Saturday, 12 January 2013

प्रेम हेच जीवन ♥



♥ एक छोटीशी प्रेम कथा ♥
दररोज सकाळी अंधेरी स्टेशनला मला एक कप्पल दिसायचे.
ते दर वेळेस हसी मज़ाक गम्मत-जम्मत करत राहायचे ... 
मला ते अनोळखी होते. 
पण त्याना कुठे तरी पाहिल्या सारखे वाटे.
सो मी त्याना मिस्टर. व मिसेस शर्मा हे नाव दिले...
मी दररोज सकाळी त्याना पाहयचो.
माझ्या दृष्टिने ते एक हॅपी कप्पल होते.
ट्रेन ची वाट पाहत ते गप्पा मारत बसत आणि कधि कधि शांत बसत.
मला त्यांचे जाम आकर्षण होते.
लोकल आली की मिसेस शर्मा या मिस्टर शर्माच्या गळ्यात बॅग घलून देत
आणि नंतर त्यांचा हाथ पकडून त्याना गाडीत चढायाला लावत..
लोकल गाडीत चढले के मग ते सीट वर बसत
मी सामोर बसुन किवा बाजुला उभे राहुन त्याना पाहत बसे…
गाडीत बसले की मिस्टर शर्मा पेपर कढुन वाचत बसायचे
मिसेस शर्मा थोड़या वेळात बॅग मधुन लोकरिचा लाल कलर चा गोळा काढून स्वेटर विनत बसायचया.
त्या स्वेटर विनत असताना कधि कधि मिस्टर शर्मा त्याना मदत करायाचे
किवा लोकरिचा गोळा जवल धरूण बसायचे.
नंतर मला कॉलेज मुळे नाही जमायचे जायाला..
एक दिवशी तब्बल 5 महिन्याने ते मिस्टर शर्मा दिसले पण एकटे होते.
सौ सोबत नव्हत्या मी जवळ गेलो विचारले "ओळखले का मला… ? "
ते बोलले " हो तो तूच ना जो आम्हाला घुरुन बाघयचा…? "
मला या वाक्याचा राग आला नाहि
मी : तुमच्या बरोबार त्या लेडीज
असायच्या त्या आज नाही का…?
मिस्टर. शर्मा: शी पास्ड अवे
मी क्षणभर सुन्न झालो … मनात आक़ाशाचे काळे ढग जमा झाले...
20 मिनिट शांततेत गेली.. लोक लोकल मधून उतरत होती चढत होती..
मी : नक्की काय झाले ?
ते: अरे तिला कॅन्सर होता पण माझ्या जवळ दररोज राहता यावे
म्हणून मला सोडयाला यायची ऑफीसला.....
ऑफीसला सोडले की जायची घरी..
बस ती त्याचयात खुश होती..
खूप प्रेम होते तिचे माझ्या वर आणि माझे तिच्यावर
दोन जीव एक प्राण होतो आम्ही....
कधी एकमेकांच्या पासून दूर राहिलो नाही.......
आज तिच्या शिवाय जगायला लागत आहे...
मी ठरवले होते तिच्या सोबतच मरायचे..
पण तिने माझ्या कडून वचन घेतले होते कि,
तुम्ही या मिळालेल्या जीवनात जगायचे आहे.....
पुढचा जन्म आपण दोघे एकत्रित घालवूयात....
मी तिच्या सोबत वेळ घालवण्यासाठी
तिला भेटायला रोज समशान भूमीवर जातो.
ती मला रोज भेटते.
तिच्या असण्याच्या भास मला होतो
ती माझ्या जवळच कुठे तरी आहे असे वाटते........
आणि बस आता जगतो आहे, तिच्या फक्त आठवणीत.....
कधी मरण येईल आणि कधी पुढचा जन्म मला मिळेल आणि कधी आम्ही भेटू वाट बघतो आहे...
मला काहिच सुचेना…
बांद्रा स्टेशन ला ते उतरले मला हसू की रडू कळत नव्हते ..
आणी इतक्या वेळा पासून मी त्यांच्या सोबत बोलत होतो
जेव्हा ते जात होते मी त्यांच्या कडे बघत होतो
तेव्हा माझ्या लक्षात आले त्या शर्माजिंनी लाल कलर चे स्वेटर घातलेले
दिसले ते पण अर्धेच होते एकच साईड ची बाही पूर्ण असलेले….
बस मला कळले पुस्तकातील प्रेम, मुव्ही मधील प्रेम जे पहिले होते
ते साक्षात माझ्या समोर होते.... ते प्रेम मी आज अनुभवले..
किती प्रेम शर्माजींचे पण त्यांच्या बायकोवर आहे....
आणि या सत्य प्रेम कथेचा खरच मी एक भाग होतो…
मित्रानो प्रेम करा अगदी मनापासून करा.....
प्रेम हेच जीवन.....
प्रेम करत राहा....

No comments:

Post a Comment