Friday, 23 March 2012

ही एक काल्पनिक गोष्ट आहे............

ही एक काल्पनिक गोष्ट आहे............
.
एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्यात वाद सुरु असतो.
लक्ष्मी मातेचं म्हणणं असं असतं, कि " जग चाललय तर ते फक्त माझ्यामुळे (पैशामुळे) ......... ज्या माणसाकडे पैसा नाही, संपत्ती नाही....... त्याला काही किंमत नाही. माणूस ओळखतो........ जाणतो....... आणि बोलतो ते फक्त पैशानेच. "
यावर विष्णू भगवान हसून म्हणतात कि " असं काही नाहीये. "
... पण लक्ष्मी माता येन केन प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते कि पैशालाच जास्त महत्व आहे.
तरीही विष्णू भगवान मान्य करत नाहीत म्हणून लक्ष्मी माता म्हणते, " ठीक आहे. मी सिद्ध करून दाखवते. मग तरी मान्य कराल? "
विष्णू भगवान हसून म्हणतात, " हो चालेल. "
त्यावर लक्ष्मी माता पृथ्वी वरील एक दृश्य दाखवते. - एक शोकमग्न अंत्ययात्रा चालली असते...............
लक्ष्मी माता आकाशातून धनाचा वर्षाव सुरु करते.... आणि लगेच अंत्ययात्रेतील सगळे लोक आपण कुठे जातोय हे विसरून पैसे गोळा करू लागतात.
लक्ष्मी माता भगवान विष्णूंकडे पाहत म्हणते, " पाहिलंत? पैश्या समोर माणूस आपण कोणाला तरी कायमचे गमावून बसलोय हे दुखः देखील विसरतो."
" अगं पण त्या चौघांच काय? जे मृत देहाला खांदा देऊन आहेत? ते तर नाही ना वाकले पैसे उचलायला? " विष्णू भगवान म्हणाले.
लक्ष्मी माता म्हणली, " ठीक आहे....... हे घ्या." एवढे म्हणून लक्ष्मी मातेने खांदा दिलेल्या त्या चौघांसमोर धनाचा वर्षाव सुरु केला.............
त्या चौघांनी प्रेत बाजूला ठेवलं आणि जमेल तितके पैसे गोळा करायला सुरुवात केली.
यावर लक्ष्मी मातेने आपण जिंकलो या अविर्भावात भगवान विष्णूंना प्रश्न केला, " आता तरी पटलं? "
" अजून ही एकजण बाकी आहे......... " दृश्याकडे पाहत विष्णू भगवान म्हणाले. " तो जो तिरडीवर झोपलाय.... तो तर नाही उठला पैसे उचलायला? "
लक्ष्मी माता म्हणली, " तो उठेल तरी कसा? तो मृत आहे. त्याच्या शरीरात आत्माच नाहीये. "
तत्क्षणी भगवान विष्णू म्हणाले, [ हे जरा काळजी पूर्वक वाचा! ]
" हेच तर सांगायचं मला, जो पर्यंत मी शरीरात आहे तो पर्यंतच तुला ( पैश्याला/संपत्तीला ) मान आणि किंमत. ज्या क्षणी मी मनुष्य देहातून अंतर्धान पावलो त्या क्षणी त्या मनुष्यासाठी पैसा मातीमोल. माणसा बद्दल हेच तर आश्चर्य आहे कि तो पैश्यासाठी जीवन पणाला लावतो पण मग तोच पैसा त्याचा जीव का नाही वाचवू शकत.........................? आयुष्य जगताना तो असा जगतो कि कधीच मरणारच नाही......... आणि मरताना असा मरतो कि कधी जगलाच नाही.........."
.
काय? खरय ना............?
मित्रांनो मला ही गोष्ट सुचन्यामागची कारणे अशी की, मी जेव्हा रोज ट्रेन ने प्रवास करतो....... तेव्हा मी पाहिलेले प्रसंग आणि अनुभव.
आणि फक्त ट्रेन चा प्रवास नाही, तर इतर अनेक ठिकाणीसुद्धा. माणूस पैश्यामागे धावतोय................... अक्षरशः धावतोय आणि दम लागून जीव सोडतो.
कमावलेला पैसा तुम्ही प्रेम करत असलेल्या जिवलगांना सुख संपत्ती देऊ शकतो, पण या खटाटोपात कायमचे दूर गेलेल्या कुणाच्या तरी बाबाला, दादाला, नवऱ्याला, मुलाला.............. नाही परत आणू शकत.
यावर नक्की विचार करा. आणि पैश्यापेक्षा सुद्धा लाख मोलाचा असलेला आपला जीव आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती यांची काळजी घ्या.

No comments:

Post a Comment