Friday, 29 March 2013

*एक छोटीशी सुंदर कथा*



एकदा एक १० वर्षाचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला.

तो टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारलं,

" आईस्क्रीम कोन केवढ्याला आहे...?"

वेटर म्हणाला,
" ५ रुपये, "

तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला.

नंतर...

त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला,
असं विचारलं.

वेटरने ञासिकपणे उत्तर दिलं,
" ४ रूपये, "

तो मुलगा म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कप द्या,

त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं,
बिल दिलं आणि तो गेला.

वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला...

आणि...

त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेलं...

कपाजवळ १रुपया त्याने टीप म्हणून ठेवला होता...

आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वीत्या लहान मुलाने त्या वेटरचा विचार केला होता...

त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती...

स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता.

मी प्रत्येक वेळी नाही म्हणत,

पण...

कधीतरी दुसऱ्यांचा विचार करावा...
सर्वजण एकसारखे नसतात ते आपापल्या परिस्थिती नुसार असतात...

म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं .................

*आयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं...
म्हणतात,प्रेम करणं सोप असतं ते व्यक्त करणं कठीण असतं,प्रेम पहाणं सोप असतं,ते समजून घेणं कठीण असतं..
आणि हेच समजून घ्यायचं होतं,
म्हणून,आयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं

असतो का प्रेमात खरच आनंद का नुसतच "I Love U" म्हणायच असतं?
विरहात त्याच्या  बुडून मरायच असतं की फक्त "I Miss U" म्हणायच असतं?
हेच बघायच होत  म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं

म्हणुनच त्याच्याजवळ  व्यक्त करणं ठरवल
आणि व्यक्तही केल होतं पण..............
त्याला "माझ तुझ्यावर प्रेम नाही" असं म्हणायला काहीच वाटल नव्हतं ,
असतात खरच अशी माणसं या जगात हे कधी मी पाहिलं नव्हतं...

झगडत होते त्याच्याकडून  ते 'I Love You" हे तीन शब्द ऐकण्यासाठी
कधी त्याच्या  आठवणीतं मरतहोते ,तर कधी मरुनच जगत होते ....
आणि कदाचित हेच माझ्या मनाला अनुभवयाच होतं .....
म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं!!!!!!

ति आणी तो

दोघे कॉलेजला जात असतात..
ति: मला आज खूप भिती वाटतेय रे..
तो: का..? कशाची..?
ति: मला सारखा वाटतंय कि तुझी सोबत आता नसणार मला...तू असं कर एकवेळ मला मिठीत घे. ( ति त्याचा हात हातात घेते..)
तो: अशी का वेड्यासारखी करतेस सगळे बघत आहेत..
ति: खरंच रे एक ना माझं, मला समजून घेरे प्लीज...
तो: चल वेडेपणा करू नकोस.(तो हात सोडवून घेतो अन्तिला थोडं दूर ढकलतो..)
खरंच तेवढ्यात मागून एक ट्रक येवून तिला चिरडतो....आणी त्या दोघांची सोबत तिथेच संपते...!
Please please dont ignore your partner's fillings....the result of the same may be very very painfull...!

