Sunday, 23 December 2012

हृदयस्पर्शी कथा :



एकदा एक गरीब माणूस थकून उशीरा घरी येतो आई नसलेले त्याचा ५ वर्षाचा मुलगा

त्याची दारात वाटचं पाहत असतो..

मुलगा - बाबा तुम्हाला एका तासाचे किती मिळतात हो..??


बाबा - त्याचं तुला काय करायचंय..

मुलगा - सांगा ना बाबा..

बाबा - २० रुपये..

मुलगा - मला १० रु हवेयत..

बाबा - चल जा झोप गपचुप..

मुलगा कोमेजुन गपचूप वाकळ अंथरतो
आणी उशी खाली डोक टाकतो..
बाबांचा राग शांत होतो..

ते मुलाकडे जातात आणी,
"बाळाहे घे तुझे १० रु"

मुलगा - ते पैसे घेतो आणी त्याच्या उशीत लपवलेली काही चिल्लर काढून मोजतो..

मुलगा - बाबा माझ्या जवळ २०रु.. आहेत मला तुमचा
एक तास विकत घ्यायचाय,
उद्या मला तुमच्या सोबत जेवण करायचंय,
उद्या लवकर याल ना...

गोष्ट थोड़ी मोठी आहे

गोष्ट थोड़ी मोठी आहे पण छान आहे... नक्की वाचा....

एक माणूस एकदा एका अरण्यात फिरता फिरता वाट चुकला. भटकत भटकत तो अरण्याच्या खूप आत पोहचला. अरण्याचा हा भाग एकदम निर्जन होता. तिथे एका परी अन एका भूताचे राज्य होते. दोघेही आपापल्या राज्याच्या व
ेशीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करीत होते.

वाट चुकलेल्या माणसाला बघून परी म्हणाली अरे मी ओळखते ह्याला! लहान पणी मी ह्याच्या स्वप्नात जायचे, हा खूप खूप आनंदून जायचा मला बघून! मग आम्ही खूप खूप खेळायचो, नाचायचो खूप खूप भटकायचो. हा तर अगदी हट्टच करायचा तू जाउ नकोस म्हणून. मला आठवतंय सगळं त्यालाही आठवेल!

तो ओळखेल मला नक्कीच! मला वाटतं माझ्याच शोधात आलाय तो इथे. मी त्याचं अगदी जोरदार स्वागत करील. त्याला माझ्या राज्यात नेईल, त्याला छान सगळीकडे फिरवील. मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करील. आम्ही खूप खूप मज्जा करू.

भूत म्हणले, मी ही ओळखतो ह्याला. मी ही जायचो ह्याच्या लहानपणी ह्याच्या स्वप्नात. तेव्हा हा खूप घाबरायचा मला, अगदी थरथर कापायचा, मला बघून ह्याला भर थंडीतही दरदरून घाम फुटायचा ह्याला कधी कधी तर दचकून झोपेतून उठायचा, मग पांघरुण ओढून गुडुप झोपायचा प्रयत्न करायचा.

परी म्हणाली, तुझं असंच रे तूला सगळेच घाबरतात, तो काही केल्या तुझ्या जवळ यायचा नाही.

भूत म्हणाले, नाही! तसं होणारच नाही. तो माझ्या राज्यातून पुढे जाऊच शकणार नाही .

परी म्हणाली, नाही! नाही तो नक्कीच येईल तू बघच. त्याला खूप खूप आवडायची रे मी!

भूत म्हणाले, ती फार जुनी गोष्टं तेव्हा तो फार लहान होता. आता तर त्याला तू आठवणार ही नाहीस.

परी म्हणाली, आठवेल आठवेल त्याला सगळं! किती किती गोड होतं ते सगळं! ते रम्य बालपण! त्या गोष्टी विसरतो काय कुणी?

भूत म्हणाले, तुला वाईट वाटेल पण तो तुला विसरलाय हे नक्की. आता तर तो तुझ्यावर विश्वास सुद्धा ठेवणार नाही.

परी म्हणाली, मग तो तुझ्या राज्यात काय म्हणून येईल तो तुलाही विसरला असणार ना? तो काय म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवील?

भूत म्हणले, तसं होत नाही कधीच तो मला नक्कीच ओळखेल तो मला विसरणार नाही कधीच.

परी म्हणाली, तो मला ही विसरणार नाही, बघ तू आता कशी आठवण करून देते त्याला तू बघच. माझा निर्माता आहे विश्वास. विश्वास कधीच खोटा ठरायचा नाही! तू बघच तो मला नक्कीच ओळखेल, लावतोस पैज!

भूत म्हणाले, पैज नको लाउस कारण मला चांगला अनुभव आहे तू नक्कीच हारशील.

परी म्हणाली, नाही माझा विश्वास कधीच खोटा ठरणार नाही, तूच घाबरतो आहेस पराभवाला! म्हणून टाळतो आहेस ना?

भूत म्हणाले, ठीक आहे बघ प्रयत्न करून.

परी म्हणाली, सांग मी जिंकली तर काय देशील?

भूत हसले आणि म्हणले, जर तू जिंकलीस तर मी तुला माझे पूर्ण राज्य देऊन टाकील, अन मी कायमचा ह्या जगातून निघुन जाईल.

बघ हं! परी म्हणाली, वेळेवर शब्द फिरवायचा नाही.

नाही फिरवणार! भूत म्हणाले.

मग परी ने विश्वासाची आराधना केली, अन तिने गोड आवाजात गाणे म्हणणे सुरु केले, पक्षी ही आपल्या गोड गळ्याने तिला सुरात साथ देऊ लागले. परी ने मग हळू हळू नाचायला सुरवात केली. वारा मंद मंद शीळ वाजवून तिला साथ देऊ लागला, पानांची सळसळ सुरु झाली. आनंदानी झाडे अन वेली ही डोलू लागली. फुलांनी आपल्या पाकळ्या पसरायला सुरवात केली.वातातावरण प्रसन्न होऊ लागले माणूस ही आनंदी होऊ लागला. परी ने मग मनातल्या मनात दुप्पट जोमानी विश्वासाची आळवणी केली, आता सूर्याने वनावर आपली किरणे फेकली त्या किरणात माणसाला परी चे सोनेरी केस तिचे सुंदर डोळे दिसू लागले, हळूहळू त्याला तीची पूर्ण आकृती दिसू लागली. परी आनंदून गेली तिने त्याच्या स्वागता साठी हात पसरले.

माणसाला स्वता:च्या डोळ्या वर विश्वासच बसेना. भ! भ! भूत!! त्याच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले.

अचानक आकाशात ढग भरून येऊ लागले, विजांचा कडकडाट सुरु झाला, सूर्य ढगांच्या आड लपून गेला, अंधारून येऊ लागले, सोसाट्याचा वारा सुरु झाला, झाडे कडाकडा मोडून पडू लागली, माणूस भयानी घामाघूम झाला, त्याची दातखीळ बसली अन तो कोसळून गतप्राण झाला.

सर्व काही शांत झाले. परी धावतच माणसा जवळ गेली अन रडू लागली. ती भूताला म्हणाली, तूच जिंकलास. नेहमी तूच का रे जिंकतोस. मला सगळे का विसरून जातात?

भूत ही खिन्न झाले, त्यानी परीच्या खांद्या वर थोपटले. ते म्हणाले हे असंच होतं.नेहमीच! तुझा निर्माता आहे विश्वास, माझा निर्माता आहे भय. विश्वास काय अन भय काय हे ह्याच्याच डोक्यातून जन्म घेतात. हाच आपला मुळ निर्माता आहे, आपले वेगळे अस्तित्व नाही. पण!
पण! पण काय? परी म्हणाली.

हा मोठा झाला होता. अन जसा जसा माणूस मोठा होत जातो ना तसा तसा त्याचा विश्वास कमी होत जातो, पण! पण भय मात्र वाढत जातं. म्हणूनच मी जिंकतो. पण तू उदास नको होऊस, माझा शब्द अजून कायम आहे जेव्हा ही विश्वासाचा विजय होईल ना त्या दिवशी मी खरंच हे जग नेहमी साठी सोडून जाईल. भूत म्हणले.







Saturday, 15 December 2012

आई-वडिलांवर प्रेम असेल तर हे वाचा............

आई-वडिलांवर प्रेम असेल तर हे वाचा नाहीतर Scroll करा !!




आई घराच मांगल्य असते तर बाप घराच अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला
खरच आम्ही कधी समजून घेतलेले आहे का ?

वडिलांना महत्व असूनही त्यांच्या विषयी जास्त लिहिलं जात नाही, बोललं जात न

ाही.
कोणताही व्याख्याता आई विषयी बोलत राहतो. संत महात्म्यानीही आईचचं महत्व अधिक
सांगितलं आहे. देवदिकांनीही आईचेच गोडवे गायले आहेत.. लेखकांनी कवींनी आईचं
तोंड भरून कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते

पण बापविषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही
तापट, व्यसनी, मारझोड करणाराच.

