कसे आहात ? खरतर एका घरात राहूनही हा प्रश्न विचारण तस विचित्रच वाटत ना ...
पण काय करू ,तुमचा दिवस माझ्या आधी सुरू होतो आणि माझ्या झोपल्यानंतर च संपतो ....
म्हणून विचारलं कसे आहात???
पत्र लिहायला कारण म्हणजे ,
काल फादर डे होता... तुमची खूप वेळ वाट पहिली ... तुमच्यासाठी आणलेला गुच्छ ही तसाच कोपर्यात वाळून गेला ...
तुम्हाला यायलाच इतका उशीर झाला की त्याला तुम्ही पाहिलाच नाही आणि सकाळी ही घाईत निघून गेलात ....
dad एका घरात राहून ही आपण एका घरात राहून ही paying गेस्ट सारखं झालो आहोत...
कधी कधी वाटत कामाच्या गर्दीत तुम्ही आम्हाला विसरता की काय .....
लहानपनी चालताना सावरणार्या हातांची आजही गरज आहे बाबा आम्हाला .पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्यासाठी...
आमच्या विश्वातून हरवत जाणारा बाबा आम्हाला परत हवा आहे......
फक्त फादर डे पुरता नाही ... प्रत्येक दिवसकरिता ......
एवढ सगळं तुमच्या पुढ बोलता आल नसत म्हणून हा पत्राचा खटाटोप ...............
तुमचं काम नक्कीच महत्वाचं आहे ....
पण dad तुमच्या वाटेकडे कोणीतरी डोळे लावून बसल आहे ...
लौकर घरी या ..
तुमच्याशी खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत .......
Nice.....
ReplyDeletehi rohit kuthe aahet
Delete