Wednesday, 23 January 2013

स्वर्गात बांधलेल्या गाठी

ती त्याला रेल्वे स्टेशनवर भेटली,आपल्या मैत्रीणीला रेल्वे स्टेशनवर सोडायला आली होती.तिला बघताच हा तिच्या चेहर्यात अशा प्रकारे हरवुन गेला की जसं भोवरा फुलाच्या सुगंधात हरवुन जातो.
एक वेगळाच मोह तिच्या चेहर्यात होता.
ती जाऊ लागली,तो तिच्या मागेमागे जाऊ लागला.पण अचानक ती गर्दीत कुठे गायब झाली हे कळलंच नाही त्याला,त्याने शोधायचा खुप प्रयत्न केला पण ती काही सापडली नाही.
थोड्या वेळानंतर त्याला लक्षात आलं की आपल्याला ज्या ट्रेनमध्ये बसायचं होतं तीची वेळ जवळ जवळ होत आली होती.गडबडीने तो प्लॅटफॉर्मच्या दिशेने धावलापण ट्रेनही निघुन गेली होती.
मुलगी ही गेली आणि ट्रेनही...
काही दिवस तो तिला विसरुच शकला नाही,तिच्या आठवणीत काही दिवस तसेच गेले.तो तिला जवळ जवळ विसरलाच होता कि,ती पुन्हा दिसली त्याला मंदिरात जाताना .
चालु एस टी तुन याने उडी मारली.आणि कधी मंदिरात जाऊन माहीती नसणारा हा,पहील्यांदा याने मंदीरात पाय ठेवले.तिथलं वातावरण खुपच मोहक होतं.
ती देवाला नमस्कार करत होती.हा ही तिच्या शेजारीच उभा राहुन प्रार्थना करण्याचा आव आणत तिच्याकडे चोरुन पाहत उभा होता.तिचं ते मोहक रुप पाहुन त्यानेही डोळे मिटुन देवाला प्रार्थना केली की,माझ्या आयुष्याची साथीदार म्हणुन मला हीच मुलगी मिळो.
त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा पुन्हा एकदा ती मुलगी निघुन गेली होती.तो पुन्हा एकदा तिला शोधतच राहीला,...
काही दिवसांनंतर त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.दोन तीन वर्षे मग अशीच निघुन गेली तो तिला थोडाफार विसरला होता.पण कुठेतरी याच्या मनातल्या भावना तिच्याप्रतीतशाच होत्या.
याच्या आईवडीलांनी याच्यासाठी मुली पाहण्यास सुरुवात केली,पण काही केल्या याला कुठली मुलगी पसंतच पडत नव्हती.त्यामुळे एक दिवस याच्या आईवडीलांनी याला वधु वर सुचक मेळाव्यात पाठवलं.
मनात नसतानाही आई वडीलांच्या आग्रहाखातर तो मेळाव्यात गेला.खुपच गर्दी होती तिथे,प्रत्येकजण एकमेकांशी ओळख करुन ओळख वाढवण्याचा प्रयत्न करत होते.हा मात्र तिथे एकाजागी शांत उभा होता.लक्ष लागत नव्हतं.
कधी एकदा ईथुन बाहेर पडतोय असं झालं होतं त्याला.
तेवढ्यात कोणीतरी मागुन त्याला हाक मारली,त्याने मागे वळुन पाहीलं,तर तीच मुलगी तिथे उभी होती,जिचा चेहरा हा मनात ठेवुन जगत होता.कोणीतरी शांत परिसरात शंखानाद केल्यावर जसा आवाज व्हावा.तसाच आवाज तिला पाहील्यावर याच्या हृदयाच्या तारा हेलावुन होत होता.
ती म्हणाली,माझं नाव साक्षी मी मुळची सातार्याची,पण मुंबईला जॉब करते.इथे माझे काका काकु असतात.मी पदवीधर आहे,तर ही अशी आहे मी तुमच्या विषयीही काही सांगाना.त्याला कायबोलावं हे समजतच नव्हतं,डोळे झाकुन पाहीलेलंस्वप्न डोळे उघडताच समोर दिसावं...अशी केविलवाणी अवस्था त्याच्या मनाची झाली होती.
पण किती दिवसांनी तो उत्स्फुर्तपणे बोलु लागला.ओळख वाढवली आणि शेवटी त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं.आणि ही गोड बातमी दोघांच्याही आई वडीलांनाही कळवली,बोलणी झाली आणि लग्नही अगदी थाटामाटात झालं.
भेटी नशिबात नव्हत्या पण साथ मात्र नशिबात होती....
मित्रांनो काहीजण असतात ज्यांच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात.
पण काहीजण असे असतात,त्यांच्या गाठी स्वर्गात तर बांधलेल्या असतात पण तो स्वर्ग त्यांनी स्वतःच्या हातांनी घडवलेला असतो.......


अस पण प्रेम ..........

