Friday, 13 January 2012

!!! तिला ही इच्छा मरण हवं आहे !!!

!!! तिला ही इच्छा मरण हवं आहे !!!
काल एका गर्भातल्या नव अर्भकाने
इच्छा मरणाची व्यक्त केली होती
इच्छा मरणाची बातमी तिने
आईच्या गर्भातचं ऐकली होती

अर्भकाने बाप्पाला विनंती केली की
तिला इच्छा मरण हवे आहे
जन्मल्यावर आपटून आपटून मरण्यापेक्ष्या
आईच्या गर्भातच शांतपणे डोळे मिटायचे आहे

ती रडक्या स्वरात म्हणाली की मला बाबांची भीती वाटते
बाबांनी आईला सांगितले होते " मला मुलगाच हवा आहे !!
मुलगी झाली तर आईला आणि मला सोडणार नाही
बाळ मुलगी असेल तर हे जगंच पाहून देणार नाही "

माझ्या बाबांनी आजीने आजोबांनी
आईला मुलगाच झाला पाहिजे म्हणून खडसावले आहे
मुलगी झाली तर माझ्या आईला मात्र असंच
टोचून टोचून असह्य जगायचं आहे

"" देवा ! त्यापेक्ष्या तु मला गर्भातच इच्छामरण दे !!
तु मला तथास्तु म्हणताच माझा श्वास बंद होणार
देव ही हसत म्हणाला " बाळा मीच तुला हे विश्व दाखवणार
तर मी कसा तुला मातेच्या गर्भात मरण देणार ? "

गर्भातलं बाळ मात्र देवापुढे हट्टाला पेटलं
इच्छामरण द्यावे म्हणून गळ घालू लागलं
देवालाही त्या बाळाचं कुतूहल वाटलं
मानवाच्या अमानुष कृत्याचं आश्चर्य वाटलं

देव ऐकत नाही म्हणून बाळाने
आईलाच विनंती करण्याचे ठरविले
हळूच आईच्या स्वप्नांत जाऊन आईचे चुंबन घेतले
"आई !ई " असा गोड आवाज देत आईच्या कुशीत विसावले

"" आई माझा तुला त्रास नको म्हणून मला
गर्भातच विष देशील का ?
बाळाचं हे ऐकताच आईला रडूच कोसळले
बाळा तु मला हवी आहेस म्हणत तिला हृदयाशी कवटाळले "

" पण आई माझा जन्म झाल्यास मुलगी म्हणून बाबा मला मारतील
नाही तर तुला दोष देवून तुझं जगणं कठीण करतील
मला हे जग नाही पहायचं आहे
क्रूर माणसांची तोंडं पाहण्याआधी मला गर्भातच मरायचं आहे ""

"" आई !! मला तु गर्भातच संपव
मृत जन्मलेली मुलगी पाहता बाबा ही खुश होतील
आजी आजोबा ह्यानाही नातू हवाच आहे ना
मीच गेल्यावर सर्वांचे चेहरे आनंदी होतील "

" आई खरंच मला गर्भातच इच्छामरण हवं आहे गं
तु बाबांना सांग की मी स्वप्नात येवून गेली
तुम्हा कोणालाच त्रास नं देता मी हे
सुंदर जग गर्भातूनच अनभवून देवाघरी गेली "…

या निर्दयी समाजाचे विचार बदलण्यास मदत करा...

No comments:

Post a Comment