समाजात एक दोन टक्के बाप असतीलही पण चांगल्या वडिलांबद्दल काय?

आईकडे अश्रूंचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते
पण सान्त्वन वडिलांनाच करावं
लागतं आणि रडणार्यापेक्षा सान्त्वन करणार्‍या वरच जास्त ताण पडतो कारण
ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना ! पण श्रेय नेहमी ज्योतिलाच मिळत राहतं !
रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरिचि
सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो.
सर्वासमोर आई मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशित तोंड खुपसुन मुसमुसतो तो
बाप असतो .
आई रडते वडिलांना रडता येत नाही, स्वतः चा बाप वारला तरीही त्याला रडता येत
नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचा असतं. आई गेली तरीही रडता येत नाही, कारण
बहिनिंचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावर सोडून गेली तरी

पॉरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.

जिजाबाईंनी शिवाजी घडविला अस अवश्य म्हणावं पण त्याचवेळी शहाजी राजांची ओढतान
सुद्धा ध्यानात घ्यावी. देवकीच, यशोदेच कौतुक अवश्य करावं

पण पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा.

राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण पुत्रवीयोगाने तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता.

वडिलांच्या टाचा झिजलेल्या चप्लांकडे बघितलं की त्यांच प्रेम कळते. त्यांचे
फाटके बॅनियान बघितलं की कळतं "आमच्या नशीबाची भोक

त्यांच्या बॅनियानला पडलीत".त्यांचा दाढी वाढवलेला चेहरा त्यांची काटकसर
दाखवितो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला लुंगी घेतील पण स्वतः

मात्र जुनी पॅंटच वापरतील.मुलगा सलुन मध्ये वीस पंचवीस रुपये खर्च करतो, मुलगी
पार्लर मध्ये खर्च करते, पण त्याच घरात बाप दाढीचा साबण संपला म्हणून
आंघोळीच्या साबणाने दाढी करतो.अनेकदा नुसतं पाणी लावून दाढी करतो.बाप आजारी
पडला तरी लगेच दावाखान्यात जात नाही, तो
आजारपनाला घाबरत नाही पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला
भीती वाटते कारण पोरिच लग्न, पोरांच शिक्षण बाकी असतं, घरात उत्पन्नाच दुसरं
साधन नसतं.ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकल, इंजिनियरिंग ला प्रवेश मिळवून दिला
जातो, ओढतान सहन करून मुलाला दरमहिन्याला पैसे पाठविले जातात. पण सर्वच नसली
तरीही काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूम
मध्ये पार्ट्या देतात आणि
ज्या बापानी पैसे पाठविले त्याच बापाची टिंगल करतात.
आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या
घराकडे वाईट नजरेने कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला कर्ता
जिवंत असतो, तो जरी काहीही करत नसला तरीही तो त्या पदावर असतो आणि घरच्यांच
कर्म बघत असतो, सांभाळत असतो.कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही पण बाप होणं
टाळता येतं, पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई
होण्याला बापामुळे अर्थ असतो.
कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते,
कौतुक करते, पण गुपचुप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत
नाही. पाहितलकरणीच खूप कौतुक होतं पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणार्
या त्या बाळाच्या बापची कोणीही दाखल घेत नाही.

चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर 'आई गं' हा शब्द बाहेर पडतो. पण रस्ता पार
करताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक लावतो तेव्हा 'बाप रे' हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो. काय पटतय ना?

कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्वजण जातात, पण मयताच्या प्रसंगी बापलाच जावं
लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो,
पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा ऊशिरा घरी
येतो तेव्हा बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढे
लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उम्बर्ठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी
स्वतः च्या व्यथा दडपणारा बाप, खरच किती ग्रेट असतो ना?

वडिलांचं महत्व कोणाला कळतं ? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदर्या खूप
लवकर पेलाव्य लागतात, त्यांना एकेका वस्तुसठी तरसावं लागतं. वडिलांना खर्या
अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून
दूर असलेल्या मुलीला फोनवर
बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो, ती अनेक प्रश्न विचारते.
कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेऊन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या
बोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते. इतरांनी सुद्धा असच आपल्याला
जाणावं हीच बापची किमान अपेक्षा असते

आवडलं तर नक्की शेयर करा !!!!!

Tuesday, 4 December 2012

प्रेमत्रिकोण.............

प्रेमत्रिकोणः
मित्रांनो ही कहानी आहे अशा प्रेमवीरांची जे बालपणाचे मित्र तर होते,पण त्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रेमाला ते मैत्रीच समजत होते.या कहानीत देवदासही आहे,पारोही आहे आणि चंद्रमुखीही.पण तरीही ही कहाणी पुर्णतःवेगळी आहे जी नक्कीच

