Friday, 13 January 2012

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..................

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे
एका झाडा खाली पोपट वाघ आणि डुक्कर राहत होते,
त्यांची खूप मैत्री होती, ते एक मेका शिवाय राहू शकत नव्हते,
एके दिवशी वादळ आल, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले,
... आणि या प्रसंगा मध्ये पोपट मरण पावले.
आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ आजारी पडला आणि त्या आजारात त्याचा मृत्यू झाला.
आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे डुक्कर सुद्धा त्या परीस्तीतीत जिवंतराहू शकत नव्हता, आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी आपले प्राण सोडले.
..खूप दिवसांनी ज्या ठिकाणी
पोपट वाघ आणि डुक्कर मरण पावले होते त्या ठिकाणी एक'मोहाचे' ( 'मव्हाचे')'झाड रुजू लागले.
पुढे मव्हाच्या झाडापासून मानवाने''दारू'' बनवली.
.. आणि म्हणूनच.
ज्या वेळी माणूस दारू पितो
त्यावेळी पहिला त्याचा पोपट होतो
..आणि पोपटा सारख बोलू लागतो.
थोड्या वेळाने तो वाघ होतो..
आणि कुणालाही न घबराता तो वाट्टेल तेबोलू लागतो, कुणाचेच ऐकत नाही .
सरते शेवटी त्याचा डुक्कर होतो.
... आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर लोळतो त्याच प्रमाणे तो रस्तावर, गटारात.......

No comments:

Post a Comment