कॉलेज केव्हाचं सुरु झालंय.सर्व क्लास पुर्णपणे भरलेत.तिसर्या पिरेडची बेल वाजली.लाट मॅडमचा पिरेड संपला होता.मॅडम अजुनजायच्या होता.पौर्णिमा गडबडीने क्लासमध्ये आली,पावसाने चिँब भिजली होती ती.मॅडमांना काही सांगायची गरज नव्हती,पावसामुळे  उशीर झालाय असेल म्हणुन त्यांनी तिला बसायला सांगितलं आणि त्या निघुन गेल्या.प्रदीप पौर्णिमाला सारखं विचारत होता.एवढं भिजत यायची काय गरज होती?एक दिवस आली नसतीस तर चाललं असत
 ना....ती म्हणाली,हो पण तुला एक दिवस न बघणं चाललं मला चाललं नसतं.प्रदीप अलगद खाली बघुन हसला.किती प्रेम आहे तुझं माझ्यावर असं म्हणुन तिच्या हातावर हात ठेवला.तिचं अंग खुपच तापलं होतं.त्याला एकदम चटका बसला.अगं तुला तर खुप ताप आलाय आणि तरीही तु इथवर आलीस.तुला तर ना मी आता..,.पुढे काही बोलण्याच्या आतच कांबळे सर तिथे आले,प्रदीप लगेच आपल्या जागेवर गेला.आणि सर्वजण gd moning sir म्हणत उभे झाले...sit downपौर्णिमा सोडुन.... पौर्णिमाला उभं राहायला सांगितल्याबद्दल सर्वच आश्चर्यचकित झाले.प्रदीप जरा जास्तच आश्चर्यचकित झाला.....कांबळे सरःबाळ तुला इतकाउशीर का झाला?(सर थोडे कडक शिस्तीचे होते,त्यांनी तिला उशीरा येताना पाहीलं होतं)...पौर्णिमा सर पाऊस आला होता?..पाऊस आला होता तर यायचं नव्हतं कॉलेजला,हात पुढे कर....तिने हात पुढे केला सर तिला छडी मारणार तेवढ्यात प्रदीप ओरडला सर थांबा....ती वेळेवर आलीय हवंतर विचारा सर्वांना...हो का?मी प्रत्यक्ष पाहीलं नसतं यावर विश्वासही ठेवला असता कदाचित,..असं म्हणुन ते पुन्हा छडीमारणार तेवढ्यात तो पुन्हा मधी बोलला.आता ते चिडले आणि पहीला त्यालाच छडीने सरांनी हाणलं.प्रदीप ने पौर्णिमाला पुरपुर वाचवण्याचा प्रयत्न केला.पण तिसर्यावळी सर तिला मारताना तिने डोळे मिटले आणि धाड करुन खिडकीचे दार वार्याने धडकले गेले.तिने डोळे उघडले तेव्हा तिथे कोणीही नव्हतं.सर्व बँचेसमोकळे होते.बाहेर धो धो पाऊस पडत होता.तिच्या आईने लगबगीने छत्री घेऊन वर्गात प्रवेश केला.....मित्रा ंनो या कथेला इथे थोडा pause देऊया. आत्ता तुम्ही म्हणाल तिथे कोणीच नाहीये,सर्व कोठे गेले...सांगतो.. .पण हे सांगण्यासाठी मला तुम्हाला थोडं PASTमध्ये न्यावं लागेल.चला तर मग...एका वर्षापुर्वी...
आजपासुन बारावीचे एक्झाम्स चालु झालेत.प्रदीप आणि पौर्णिमा हे वेगवेगळ्या कॉलेजचे पण त्यांचा exam no एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये पडला आहे.त्यामुळे ओळख वाढवण्यासाठी प्रदीप सुरुवात करतो...हाय माझं नाव प्रदीप...तीःआणि माझं पौर्णिमा.,.तोः रागावणार नसशील तर एक सांगु का?तीःहो सांग ना.तोःतु खुप सुंदर आहेस.तुझ्या कपाळावर एक चंद्रकोर असती ना तर त्या चंद्रकोरीलाही तुझ्यामुळे शोभा आली असती.ती लाजुन थँक्स म्हणाली.त्याचा हा कॉन्फीडंस आणि स्पष्ट वक्तेपणा तिला खुप आवडला.अशी त्यांची मैत्री झाली.दोन तीन पेपर व्यवस्थित गेले पण एका पेपरच्या वेळी तिच्यापायात कोणीतरी कॉपी टाकली जे तिला कळलं नाही.त्यावेळेसच निरीक्षकांच्या नजरेत ही कॉपी पडल्यावर त्यांनी पौर्णिमाला जबाबदार धरलं.ती खुपच विनंती करुन त्यांना सांगत होती कि ही माझी कॉपी नाही।पण त्यांनी ऐकलं नाही शेवटी प्रदीपने तो आळ आपल्या डोक्यावर घेतला आणि तो म्हणाला,सर ही कॉपी माझी आहे आणि ती मीच हिच्या पायात टाकली होती.त्यामुळे त्या सरांनी पौर्णिमाला सोडुन प्रदीपच्या पेपरवर लाल शेरा मारला.पौर्णिमेला   माहीत होतं की हा खोटं बोलतोय कारण इतका स्मार्ट मुलगा कॉपी कसा काय करेल?पेपर संपल्यावर ते भेटले तेव्हा तिने स्पष्टच विचारलं.तु कॉपी केली नसताना ती तुझि कॉपी आहे असं का म्हणालास?...तुला वाचवण्यासाठी... .पण का?तु कोण आणि मी कोण आपलं नातच काय?दोन दिवसाच्या मैत्रीखातर कोणी असं करतं का?बरोबर आहे कदाचित.पण दोन दिवसाच्या प्रेमाखातर असं कोणीही करु शकतं,नाहि?...म् हणजे तुझं माझ्यावर प्रेम....हो तुला बघताक्षणीच झालं होतं ते पण प्रपोज असं करावं लागेल याची जरादेखील कल्पना नव्हती मला.बोल करशील माझ्याशी लग्न?तिला त्याची एक वेगळी पद्धत,स्पष्टपणे बोलणं आवडलं आणि तिनेपटकन हो म्हटलं।काहि दिवसांनी एकाच कॉलेजमध्ये त्यांचं अॅडमिशन झालं.त्यांचं प्रेम फुलत गेलं.पण एक दिवस कॉलेज भरलेलं असताना धो धो पडणार्या पावसाने कॉलेजच्या बिल्डींगचा एक भाग कोसळला.त्यामध्ये  चाळीस विद्यार्थी,विद् यार्थींनीचा मृत्यु झाला आणि 100 च्या वर जखमी झाले...प्रदीपचं नाव मृतांमध्ये होतं तर पौर्णिमाचं जखमींमध्ये होतं....होत्याच नव्हतं झालं.उकळत्या दुधामध्ये विरझण पडावं तसं त्यांच्या प्रेमामध्ये दुर्दैवाने उडी घेतली होती.पौर्णिमाचा जीव तर वाचला पण तिच्या मनावर या घटनेचा जबर मानसिक आघात झाला तिच्या पालकांनी यावर उपचारासाठी प्रयत्न केले पण तिने योग्य प्रतिसाद दिला नाही.....
तेव्हापासुन आजपर्यँत जवळजवळ रोज ती कॉलेजमध्ये येत असते.आजतर तिने कहरच केला 100 डिग्रीचा ताप आला असतानादेखील ती कॉलेजमध्ये पावसात भिजत आली होती.त्या खिडकीची दारे सुटलेल्या वार्याने धडकत होती,तिचे केस उडत होते.तीची आई छत्री घेऊन तिथे आली.आणि पौर्णिमाला भिजलेल्या डोळ्यांनी म्हणाली,कितीवेळा  तुला इथे आणायला यायचं बाळ.रोज तु न सांगता इथे येतेस.काय झालंय ते तरी सांग.आजपर्यंत तुला कितीवेळा समजावलं पण आज फणफणत्या अंगाने सुद्धा तु इथे आलीस.असं म्हणत त्या पौर्णिमाला घेऊन गेल्या.त्यांना माहीत होतं की हीला मानसिक आजार झालाय.पौर्णिमाल ा याची कल्पना दिला गेली असतानादेखील तिने उपचारास नकार दिला.हा माझा मानसिक आजाराच का असेना पणतो मला रोज भेटतो हेच माझ्यासाठी खुप आहे.उपचारानंतर तो मला कधीही दिसणार नाही म्हणुन आजपर्यँत ती उपचार न घेता तशीच राहीली...फक्त त्याच्यासाठी .,....मित्रांनो पौर्णिमाने प्रदीपवर केलेल्या नितांत प्रेमासाठी,त्या च्या एका भेटीसाठी तिला झालेल्या मानसिक आजारालाच तिनं आयुष्य बनवलं.म्हणुनच पौर्णिमेच्या आयुष्यात कायमची आमावस्या आली.


