Friday 13 January 2012

भावना




  एकदा एक माणुस ऑफिसमध्ये Boss खुप रागावले म्हणुन तडकाफडकी Half day सुटुन बसने घरी जायला निघतो.
बसमध्ये जेमतेम 10-12 जण असतील , तो रिकामी Seat पाहुन Tension मध्येच बसतो
पुढच्या Stop वर एक माणुस आपल्या दोन चिमुरड्यांसह त्या व्यक्तीच्या पुढच्या Seat वर येवुन बसतो.
ती लहान चिमुरडी मग बसमध्ये खुप धिंगाणा घालु लागतात , खिडकीच्या बाहेर डोकावुन मोठमोठ्याने ओरडतात , मध्येच भुक लागली म्हणुन रडकुंडलीला येतात .
त्या मागच्या Seat वर बसलेल्या व्यक्तीला याचा खुप राग येऊ लागतो , खुप वेळेस समाजावुनही ती मुले शांत होत नाहीत ते पाहुन तो त्यांच्या वडिलावर ओरडतो "सांभाळता येत नसेल मुलानां तर कशाला ऊगीच जन्माला घालता ओ अशी मुलं ???? "
त्यावर तो माणुस शांत पाणीदार डोळ्याने म्हणतो , " तुमच्या भावना मी समजु शकतो साहेब , पण या चिमुरड्या जीवाला कसं समजावु कि तुमची ' आई ' या जगामध्ये नाही आता .., थोडयाच वेळापुर्वी तिच्यावर हॉस्पीटलमध्ये अंत्यसंस्कार करुन घरी निघालोय आम्ही. .
यावर त्या दुसर्या माणसाची मान शरमेने त्यापुढे झुकली

No comments:

Post a Comment