Monday 30 July 2012

ती : माझ्यात काय आवडतं?
तो : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत मला....पण "तुझ्या मनातला मी" आवडतो मला...
ती : किती प्रेम करतोस माझ्यावर???
तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान दिसतंय?त्या पानावर जितक्या हिरव्या शिरा आहेत न तितकंच प्रेम करतो.
जास्त नाही.
ती : मला कधी विसरशील?
तो : एकदम सहज विसरेन....हा आकाशातला सूर्य उगवायचा थांबला ना कि विसरेन.
ती : कधी आठवशील मला?
तो : आठवण सारखी सारखी का काढू ? कधी तरीच काढेन...
पापण्यांची उघडझाप करतील ना तेव्हाच काढेन.
ती : तुझ्या सोबत राहिल्याने मला काही तोटा होईल का?
तो : तोटा तर आहेच...माझ्या सोबत राहिलीस तर तुला तुझं दु:ख कधीच एकटीला अनुभवता येणार नाही.
त्यात अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून ठेवावा लागेल.
ती : माझ्या कोणत्या गोष्टीवर तूझा सर्वात जास्त हक्क आहे?
तो : तुझ्या जगण्यावर नसेल माझा हक्क पण...तू माझ्याशिवाय एकटी हे जग सोडून जाऊ नाही शकणार..

सगळं ऐकून आभाळातल्या उगवत्या सुर्याखाली हातात पान घेतलेल्या पापण्यांची उघडझाप करणाऱ्या
त्याला पाहताना तिच्या डोळ्यात फक्त पाणीच होते.
तो क्षण काय होता...याचं उत्तर दोघांकडेही नव्हतं...
पण तो क्षण शिंपल्यातल्या मोत्यासारखा होता.... मनात भरणारा...

-व.पु काळे

१)कोणताही स्वार्थ नसतो ,तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो.
२)आपल्या वाचून कुणाचं तरी अडतं हि भावना सौख्यदायक असते.
३)सगळी उत्तरं आपल्याजवळच असतात.समस्या आपली आणि त्याचं उत्तरं मात्र इतरत्र असे घडत नाही.
उत्तराची मागची बाजू म्हणजे समस्या.आपण फक्त आपली बघण्याची दिशा बदलायची.स्वतःकडेच नीट पाहायचं.
'पिंडी ते ब्रह्मांडी' असं म्हणतात ते सत्य आहे.
४)लपून राहणं हा प्रकाशाचा गुणधर्म नाही.
५)सगळे प्रॉब्लेम्स चांगुलपणातूनच निर्माण होतात.
६)परदु:ख नेहमी शीतल असतं.
७)"काळजी नको करूस" असं कुणी सांगणारं असलं म्हणजे माणूस जास्त काळजी करायला लागतं.
८)बर्फ हा नेहमी नऊ दशांश पाण्याखाली असतो आणि एक दशांशच वर दिसत असतो.संसारातल्या अडचणी, मानापमान
आणि दु:ख पण अशीच असतात.नऊ दशांश न सांगता येण्यासारखी.सांगितली तर खोटी वाटणारी.एक दशांश न सांगता दिसणारी
किंवा सांगितलं तर लगेच पटणारी!
९)एखाद्या बाईच्या प्रेमात पडण्याचा एखादाच क्षण असतो.तसाच उबग येण्याचा क्षणही एकाच असतो.

१०) ज्याच्याबद्दल नाना कल्पना करता येतात, विरंगुळा मिळवता येतो असा एकंच दिलासा म्हणजे 'उद्याचा दिवस'.

