Wednesday 18 January 2012

बाई मी तुम्हाला विसरलो नाही....

बाई मी तुम्हाला विसरलो नाही....


"म्याडम एक नोटीस आहे. विद्यार्थ्यांसाठी, आत येऊ का ? " शाळेचे शिपाई काका आमच्या वर्ग शिक्षिका गुजराती बाईंना ती नोटीस दाखवत वर्गात आले
आणि बाईंनी ती नोटीस आम्हा विद्यार्थ्या साठी वाचण्यास सुरवात केली

"सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि सोमवार दिनांक (दिवस नक्की आठवत नाहीये ) रोजी आपल्या शाळेत अंतर शालेय भक्ती गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे जे विद्यार्थी यात सहभागी होण्यास इच्छुक आहेत त्यांनी आपली नावे आणि ५० रु नोंदणी शुल्क दि --/--/-- पर्यंत श्री परदेशी सर कडे जमा करावीत धन्यवाद ".

नोटीस ऐकल्या ऐकल्या आमच्या वर्गातल्या सर्व भावी गायकांनी जल्लोष (म्हणजे गोंधळ ) केला त्या गोंधळातच बाईंनी नोटीस वर हस्ताक्षर केले आणि काका पुन्हा ती नोटीस घेऊन दुसर्या वर्गात घेऊन जाण्या साठी निघाले गोंधळ एवढा होता कि शेवटी बाईंना दोघा तिघांच्या पाठीवर धाबुके घालावे लागले तेंव्हा कुठे वर्गात शांतता प्रस्थापित झाली आणि बाईंनी पुढे शिकविण्यास प्रारंभ केला. तास संपल्या नंतर बाई माझ्या कडे आल्या आणि म्हणाल्या पेंडलवार मधल्या सुट्टीत मला येऊन भेट. मी हो म्हणालो आणि मागे वळलो तर माझ्या वर्ग मित्रांच्या चेहेऱ्या वर मला बरेचसे प्रश्न दिसले खर म्हणजे मला सुद्धा माहित नव्हत कि बाईंनी मला का बोलावलं. खर तर , बोलवण्या सारख काहीच कारण नव्हत त्यांच्या विषयाची माझी गृहपाठाची वही पण पूर्ण होती नुकत्याच झालेल्या घटक चाचणीत सुद्धा बर्या पैकी मार्क होते तक्रारीला कुठेच जागा नव्हती पण मनात अनामिक हुरहूर लागली कि बाईंनी मलाच का बोलावलं
मधल्या सुट्टीत कसातरी डबा संपवून मी स्टाफ रूम मध्ये गेलो तर गुजराती बाई सुधा तिथेच बसलेल्या होत्या आणि परदेशी सर सुद्धा मी आलेलो पाहून त्या हसतच मला म्हणाल्या कि "अरे ये ये पेंडलवार बर झाल तू आलास " मला बाजूला बसवून माझ्या पाठीवर हात फिरवून त्या परदेशी सरांना सांगत होत्या सर हा मुलगा खूप शांत आहे आणि याचा गळा पण खूप गोड आहे मला वाटत याच नाव तुम्ही त्या भक्ती गीत गायन स्पर्धेत नोंदवून घ्या. सर म्हणाले म्याडम नाव नोंदवून घेण्यासाठी माझी काहीच हरकत नाहीये पण नोंदणी शुल्काच काय ??
याचे वडील भरतील ? कारण सहामाई आणि वार्षिक फीस भरतांना माझे वडील आमच्या स्कूल म्यनेजमेंट बरोबर भरपूर वाद घालायचे आणि त्याच कारणास्तव माझे वडील संपूर्ण शाळेमध्ये चिंगूस म्हणून प्रसिद्ध झाले होते पण मुळात ते तसे नव्हते त्यांना आधी पासून प्रत्येक गोष्टीं मागच कारण शोधण्याची जुनी सवय आहे. तसे ते म्यनेजमेंट ला सुद्धा माझ्या फीस च विवरण मागायचे आणि त्याच कारणास्तव वादही व्हायचे.खर तर माझे आजोबा रेल्वेत होते आणि माझे वडीलही रेल्वेत नौकरीला आहेत त्यामुळे आमची परिस्थिती सुद्धा चांगली होती
पण माझ्या वडिलांना परदेशी सर चांगल्या प्रकारे ओळखत असल्या मुळे आणि दोन, तीनदा माझ्या वडिलांचे आणि त्यांचे वाद झाल्या मुळे सुद्धा त्यांना मी नोंदणी शुल्क भरू शकेन का ? या वर शंका होती.
पण नोंदणी शुल्काच काय ?? या प्रश्नाने मला सुद्धा वाईट वाटल आणि पप्पांचा राग सुद्धा आला वाटल कि पप्पा विनाकारण वाद घालतात पण काय मी काय करू शकत होतो
