश होऊन स्वैपाकघरात गेले आणि बघते तर काय, भाजीच - कोशिंबीर सर्व चिरुन ठेवले होते - गॅसवर पातेल - डाव - ओटयावर मिसळणाचा डबा - तांदुळ घुवुन कुकरमध्ये ठेवलेले. फक्त कुकर गॅसवर ठेवायचा बाकी - ही काय नवीनच तऱ्हा - माझ्या अंगाचा नुसता तिळपापड झाला.
    ''हे बघा - एवढी सगळी तयारी केलीच आहे तर तुम्हीच स्वयंपाक करुन घ्या - मला नाही असल जमणार'' अस त्यांना सांगुन मी बाहेरच्या खुर्चीवर येऊन विमनस्करपणे बसले.
    खरतर आज सकाळपासूनच मला बर वाटत नव्हत.  दिवसभरच्या कामाने त्याहीपेक्षा मानसिक क्लेशाने दमुन गेले होते.  संध्याकाळी 5 मिनिटे नुसती आडवी पडेन म्हटले तर ते सुध्दा ह्या घरात शक्य नव्हत.  रात्रि मी खुप रडले.  आता ह्या घरात माझा जीव घुसमटायला लागला होता.  साधी रडायचीही चोरी.  कारण आत आवाज ऐकु जाईल म्हणून रडणसुध्दा नुसते अश्रु सांडुन.  खरच मला तर कळेनासच झाल होत.
    पुढच्याच रविवारी सासुबाईंच्या नात्यातले जेवायला येणार होते.  तसे त्यांचे ते मामा - दुर बडोद्याला राहायचे.  वय होते पण खुरखुरीत - असत. तब्येत सांभाळुन होते. ते येणार म्हणून आम्ही दोन्ही सुनांनी चांगला सकाळपासून  स्वयंपाक तयार ठेवला.
    ''अरे वा ! अशी वांग्याची भाजी मी आमच्या लहानपणी शेतावर खायचो अशी आत्ता ही म्हणजे वा ! कोणी केलीय ?''  सासुबाईंच्या मामांनी विचारले - ''हि ही आमच्या मोठया सुनेने, सुगरणच आहे अग स्नेहा स्नेहा'' - जाऊबाई बाहेर आल्या - त्यांनी हसत हसत कौतुकाचा स्विकार केला -
    ''आणि ही बासुंदी ......''
    ''हे घ्या ही भाजी घ्या आवडलीय नं - आणि आमटी पण'' - सासुबाईंनी त्यांना पुढच बोलुनच दिल नाही.  बरोबर आहे ती मी केलीय आणि माझ सर्वांच्या देखत कौतुक करुन कस चालेल ?  त्या दिवशी मला जेवणच गेला नाही.
    तो सर्व आठवडा असाच टेन्शनमध्ये गेला.  ऑफसमध्येही काम घरी असली तऱ्हा - माझ्या डोक्याचा विचार करुन भुगा व्हायची वेळ आली - आणि मग नको तेच झाल - मला ब्लिडींग सुरु झाल.  लगेच डॉक्टर - हॉस्पिटल - त्यांनी मला सक्तिची पुर्ण एक महिना विश्रांतीची शिक्षा दिली.
    तो संपुर्ण महिना म्हणजे मला तुरंगातली शिक्षाच होती.  एकवेळ मी ऑफीसमध्ये जात होते तर तेवढेच थोडा वेळ मनातले तेच तेच विचार कामामुळे डोक्यातच यायचे नाहीत - थोड चेंज वाटायचे.  आता तर दिवस रात्र त्यांच्याच ताब्यात.  मनात एवढी प्रचंड भिती वाटत गेली - कारण कुणालाही मुलगा झाला की त्या आनंदाने ही बातमी सांगत पण कुणाला मुलगी झाल्याचे बातमी अगदी दुःखाने सांगत.
    मोठया जाऊबाईंना ही मी हे सर्व सांगायचा प्रयत्न केला पण त्यांच ही सासुबाईंपुढे काही चालत नसे.  आर्थिक-मानसिक सर्वच बाजूंनी त्या लाचार होत्या -
    कधी एकदा मी आईकडे जाईन अस मला झाल होत - पहिल बाळंतपण असल्याने आईच्या जवळच हॉस्पीटलमध्ये नांव घातल होत पण आता शारिरीक-मानसिक ओढाताण माझ्या प्रयत्ना पलिकडे गेली होती. ह्यांचा मानसिक आधार होता पण तो हे प्रश्न सोडवु शकत नव्हता.