एक प्रेमकथाः

रिया कॉलेजला जात

असताना तिला कोणाचीतरी हाक ऐकु


,ती जागीच थांबली.एक मुलगा धापा टाकत


तिच्यापर्यँत आला..hi माझं नाव


शिरीष,तुला इथुन रोज जाताना पाहतो.तुला love


at first sight वर विश्वास आहे?...काय ?

(रिया खुपच दचकलेल्या आवाजात ओरडते).

ओरडु नको, मलाlove at first sight

ज्याला म्हणतात ना तेच झालंय तुझ्याशी.

रियाः मग मी काय करु? तोः frndship

रियाः आणि नाही केली तर.,


शिरीषः तु तुझ्या आयुष्यातील सुवर्ण


क्षणांना मुकशील।


रियाः असं! ठीक आहे मी करीन


तुझ्याशी मैत्री,बघुया तु काय करतोयस ते! पण


मला जर तुझ्याशी प्रेम झालं नाही तर?


शिरीषः फक्त सातच दिवसात तुला माझ्यावर


प्रेम होईल।


रियाः इतका over confidance,पडशी ल


तोँडावर


शिरीषः बघ पैज लावुन सांगतोय,फक्त


दिवसातला एक तासभर माझ्याबरोबर spend


करायचा.तुला आठवडाभरातच


माझ्याशी नक्की प्रेम होईल.नाही झालं तर


तुझी प्रत्येक शिक्षा मला मान्य असेल.


रियाः interesting मान्य एकदम मान्य.ठीक


आहे ur time will start from


tomarrow..by


पहील्या दिवशी ते भेटले,तो तिच्यासाठी एक


गुलाब घेऊन आला होता.ते


तिला आवडलं.तिला ताज होटेल


दाखविण्यासाठी घेऊन गेला.मस्त वातावरणात


आणि एकमेकांच्या साथीत,आणि महत्त्वाचं


म्हणजे तो स्पष्ट व बोलका असल्याने तो तास


कसा निघुन गेला कळतंच नाही.अशा तर्हेने


तो रोज


मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी तिला फिरवायला नेऊ


लागला,बघितले लेच स्पॉट/ ठीकाणे त्याच्यासोबत


बघण्यातलं वेगळेपण तिला स्पष्ट जाणवु


लागलं.त्याच्यात ला बोलकेपणा,त्याची


सहजवृत्ती,त्याच


त्याच्या  स्वभावातला गोडवा तिला आवडु


लागला.त्याच्यास सोबत असलं की ती सगळं विसरुन


जायची.ती फक्त आणि फक्त

आनंदी दिसायची. वेगवेगळी  ठीकाणे पाहण्यात


सहा दिवस कसे गेले तिला कळलंच


नाही.तिला खरंच त्याच्यावर प्रेमझालं


होतं.तिला त्याची सवयच


लागली होती.तो उद्यानंतर कदाचित मला भेटणार


नाही हिची तिला हुरहुर लागुन


राहीली होती.तो फक्तमाझा व्हावा असं तिला वाटु


लागतं.त्याच्याव विषयी असलेलं प्रेम व्यक्त करुन


टाकावं असं तिला राहुन राहुन वाटत होतं.पण


त्या पैजेचाविचार करुन


ती स्वतःला आवरघालायची.आजसा तवा दिवस


तो तिला संध्याकाळी समुद्रकिनारी घेऊन


गेला.आणि त्याने तिला डोळे


झाकायला सांगितले.तिच्या घड्याळाचा हात


आपल्या हातात घेऊन त्या घड्याळात


बघतो.बरोबर 6.15वाजल्यावर तिला डोळे


उघडायला सांगतो.तिने डोळे उघडताच,मावळतिकडे


झुकलेल्या सुर्याचीएका आकारात पडलेली किरणे


आणि त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिँब पाहुन


तिचं मन प्रफुल्लित


झालं.तो देखावा तिनेतिच्या डोळ्यात भरुन


घेतला.याबद्दल शिरीषचे ती मनापासुन आभार


मानते.शिरीष दुःखी मनाने म्हणतो,आज


सातवा म्हणजे


शेवटचा दिवस,मला माफकर,मला खरंच तु


आवडतेस.मला तुझ्यासोबतवेळ


घालवायचा होता,तुला जाणुन घ्यायचं


होतं.म्हणुनच मी तुझ्याकडुन सात दिवसाचा वेळ


मागुन घेतला.आणि या सात दिवसात


पुन्हा एकदा मी तुझ्या प्रेमात पडलो.पण


मी याबद्दल confident


नव्हतो की तुला माझ्या प्रेमात पाडु शकेन


की नाही ते.या सात दिवसात माझ्याकडुन


तुला काही चुकीची वागणुक मिळाली असेल तर i


m sorry असं म्हणुन तो निघुन


जातो.ती त्याच्याकडे बघतच राहीली.