 तुम्ही याआधी कधीच अनुभवली नसेल।
शर्विल या कथानकाचा नायक,दिप्ती नायिका आणि मानसीला चंद्रमुखी म्हणायला हरकत नाही।
शर्विल आणि दिप्ती हे दोघे बालमित्रच शेजारी शेजारी असलेने त्यांची मैत्री ही खुपच गाढ होती।एकाच शाळेत एकाच वर्गात शिकायचे ते..शर्विल अभ्यासात कच्चा आणि आळशी असल्याने त्याचा घरचा अभ्यास खुपवेळा दिप्तीच करायची।पण तोहि दोस्ती निभावण्यामध्ये काही कमी नव्हता,एकदा ज्यावेळी दीप्ती तिची अभ्यास केलेली वही घरीच विसरुन आली होती,त्यावेळी शर्विलने त्याची वही जी तिनेच पुर्ण केली होती,ती तिला दिली आणि त्याने अभ्यासाची वही नसल्याने मॅडमचा मार खाल्ला होता।आज ते मोठे झालेत आणि अजुनही एकाच कॉलेजमध्ये,एकाच क्लासमध्ये शिकतात,त्यांची मैत्री अजुनही तशीच आहे,सदाबहार, अजुनही शर्विल आळशीचा आळशी आणि दिप्ती जशीच्या तशीच आहे,ही कायम कॉलेज टॉपर असायची आणि हा 35% जिँदाबाद,तेही तिच्याच पेपरमधलं उतरवलेलं,हा पण तो कॉलेजमधला एक नंबर डान्सर आहे,सर्व मुली तर याच्या लॉकींग पोपींग डान्सवर मरतात,दीप्तीलाही त्याचा डान्स आवडतो पण,हे तिला आवडत नाही।काही दिवसापुर्वी त्यांचा निकाल लागला त्यात दीप्तीला 96%आणि शर्विलला 48%मार्क्स मिळाले होते।दोघांनीही एकाच क्लासमध्ये अॅडमिशन घेतलंय।आणि आता या कथेची उपनायिका म्हणजेच या कथेची चंद्रमुखी म्हणजेच मानसी हीचि entry होते।मानसी एक मॉडर्न मुलगी आहे,जीन्स,स्कर्टस डोळ्यावर गॉगल,4व्हीलर गाडी,पर्स कायम पैशाने भरलेली,अशी ही मुलगी।तिचंही अॅडमिशन आज शर्विलच्या क्लासमध्ये झालंय.तिची Entry होताच,वर्गातली सर्व मुले तिच्याकडेच बघत असतात,शर्विलही।त्यामुळे सर्वमुली तिच्यावर जळतात.शर्विलला तर ती बघताक्षणीच आवडली होती।शर्विलने तिच्याशी मैत्री केली,एकमेकांसमवेत त्यांचा बराच वेळ जाउ लागला।त्यामुळे दीप्तीला ते आवडत नव्हतं,कारण नकळत ती त्याच्या प्रेमात पडली होती.एक दिवस कॉलेजच्या गॅदरींगमध्ये शर्विलचा डान्स पाहुन मानसी तर त्याच्या डान्सवर एकदम वेडीच झाली।इकडे शर्विल दीप्तीला म्हणाला माझं मानसीवर खुप प्रेम आहे,तिला प्रेमपत्र लिहावं म्हणतोय पण काय लिहावं हे कळतच नाहाये,मला मदत करशील?यावर काय reaction द्यावी हे दीप्तीला कळतंच नव्हतं।पण मैत्रीसाठी तिने निस्वार्थ भावनेने,थोडं दुखी मनाने ते प्रेमपत्र लिहीलं.दुसर्यादिवशी क्लासमध्ये ते पत्र तिने शर्विलच्या हातात हळुच कोंबले आणि मानसीला ते देण्याचा इशारा केला।तो खुप घाबरला होता,थरथरतच तिच्यासमोर जाऊन उभारला।तो पत्र द्यायच्या आतच मानसीने त्याच्या हातात एक चिठ्ठी दिली,व जायचा इशारा केला त्यानेही ते पत्र तिच्या हातात देऊन तिथुन काढता पाय घेतला।गंमत म्हणजे दोघांनीही एकमेकांना एकाचवेळी प्रेमपत्रे दिली होती।दोघांचं प्रेम जमलं,एकमेकांना बाहेर भेटणं सुरु झालं,याला निवांत कुठेतरी बागेत भेटणं आवडायचं,तर तिला डान्सक्लब,पार्ट्यांमध्ये रमणं आवडायचं।इकडे शर्विलविना दिप्तीची अवस्था खुपच वाईट झाली होती,आपला जिवाभावाचा मित्र अचानकच आपल्यापासुन खुपच दुर जात होता,तिला मनमोकळं करायला कोणीही नव्हतं,तिला कळुन चुकलं होतं की आपलं त्याच्यावर प्रेम बसलंय।पण ती स्वतःच्याच मनाला समजावत होती की आपल्या प्रेमाला त्याच्या प्रेमाची साथ मिळाली हेच माझ्यासाठी सुख आहे।इकडे शर्विलला कळलं कि मानसी क्लबमध्ये पार्ट्यांमध्ये ड्रिँक घेते यावरुन त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि तु माझ्या आयुष्यात पुन्हा मला भेटु नकोस असं म्हणुन तो घरी निघुन आला.त्याला पुन्हापुन्हा दीप्तीची आठवण येत होती तिला सगळं सांगावंस त्याला वाटत होतं,तिच्यावर आपण केलेल्या अन्यायाची जाणीव त्याला झाली.रात्र खुप झाली होती त्याच्या मोबाईलवर एका unknown नंबर वरुन फोन येत होता,थोडा डिस्टर्ब असल्यामुळे शर्विल पुन्हापुन्हा फोन कट करत होता.फोन येणं बंद झाल्यावर तो झोपीला.सकाळी सहा वाजता दिप्तीचा फोन त्याला आला त्याने तो लगेच उचलला.दीप्तीची आई बोलत होती,हॅलो शर्विल,काल दीप्तीचा अॅक्सीडंट झालाय रे तिला गांधी हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केलंय प्लीज तु लवकर ये...फोन लगेच कट झाला..तो लगबगीने गांधी हॉस्पीटल कडे निघाला,मनात वाईट विचार येत होते,काय झालं असेल माझ्या दीप्तीचं?माझी दीप्ती....मी असं का म्हणतोय?काय खरंच माझं तिच्यावर प्रेम जडलंय?जाऊदे....शर्विल हॉस्पीटलमध्ये पोहोचताच दीप्ती कॉटवर पडलेली असते,तिला सलाईन लावलेलं असतं,डोक्यावर पट्ठी बांधलेली असते,ती अजुन बेशुद्धावस्थेत असते,शर्विल तिच्याजवळ जाऊन बसतो,आणि त्याने तिचा,हात हातात घेताच तिला शुद्ध येते,ति त्याच्याकडेच बघत असते.तो तिची माफी मागतो आणि म्हणतो,मी भावनेच्या भरात भरकटलो होतो मला माफ कर,मी मानसीशी सर्व संबंध तोडलेत,मला फक्त त्या मैत्रिणीची गरज आहे जी माझी काळजी घेते,माझ्या मनातलं ओळखते मला तुझ्याशी लग्न करायचं आहे,तु माझ्याशी लग्न करशील?तिच्या डोळ्यातुन एक अश्रु तिच्या गालावरुन खाली घरंगळत आला.शेजारी असणारी एक लहान मुलगी शर्विलला म्हणाली,अॅक्सिडंट नंतर दीदीने बोलण्याची शक्ती गमावलीय.काल तिचा शेजारी असलेल्या स्टॉपजवळ अॅक्सिडंट झाला,ती बेशुद्धावस्थेत होती,जवळ पडलेल्या डायरीमध्ये तुमचा नंबर मिळाला,पण तुम्ही काही फोन उचलला नाही.त्यामुळे दीदीला दवाखान्यात आणण्यास खुपच उशीर झाला आणि त्यामुळेच तिची वाचा शक्ती गेली.हे ऐकताच त्याची मान शरमेने खाली गेली व तोही रडु लागला,दीप्तीने त्याच्या हनुवटीला धरुन तीच मान अलगद वर केली,आणि इशार्यानेच न रडण्याचा ईशारा केला.त्याने तिला एकदम छातीशी धरलं,आणि खुप रडला,तिने शेवटी लग्नाला होकार दिलाय,दोघांचं लग्न खुपच साध्या पद्धतीने पण छान झालं.....
आज ते खुपच सुखी आहेत आजपाच वर्षानंतर त्यांना एक मुलगी ही आहे.

Tuesday, 13 November 2012



बलिप्रतिपदा.......पाडवा...

लक्ष्मीपूजनानंतर येतो पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा. साडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहुर्त म्हणून हा महत्वाचा दिवस आहे. या दिवसापासून शुभकार्याची सुरवात करण्याची प्रथा आहे. विक्रम सवंत व महावीर सवंत यांचा नववर्षारंभ
यांच दिवसापासून होतो. बळीराजाचा हा स्मरणदिन आहे. बळी हा शेतकऱ्याचा राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता त्यामुळे तो देवांपेक्षाही मोठा झाला होता. लोक देवांच्या आधी बळी राजाचे नाव घेत त्यामुळे देव संतप्त झाले व त्यांनी विष्णूला साकडे घातले. विष्णूने वामनावतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेला ‘काय हवे ते माग’ बळी बोलला. फक्त त्रिपादभूमी हवी मला वामन उत्तरला. सर्व काय ते बळी उमजला. परंतू शब्द दिला तो त्याने पाळला ‘दिली भूमी’ म्हणून गरजला. वामनाने एका पावलात स्वर्ग, दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली. तिसरे पाउल कुठे ठेऊ असे विचारताच बळीने आपले मस्तक पुढे केले. विष्णूने त्याला पाताळात गाडले. पण एक वर दिला. तो वर समाजाच्या हिताचा होता. जो कोणी बळीप्रतिप्रदेला दीपदान करेल त्याला यमयातना होणार नाहीत. त्याच्या घरी लक्ष्मीचा वास सदा राहील. लक्ष्मीला आपल्या पतीचे कौतुक वाटले म्हणून तीने पतीचे विष्णूचे ओक्षण केले त्याला ओवाळले. ओवाळणी म्हणून विष्णूने हिरे माणके इत्यादी अलंकार घातले. यामुळेच आजही बलिप्रतिपदेला पत्नी पतीला ओवाळतात व पती पत्नीला भेटवस्तू देतात.
श्रीकृष्णाने आजच्या दिवशीच गोवर्धन पूजेची सुरवात केली. निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची हि सुरवात होती त्यानिमित्त पाडव्याला कृष्ण, गोपिका, गोवर्धन पर्वताच्या देखाव्याची पुजा होई. या प्रथेपासून निघालेले किल्ले म्हणजे गड, सैनिक, शिवाजी महाराज यांचे मोठ्या कल्पकतेने देखावे उभारण्याची प्रथा महराष्ट्रात रूढ झाली. यातूनच मुलांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला वाव मिळू लागला.

Thursday, 30 August 2012

एक विलक्षण प्रेमकथा


three bst wishesh(एक विलक्षण प्रेमकथा)
अदिती आणि निरव हे गेली दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत.दिवसभर workमध्ये असणारा निरव दररोज संध्याकाळी 9 वाजता तिला फोन करायचा.बोलताना त्याचं सुरवातीचं एक वाक्य कायमचं ठरलेलं असायचं.ते म्हणजे hey dear i lov u.हे वाक्य ऐकल्याशिवाय अदितीला कधी झोपच यायची नाही.एक दिवसही तिचा असा गेलेला नसतो की तिचं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं नाही.एक दिवस सत्याचा सामना करायचं ठरवुन
...

नीरव तिला घरी घेऊन गेला आणि त्यांच्या रिलेशनशिपविषयी सगळं सांगितलं.त्याच्या आई वडीलांनी मोठ्या मनाने त्यांच्या नात्याला परवानगी दिली.त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.आणि त्यांना सल्ला दिला की एकदा आपल्या कुलदेवतेला जाऊन या.त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकुन ते कुलदेवतेच्या दर्शनाला गेले.दोघांनी देवाला नमस्कार करुन आपली इच्छा देवाजवळ व्यक्त केली.अदितीने मनोमनी देवाजवळ मागणं मागितलं की,देवा निरवच्या कोणत्याही bst 3 wishesh तु पुर्ण कर,एवढंच माझं मागणं आहे तुझ्याकडे..निरवने मागणं मागितलं कि,देवा ही जे काही तुझ्याकडे मागतेय ते ते तु तिला दे.देवाजवळ आपल्या इच्छा व्यक्त करुन ते तिथुन निघतात.
यानंतर अदितीचं त्यांच्या घरी येणंजाणं म्हणजे कायमचंच होऊन जातं.पण तरीही त्यांच मोबाईलवरचं बोलणं काही थांबलं नव्हतं.
एक दिवस अदिती निरवला पुर्वकल्पना देऊन दोन दिवसांच्या summer campला जाते,एकडे निरवला त्याच्या working site वर जोराचा अपघात होतो.त्यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागतो.त्याच्या आईवडीलांना याचा जोराचा धक्का बसतो पण ते हृदयावर दगड ठेवुन ठरवतात की यातलं काहीही अदितीला कळु द्यायचं नाही,कारण ती हे अजिबात सहन करु शकणार नाही.दोन दिवसांच्या समर कँप नंतर जेव्हा ती त्याच्या घरी येते,तेव्हा त्याचे आईवडील त्याच्याविषयी सांगणं टाळु लागतात.पण हार चढवलेला निरवचा फोटो बघुन,ती हिसक्याने तो हार खेचते.आणि त्यांना म्हणते,अंकल ही कसली चेष्टा आहे,त्याच्या फोटोवर हार का चढवला होता तुम्ही?शेवटी लपवता येणं कठीण वाटु लागल्यावर ते तिला सर्व हकीकत सांगुन टाकतात.पण तिला ही गोष्ट न पटणारी असते.ती म्हणते,हे कसं शक्य आहे?गेले दोन दिवस आम्ही contact मध्ये आहोत,त्याने मला कालच तर call केला होता.ती तिच्या cellphoneमधील recived calls मधील निरवचा नंबर दाखवते.पण त्यावर आता calling करुन पाहताना तो नंबर बिझी दाखवत असतो.पण तरीही ती त्यांना पटवुन देण्यासाठी सांगते कि निरव every evening 9.pmला मला कॉल करतो.आजही तो कॉल नक्कीच करेल.
उत्सुकतेपोटी ते थोडावेळ तिच्यावर विश्वास ठेवतात.
ते सायंकाळचे आठ वाजल्यापासुनच तिचा cellphone टेबलवर ठेवुन,तीन बाजुला तिघे जण बसलेले असतात.तिघांच्याही नजरा cellphone वर खिळलेल्या असतात.तिघांच्याही मनात एक चलबिचल आणि भीती असते.घड्याळात 9चा ठोका पडतो.आणि त्या मोबाईलची रिंग वाजते.थरथरत्या हताने अदिती तो फोन लाऊडस्पीकरवर ON करते,आणि त्यातुन आवाज येतो,hey i love u dear!हे ऐकुन त्याच्या आई वडीलांना हा विश्वास पटतो की हा निरव आहे तो म्हणतो,मला माहीतीये मम्मी पप्पा तुम्हीही मला ऐकताय,अदिती,मम्मी पप्पा जे काही म्हणतायेत की मी मेलोय ते अगदी खरंय..
अदितीःमग तु सध्या आमच्याशी बोलत कसा आहेस?कसली मस्करी करतोयस?
निरवःही सुद्धा तुझीच कृपा आहे.तुने देवाकडे मागितलेले माझे 3 wishash पुर्ण करण्याचे मागणे,यातली ही माझी दुसरी wish होती कि मी मृत्युनंतरही काही दिवस तुझ्याशी बोलु शकेन.आणि तिच इच्छा सध्या देव माझी पुर्ण करतोय.
ते जाऊदे पण एक लक्षात ठेव तुला आता तुझं आयुष्य सावरायचंय आणि योग्य तो वर बघुन तुला लग्न करायचंय माझ्या आठवणीत तु तुझं आयुष्य बरबाद करु नयेस असं मला वाटतं.
अश्रुंनी भिजलेल्या चेहर्याने ती म्हणते,ठीकेय मी करीन लग्न!पण तुझी पहीली wish काय होती.निरवःअगं ती तर मी मंदिरातच मागितली होती,तु जे मागतीयेस ते तुला मिळो,आणि देवाने तुला दिलं....सॉरी पण मला जावं लागेल उद्यापासुन मी तुला कॉल करु शकणार नाही.
आई वडीलांना तो हिचं लग्न करुन देण्यास सांगतो आणि लगेच फोन कट होतो....
अदितीच्या मनातला एक प्रश्न तर अनुत्तरीतच राहतो की निरवची तिसरी wish काय होती.
.
.
.
.
.
आज अदितीचं लग्न होऊन सहा वर्षे झाली.ती एका श्रीमंत घरात नांदतीये.संध्याकाळचे नऊ वाजतायेत.तिच्या मोबाईलची पुन्हा एकदा रिंग वाजते,ती फोन उचलते हेलो कोन? समोरुन आवाज येतो,hey i love u dear!निरव हा तुच आहेस,कुठे आहेस तु?कुठे होतास तु?
तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नाही.तिच्या cellphone वर पडलेला नंबर ती बघते.तिच्याच बंगल्यातील hallमधला landlineचा नंबर असतो तो...
.
bedroomमधुन बाहेर येऊन ती hallमधल्या त्या phoneकडे ती बघते...फोनवर तिचा साडेतीन वर्षाचा मुलगा असतो जो तिच्याकडे बघुन हसत असतो.आत्ता तिला कळतं की निरवने देवाकडे त्याची तिसरी wish कोणती मागितली होती ते।
सहा वर्षे निरवच्या आठवणीँनी दबल्या गेलेल्या तिच्या अश्रुंना आज तिने तीच्या मुलाच्या रुपातील निरवला मिठीत घेऊन मोकळीक दिली,ज्यामुळे तिचं मन खुपच हलकं झालं..
मित्रांनो काहीजणांच प्रेम हे अद्वितीय असतं.जे वास्तविकतेच्या खुपच
पलीकडचं असतं.पण खुपवेळा अशा प्रेमाला त्याचं योग्य स्थान मिळत नाही,आणि म्हणुन त्याची योग्य किंमत कळत नाही.अन जेव्हा त्याची योग्य किंमत आपल्याला कळते.तेव्हा त्याची किंमत ठेवण्याइतकी,आपल्याला किँमत राहीलेली नसते.....!!!!

Thursday, 23 August 2012

ती दोघं..................


हृदयस्पर्शी कथा - ती दोघं...
त्यांच बिनसलच होत गेले
काही दिवस
तो काहीही बोलला तरी ती त्याचा वेगळा अर्थ
काढायची..
तो बोलला तरी भांडण, गप्प राहिला तरी भांडण ते भांडण मिटवायच म्हणून तो तिला सिनेमाला घेऊन गेला
पण ती गप्पच होती,शांत होती,
काहीच बोलायला तयार
नव्हती. तिचा चेहराच सांगत
होता कि,तिचा निर्णय झालेला होता..
ते घरी परतत होते. तो गाडी चालवत होता.
शेवटी न राहवून ती त्याला म्हणालीच..
"मला वाटत..हे अस रेटण्यात
आणि एकमेकांना छळण्यात काहीच अर्थ नाही..मला वाटत
आपण
आपापल्यां वेगळ्या वाटांनी जाव..मी तरी तसा निर्णय घेतलाय..यापुढे आपण न भेटनच
योग्य...!
ते ऐकून त्याला धक्काच बसला.. त्यान गाडी स्लो करत
रस्त्याच्या एका बाजूला नेऊन
थांबवली त्याचे डोळे पाण्याने डबडबले ,
त्यान खिशात चाचपून पाहिलं.एक कागदाच चीटोर
तिच्या हातात देत डोळे पुसले.. आणि ती चिट्ठी उघडून
वाचणार तेवढ्यात समोरून एक भरधाव गाडी आली..
थेट यांच्या गाडीवरच येऊन
आदळली..
त्या अपघातात 'तो' जागीच ठार झाला..आणि तिला मात्र किरकोळ जखम झाली... हातात ते चीटोर तसंच होत..
ते एकदम उघडून तीन पाहिलं तर
त्यावर फक्त एकच वाक्य
लिहिलेलं होत ..
'तुझ्याशिवाय जगण शक्य नाही,
तू सोडून गेलीस तर त्याक्षणी मी मरेन...! ...तो खरच त्याक्षणी मेला होता..
प्रेम असंही असत...जे मागू ते देऊन
मोकळ होत..
मागायचं काय, मरण कि जगण... हे प्रेम करणाऱ्यांनाच ठरवावं
लागत....!

Tuesday, 21 August 2012


प्रेम मनातच असणे पुरेसे नसते...!!

जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस...मी म्हणलो...

" माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे " तू विचारलस "ते काय असत ..?"

... ... आठवतंय..? मी २५ व्या वर्षी तुला म्हणालो "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..."

तू म्हणालीस..."मला एकटी तर नाही ना सोडणार..?"आणि अलगद माज्या मिठीत विरघळलीस...!!

३५ व्या वर्षी ...जेव्हा एकदा मी रात्री उशिरा घरी आलो..तू आणि मी सोबतच डिनर घेतलं...

