Saturday, 4 August 2012

♥♥ एक सुंदर प्रेमकथा ♥


ती मला खूप आवडायची college मधल्या सेमिनार मध्ये पाहिलांदा पाहिली होती तिला
गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस मध्ये, लांब सडक केस आणि काळ्याभोर डोळ्यांवर एक बारीक शीफ्रेम असलेला चष्मा
कसा विसरेन तिला....... 
तिच्यामुळेच माझ्या presentation चे बारा वाजले होते न
पण तिच्याशी बोलायला काही संधी मिळत नव्हती... 
तिला पाहता पाहता दुसऱ्या एका मुलीला धडकलो... sorry.... its okey सर्व झाल आणि ती हि लपत झाली
असेच काही दिवस गेले.. जरा स्मृती असलेला तो चेहरा परत दिसला college gathering मध्ये../ आणि तिच्या मागून ती दुसरी मुलगी आली जिला मी धडकलो होतो...
दोघी मैत्रिणी... तेव्हा वाटल जरा तरी संधी आहे बोलायची म्हणून मी अचानक भेटल्यासारख त्यांच्या समोर गेलो...
तेव्हा टक्कर झालेल्या त्या मुलीने smile दिली आणि मी हि बोलन सुरु केल
तीच नाव प्रीती होत आणि जिने मला वेड केल ती होती अनामिका... मी हि माझी ओळख करून दिली... मी प्रशांत
आणि आम्ही निघालो.. पण आता अनामिकाशी बोलायचं कस म्हणून नि प्रीती ला गाठल.. तिच्या शी ओळख वाढवली... आमची मैत्री झाली... तशी खूप साधी आणि गोड होती ती ...
एका दिवशी तिला मी बोललो कि मला अनामिका फार आवडते... तिच्या प्रेमात पडलोय मी.... तेव्हा ती म्हणाली कि तिला मला नक्कीच मदत करेन जमल तर दोघांना एकत्र आणायला
असेच ६-७ महिने गेले आमच्या तिघांची मैत्री फुलत होती... एव्हाना अनामिका ला कळाल होत कि मी तिच्यावर प्रेम करतोय.... मी कसा आहे आणि तिला हे पटवून देण्यात प्रीती ने खूप मदत केली होती...
आमच्यात झालेली भांडण हि तिने मिटवली होती खुपदा....
मला काय आवडत हे प्रीतीला कस कळायचं माहित नाही आणि अनामिका ची चांगली मैत्रीण असल्याने तिच्या सर्व सवयी आवडी निवडी तिने मला सांगितल्या होत्या म्हणून मला खूप लवकर अनामिका समजू लागली होती
दिवसेंदिवस अनामिका आणि मी जवळ येत होतो.... आणि त्यानुसार मी तिला१४ फेब्रुवारीला propose पण केल आणि अनामिका हि हो म्हणाली... आमचं graduation संपल्यावर प्रीती higher studies साठी भारताबाहेर गेली... आणि आम्हा दोघांना कळाल नाही कि तिने कधी apply केल आणि सर्व procedure पूर्ण केली...
आमच्या घरातीली पण आमच्या लग्नाला तयार झाली आणि आम्ही दोघ हि job करत असलेल्या सर्व काही व्यवस्थित चालू होत...
लग्नाच्या आदल्या दिवशी मी अनामिका ला phone केला आणि बोलताबोलता म्हणालो तुझ लिखाण खूप सुंदर आहे पत्र भारी लिहितेस खूप जपून ठेवलेत ती मी सर्व....
तेव्हा ती म्हणाली अरे कोणते पत्र... मला साध २ ओळीचा mail पाठवायचा कंटाळा येतो पत्र कुठूनलिहणार मी ... हो तसं प्रीती बोलायची मला कि तुझ्या पत्रांना उत्तर द्यायला पण मी नाही दिले कधी...
अरे प्रेम हे मना पासून केल जात प्रेमातून नाही.... मी म्हणालो हम्म्म बरोबर आहे... आणि phone ठेवला
पण डोक्यात काहूर माजू लागल... हे पत्र कोणी लिहील आणि अनामिकाचे म्हणून मला प्रीती ने का दिले....
सर्व पत्र पाहता पाहता सर्वात पत्र माझ्या हाती लागल... त्यात अनामिका माझ्या वर प्रेम करते अस कबूल केल होत... मी ते पुन्हा पुन्हा वाचाल तेव्हा माझ्या लक्षात आलं.. त्यातील खूपशा गोष्टी फक्त प्रीती आणि माझ्यातल्या होत्या त्या अनामिका ला माहित असण्याचा प्रश्नच येत नाही...

प्रश्नच काहूर माजलेल डोक काही शांत होत नव्हत तेव्हा मी प्रीती ला phone केला पण ती म्हणाली तिला लग्नाला नाही जमणार येयला exam आहेत... मी तिला तेव्हा force नाही केल आणि तिच्या घरी phone केला तेव्हा

तिच्या आईकडून कळाल कि तिने जाण्याआधी घरात वाद घातला कि तिला जायचं आहे.. आम्हाला तिला दूरपाठवण्याची भीती होती पण ती ऐकत नव्हती... शेवटी आम्ही कबूल झालो...
पण तिची आई म्हणाली प्रशांत तुम्ही तिचे चांगले मित्र तुम्हाला पण माहित नाही कोण तो मुलगा मला तरी सांगा मी बोलते त्याच्याशी... मला माझ्या मुलीला अस नाही पाहवत...
मी म्हणालो.." काकी माफ करा पण मला काही माहित नाही याबद्दल, मी तुम्हाला उद्या भेटायला येतो"
दुसऱ्या दिवशी माझ लग्न पण मी प्रीतीच्या घरी गेलो आणि तिच्या रूम मध्ये तिच्या आईशी बोलताना तिच्या काही dairy पाहिली... त्या म्हणाल्या कि प्रीती लहानपणा पासून सर्व त्यात च लिहिते.. कोणाला काही बोलत नाही...
त्यातील एकात मी आमच्या टक्कर पासून अनामिका च आणि माझ लग्न पक्क होण्यापर्यंत सर्व लिहील होत....अनामिका आणि मला कधी च नाही कळाल प्रीती माझ्यावर प्रेम करत होती... तिच्या लिखानाहून मला भरूनआल मी नकळत तिला किती दुखावलं होतआणि तिच्या एका शब्दाने तर मी पूर्ण हरून बसलो
प्रशांत ने फक्त अनामिका साठी माझ्या मैत्री केली का?
हा प्रश्न घेऊन घरी गेलो... सर्व कार्यक्रम पार पडले... आमच लग्न पण झाल... माझ कधी प्रेम नव्हत प्रीती वर पण का खरच मी तिचा वापर केला... मी ज्या मुलीवर प्रेम केल ती नक्की अनामिकाच आहे कि नकळत प्रीती वर करत होतो कारण जस मला प्रीती सांगायची तसं मी अनामिकाचप्रेमात पडत गेलो होतो....
अजून हि मी काही प्रश्न मनात घेऊनआहे आणि आमची आता भेट हि होते पण मी नाही कधी दाखवलं कि प्रितीच मनमला कळाल आहे कारण तिच्या चेहर्यावरच समाधान मला घालवायच नव्हत ते बलिदानाच आणि निख्खळ प्रेमच आणि आमच्या मैत्रीच... भले मी तिला स्वार्थी वाटत असेल

3 comments: