Saturday, 16 June 2012

व.पु.काळे

जो कुणी "मी खूप सहन केले,खूप सहन केले" असे ओरडून सांगतात
ते खरे तर जगाकडून सहानभूती मिळवत असतात.
जो सहन करतो तो कधी बोलत नाही.

"व्यवहारी माणसांत, समाजात चांगल वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून. म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची. इथच यातना आहेत. एखादाच बदल असा असतो कि त्याचा मनाने स्वीकार केला जातो. बाकी सगळ लादलेल असत. प्

रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारख करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्याच प्रमाणात तो... समोरच्या माणसावर प्रेम करतो. ह्या स्वरूपाच प्रेम करण हे प्रेमच नाही. ही स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारे किती?

प्रत्येक माणसाच्या मनात त्याच एक जग असतं. ते उध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड. जे बाहेरचं जग मानतात ते आतून फुटतात. जे बाहेरचं जग उध्वस्त झाल तरी चालेल म्हणतात ते सुखी."

सर्वात जवळची माणसंच जास्त तर्हेवाईकपणाने वागतात, त्यांचं आपण मुळीच मनाला लाऊन घेऊ नये. परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करू नये ह्याचा धडा आपल्याला घरबसल्या मिळावा हा त्याचं सद्हेतू असतो. एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख निर्माणच होत नाही.

आईच्या आणि बापाच्या व्याख्येत जर सुस्वाद नसेल ,तर मुलं गुदमरतात...कोणत्या पाऊलवाटेचा पुढे हमरस्ता होईल हे प्रवासाच्या प्रारंभी सांगता येत नाह...ी....तेव्हा मुलाला चालू द्यावं.....आई बापांनी मुलाच्या मार्गात आडवं पडावं ते सावलीच्या रूपाने.

बाप मुलाला गाडी देऊ शकतो.
झोप देऊ शकत नाही.
आई जेवण देऊ शकते.
भूक देऊ शकत नाही.



व.पु.काळे

No comments:

Post a Comment