मी तुला जवळ ओढून म्हणालो..."I love you...!!" तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालीस..
" I know that.." पण सकाळी मुलांचा पेपर आहे...उशीर नको व्हायला आता जास्त...आता झोपू यात लवकर...!!

माझ्या ५० व्या वाढदिवशी सगळे पार्टी मध्ये गुंग असताना,मी हळूच म्हणालो..."I love you very much "

तू हसत हसत म्हणालीस ..."माहित आहे आगी २० वर्ष आधी पासून माहित आहे.." आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस...!!

तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो...

आपल्या मुलाच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो...
" छान दिसतेस...आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो...तू मला खूप आवडतेस...आणि माझ तुझ्य्वर खूप प्रेम आहे..."
तू मला बाजूला सारत म्हणालीस..."ते ठीक आहे हो...!! पण सगळ व्येवास्थित अरेंज झालाय ना..?"

मी आत ७५ वर्षाचा..,आराम खुर्चीवर बसून....आपला जुना अल्बम बघत होतो...,

तू स्वेटर वीणत होतीस..नातवासाठी..मी म्हणालो "माझ तुझ्यावर अजून हि तितकाच प्रेम आहे ..!"
आणि तू म्हणालीस...."माझ पण तुझ्यावर आजही तितकच प्रेम आहे जितक तुला होकार देताना होत.."

माझ्या हातातील तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला...

डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते ...कारण आज इतक्या वर्षांनी ...तू स्वतः म्हणाली होती...तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून...!!

{फक्त प्रेम पुरेसे नसते...कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असत...त्याला ओढ असते ती फक्त ओढ असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे सांगतात ..."हो माझ पण तितकाच प्रेम आहे तुझ्य्वर ..जितका तुझ माझ्यावर आहे....म्हणून जेव्हा पण संधी मिळेल सांगायला चुकू नका....तुम्ही सुद्धा प्रेम करतात ते..

Saturday, 18 August 2012



Photo: आपल्याला असा वाटत की आपण सर्वा पेक्ष्या सुंदर नाही....पण काही लोक कुरुपच जन्माला येतात...
आपल्याला वाटत की राग फक्ता आपल्यालाच येतो....काही वेळा अनेक लोक चुकी नसताना पण शांत राहतात....
आपल्याला सोबत महणून बॉय फ्रेंड किवा गर्ल फ्रेंड हवी असते...काही लोकणा स्वताची फॅमिली सुद्धा नसते..
आपल्याला भूक लागली की आपण नेहमी तक्रार करतो...काही मुला रोज उपासमारीत जगतात...
आपल्याला नेहमी नवीन कपडे हवे असतात....काही व्यक्तीना उब मिळण्यासाठी सुद्धा कपडे मिळत नाही...
कधी कधी दुख झाल्यावर आपल्याला वाटत मारुन जाव....पण काही लोक शेवटचे क्षण मोजताना सुद्धा जगण्यासाठी धडपड करत असतात...
आपल्याला आणखी पैसा हवा असतो....पण काही लोक गरीबीत सुद्धा सुखाने जगत असतात...
महणून तुम्हाला जे हवा आहे त्याचा मागे पळून वेळ वाया घलवू नका तक्रार करू नका...जे आहे त्यात समाधानी राहा..कारण
तुमच्या पेक्ष्या आणखी किती तरी अशी लोक आहेत ज्याना तुमच्या पेक्ष्या जास्त त्या वस्तूची गरज आहे....
तुम्हाला त्या वस्तू सहज मिळूनही जाएल कदाचित....
पण त्याना त्या न मिळता देखील ते सुखात आहेत....
कदाचित यालाच जगण म्हणतात....

शब्द वेचताना....

पटला तर नक्की like आणि  share करा...

आपल्याला असा वाटत की आपण सर्वा पेक्ष्या सुंदर नाही....पण काही लोक कुरुपच जन्माला येतात...
आपल्याला वाटत की राग फक्ता आपल्यालाच येतो....काही वेळा अनेक लोक चुकी नसताना पण शांत राहतात....
आपल्याला सोबत महणून बॉय फ्रेंड किवा गर्ल फ्रेंड हवी असत
े...काही लोकणा स्वताची फॅमिली सुद्धा नसते..
आपल्याला भूक लागली की आपण नेहमी तक्रार करतो...काही मुला रोज उपासमारीत जगतात...
आपल्याला नेहमी नवीन कपडे हवे असतात....काही व्यक्तीना उब मिळण्यासाठी सुद्धा कपडे मिळत नाही...
कधी कधी दुख झाल्यावर आपल्याला वाटत मारुन जाव....पण काही लोक शेवटचे क्षण मोजताना सुद्धा जगण्यासाठी धडपड करत असतात...
आपल्याला आणखी पैसा हवा असतो....पण काही लोक गरीबीत सुद्धा सुखाने जगत असतात...
महणून तुम्हाला जे हवा आहे त्याचा मागे पळून वेळ वाया घलवू नका तक्रार करू नका...जे आहे त्यात समाधानी राहा..कारण
तुमच्या पेक्ष्या आणखी किती तरी अशी लोक आहेत ज्याना तुमच्या पेक्ष्या जास्त त्या वस्तूची गरज आहे....
तुम्हाला त्या वस्तू सहज मिळूनही जाएल कदाचित....
पण त्याना त्या न मिळता देखील ते सुखात आहेत....
कदाचित यालाच जगण म्हणतात....


एक सुंदर love story......





एक सुंदर love story......

आज तिचा वाढदिवस होता...म्हणटल काहीतरी वेगळा करू..म्हणून त्याला सांगितला..चल दूर एकंतात कुठेतरी जाऊ
तो मग तिला समुद्रकिनारी घेऊन गेला
शांत वारा....सळसळणार्‍या लाटा...आणि सोबत त्याच्या मिठीची
खूप सुखावले होती ती ते
व्हा...
मग अचानक तिला आठवण झाली..त्याने तिला काही भेटवास्तूच दिली नव्हती...मग ती रागच्या सुरताच बोलली त्याला...
"आज काय फक्त मिठीतच भागवणार का???"
तो हसतच म्हणाला....नाही ग...मग तुला जे मागायचा ते....
ती क्षणचाही विचार न करता बोलली..."मला काही नको रे...पण तू नेहमी आनंदात राहा ..हसत राहा...काहीही झला तरी...
तो उदास नजरेने बोलला"का अस म्हनतेस ग????"
ती"कारण आज सकाळपासून तू उदास आहेस..महणून मला तुला नेहमी हसत पाहायचा आहे...
तो जरा बावरलाच ..पण नंतर बोललच...
"कारण मी माज्या आई वडिलांना त्रास देऊन त्याच्या मानविरूढा लग्न करून त्याना दुख देऊन मी सुखी राहू शकत नाही...
त्याच्या सुखताच माझा सुख आहे"
तिला बहुतेक समजला होता..पण डोळ्याटले अश्रू तिने तिथेच थांबवले..मग हसतच म्हणाली...
"ठीक आहे ना..बघ मला तुला सुखात पाहायचा आहे..आणि तुला तुझ्या आई वडिलाना...त्यात उदास होण्यासारख काय आहे "
"आई वडिलाना त्रास देऊन आपण कधीच सुखात राहू शकनार नाही"आणि
"प्रश्न सुखचाच आहे ना!!!ते तर तुज्याच सुखात आहे...तू जा....माझी काळजी नको करू....पण स्वताची आणि आई वडिलांची काळजी घे..."
आणि ती गेली...कदाचित कधीच परत न येण्यासाठी....वाढदिवासचे ते सुंदर गिफ्ट नसेलही पण त्याच्यासोबतचे क्षणच तिला पुरेसे होते आयुष्या जगण्यासाठी..
कारण प्रेम हे असच असता मित्राणो...कधी कधी स्वताचा स्वार्थ सोडून त्यागातच सुख मानव लागत्.......

एक छोटीशी प्रेम कथा.................


एक मुलगा आणि मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करायचे.मुलगा मुलगी दोघेही मध्यमवर्गीय घरातले होते.एक दिवस मुलगी त्या मुलग्याची प्रेमाची परीक्षा घ्यायची ठरवते.
तो जेव्हा तिच्या घरी येतो, तेव्हा ति बेडवर झोपलेली असते आणि त्याच्या हातात दिला जातो एक कागद...तो कागद दुसरा तिसरा काही नसुन तिला डॉक्टरांनी दिलेलं एक सर्टिफिकेट असतं ज्यात लिहीलेलं असतं की तिला कॅन्सर झालाय तिच्याजवळ फक्त 16 तासाचा वेळ शिल्लक आहे.त
ी त्याच्या चेहर्यावरचे भाव बघण्यास खुप आतुर झालेली असते,पण तो काहीही न बोलता तसाच निघुन जातो.तिला वाटतं की बहुतेक त्याला कळलंय की हे सर्टिफिकेट खोटं आहे.
तो चार तासातच परत येतो आणि तिला म्हणतो,चल आणि पुढचे बारा तास मलाकोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारायचं नाही मी सांगेल तेच करायचं.असं सांगुन तो तिला घेऊन जातो,सकाळच्या नयनरम्य वातावरणात ती हिरवीगार झाडी आणि त्यावर पडलेलं दव,बाईकवर असतानाचा तो थंडगार झोंबणारा वारा याच्या आनंदाने ती खुपच शहारुन गेलेली असते.दोन्ही हात लांब करुन तो वारा कवेत घेण्याचा ती प्रयत्न करत असते.तिचा हाच आनंद त्याला हवा असतो.त्यानंतर तो तिला प्राणीसंग्रहालय ात घेऊन जातो तिने आधी न पाहीलेले कितीतरी प्राणी तिथे पाहीले आणि जे तिला खुप आवडले.थोड्या वेळानंतर तो तिला esselworld मध्ये घेउन गेला.water games,उंचच उंच पाळणे,जलतरण तलावअशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती इतकी रमुन गेली की या जगाचं तिला भानंच नाही राहीलं,तिच्या चेहर्यावरचा ओसंडुन वाहणारा आनंद त्याला खुपच मोहुन जातो.
संध्याकाळचे सहा सव्वासहा वाजता तो तिला समुद्रकिनारी घेऊन जातो,तिने कधीही आधी न पाहीलेला सनसेट पॉईँट तो तिला दाखवतो. ते पाहुन ती हळुच त्याच्या मिठीत विसावते...तिथे दोघेही एकत्र फोटो काढुन घेतात ते फोटो तो तिची शेवटची आठवण म्हणुन स्वतःजवळ ठेवुन देतो.काही वेळानंतर ते शॉपिंगला जातात तिला जे जे आवडतं ते ते सगळं ते दोघे खरेदी करतात तो स्वतःसाठी मात्र काहीही खरेदीकरत नाही.रात्र झाली नंतर ते तिच्या घरी जातात.दिवसभरच्य ा मिळालेल्या आनंदाच्या वातावरणातुन ती थोडी बाहेर येते मग ती विचारात पडते की याने इतके पैसे आणले कुठुन?हाच प्रश्न ती त्याला विचारते.तो म्हणतो,तुझ्यासा ठी मी माझं घर विकलं.हे ऐकल्यावर तिचा खुप संताप होतो.आणि ती त्याला म्हणते,अरे पण का विकलंस तु घर?
तोःतुझ्यासाठी।त ुझ्याकडे आयुष्याती फक्त सोळा तास शिल्लक आहेत,जेव्हा हे मला कळलं तेव्हा खरंतर रडावसं वाटत होतं,पण तुझे उरलेले आयुष्य तु फक्त आणि फक्त आनंदाने जगावंस.असं मला वाटत होतं.आणि तो आनंद जर मला तुला द्यायचा झाला तर मला माझं घर विकावं लागेल याची जाणीव मला झाली. म्हणुनच मी माझं घर विकलं.आता हेच बघ ना आज दिवसभरात तुला दुसरी कशाची आठवण आली का?नाही ना हेच तर हवं होतं मला...हे ऐकताच तिच्या हातातुन शॉपिंग केलेल्या बॅग्झ खाली पडल्या आणि तिने त्याला मिठीत घेतलं.
ती म्हणाली,मला माफ कर.. प्लीज मला माफ कर मी तुझी दोषी आहे तु मला सांगशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे.
तोःकशाबद्दल?
तीःमी तुझ्याशी खोट्याने वागले.मला कॅँसर वगैर काही झालेला नाही मी तर फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी खोट बोलले,खोट्याने वागले मला माफ कर...
ती खरंच आपल्याला सोडुन जाणार नाही या आनंदाने त्याचे डोळे पाण्याने भरुन आले,घर गमावल्याच्या दुःखापेक्षा प्रेयसीला पुन्हा एकदा मिळवल्याचा आनंद त्याला जास्त होता आणि त्याने तिला माफ केलं.त्यांची मिठी आणखीनच गडद झाली.तो तिला म्हणतो,तु खरंच मला सोडुन जाणार नाहीस ना?नाही रे राजा मी तुला कधीही सोडुन जाणार नाही.
खरंच हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाँत आनंदाचा दिवस आहे.संपुर्ण आयुष्यभर जितकं रडलोनसेन तितकं मी तुला कँसर झालाय हीबातमी ऐकल्यापासुन रडलोय.....i m sosorry मी तुझ्याशी पुन्हा असं खोटं बोलणार रे.....its ok पण पुन्हा असली चेष्टा करु नकोस,नाहीतर तुझ्या आधी मीच मृत्युला सामोरं जाईन..तो असं बोलताच तिने त्याच्या तोँडावर हात धरला आणि ते पुन्हा एकमेकांच्या मिठीत विसावले....
मित्रांनो असं म्हणतात की प्रेम जितक्या परीक्षेत पास होत जातं तितका त्यातला गढुळपणा कमी कमी होत जातो आणि त्याचं पावित्र्य वाढत जातं.ही गोष्ट मलाही मान्य आहे पण त्या परीक्षा किती आणि कोणत्या प्रकारच्या असाव्यात यालाही काहि मर्यादा आहेत की नाही?हीच गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही डोळसपणे निवडलेल्या साथीदारावर डोळे झाकुन विश्वास ठेवा. म्हणजे बघा तोच साथीदार तुमची किती सुरेख साथ निभावतो ते......!!!

सुंदर अर्थपूर्ण प्रेमळ कथा .......


♥  नक्की वाचा आणि आई वडिलांवर प्रेम करत रहा ♥ 


"सांगली जवळील खेड्या मध्ये एक वृद्ध माणूस राहत होता, त्याची इच्छा होती कि घरासमोरील अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण हे खूप कष्टाचे काम आहे, ........ आणि दुर्दैवाने त्याचा मुलगा तुरुंगात होता, त्यामुळे हे कसे होणार, असे म्हणून तो आपल्या मुलाला एक पत्र लिहितो,

"राजू,
तुझ्या स्वर्गवासी आईची इच्छा होती कि आपल्या अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण त्यासाठी सारे आंगण खोदावे लागणार, मी तर थकलो आहे
, तू इथे असतास तर मदत झाली असती"

दोनच दिवसात त्या वृद्ध माणसाला त्याच्या मुलाकडून पत्र आले,

" बाबा, कृपया करून तुम्ही आपले आंगण खोदू नका, तिथे मी पिस्तुल व कार्तुस लपविली आहेत"

दुसर्या दिवशी सकाळी पूर्ण मुंबई पोलीस सांगली मध्ये दाखल झाली, त्यांनी पूर्ण आंगण खोदले पण त्यांना काहीच मिळाले नाही.

लगेच मुलाचे पत्र आले, " बाबा आंगण खोदून झाले, आता तुम्ही बी पेरा व बटाट्याची मोठी बाग आपल्या अंगणात फुलवा" ............ इथे बसून मी तुमच्यासाठी सर्वोत्तम म्हणजे हेच करू शकतो.

तात्पर्य :- मनापासून काहीही करायचे ठरविले तर ते नक्की होते, मग तुम्ही दुसर्या गावी असूद्यात किंवा परदेशात असूद्यात.

एक प्रेमकथा !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

एक प्रेमकथाः
रिया कॉलेजला जात
असताना तिला कोणाचीतरी हाक
ऐकु येते,ती जागीचथांबली.एक
मुलगा धापा टाकत
तिच्यापर्यँत आला..hi माझं नाव

