Tuesday, 7 August 2012

"जिथे आई तोच स्वर्ग..."


Photo: सातारा ह्या गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे शामराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले,
तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशीमुलगी रडत असल्याचे दिसले,,
त्यावर त्यांनी विचारले,
शामराव :- तू का रडत आहेस बाळ..???
मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुलघ्यायचे आहे,,
फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत...
शामराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो....
(फुल घेऊन दिल्यावर)
चल मी तुला घरी सोडतो...
मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा..
(त्यावर ती गाडीत बसते..)
शामराव :- कुठे सोडू तुला..??
मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाथाला स्वर्ग आहे तिथे...
शामराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे...!!!
मुलगी :- काका,"जिथे आई तोच स्वर्ग..."
नव्हे का...???
शामरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला...
पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी शामराव स्वताहा सातार्याला आपल्या आईला भेटावयास गेले...!!!
तात्पर्य :-" हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जिने स्पर्श केला ती भावनाच तात्पर्य होय...

No comments:

Post a Comment