Friday, 11 January 2013

आयुष्यात खुप माणसं येतात जातात .....







आयुष्यात खुप माणसं येतात जातात .....

काही माणसं मेहंदी सारखी असतात

कोरा असतो हात .... ती अगदी अलगदपणे हातावर उतरतात ......

त्यांची नाजुक नक्षी आणि तो मेंदीचा धुंद करणारा सुगंधही आपल्या जीवनात घेउन येतात....

खुप हरवून जातो आपण त्यांच्या रंगात... रंगत जातो....

आणि मग हलू हलू ... तो रंग... तो वास फिकट होंत जातो.....

आणि त्या माणसाचे अस्तित्व पण दूर होते आपल्या आयुष्यातून..

पुन्हा तो कोरा हात आणि मनात त्या रंग, सुगंधी, नक्षीदार आठवणी.....

तर काही माणस असतात ती तळ्यात पड़णlऱ्या दगडासारखी ....

शांत पाण्यात खळबलात माजवनारी......

ती पाण्यात पडताच तरंगावर तरंग येतात जीवनात .....

अनपेक्षीतरित्या येतात ही माणस ... धवलून काढतात जीवन....

मग कधी खालचा गाळ ही वरती येतो.... गधूळता वरती येते आपल्या जीवनातली.....

आपण सवारेपर्यंत तो गाळ जगासमोर येतो आणि ही माणस गायब होतात

त्या तलाताच खोल कुठेतरी

तर कधी काही माणस असतात मृग जला सारखी ......

त्यांच्या मागे आपण धावत असतो...ओढीने... l

पण ती तर मृगजळच ना....न हाती येणारी.....

तरीही त्या तहानलेल्या जीवाला दुसर काही दिसतच नाही..




No comments:

Post a Comment