रिचाचं आणि माझं तसं सारं व्यवस्थित चाललं होतं, रिचा
दिवसातला बराच वेळ मला देत असे. त्या व्यतिरिक्त नित्यनियमाने फोनवर बोलणे होत असे
. कधी ती फोन करत असे तर कधी मी. पण गेल्या जवळ जवळ वर्षभरात हे चित्र बदललं
होतं.आता फक्त मीच फोन करत होतो. आणि पूर्वी तासन तास फोन वर बोलणारी रिचा मात्र
फोन उचलल्या पासून "ठेवू का?" चा घोष लावत असे.
आजसुद्धा तिच्या फोनची वाट पाहून शेवटी मीच तिला फोन लावला. तिने फोन उचलला, पण पहिलेच वाक्य -"अरे जरा बिझी आहे, नंतर बोलूया का?" मी विचारले "कुणी बरोबर आहे का?" "हो, राकेश आहे. मी तुला नंतर फोन करेन." असे म्हणून मी पुढे काही बोलायच्या आत तिने फोन ठेवला. "राकेश!!" मी काहीसं चिडूनच फोन खाली ठेवला. आजकाल जवळ जवळ सारा वेळ रिचा राकेशबरोबर घालवू लागली होती. रिचा आणि माझ्यामध्ये राकेश कडमडला होता. पूर्वी आतुरतेने आणि तत्परतेने उचलले जाणारे माझे फोन कॉल्स आता मिस्ड कॉल्स मध्ये जमा होऊ लागलं होतं. रिचाचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे याची मला एके काळ खात्री होती. पण आता त्या प्रेम कहाणीचं रुपांतर लव्ह ट्रायंगल मध्ये रुपांतर झाल्याची चिन्हे दिसू लागली होती.
रिचाचं आणि माझं बोलणं बरेचसे जुजबी होऊ लागलं होतं.थोडं फार बोलणं होई त्यात ती राकेश बद्दल जास्त बोलू लागली होती.इतके दिवस ती कायम माझे कौतुक करत असे. पण आता राकेशचे कौतुक होऊ लागलं होतं.रिचाचं माझ्याकडे होणारे दुर्लक्ष मला बरेच जाणवू लागलं होतं.
कालचाच प्रसंग. आज (म्हणजे काल रात्री १२ वाजल्यापासुन) माझा वाढदिवस. आमची ओळख झाल्यापासून रिचाने कधी माझा वाढदिवस चुकवला नव्हता. सर्वात आधी शुभेच्छा, ते सुद्धा आदल्या रात्री बरोबर १२ च्या ठोक्याला रिचा देत असे.आणि दुसर्या दिवशी जंगी पार्टीचं प्लानिंग सुद्धा तीच करत असे. पण काल रात्री मात्र रिचाकडून शुभेच्छा मिळाल्या नाही. कदाचित ती बिझी असल्याने विसरली असेल अशी मी मनाची समजूत घातली.कदाचित तिला सकाळी आठवेल आणि ती सकाळी मला शुभेछा देण्यासाठी ऑफिसमध्ये फोन करेल आणि काल रात्री शुभेच्छा द्यायला विसरल्याबद्दल माझी माफी मागेल, असं मी स्वतःला समजावलं. पण सकाळ संपली दुपार होऊन गेली, संध्याकाळची चाहुल लागली तरी तिचा ऑफिसमध्ये फोन काही आला नाही. आता मात्र मी पुरता वैतागलो. मनाशी चरफडलो. तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली. पाहतो तर की, चक्क रिचाचा फोन. एका क्षणात माझा सारा राग,वैताग नाहीसा झाला. रिचाबद्दल आतापर्यंत मी काय काय विचार केले ते आठवून स्वतःची लाज वाटली.
"बोल", मी माझी उत्सुकता माझ्या आवाजात दिसू न देण्याचा प्रयत्न करत होतो.
तिच्या मधुर आवाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐकण्यासाठी माझे कान पुरते आतुरले होते.
"जतीन, वाढदिवसाचा काय प्लान?", मला आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी रिचाने सरळ मुद्द्याला हात घातला हे पाहुन मी चक्रावलो.
"काय म्हणजे? जाऊ की मंत्रामध्ये नेहमीप्रमाणे.” मी माझ्या आवडत्या हॉटेलचं नाव सुचवलं.
"हॉटेल मध्ये कशाला? काही तरी वेगळं प्लान करू. हा वाढदिवस राकेशसाठी स्पेशल आहे!!"