मी गुजराती बाईं कडे बघितलं . आणि त्यांनी सुधा माझ्या कडे पाहिलं आणि त्या लगेच म्हणाल्या काही काळजी करू नका मी भरते त्याचे नोंदणी शुल्क त्यांच्या पर्स मधून त्यांनी ५० रु काढले आणि परदेशी सरांकडे दिले आणि माझ नाव त्या यादी मध्ये नोंदवल गेल नंतर बाईंनी वैयक्तिक लक्ष देऊन त्या स्पर्धे साठी माझी तयारी करून घेतली आणि विशेष म्हणजे त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर पण आला होता
ती स्पर्धा संपली ते वर्ष संपल आणि अशी सगळीच माझी शालेय शिक्षणाची वर्षे संपली मी दहावी पास होऊन त्या शाळेतून बाहेर पडलो गायन स्पर्धेच्या घटने नंतर म्याडम शी मी बर्याच वेळा भेटलो,बोललो पण बाईंचं त्या दिवशीच ते वागण आज हि डोळ्या समोरून जात नाही ती घटना आजही आठवली कि काळ्जाच पाणी होत शाळेच्या शेवटच्या दिवशी बाई माझ्या जवळ आल्या त्यांनी मला जवळ घेतलं आणि म्हणाल्या अजून तुला अजून खूप पुढे जायचय. तू खूप शांत आहेस आणि सरळ सुद्धा बाहेरच्या प्रलोभनाला बळी पडू नकोस तुझी घरची परिस्थिती चांगली आहे पण काही मदत लागली तर कळव आणि त्यांचे डोळे पाण्याने भरले त्या रडत होत्या मला आणखी जवळ घेऊन त्या म्हणाल्या तू मला माझ्या मुला सारखा आहेस मला कधी विसरू नकोस .मला बाईच्या त्या वागण्याचा अर्थ कळत नव्हता मी ही थोडासा भावूक झालो होतो बाइन्च्या पायावर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला आणि निरोप घेतला
त्या नंतर मी माझ graduation compelete केल post-Graduation करतोय आणि हे सगळ करता करता job पण करतोय आणि ते ही एका शाळेतच पण शाळेच्या शेवटच्या दिवसाच्या त्या घटने नंतर मी बाईना कधीच नाही भेटलो नंतर माझ्या पप्पांची बदली माझ ही कॉलेज मी माझ्या च विश्वात रमून गेलो होतो पण आता शाळेत काम करत असतात शिक्षकांशी आणखी जवळचा संबंध येतोय पण का कुणास ठाऊक "वो बात नहीं हैं " विद्यार्थ्यांशी प्रचंड आत्मीयता आता मला या शिक्षकांमध्ये दिसत नाहीये मान्य आहे व्यावसायिकता सगळ्याच क्षेत्रात आलीये पण विद्यार्थी आणि शिक्षकाचे नाते सुधा त्याला अपवाद नसावं दुर्दैवी आहे सगळ .माफ करा थोड विषयांतर होतंय पण खर सांगतो आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने का होईना पण गुजराती बाईंचा तो भावूक चेहरा मला आठवतोय. बाई मला माफ करा तुम्ही मला म्हणाला होतात मला कधी विसरू नकोस मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही पण काय करू शाळे नंतरच्या जगात जेंव्हा मी प्रवेश घेतला तिथे सगळे जन धावत होते त्या जगाचा आपलाच एक असा वेग होता आणि अनाहूत पणे मी ही स्वत: ला त्या गतीचा भाग बनवून घेतल. प्रश्न भक्तीगीत गायन स्पर्धेसाठी तुम्ही भरलेल्या माझ्या त्या ५० रु नोंदणी शुल्काचा नाहीये ते तर मी आज कितीतरी पटीने तुम्हाला परत करू शकतो पण ते प्रेम आणि मी त्या स्पर्धेत गायलोच पाहिजे हा जो अधिकाराने आणि प्रेमाने दरडावून सांगण्या मागच्या भावना मी कशा परत करू शकेन बाई कदाचित तुम्ही सांगितल्या सारखा आज मी तेवढा सरळ आणि साधा नसेन ही पण तुमचा हा विद्यार्थी बाहेरच्या प्रलोभनाला अजून तरी बळी पडलेला नाही
मला माझ्या बाईकडून जे प्रेम आणि जे संस्कार मिळाले ते आजही मी बाळगून आहे माझ शिक्षण एका मराठी शाळेत झाल शिक्षकांना बाई किंवा मास्तर म्हणण्याची पद्धत कदाचित आजच्या SO CALLED पुढारलेल्या ?? पिढीच्या मुलांना गावांढळ वाटेल पण आजच्या 'म्यम' मध्ये कालच्या बाईंचा आदर आणि प्रेम येउच शकत नाही
भविष्यात माझ्या प्रत्येक यशा मागचा सिंहाचा वाटा निर्विवाद पणे माझ्या शिक्षकांचाच असेल
गुजराती बाई तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेछ्या

No comments:

Post a Comment