रात्री त्याचं हेच बोलणं तिच्या मनात घोळत


होतं.रात्रीचे 11.55झालेले असतात.तिने ठरवलेलं


असतं की,आजचा दिवससंपल्यावरच म्हणजे


बारा वाजुन गेल्यावरच त्याला फोनवर i love u


म्हणायचं.हातातल्या  घड्याळाकडे ती उशीरपासुन


बघत असते..बरोबर12.0 5झाल्यावर


ती त्याला फोन लावते.शिरीश  तु पैज


हारलास.कारण सात दिवस आत्ता पुर्ण


झालेत.खरंच मीया दिवसांततुझ्या प्रेमात पडले

पण तरीसुद्धा संयम ठेवला आणि ते


कधी मी बोलले नाही.आता तु सुद्धा तुझी हार


मान्य कर.


शिरीषःहो बाई हारलो मी आत्तातरी love u


म्हण


रियाःआता ठीक आहे,आत्ता बोलायला काहीच


हरकत नाही.I LOVE U SHIRISH,I REALLY


LOVE YOU SO MUCH..


शिरीषःreally u love mi?


रियाःyah


शिरीषःठीकेय मग मी सांगतो तसं कर ok...तु


तुझ्या bedroomमधुन hallमध्ये जा.


रियाःok गेले....पुढे काय?


शिरीषःhallमधल्य ा घड्याळात किती वाजलेत


बघ?


रियाः11.50.अरे पण हे कसं शक्य आहे?


माझ्या घड्याळ्यात तर 12.05झालेत.


शिरीषःआपण


जेव्हा समुद्रकिनारी गेलो होतो,तिथे मी तुला डोळे


झाकायला सांगुन तुझा हात


हाती घेतला होता ना,तेव्हाच मी तुझं घड्याळ


पंधरा मिनिटे पुढे केलं होतं.कारण


अशी परिस्थीती येणार हे


मला माहीती होतं.आताबोल झालं ना बरोबर,सात


दिवसाच्या आत तुला माझ्यावर प्रेम?


रियाः smart...vry smart उद्या भेट


तुला सांगते.


शिरीषः sorry bt everything fair in love


&war... ♥♥

शब्दा वाचून तिला सगळ काही कळते



ती: खूप दिवसा पासून काही तरी विचारायचं होता... विचारू का?

तो: permission काय घेतेस... विचार जे विचारायच्या ते...

ती: तू रोज कविता का करतोस?

तो: मनातल सगळ सांगण्यासाठी...

... ती: मग कवितेत का रडतोस?

तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी...

ती: कशी सुचते रे कविता तुला ? कसे सुचतात रे शब्द ?

भिडते रे मनाला कविता तूझी, अन वाचून होते, मी रे स्तब्ध...

तो: कशी सुचते ते मला माहित नाही, पण लिहितो मी काही तरी...

शब्द नसतात ग त्यात, रचत मी भावनांची रांगोळी ...


ती: कोणासाठी लिहितोस रे ह्या सगळ्या कविता ?


तो: आहे कोणीतरी ... जी माझी असून हि माझी नाही...


ती: ह्म्मम्म्म.... दिसते रे कशी? राहते रे कुठे?


तो: दिसते ती परी सारखी, अन राहते......


हम्म्म्म..... राहते माझ्या हृदयात...


ती: (रागावून) नाही सांगायचं तर तस सांग... पण फुकट पकावू नकोस ..


तो: चालेल सांगतो, पण तू आता रागाऊ नकोस...


ती आहे परी सारखी , फक्त माझ्यशीच बोलणारी...


मनातल सगळ काही फक्त मलाच येऊन सांगणारी...


दररोज मला भेटणारी, अन माझ्या समोर बसून,


फक्त मलाच पाहणारी ....