Tuesday 3 April 2012

त्याग कुणाचा मोठा?

त्याग कुणाचा मोठा?

त्याग कुणाचा मोठा?
अंधपती साठी डोळ्यावर पट्टी बांधणाऱ्या गांधारीचा त्याग मोठा ?
कि गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांना स्वतःचा अंगठा देणाऱ्या एकलव्याचा त्याग मोठा?
कोणतं दु:ख मोठं?
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्याचं दु:ख मोठं ?
कि व्यक्ती जग सोडून गेल्याचं दु:ख मोठं?
सुख कोणतं मोठं?
प्रेयसीच्या होकाराचे सुख मोठे?
कि पहिला पगार हाती धरलेल्या आईच्या पाणावलेल्या डोळ्यांमधले सुख मोठे?
सोनचाफ्याचा गंध जास्त सुखदायक कि देवाऱ्यातल्या अगरबत्तीचा गंध जास्त सुखदायक?
देवळातली प्रसन्नता मोठी कि झाडाखालच्या शांत सावलीतली प्रसन्नता मोठी?
आईची अंगाई जास्त सुरेल असते कि कोकिळेचे गाणे जास्त सुरेल असते?
लहान बाळाचा स्पर्श जास्त नाजूक कि मोरपिसाचा स्पर्श जास्त नाजूक?
फुलपाखरू जास्त सुंदर कि पहाटेचे आभाळ जास्त सुंदर?

तुलनेचा तराजू प्रत्तेक गोष्टीसाठी लागू नाही करता येत.
काही गोष्टी स्वत:च स्वत:चे एक वेगळे स्थान घेऊन जन्माला येतात.

No comments:

Post a Comment