Friday, 23 March 2012

आपण गुढीपाडव्याला नववर्ष का साजरे करतो ?

एखादी कृती करण्यापूर्वी ती का करावी ? त्यामागील शास्त्र, तसेच इतिहास काय आहे ?, या सर्व गोष्टी आपण पहातो. मग ‘सध्या लोक नवीन वर्ष ३१ डिसेंबर या दिवशी का साजरे करतात ? यामागे कोणते शास्त्र आहे कि इतिहास आहे ?’, असे प्रश्न तुम्हाला पडत नाही का ? कोणतेही शास्त्र किंवा इतिहास नसतांना केवळ पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणून आपण ३१ डिसेंबर या दिवशी नवीन वर्ष साजरे करतो. तेव्हा नववर्षाचा प्रारंभ कसा होतो, ते आपण पहातोच.
रात्री १२ नंतर डिजेचा कर्णकर्कश नाद, दारू पिणारे नाचणारे आणि भांडणे करणारे तरुण यांच्या सहवासात वर्षाचा प्रारंभ आपल्याला योग्य वाटतो का ? ते पाहून ‘खरेच हा नववर्षारंभ आहे’, असे आपल्याला वाटते का ? तुम्हीच याचा अभ्यास करा. मला सांगा, आपल्या दिवसाचा प्रारंभ दुःखाने झालेला आपल्याला आवडेल का ? नाही ना ? हिंदु संस्कृतीनुसार रात्री १२ वाजल्यानंतरचा काळ हा असुरांचा मानला जातो. मग अशा वातावरणात वर्षारंभ होऊच शकत नाही.
आपल्या हिंदु संस्कृतीनुसार आपण गुढीपाडव्याला नववर्ष का साजरे करतो, हे ठाऊक आहे का ? कारण या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. इतिहास पाहिला, तर याच दिवशी रामाने रावणाचा वध करून अयोध्येत प्रवेश केला आणि लोकांनीही त्या विजयाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढ्या उभारल्या. त्यामुळे आपण या दिवशी नवीन वर्ष साजरे करतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ साजरा करतांना आपण पहाटे अभ्यंगस्नान करून घरासमोर रांगोळी काढतो. हिंदु संस्कृतीप्रमाणे वेशभूषा करून प्रभात फेर्यांमध्ये सहभागी होऊन भजने म्हणतो, तसेच सनई किंवा तुतारी वाजवतो आणि शंखनादही करतो. मग मित्रांनो, तुम्हीच सांगा कोणत्या दिवशी वर्षारंभ साजरा करायला हवा ?
मित्रांनो, हिंदु संस्कृतीतील प्रत्येक दिवस आणि सण यांमागे काहीतरी शास्त्र अन् इतिहास असल्याने ते आपल्या जीवनातील आनंद द्विगुणित करतात. हिंदु संस्कृतीनेच विश्वाला आनंदी जीवन जगायला शिकवणारी जीवनपद्धत घालून दिली आहे. त्यामुळे अशा महान संस्कृतीने ठरवून दिलेला वर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करून आपणही आनंदी जीवन जगूया.
आपणही आपल्या मित्र-मैत्रिणींना गुढीपाडव्यालाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी सिद्ध होऊया.’
आता आपण इंग्रजी मासानुसार वर्षारंभ १ जानेवारी आणि हिंदु धर्मानुसार वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदा यांच्यातील चित्ररूप भेद पाहूया

No comments:

Post a Comment