माझ्या कानाला काही तरी खटकलं.
"वाढदिवस राकेशसाठी स्पेशल? तू नक्की माझ्या वाढदिवसाबद्दल म्हणतेयस की… ?" पटकन माझ्या तोंडून निघालं.
"अरे मी तुझ्या नाही, राकेशच्या वाढदिवसा बद्दल बोलते आहे " रिचा हे बोलली खरी आणि त्याच वेळी तिच्या डोक्यात १०० वॅट्सचा उजेड पडला. "ओ माय गॉड , जतीन आज तुझा वाढदिवस आहे आणि मी चक्क विसरले. आय एम सो सॉरी." रिचा आणखी बराच काही पुढे बोलली, पण मी ते ऐकत नव्हतो. ती माझा वाढदिवस विसरली हे जाणवून मी दुखावला गेलो होतो.
रिचाचं माझ्याकडे दुर्लक्ष होत होतं हे मला कळत होतं, पण आज त्याचा कळस झाला होता. तिच्याशी बोलायचं म्हणून काहीतरी बोलून मी फोन ठेवला.रिचाच्या आयुष्यात माझं महत्व आता कमी झालं होतं हे आता मला ढळढळीतपणे जाणवलं होतं. यातून कसा मार्ग काढायचा त्याचा विचार मी करू लागलो. लव्ह ट्रायांगल्स चित्रपटातच बरे, आयुष्यात ते परवडत नाही, हेच खरं. माझं डोकं पुरतं भणाणून गेलं, पण काय करावं ते सुचेना. दूर कुणाच्या तरी कॉम्प्युटरवर गाणं लागलं होतं .. क्या हुवा तेरा वादा..
माझं कामात लक्ष लागेना. कॉम्प्युटर लॉक केला.
कंपनी समोरच्या टपरी वर जाऊन सिगारेट घेतली. हवेत धूर सोडला. पण धुराची वलयं सुद्धा त्रिकोणी दिसू लागली. मनातच चरफडत सिगारेट पायाखाली चिरडली.
ऑफिसमध्ये परतलो. कसं बसं कामात गुंतवून घ्यायचा प्रयत्न केला. ७ वाजले. डेस्क आवरलं. कॉम्प्युटर बंद केला आणि ऑफिस्मधून बाहेर पडलो. ऑफिसच्या समोरच बस थांबा होता. तिथे आलो. नेहमीची बस पकडली. नेहमीप्रमाणे तासभर ट्राफिकमध्ये काढून ८ वाजता इमारतीच्या समोरच्या बस थांब्यावर उतरलो. विषण्ण मनाने जिन्याच्या पायऱ्या चढलो. बेल वाजवली. थोडा वेळ वाट पहिली, पण दार काही उघडलं नाही. ह्या वेळेला घरातले कुठे बाहेर गेले म्हणून चरफडत माझ्याकडची चावी शोधली आणि त्या चावीने दार उघडलं. संध्याकाळ झाल्यामुळे आत काळोख होता. दरवाज्याच्या बाजूच्या भिंतीवरचं दिव्याचं बटण शोधू लागलो. दिवा लावणार तेवढ्यात आपोआप घरातले सारे दिवे लागलं. आणि पाहतो तर काय घरात कोण जत्रा.. घरात माझे मित्र आणि माझे सारे नातेवाईक जमलेले. आणि साऱ्यांच्या पुढे माझी लाडकी पत्नी "रिचा" जी कधी नव्हे तो आज माझा वाढदिवस विसरली होती (असा माझा समज झाला होता) आणि तिच्या कडेवर आमच्या आगळ्या प्रेम त्रिकोणातला तिसरा कोन म्हणजे आमचा चिमुकला "राकेश". रिचाच्या माझ्यावरील प्रेमातला नवा भागीदार. पुढच्या आठवड्यात पठ्ठ्याचा पहिला वाढदिवस. त्याच्यासाठी, खरं तर आम्हा सर्वांसाठीच स्पेशल. मला पाहताच त्याच्या ओठांवर मिश्कील हसू आलं आणि तो माझ्या कडे झेपावला. सगळेच लव्ह ट्रायांगल्स काही वाईट नसतात, हेच खरं.
साऱ्यांनी एका सुरात "हॅप्पी बर्थडे - जतीन" चा घोष केला.
दूरवर कुठे तरी रेडिओवर प्रशांत दामले गात होतं "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते?"

नक्की वाचा …………….
No comments:
Post a Comment