Friday, 13 January 2012

एक सत्य कथा एकदा जरूर वाचा ....


एक सत्य कथा एकदा जरूर वाचा ....

जानेवारी महीन्याच्या एका सकाळी वॉशिंग्टनमधील मेट्रो रेलवे स्टेशन वर एक माणुस येउन बसला आणि त्याने व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली.
त्याने सुमारे ४५ मिनिटे सुमधुर संगीताच्या सहा फैरी वाजवल्या.

सकाळ असल्याने कामावर जाणार्‍या हजारो माणसांची लगबग त्यावेळी स्टेशनवर होती.
काही मिनिटे झाली आणि एका वॄद्ध गृहस्थाचे त्या वादकाकडे लक्ष गेले.
आपला वेग थोडासा मंदावुन ते तेथे काही क्षण थांबले आणि पुन्हा लगबगीने आपल्या मार्गाला लागले.
त्यानंतर काही मिनिटांतच त्या वादकाची पहीली कमाई झाली.
एका महीलेने एक डॉलर त्याच्या दीशेने भिरकावला आणि न थांबताच ती तेथुन निघुन गेली.

आणखी काही मिनिटांनंतर एक माणुस ते गाणे ऐकण्यासाठी थांबला, पण घड्याळाकडे लक्ष जाताच घाईघाईने पुन्हा चालु लागला. त्याला बहुदा ऑफीसमध्ये जायला उशीर झाला होता.

मात्र एका ३ वर्षाच्या मुलाचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि तो तेथेच उभा राहुन अगदी मनापासुन त्या वादकाकडे आणि वादनाकडे लक्षपुर्वक पाहु लागला. तो मुलगा त्याच्या आईबरोबर होता आणि त्याची आई त्याला पुढे जाण्यासाठी ओढतच नेत होती. तेथुन जाणार्‍या प्रत्येक मुलासोबत असेच होत होते. प्रत्येक मुल ते गाणे ऐकायला थांबु पाहत होते आणि प्रत्येक पालक त्यांना ओढुन नेत होते. ४५ मिनिटांच्या वादनात फक्त ६ जणांना ते गाणे ऐकण्यासाठी क्षणभर का होईना थांबावेसे वाटले. जवळपास २० लोकांनी त्या वादकाला पैसे दीले मात्र तेही न थांबता तेथुन निघुन गेले.

त्या वादकाने ३२ डॉलर्सची कमाई केली. पण जेव्हा त्याने वादन थांबवले तेव्हा संगीत बंद झाल्याचे कोणाच्या लक्षात देखील आले नाही. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत की त्याला शाबासकी दीली नाही. कोणालाही हे कळले नाही की तो वादक दुसरा तीसरा कोणीही नसुन जगातील सर्वोत्कॄष्ट व्हायोलीन वादक जोशुआ बेल हा होता. आणि त्याने वाजवलेली तान हे सुमारे ३.५ दशलक्ष डॉलर्स इतक्या कीमतीचे व्हायोलीनवर बनलेले जगातील सर्वोत्कॄष्ट संगीत होते. स्टेशनवर व्हायोलीन वाजवण्याच्या दोनच दिवस आधी बॉस्टनमधील एका सभागॄहात झालेल्या त्याच्या कार्यक्रमाची तीकीटे अगदी १०० डॉलर प्रतीव्यक्ती इतक्या जास्त किमतीला गेली होती.

ही एक सत्य घटना आहे. खरेतर विविध गोष्टींचा आस्वाद घेण्याच्या लोकांच्या पद्धतीवर आणि प्राधान्यांवर प्रकाश टाकण्यासाठी केलेला हा एक प्रयोग होता. या प्रायोगाचा मुख्य हेतु खालील काही प्रश्नांचा उलगडा करणे हा होता. - एखाद्या सार्वजनीक ठीकाणी आणि अयोग्य वेळी आपण सौंदर्याचा, कलेचा आस्वाद घेतो का? - तो घेण्यासाठी आपण थांबतो का? - अगदी वेगळ्याच मार्गाने नकळत समोर आलेल्या कलाकौशल्याला आपण तीतक्याच रसीकतेने वाखाणतो का?
या प्रयोगाचा एक निश्कर्ष असा देखील काढता येइल की - जर जगातील सर्वोत्कृष्ट वादकाचे सर्वोत्कृष्ट संगीत ऐकण्यासाठी एक क्षण थांबण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो ,

तर मग विचार करा दररोज अशा कितीतरी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आहे? बघा विचार करा आणि आपली उत्तरे आपणच शोधण्याचा प्रयत्न करा...

No comments:

Post a Comment