Wednesday, 18 January 2012

माणसं.............



माणसं
कधी कधी जेव्हा गरज असते तेव्हा आपली माणसं साथ सोडतात....तेव्हा मन थरथरतं,धीर सुटतो.
पण कधी कधी अश्या वेळी काही अनोळखी माणसं नकळत जवळ येतात,आपला आधार बनतात.
आधार देताना त्या व्यक्तीने सांगितलेल्या प्रत्तेक गोष्टीवर विश्वास ठेऊन आपण जगायला सुरुवात करतो.
जगता जगता आपला आयुष्य आपण त्या व्यक्तीच्या स्वाधीन कधी केले याची हि जाणीव होत नाही.

... चालणारे आपण पण रस्ता ठरवणारं कुणी दुसरं बनतं,
या सगळ्यात वाईट गोष्ट इतकीच असते कि,
आपण "परावलंबी" बनतो,
आलेली व्यक्ती "आधार" देते,नवं जीवन देते,
पण ती कायम तुमच्या आयुष्यात राहील याची शाश्वती नसते.

"आयुष्याच्या रथासाठी एखाद्याचे मार्गदर्शन घेणे ठीक....
पण रथाची दोर दुसऱ्याकडे सोपवणे चुकीचे"
स्वतःचा रिमोट कंट्रोल स्वतःकडेच असावा....
सवय हि जितकी चांगली गोष्ट आहे त्याहून कितीतरी वाईट आहे.

वाटसरूच्या मनात "सावलीची" ओढ असावी
परंतु....
वाटसरुने एका ठराविक वृक्षाच्या प्रेमात पडू नये किंवा ठराविक वृक्षाच्या सावलीचा हट्ट धरू नये......

No comments:

Post a Comment