Thursday 22 January 2015

"बायको"........


"बायको"
तिचं आपल्या आयुष्यात येणं,
किती किती सुखद असतं..
या नात्याला श्वासांशिवाय,
दुसरं कुठलंच नाव नसतं...
एका सुंदर क्षणी आपल्या,
घरामध्ये येते "ती"...
तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला,
भेट म्हणून देते "ती"...
किती सहज बनवत जाते,
ती प्रत्येकाशी नातं....
बघता बघता अनोळखी घर,
तिचंच बनून जातं....
सुखामध्ये दुःखामध्ये,
'ती'च सोबत असते ना..
सगळं सहन करून ती,
तुमच्यासाठीच हसते ना...?
सकाळपासून रात्रीपर्यंत,
राबत असतात तिचे हात...
सासू-सासरे, मुलं, घर..
सतत असतं तिच्या मनात...
चहा, दूध, नाष्टा, डबे,
आंघोळीला गरम पाणी...
प्रत्येकाची करून कामे,
तिची मात्र मधाळ वाणी....
सगळ्यांत शेवटी झोपते ती,
सगळ्यांच्याही आधी उठून...
दिवसभर राबण्यासाठी,
ताकद एवढी आणते कुठून...?
घरामधलं सगळं आवरून,
कामांसाठी बाहेर पळते....
घरामध्ये नसते तेंव्हाच,
तिची खरी किंमत कळते...
घर होतं अस्ताव्यस्त,
घरामध्ये नसते जेंव्हा....
तिच्याशिवाय व्हायचं कसं...?
मनात आपसूक येतं तेंव्हा...
म्हणूनच ती परत येते,
घरामध्ये पदर खोचून....
बोलून दाखवते मलाच ती,
वरती हे टोचून टोचून...
की, "मी म्हणून टिकले..., दुसरी
केव्हाच गेली असती पळून....
माझे महत्त्व येत नाही,
अजून कसे तुम्हांला कळून...?"
राग-लोभ, रुसवे-फुगवे,
उणी-दुणी, मानपान...
प्रत्येकाला घेते समजून,
जुळवून घेते कित्ती छान...
थकूनभागून आल्यावर ती,
हसून, चहा देते आणून...
दिवसभराचे आपले कष्ट,
अलगदपणे घेते जाणून....
सगळं भांडण विसरून जेंव्हा,
घराशी ती एकरूप होते...
घर तिचंच होऊन जातं,
जेंव्हा ती कुशीत घेते.....
आयुष्यभर उपयोगी पडतं,
नेहमी तिचंच संसारी धोरण....
म्हणून प्रत्येक घरात सजतं,
"बायको" नावाचं मखमली तोरण....
ती आहे म्हणून आहे,
आपल्या घरादाराला किंमत....
तिला विरोध करण्याची इथं....
कुणात आहे हिंमत....?
कुठून येतात आयुष्यात आपल्या,
इतक्या समजूतदार मुली.....?
उगाच नाही म्हणत...
" घरोघरी मातीच्याच चुली...!!!"

क्षणांचीही साथ नव्हे,
साताजन्मांची ही सोबत असते....
"नवरा" आयुष्यभर "नवरा"च राहतो,
"नवरी मुलगी" मात्र "बायको" बनते....




प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता
.......... 
("चांदणझुलामधून... )

1 comment:

  1. प्रा. गुरुराज गर्दे यांची संपूर्ण
    महाराष्ट्रात प्रचंड गाजत असलेली *"बायको "* कविता आज पुन्हा, तुम्हां Face Book आणि Whats Up च्या रसिक वाचकांसाठी.
    ("चांदणझुला" मधून... )

    Mobile - 9021501924 / 9422058288
    प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!

    माझी कोणतीही गझल / कविता आवडली तर कृपया, माझ्या नावासह व नंबरसह फॉरवर्ड करावी. ही नम्र विनंती.