शिरीष,तुला इथुन
रोज जाताना पाहतो.तुला love at first sight
वर
विश्वास आहे?...काय?(रिय ा खुपच
दचकलेल्या आवाजात ओरडते).ओरडु
नको,मला lovd
at first sight ज्याला म्हणतात ना तेच झालंय
तुझ्याशी.
रियाःमग मी काय करु? तोःfrndhp
रियाःआणि नाही केली तर.,
शिरीषःतु तुझ्या आयुष्यातील सुवर्ण
क्षणांना मुकशील।
रियाःअसं!ठीक आहे मी करीन
तुझ्याशी मैत्री,बघुया तु
काय करतोयस ते!पण मला जर तुझ्याशी प्रेम
झालं
नाहीतर?
शिरीषःफक्त सातच दिवसात तुला माझ्यावर
प्रेम
होईल।
रियाःइतका over confidance,पडशी
लतोँडावर
शिरीषःबघ पैज लावुन सांगतोय,फक्तदिव
सातला एक
तासभर माझ्याबरोबर spend
करायचा.तुला आठवडाभरातच
माझ्याशी नक्की प्रेम
होईल.नाही झालं तर तुझी प्रत्येक
शिक्षा मला मान्य
असेल.
रियाःinterestin g मान्य एकदममान्य.ठीकेय
ur
tme will start from tomarrow..by
पहील्या दिवशी ते भेटले,तो तिच्यासाठी एक
गुलाब
घेऊन आला होता.ते तिला आवडलं.तिला ताज
होटेल
दाखविण्यासाठी घेऊन गेला.मस्त वातावरणात
आणि एकमेकांच्या साथीत,आणि महत्त्वाचं
म्हणजे
तो स्पष्ट व बोलका असल्याने तोतास
कसा निघुनगेला कळतंच नाही.अशा तर्हेने
तो रोज
मुंबईतल्या वेगवेगळ्या ठीकाणी तिला फिरवायला नेऊ
लागला,बघितलेलेच स्पॉट/ ठीकाणे
त्याच्यासोबत
बघण्यातलं वेगळेपणतिला स्पष्ट जाणवु
लागलं.त्याच्यातला बोलकेपणा,त्याची
सहजवृत्ती,त्याच ्या स्वभावातलागोडवा
तिला आवडु
लागला.त्याच्यास ोबत असलं की ती सगळं
विसरुन
जायची.ती फक्त आणि फक्त
आनंदी दिसायची.वेगवेगळ
ी ठीकाणे पाहण्यात सहा दिवस कसे गेले
तिला कळलंच
नाही.तिला खरंच त्याच्यावर प्रेम झालं
होतं.तिलात्याची सवयच
लागली होती.तो उद्यानंतर
कदाचित मला भेटणार नाही हिची तिला हुरहुर
लागुन
राहीली होती.तो फक्त माझा व्हावा असं
तिला वाटु
लागतं.त्याच्याव िषयी असलेलं प्रेम व्यक्त करुन
टाकावं असं तिला राहुन राहुन वाटत होतं.पण
त्या पैजेचा विचार करुन ती स्वतःला आवर
घालायची.आज सातवा दिवस
तो तिला संध्याकाळी समुद्रकिनारी घेऊन
गेला.आणि त्याने तिला डोळे
झाकायला सांगितले.तिच्या घड्याळाचा हात
आपल्या हातात घेऊन त्याघड्याळातबघत
ो.बरोबर
6.15वाजल्यावर तिला डोळे
उघडायला सांगतो.तिने
डोळे उघडताच,मावळतिकड े
झुकलेल्या सुर्याची एका आकारात
पडलेली किरणे
आणि त्याचे पाण्यात पडलेलेप्रतिबिँब पाहुन
तिचं मन
प्रफुल्लित झालं.तो देखावा तिने
तिच्या डोळ्यात भरुन
घेतला.याबद्दल शिरीषचे ती मनापासुन आभार
मानते.शिरीष दुःखीमनाने म्हणतो,आज
सातवा म्हणजे
शेवटचा दिवस,मला माफ कर,मला खरंच तु
आवडतेस.मला तुझ्यासोबत वेळ
घालवायचा होता,तुला जाणुन घ्यायचं
होतं.म्हणुनच
मी तुझ्याकडुन सात दिवसाचा वेळ मागुन
घेतला.आणि या सात दिवसात
पुन्हा एकदा मी तुझ्या प्रेमात पडलो.पण
मी याबद्दल
confident नव्हतो कीतुला माझ्या प्रेमात
पाडु शकेन
की नाही ते.या सात दिवसात माझ्याकडुन
तुला काही चुकीची वागणुक मिळाली असेल तर
i
msorry असं म्हणुन तो निघुन
जातो.तीत्याच्या कडे
बघतच राहीली.
रात्री त्याचं हेच बोलणं तिच्यामनात घोळत
होतं.रात्रीचे 11.55झालेले असतात.तिने
ठरवलेलं
असतं की,आजचा दिवस संपल्यावरच म्हणजे
बारा वाजुन गेल्यावरच त्याला फोनवर i love
u
म्हणायचं.हातातल ्या घड्याळाकडे
ती उशीरपासुन बघत
असते..बरोबर12.0 5झाल्यावर ती त्याला फोन
लावते.शिरीष आत्ता तुपैज हारलास.कारण
सात दिवस
आत्तापुर्णझालेत .खरंच मी या दिवसांत
तुझ्या प्रेमात
पडले पणतरीसुद्धा संयम ठेवला आणि ते
कधी मी बोलले नाही.आता तु सुद्धातुझी हार
मान्य कर.
शिरीषःहो बाई हारलो मी आत्तातरीlove u
म्हण
रियाःआता ठीक
आहे,आत्ता बोलायला काहीच हरकत
नाही.I LOVE U SHIRISH,I REALLY
LOVEYOU SO MUCH..
शिरीषःreally u love mi?
रियाःyah
शिरीषःठीकेय मग मी सांगतो तसं कर ok...तु
तुझ्या bedroomमधुन hallमध्ये जा.
रियाःok गेले....पुढे काय?
शिरीषःhallमधल्य ा घड्याळात किती वाजलेत
बघ?
रियाः11.50.अरे पण हे कसं शक्य आहे?
माझ्या घड्याळ्यात तर 12.05झालेत.
शिरीषःआपण
जेव्हा समुद्रकिनारी गेलो होतो,तिथे
मी तुला डोळे झाकायला सांगुन तुझा हात
हाती घेतला होता ना,तेव्हाचमी तुझं घड्याळ
पंधरा मिनिटे पुढे केलं
होतं.कारणअशी परिस्थीती येणार
हेमलामाहीती होतं.आता बोल झालं
ना बरोबर,सात
दिवसाच्या आत तुला माझ्यावर प्रेम?
रियाःsmart...vr y smart उद्याभेट
तुला सांगते.
शिरीषःsorry bt everything fair in
love&war....!!

Tuesday, 7 August 2012

"जिथे आई तोच स्वर्ग..."


Photo: सातारा ह्या गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे शामराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले,
तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशीमुलगी रडत असल्याचे दिसले,,
त्यावर त्यांनी विचारले,
शामराव :- तू का रडत आहेस बाळ..???
मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुलघ्यायचे आहे,,
फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत...
शामराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो....
(फुल घेऊन दिल्यावर)
चल मी तुला घरी सोडतो...
मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा..
(त्यावर ती गाडीत बसते..)
शामराव :- कुठे सोडू तुला..??
मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाथाला स्वर्ग आहे तिथे...
शामराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे...!!!
मुलगी :- काका,"जिथे आई तोच स्वर्ग..."
नव्हे का...???
शामरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला...
पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी शामराव स्वताहा सातार्याला आपल्या आईला भेटावयास गेले...!!!
तात्पर्य :-" हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जिने स्पर्श केला ती भावनाच तात्पर्य होय...

माझ बाळ....................





माझ बाळ
माझ बाळ खूप शहाणं
त्याचं प्रेम मम्मीवर सार
त्याला लागल थोडं तरी
मम्मीला होणारया वेदना त्याला कले.
मग ते लपवायचे बहाणे
लहान असताना बोलयचा
मम्मी तू नको जावूस कामावर,
मला फक्त तू हवीस मला नको खेळी आणि खावू,
खरचं हे ऐकताना मन भरून यायचं आणि त्यावेळी वाटायचा सर्व सोडून माझा बाळा जवळ असाव
पण नाही ना करता येत अस मग त्याला समजवायचा कि तुझाच साठी करते सारे असं म्हटल्यावर शाहाण माझ बाळ लगेच ऐकत.
सगळेच असे म्हंतात कि जन्मो जन्मी मला माझी आईचं असावी
पण मी बोलते कि जन्मो जन्मी माझ हे शाहाण बाळ असाव.

Photo: बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग

आई आई ये ना जरा… बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग !
बाबा असा बघायला दिसे ना गं बरा
आळीमिळी गुपचिळी… पडलेला वारा !
हले नाही… डुले नाही… जणू काही फोटो
आवाजही त्याला माझा लांबूनच येतो !
उभा तर उभा आणि बसे तर बसे
हसे तेव्हा अजूनच कसनुसा दिसे !
विचारले- “बाबा, काय पाहतोस सांग?!’
बघे म्हणे- “आभाळाचा लागतो का थांग-
काय सांगू तुला कळणार नाही
आभाळ न आले हाती; जमीनही नाही !
चहूकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा
हाती नाही काम; गाडा चालायचा कसा !
घोडा झाला तरी काही शिकला ना बाबा
विकायच्या जगामध्ये टिकला ना बाबा !”
आणि मग उठुनिया कुशीमध्ये घेतो
ओले डोळे पुसुनिया ओली पापी घेतो…
घाबरतो जीव; बाबा असे काय बोले?
चित्रातले रंग त्याच्या जसे ओले ओले…
चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कुठे गेला ?
हसणारा बाबा कुणी पळवून नेला?….
आई आई ये ना जरा बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग….!!


मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी, तुझी आस्व पुसण्यासाठी
तू फक्त हो म्हण ग..."

तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"

मग कसं कोण जाने, ती माझ्या मिठीत विरून गेली,
विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!
आता मी मी राहिलो नव्हतो, न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..
मग न जाने का , नजर माझीच लागली .....

मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली पत्रीकेसोबत...
त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...
येऊन पाहून जा ग
पत्रिका आपल्याच लग्नाची आहे..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ...
आज तिच्या प्रेतासोबत माझंही प्रेत जळतंय...
जीव सोडला आहे....तरीही काळीज रडतंय...

Saturday, 4 August 2012

तुला मी खरंच आवडते ना...

Photo: ती... हळूच त्याच्या मिठीत विसावत ...
तुला मी खरंच आवडते ना...

तो... हा काय प्रश्न आहे का... असं
का विचारतीयेस...

ती... दुसरे सगळे कसे आपल्या प्रेयसी बद्दल
किती गोड गोड बोलतात... तू किती छान आहेस,
किती सुंदर आहेस...

नाहीतर आपलं तू... तासनतास नुसता एकटक बघत
असतोस माझ्याकडे... दुसरं काही नाही...
तो फक्त हसतो !!!!


(आता ह्या वेडीला कोण सांगणार की तिचे डोळे,
तिचे हास्य, तिचे होठ, तिच्या कानांवरून येऊन
तिच्या गालांशी खेळणारी तिच्या केसांची लट,
ह्यापैकी प्रत्येकावर ४-४ Diarya भरून
झाल्या आहेत घरी...

♥♥ एक सुंदर प्रेमकथा ♥


ती मला खूप आवडायची college मधल्या सेमिनार मध्ये पाहिलांदा पाहिली होती तिला
गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस मध्ये, लांब सडक केस आणि काळ्याभोर डोळ्यांवर एक बारीक शीफ्रेम असलेला चष्मा
कसा विसरेन तिला....... 
तिच्यामुळेच माझ्या presentation चे बारा वाजले होते न
पण तिच्याशी बोलायला काही संधी मिळत नव्हती... 
तिला पाहता पाहता दुसऱ्या एका मुलीला धडकलो... sorry.... its okey सर्व झाल आणि ती हि लपत झाली
असेच काही दिवस गेले.. जरा स्मृती असलेला तो चेहरा परत दिसला college gathering मध्ये../ आणि तिच्या मागून ती दुसरी मुलगी आली जिला मी धडकलो होतो...
दोघी मैत्रिणी... तेव्हा वाटल जरा तरी संधी आहे बोलायची म्हणून मी अचानक भेटल्यासारख त्यांच्या समोर गेलो...
तेव्हा टक्कर झालेल्या त्या मुलीने smile दिली आणि मी हि बोलन सुरु केल
तीच नाव प्रीती होत आणि जिने मला वेड केल ती होती अनामिका... मी हि माझी ओळख करून दिली... मी प्रशांत
आणि आम्ही निघालो.. पण आता अनामिकाशी बोलायचं कस म्हणून नि प्रीती ला गाठल.. तिच्या शी ओळख वाढवली... आमची मैत्री झाली... तशी खूप साधी आणि गोड होती ती ...
एका दिवशी तिला मी बोललो कि मला अनामिका फार आवडते... तिच्या प्रेमात पडलोय मी.... तेव्हा ती म्हणाली कि तिला मला नक्कीच मदत करेन जमल तर दोघांना एकत्र आणायला
असेच ६-७ महिने गेले आमच्या तिघांची मैत्री फुलत होती... एव्हाना अनामिका ला कळाल होत कि मी तिच्यावर प्रेम करतोय.... मी कसा आहे आणि तिला हे पटवून देण्यात प्रीती ने खूप मदत केली होती...
आमच्यात झालेली भांडण हि तिने मिटवली होती खुपदा....
मला काय आवडत हे प्रीतीला कस कळायचं माहित नाही आणि अनामिका ची चांगली मैत्रीण असल्याने तिच्या सर्व सवयी आवडी निवडी तिने मला सांगितल्या होत्या म्हणून मला खूप लवकर अनामिका समजू लागली होती
दिवसेंदिवस अनामिका आणि मी जवळ येत होतो.... आणि त्यानुसार मी तिला१४ फेब्रुवारीला propose पण केल आणि अनामिका हि हो म्हणाली... आमचं graduation संपल्यावर प्रीती higher studies साठी भारताबाहेर गेली... आणि आम्हा दोघांना कळाल नाही कि तिने कधी apply केल आणि सर्व procedure पूर्ण केली...
आमच्या घरातीली पण आमच्या लग्नाला तयार झाली आणि आम्ही दोघ हि job करत असलेल्या सर्व काही व्यवस्थित चालू होत...
लग्नाच्या आदल्या दिवशी मी अनामिका ला phone केला आणि बोलताबोलता म्हणालो तुझ लिखाण खूप सुंदर आहे पत्र भारी लिहितेस खूप जपून ठेवलेत ती मी सर्व....
तेव्हा ती म्हणाली अरे कोणते पत्र... मला साध २ ओळीचा mail पाठवायचा कंटाळा येतो पत्र कुठूनलिहणार मी ... हो तसं प्रीती बोलायची मला कि तुझ्या पत्रांना उत्तर द्यायला पण मी नाही दिले कधी...
अरे प्रेम हे मना पासून केल जात प्रेमातून नाही.... मी म्हणालो हम्म्म बरोबर आहे... आणि phone ठेवला
पण डोक्यात काहूर माजू लागल... हे पत्र कोणी लिहील आणि अनामिकाचे म्हणून मला प्रीती ने का दिले....
सर्व पत्र पाहता पाहता सर्वात पत्र माझ्या हाती लागल... त्यात अनामिका माझ्या वर प्रेम करते अस कबूल केल होत... मी ते पुन्हा पुन्हा वाचाल तेव्हा माझ्या लक्षात आलं.. त्यातील खूपशा गोष्टी फक्त प्रीती आणि माझ्यातल्या होत्या त्या अनामिका ला माहित असण्याचा प्रश्नच येत नाही...

प्रश्नच काहूर माजलेल डोक काही शांत होत नव्हत तेव्हा मी प्रीती ला phone केला पण ती म्हणाली तिला लग्नाला नाही जमणार येयला exam आहेत... मी तिला तेव्हा force नाही केल आणि तिच्या घरी phone केला तेव्हा

तिच्या आईकडून कळाल कि तिने जाण्याआधी घरात वाद घातला कि तिला जायचं आहे.. आम्हाला तिला दूरपाठवण्याची भीती होती पण ती ऐकत नव्हती... शेवटी आम्ही कबूल झालो...
पण तिची आई म्हणाली प्रशांत तुम्ही तिचे चांगले मित्र तुम्हाला पण माहित नाही कोण तो मुलगा मला तरी सांगा मी बोलते त्याच्याशी... मला माझ्या मुलीला अस नाही पाहवत...
मी म्हणालो.." काकी माफ करा पण मला काही माहित नाही याबद्दल, मी तुम्हाला उद्या भेटायला येतो"
दुसऱ्या दिवशी माझ लग्न पण मी प्रीतीच्या घरी गेलो आणि तिच्या रूम मध्ये तिच्या आईशी बोलताना तिच्या काही dairy पाहिली... त्या म्हणाल्या कि प्रीती लहानपणा पासून सर्व त्यात च लिहिते.. कोणाला काही बोलत नाही...
त्यातील एकात मी आमच्या टक्कर पासून अनामिका च आणि माझ लग्न पक्क होण्यापर्यंत सर्व लिहील होत....अनामिका आणि मला कधी च नाही कळाल प्रीती माझ्यावर प्रेम करत होती... तिच्या लिखानाहून मला भरूनआल मी नकळत तिला किती दुखावलं होतआणि तिच्या एका शब्दाने तर मी पूर्ण हरून बसलो
प्रशांत ने फक्त अनामिका साठी माझ्या मैत्री केली का?
हा प्रश्न घेऊन घरी गेलो... सर्व कार्यक्रम पार पडले... आमच लग्न पण झाल... माझ कधी प्रेम नव्हत प्रीती वर पण का खरच मी तिचा वापर केला... मी ज्या मुलीवर प्रेम केल ती नक्की अनामिकाच आहे कि नकळत प्रीती वर करत होतो कारण जस मला प्रीती सांगायची तसं मी अनामिकाचप्रेमात पडत गेलो होतो....
अजून हि मी काही प्रश्न मनात घेऊनआहे आणि आमची आता भेट हि होते पण मी नाही कधी दाखवलं कि प्रितीच मनमला कळाल आहे कारण तिच्या चेहर्यावरच समाधान मला घालवायच नव्हत ते बलिदानाच आणि निख्खळ प्रेमच आणि आमच्या मैत्रीच... भले मी तिला स्वार्थी वाटत असेल

असं ही प्रेम असतं..............