Monday, 9 July 2012

- व.पु.- व.पु.

स्वतःची विचारसरणी कशी असावी हे ही काही माणसं इतरांवर अवलंबून ठेवतात ...
असं का ???
स्वतःची विचारसरणी देखील ज्याची त्याच्या मालकीची नसावी ... लोग काही का बोले ना ...

किती बोललं गेलं यापेक्षा किती ऐकलं गेलं याला महत्व आहे ...
किती खाल्लं यापेक्षा किती पचलं... किती पाहिलं यापेक्षा किती उमटलं.. याला महत्व आहे ...
हे ज्यांना कळत नाही त्यांना मग आपल्याला थकवा कशाचा आलाय याचाही पत्ता लागत नाही ...
मग सगळ्या चिंता विसरण्यासाठी ही माणसं चौपाटीवर येतात ... नाहीतर एखाद्या रम्य स्थळी जातात ...
पण तिथे जाऊन ही ती शांत होतात का ... चौपाटीवर जाणारी माणसं केवळ समुद्र किंवा आकाश पहायला जातात ??
तिथे सुद्धा ही माणसं हेवा, मत्सर अश्या क्षुद्र गोष्टी घेऊन येतात ... निसर्गाच्या जवळ येऊन देखील निसर्गाच्या लांब असतात ...
स्वतःच्या भविष्याचा विचार करतात ...

ते वाईट आहे अश्यातला भाग नाही ...
पण त्यात ती संपूर्ण हरवतात का ?? नाही ...
त्यांची भविष्यकाळातील मनोराज्य देखील क्षुद्र असतात ... स्वार्थामध्ये गुरफटलेली असतात ...

जो माणूस कशातच हरवत नाही तो माणूस कसला !!!!

- व.पु.

No comments:

Post a Comment