Monday 30 July 2012

('मी माणूस शोधतोय' मधून....)व.पु काळे

१)वर्तमानपत्र असं आपण म्हणतो खरं, पण खरं तर सगळी वर्तमानपत्रं छापतात.
तिसरं आणि चौथं पान मात्र भविष्यकाळ किती उज्ज्वल आहे हे सांगतात .
भविष्य घडवायला निघालेले कितीतरी चेहरे त्या पानांवर दिसतात.किती माणसं ते विक्रम वाचतात ?

२)जगात चांगल्या माणसांची संख्या जास्त आहे.

३)'प्रसूती' शब्दामागे नुसता 'सुलभ' ह्या विशेषणाचा वापर केल्यानं प्रसूती सुलभ होते काय?

४)सगळे कागद सारखेच.त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सटि॔फिकेट होतं.

५)चार माणसात राहायचं म्हणजे काही काही गोष्टी कराव्या लागतात ह्या बुरख्याखाली आपण स्वतःला आयुष्यभर विकून टाकतो.
समाजाचा आधार वाटायच्या ऐवजी रीत रिवाज सांभाळायला लावणारं हे एक लोढणं आहे असं वाटतं.
वेळी अवेळी चहा करण्यापासून अनेक गोष्टी हा समाज आपल्याला करायला लावतो.
खोटं आहे का सांगा ? घरात मॉडर्न गोष्टी हव्यात त्याही समाजासाठीच.

६)रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो.पण तुळस वृंदावनातच राहते.
तिच्यापुढं आपल्याला उभं राहावं लागतं.

७)हा निसर्ग आहे म्हणा किंवा नियती आहे म्हणा.नियती माणसाला कोणत्या तरी दालनात शिखरावर नेऊन पोहचवते आणि त्याचं, त्या
दिलेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी, जीवनाच्या दुसऱ्या दालनात त्याच माणसाला अगदी सामान्य, अगदी क्षुद्र करून सोडते.
एका माणसाला छोटा करून तो दुसऱ्याला मोठा करत नाही.तर एकाच माणसात ती त्याला इथं छोटा तर तिथं मोठा करते.

८)सर्वनाशातही माणसाला जस्टीस हवा असतो.

-- व.पु काळे

No comments:

Post a Comment