Friday 13 January 2012

मुलगी हवीये

हो............ आम्हाला मुलगी हवीये,नि तेच कसे १००% बरोबर आहे हे आम्ही
पुराव्याने सिद्ध करू इच्छितो.विश्वास बसत नाही नां ? मग हा घ्या पुरावा.......

भारतात नेहमी "मुलगा"जन्माला यावा म्हणूनच नवससायास केले जातात.

... ... पण मुलगीच व्हावी या साठी कोणी नवस बोलत नाहीत

मोठ्यांचे भरभरून आशीर्वाद हे नेहमी मुलांच्याच वाट्याला येतात.

पण मुली मात्रं त्या पासून वंचित रहातात

पण जेव्हा पैशाची गोष्ट येते

तेव्हा लोक लक्ष्मीचीच पूजा करतात.

नि विद्या प्राप्ती साठी

सरस्वतीचीच आराधना करतात

नि सुखसमृद्धी, मानसिकशांती-समाधाना साठी

अंबाबाईची करुणा भाकतात

अन संकटाचे वेळी
त्यांना कालीमातेचीच आठवण होते

मग आता सांगा बरे कि, लोक त्यांच्या घरात जर मुलगी जन्माला आली तर एवढे खट्टू का होतात बरे ?
खरं तर काहीच कारण नकोय !

कारण आपण जेव्हा जेव्हा संकटात सापडतो तेव्हा आपल्या सगळ्यांना वाचविणाऱ्या ह्या सगळ्या स्त्रियाच आहेत.अहो,फार कशाला आपल्याला अगदी साधी ठेच जरी लागली तरी आपल्या तोंडात प्रथम आईचेच नाव येते,न कि बाबाचे

त्या मुळे हे पोस्ट बघितल्या नंतर तुम्ही येथून जर तसेच निघून गेलात तर, तुमचे काहीच बिघडणार नाहीये हे मला माहिती आहे. पण जर तुम्ही हा सुंदर विचार,तुमच्या कडून जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहोचवला तर, "स्त्री" जातीचा उचित सन्मान करून,आपण, आपल्या आई समोर किंवा बायको समोर किंवा अगदी मुली समोर सुद्धा,ताठ मानेने नि आनंदात उभे राहू शकू ... नाही का ? त्या मुळे आपल्या घरात मुलगी जन्माला आल्यावर आपण तिचे दोन्ही हात पसरून अगदी आनंदाने स्वागत करूयात ...

राज्यात दर १००० पुरुषांमागे फक्त ९२२ महिला आहेत. तसेच स्त्री-भ्रुणहत्येच्या घटनांमध्ये दरवषीर् वाढ होत आहे आणि हेच या तफावतीमागील कारण आहे. महिलांच्या महानतेचे गुणगान गाऊ नका, त्यांना समान वागणुकीचे वचन देऊ नका, किंवा देवी देवतांचा दर्जाही देऊ नका. त्यांना फक्त जन्म घेण्याचा अधिकार द्या

No comments:

Post a Comment