    👣👣👣👣👣
    *"बायको"*
    👣👣👣👣👣

    तिचं आपल्या आयुष्यात येणं,
    किती किती सुखद असतं..
    या नात्याला श्वासांशिवाय,
    दुसरं कुठलंच नाव नसतं...
    👣👣👣👣👣
    एका सुंदर क्षणी आपल्या,
    घरामध्ये येते "ती"...
    तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला,
    भेट म्हणून देते "ती"...
    👣👣👣👣👣
    किती सहज बनवत जाते,
    ती प्रत्येकाशी आपलं नातं....
    बघता बघता अनोळखी घर,
    अख्खं तिचंच बनून जातं....
    👣👣👣👣👣
    सुखामध्ये दुःखामध्ये,
    'ती'च सोबत असते ना..
    सगळं सहन करून ती,
    तुमच्यासाठीच हसते ना...?
    👣👣👣👣👣
    सकाळपासून रात्रीपर्यंत,
    राबत असतात तिचे हात...
    सासू-सासरे, मुलं, घर..
    सतत असतं तिच्या मनात...
    👣👣👣👣👣
    चहा, दूध, नाष्टा, डबे,
    आंघोळीला गरम पाणी...
    प्रत्येकाची करून कामे,
    तिची मात्र मधाळ वाणी....
    👣👣👣👣👣
    सगळ्यांत शेवटी झोपते ती,
    सगळ्यांच्याही आधी उठून...
    दिवसभर राबण्यासाठी,
    ताकद एवढी आणते कुठून...?
    👣👣👣👣👣
    घरामधलं सगळं आवरून,
    कामांसाठी बाहेर पळते....
    घरामध्ये नसते तेंव्हाच,
    तिची खरी किंमत कळते...
    👣👣👣👣👣
    घर होतं अस्ताव्यस्त,
    घरामध्ये नसते जेंव्हा....
    तिच्याशिवाय व्हायचं कसं...?
    मनात आपसूक येतं तेंव्हा...
    👣👣👣👣👣
    म्हणूनच ती परत येते,
    घरामध्ये पदर खोचून....
    बोलून दाखवते मलाच ती,
    वरती हे टोचून टोचून...
    👣👣👣👣👣
    की, "मी म्हणून टिकले..., दुसरी
    केव्हाच गेली असती पळून....
    माझे महत्त्व येत नाही,
    अजून कसे तुम्हांला कळून...?"
    👣👣👣👣👣
    राग-लोभ, रुसवे-फुगवे,
    उणी-दुणी, मानपान...
    प्रत्येकाला घेते समजून,
    जुळवून घेते कित्ती छान...
    👣👣👣👣👣
    थकूनभागून आल्यावर ती,
    हसून, चहा देते आणून...
    दिवसभराचे आपले कष्ट,
    अलगदपणे घेते जाणून....
    👣👣👣👣👣
    सगळं भांडण विसरून जेंव्हा,
    घराशी ती एकरूप होते...
    घर तिचंच होऊन जातं,
    जेंव्हा ती कुशीत घेते.....
    👣👣👣👣👣
    आयुष्यभर उपयोगी पडतं,
    नेहमी तिचंच संसारी धोरण....
    म्हणून प्रत्येक घरात सजतं,
    *"बायको"* नावाचं मखमली तोरण....
    👣👣👣👣👣
    ती आहे म्हणून आहे,
    आपल्या घरादाराला किंमत....
    तिला विरोध करण्याची इथं....
    कुणात आहे हिंमत....?
    👣👣👣👣👣
    कुठून येतात आयुष्यात आपल्या,
    इतक्या समजूतदार मुली.....?
    उगाच नाही म्हणत...
    " घरोघरी मातीच्याच चुली...!!!"
    👣👣👣👣👣
    क्षणांचीही साथ नव्हे,
    साताजन्मांची ही सोबत असते....
    "नवरा" आयुष्यभर "नवरा"च राहतो,
    "नवरी मुलगी" मात्र *"बायको"* बनते....
    👣👣👣👣👣

    👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣
    *केवळ बायकोला समर्पित....*
    ( माझ्या, तुमच्या नी प्रत्येकाच्याच...)
    👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣

    *---------- स्नेहसखा गुरुराज.*

    Mobile - 9021501924 / 9422058288
    प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!

    माझी कोणतीही गझल / कविता आवडली तर कृपया, माझ्या नावासह व नंबरसह फॉरवर्ड करावी. ही नम्र विनंती.

    *प्रा. गुरूराज ग. गर्दे.*
    *शैक्षणिक सल्लागार - समुपदेशक, व्याख्याता.*
    पत्ता :- डीएसके विश्व, धायरी, पुणे.
    सहजसंपर्क :- 9422058288 / 9422058288

    What's Up :- 9422058288
    Email :- gururajgarde@gmail.com
    Facebook Link :- www.facebook.com/EduStudentCounselor

    पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा, महाविद्यालये, संस्थाचालक यांनी LIC of India, Star Health insurance, करीयर मार्गदर्शन, व्याख्याने, विद्यार्थी व पालक समुपदेशन, कार्यशाळा, शैक्षणिक व्यवसाय, माहिती - उपक्रमांसाठी संपर्क साधा.

    माझी गझल / कविता आवडली तर कृपया, माझ्या वा वास व नंबरसह फॉरवर्ड करावी. ही नम्र विनंती.

    (कृपया, कधीही कोणत्याही कवीचे नाव आणि नंबर कट करून कोणतीही कविता किंवा गझल स्वतःच्या नावावर फॉरवर्ड करून खपवू नये...
    ज्या त्या कलाकृतीचा प्रतिसाद, कौतुक आणि श्रेय त्या त्या संबंधित कवी व लेखकाला मिळायलाच पाहिजे, असे मला वाटते, म्हणून हा वाड़मय शुचित्वाचा प्रयत्न... कविता आवडल्यास मूळ कवीचे कौतुक करा... प्रतिक्रिया पाठवा... सर्वांनी प्रामाणिक रहा नी सहकार्य करा...
    धन्यवाद. --- श्री. गुरूराज गर्दे.)

    ReplyDelete