Monday, 29 December 2014

"एक सुंदर प्रेमकथा."एक सुंदर प्रेमकथा...!"
S...
अंकीता आणि शुभम हे लायब्ररीत
बसलेत. अंकीताला वाचनाची आवड आहे
तर शुभमला मोबाईल
चॅटची..
वाचचाना तिचं थोडं लक्ष शुभमवर
जातं.तो मोबाईलमध्ये डोळे घालुन
बसलाय...
अंकीता :- I love u...!
हे ऐकताच शुभमने समोर बघत फोन
कडेला ठेवुन दिला.आणि म्हणाला...
शुभम :- हो मला माहीतीये...
पण, तु
मला सारखी सारखी याची जाणीव
का करुन
देतेस...
अंकीता :- याची दोन कारणं आहेत,
एकतर तुला माझ्या प्रेमाची जाणीव
झाली पाहीजे. आणि दुसरं म्हणजे तु
अशा वेळी तुझा फोन बाजुला ठेवुन
माझ्याशी बोलु लागतोस.जे मला हवं
असतं. आणखी एक कारण आहे ते म्हणजे,
या तीन शब्दात एक जादु
आहे.जेव्हा भविष्यात
कधीतरी आपण वेगळे व्हायची वेळ
आली तर हेच शब्द
आपल्याला एकत्र आणतील... शुभम
तिच्या हातातलं.पुस्तक
हिसकावुन घेतो आणि म्हणतो, शुभम :-
मला केवढे टोमणे
मारशील मोबाईल या मुद्द्यावरुन.
पण तु तेवढं तेच तेच हे
रोमियो ज्युलीएटचं पुस्तक
कितीवेळा वाचशील..?
अंकिता :- हे पुस्तक माझ्यासाठी खुपच
खास आहे.आणि तुलाही भविष्यात याच
पुस्तकाची गरज पडेल कधी तरी...
शुभम :- छे छे...! कधीच नाही पडणार
गरज B t, I love 2
अंकीता :- I know...!
काही दिवसांनंतर रोज
कॉलेजला वेळेवर येणारी अंकिता आज
कॉलेजवर आलीच नाही गेली दोन तास
शुभम तिची वाट
पाहतोय.तिचा फोनही स्वीच
ऑफ आहे. तो तिच्या घरी जातो.पण
तिच्या घराला कुलुप
आहे.शुभमला काही सुचत
नाही.आजपर्यँत
कुठेही पहीली मला सांगुन
जाणारी अंकीता आज मला न सांगताच
कुठे निघुन गेली.या चिँतेने शुभम खुपच
व्याकुळ झाला.त्याला काही सुचतच
नव्हते.त्याला ही गोष्ट पटतच नसते
की, अंकिताने माझ्यासाठी काहीच
मॅसेज
सोडला नाही.थोडा विचार
केल्यावर त्याला एक गोष्ट
आठवते.तो बाईक स्टार्ट
करतो आणि लायब्ररीवर
जातो.तिथे चौकशी केल्यावर कळतं
की,अंकीता सकाळी लवकर इथे येऊन
गेलीय.त्याला ती वाचत
असलेल्या रोमियो ज्युलिएट
या पुस्तकाची आठवण होते.तो ते पुस्तक
उघडतो. पुस्तकात त्याची शोधाशोध
सुरु होते.पण त्यात काहीच
त्याला सापडत नाही.तेवढ्यात
त्याला अंकीताची ती लाईन आठवते
जेव्हा तिने म्हटलं होतं,
कि जेव्हा भविष्यात आपण वेगळे
होण्याची परिस्थिती येईल तेव्हा, I
love you हेच शब्द
आपल्याला एकत्र आणतील.
त्याला काहीतरी सुचतं.तो पुन्हा तेच
पुस्तक
उघडतो आणि बरोबर त्यातलं १४३, (I
LOVE YOU=१४३) नं. चं पान उघडतो.ते
पान चिकटवलेलं असतं.ते पान
तो एका बाजुने फाडतो.त्यात एक
चिठ्ठी असते.त्यात लिहीलेलं असतं,
मला माहीती होतं शुभम तु येथवर
पोहोचशील.कारण हे माझ्या प्रेमाचं
नशीब होतं.आता तुझ्या प्रेमाच नशीब
काय आहे ते
पाहायचंय.जेव्हा तुझ्या हातात हे
पत्र पडेल तोपर्यँत कदाचित
मी पुण्याला पोहोचलीही असेन.माझी ११:३०
ची ट्रेन आहे. काल पप्पांचं पत्र आलं
होतं
त्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहीलाय.
आज तातडीने यायला सांगितलंय.
मला माझं नशीब
आजमावायचंय.तु माझ्या नशीबात
आहेस की तो मुलगा माझ्या नशिबात
आहे....
तुझी अंकीता....
साडेअकरा वाजायला फक्त
पंधरा मिनिटे कमी असतात.
रेल्वेस्टेशन पर्यँतचं अंतर
अर्धा तासाचं असतं.शुभम
आपल्या बाईकवर बसुन
भन्नाट वेगाने रेल्वेस्टेशनकडे
निघाला.अर्ध्या तासाचं अंतर त्याने
फक्त १५ मिनिटांत पुर्ण केलं.त्याने
बाईक तिथेच सोडली आणि धावत
धावत रेल्वेस्थानकावर
अंकीताला शोधु लागला.
चौकशी अंती कळालं की पुण्याची रेल्वे
दोनच
मिनिटांपुर्वी निघालीय.तो खुपच
निराश झाला.त्याचं दुःख
अश्रुरुपाने डोळ्यात भरुन आलं. त्याचं
नशीब त्याला दगा देऊन गेलं
होतं.तो त्याच नैराश्यावस्थेत
तिथल्या एका बँचवर बसुन
राहीला.तेवढ्यात एक अलगद हात
त्याच्या खांद्यावर पडला त्याने
मागे वळुन पाहीले.तर
ती अंकीताची एक मैत्रीण
होती.ती म्हणाली...
ती :-
अंकिता तुझ्यासाठी काहीतरी देउन
गेलीय...
शुभम :- काय...?
ती :- ते तु अंकीतालाच विचार...
ती बाजुला झाली तिच्या मागे
अंकिताच
उभी होती.अंकिताला पाहताच
त्याचे हुंदके अनावर झाले
आणि तो अंकीताला मिठी मारुन रडु
लागला. अंकिताने योग्य
तो निर्णय
घेतला होता.शुभमला सोडुन न
जाण्याचा,कारण
तिने बुद्धीनं नाही.मनाने निर्णय
घेतला होता, म्हणुनच तर
ट्रेन निघुन गेली पण,
अंकीता नाही..

No comments:

Post a Comment