    आम्ही ठरवल की ऑफीसला आधी 2 नंतर 2 असे 4 महिने रजा घ्यायची, भले बिनपगी झाली तरी चालेल. 
    पण ह्या सर्व मानसीक म्हणा का शारिरीक त्रासाने मला आईकडे 8व्या महिन्यात रहायला जायच्या 2 दिवस आधीच प्रिमॅच्युअर डिलिव्हरी झाली.
    आधि शरिराचा आक्रोशणारा कणनकण नंतर एका चेतने पलिकेडे गेला - मला मुलगा झाला होता 3.5 पौंडाचा.  झाल्यावर त्याला एकदाच जवळ घेतला. डोळे भरुन पाह्यला.  खरच एवढया छोटया करता काय काय आपण कष्ट काढतो - पण त्याच्या कोवळ्या स्पर्शाने सर्व विसरायला झाल.
    ''घरी कळवलत ?''
    ''हो''
    ''सासुबाई ......
    ''खुष आहे, तु जास्त काळजी करु नकोस, सर्व ठीक होईल''
    ठीक कसल - दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी दुध पाजतांना सतत उलटून पडायला लागल - म्हणून परत चेकींग केले - तेव्हा कळले की त्याला कावीळ झाली आहे.  अरे बापरे हे काय नवीन आता माझ्या पुढे दैवाने वाठलय ? माझा मुलगा - मला - माझ्याकडे देतच नाहीत - त्याला एका वेगळ्या रुममध्ये ठेवलाय - त्यातुन दुसऱ्याच दिवशी त्याला श्वासोश्वास करण्यास त्रास होऊ लागला - काळानिळा पडायला लागला - म्हणून परत तिथून 2 दिवसांच्या बाळाला मोठया हॉस्पीटलमध्ये हलवल - परत सर्व टेस्ट झाल्या तेव्हा कळल की त्याच्या हृदयातली व्हॉलव्ह बरोबर काम करीत नाही.  प्रिमॅच्युअर झाल्याने हृदयाची वाढ बरोबर झालेली नाही तो विक आहे - परत ऑपरेशन कराव का काय, ते ही एवढया लहान मुलावर ? डॉक्टरांचे काही ठरत नव्हते.  परत ऑपरेशन म्हणजे पैसाही भरपुर लागणार होता. 
    मी इथे हॉस्पीटलमध्ये फक्त वेडी व्हायचीच बाकी होते.  आजूबाजूच्या सर्वांजवळ आपापली मुल होती - त्या त्याच्याशी हासत होत्या - पाजत होत्या - एक आयुष्यातला फक्त बायकानांच मिळणारा आनंद उपभोगत होत्या - आणि मी- दोन दिवसात मी मुलाला काय ह्यांनाही भेटले नाही.  त्यांची सारखी धावपळ सुरुच होती.  मुलाला बघायला त्याला दुधपाजण्याच्या विचारानेच नुसते छातीत भडभडुन यायचे - पण त्याला काय होतय हे कुणीच मला सांगत नव्हते -
    चौथ्या दिवशी मला कळल की तो गेला - गेला - गेला म्हणजे माझ्या डोळ्यातल पाणीच सुकुन गेल - मला रडताही येत नव्हत - एकदाच फक्त एकदाच मी त्याला हातात घेतला होता - बस एवढाच त्याचा माझा संबंध - अरे त्याच्या करता गेले 8 महिने मी सर्व प्रसंगांना तोंड देत होते - माझ्या पोटचा गोळा इतका अल्पायुषी - कसल सुख - डोहाळ्याचे डिलिव्हरीचे - देवही इतका निष्ठुर कि एखाद्या निरागसाला फक्त 4 दिवस श्वासोश्वास करायची परवानगी- 
    झाला प्रकार विसरु म्हटले तरी विसरु शकत नव्हते - पुढे 2 महिने आईकडेच होते.  आता परत त्या घरात जायची इच्छाच होत नव्हती - पण जावे तर लागणारच होते. त्या घरात - त्या सासुबाईंसमोर -
    घरी गेल्यावर महिन्यानी एक दिवस आम्ही तिघच घरात असताना म्हणाल्या -
    ''अग माझा मुलगा म्हातारा आहे की तु म्हातारी झालीस - व्हायचे ते होवुन गेले ते विसरुन जा - आता परत मुलगाच होऊ दे - आधि पासूनच तुझी मी नीट काळजी घेईन''.
    मातृत्व ह्या उदात्त भावनेपेक्षा मुलाची आई ह्या संकुचीत विचारांच्या ह्या बाईबद्दल माझ्यात कसली भावनाच उरली नाही.