११)"तुम्ही बायका अशाच असता.वरून लावलेले रंग तुम्ही वरच्या वर वागवू शकता.वरच्या वर झटकू शकता.
तुम्ही बायका कमळाच्या पानासारख्या असता.अंगाला काही चिटकू न देणाऱ्या.पुरुषाचं तसं नसतं.
तोंडाला फासलेल्या रंगाचीच त्वचा कधी होते ते त्यालाही काळात नाही.तो रंग तेलानं जात नाही,साबणानं निघत नाही.
ओरबाडून काढावा तेव्हा प्राण कासावीस होतात.
मग कळतं कि, रंग म्हणून आपण खरबडत होतो, ती कातडीच होती.
ती:एक विचारायचे होते.विचारू?
तो:तुला कधी पासून परवानगी घ्यायची गरज वाटू लागली?
ती:तसे नाही रे... केलेल्या गोष्टीतून नेहमी चुकीचंच हाती लागलं कि बरोबर गोष्ट करताना हि भीती वाटते.
म्हणून विचारलं.असो.मला एक सांग...
आपलीच एखादी गोष्ट आपल्यालाच अजिबात आवडत नसेल तर ती गोष्ट दुर कशी करायची?
आरसा आपल्याला हिणवू लागला तर काय करायचं?
स्वतःला बघताना स्वतःचीच लाज वाटू लागली तर काय करायचं?
तो: ओहो....इतके प्रश्न एकत्र..?बरी आहेस ना?... :-)... असो.. ऐक...
माणूस म्हणजे कोण ?सवय कि स्वभाव?
एखादी गोष्ट सारखी सारखी करून लागते ती म्हणजे 'सवय'
आणि एखादी गोष्ट वाटूनही हवी तेव्हा हवी तशी बदलता येत नाही तो म्हणजे 'स्वभाव'.
स्वतःच्या स्वभावाची लाज वाटू नये...सवयीची जरूर वाटू दे...
माणूस कसा असतो..एका इंद्रधनुष्यासारखा...ते हि त्याच्या नकळत...
त्याच्या सात रंगातला कोणता रंग,कुणाला आणि का आवडत असेल ते सांगणं कठीण...
आपल्याला आवडत नाही म्हणून एखादा रंग वेगळा करायचा नसतो.
इंद्रधनुष्यातला रंगांचा क्रम असाच का?हेच रंग का?दुसरे का नाहीत? असे प्रश्न विचारायचे नसतात.
आणि
मुळात आरसा काय दाखवतो?....दृश्य दाखवतो....
पण खरंतर दृश्याचा अर्थ मन ठरवतं...जे मनात असतं ते दृश्यात दिसतं..
न्यूनगंड आपल्यातच असतो.जगाने आठवण करून दिली कि,तो दृढ होतो.
तुझ्यात काही कमी आहे असं तुला वाटतं...का माहित नाही..
दिलेलं सगळं 'पूर्ण' असतं...पण 'पूर्ण' ची व्याख्याच 'पूर्ण' नाहीयेय....त्यामुळे सगळं अपूर्ण ठरतं...
त्यामुळे काही बदलू नकोस..आहेस तशी रहा...
सवय हवी तर बदल...स्वभाव तोच ठेव...
स्वतःला बदलून प्रश्न बदलत नाही...कधी ना कधी ते पुन्हा डोकावतातच....
ती: तू पण ना... कधी बदलू देणार नाहीस मला....मंद... :)

-- क्षण तुझे अन् माझे

('मी माणूस शोधतोय' मधून....)व.पु काळे

१)वर्तमानपत्र असं आपण म्हणतो खरं, पण खरं तर सगळी वर्तमानपत्रं छापतात.
तिसरं आणि चौथं पान मात्र भविष्यकाळ किती उज्ज्वल आहे हे सांगतात .
भविष्य घडवायला निघालेले कितीतरी चेहरे त्या पानांवर दिसतात.किती माणसं ते विक्रम वाचतात ?

२)जगात चांगल्या माणसांची संख्या जास्त आहे.

३)'प्रसूती' शब्दामागे नुसता 'सुलभ' ह्या विशेषणाचा वापर केल्यानं प्रसूती सुलभ होते काय?

४)सगळे कागद सारखेच.त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सटि॔फिकेट होतं.

५)चार माणसात राहायचं म्हणजे काही काही गोष्टी कराव्या लागतात ह्या बुरख्याखाली आपण स्वतःला आयुष्यभर विकून टाकतो.
समाजाचा आधार वाटायच्या ऐवजी रीत रिवाज सांभाळायला लावणारं हे एक लोढणं आहे असं वाटतं.
वेळी अवेळी चहा करण्यापासून अनेक गोष्टी हा समाज आपल्याला करायला लावतो.
खोटं आहे का सांगा ? घरात मॉडर्न गोष्टी हव्यात त्याही समाजासाठीच.

६)रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो.पण तुळस वृंदावनातच राहते.
तिच्यापुढं आपल्याला उभं राहावं लागतं.

७)हा निसर्ग आहे म्हणा किंवा नियती आहे म्हणा.नियती माणसाला कोणत्या तरी दालनात शिखरावर नेऊन पोहचवते आणि त्याचं, त्या
दिलेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी, जीवनाच्या दुसऱ्या दालनात त्याच माणसाला अगदी सामान्य, अगदी क्षुद्र करून सोडते.
एका माणसाला छोटा करून तो दुसऱ्याला मोठा करत नाही.तर एकाच माणसात ती त्याला इथं छोटा तर तिथं मोठा करते.

८)सर्वनाशातही माणसाला जस्टीस हवा असतो.

-- व.पु काळे

क्षण......................

घटना घडत जातात, निर्णय घेतले जातात.
एखाद्यावर विश्वास ठेऊन आपण निर्धास्त असतो...
परिस्थिती आपल्याच बाजूने निकाल देईल याची खात्री असते....
कारण परिस्थितीच्या उनाडपणापेक्षा आपल्याला आपल्या माणसाच्या वेडेपणावर जास्त विश्वास असतो.
पण..
कधी कधी अंदाज चुकतात.
आपण समोरच्याला आपले वेड न लावता आपणच जास्त वेडावलो होतो याची प्रचिती येते.
परिस्थिती जिंकते...समोरचं माणूस स्वत: खेळून आपल्याला हरवून जातं...
जमिनीनेच आसरा देण्यास नकार दिल्यास पाय ठेवायचे कुठे ? अपेक्षा उपेक्षा होतात...
'आजवर आपण जे काही जगलो, मानलं ते सगळं खोटं होतं.
आजवर आपण उघड्या डोळ्यांनी हि काहीच पाहू शकलो नाही.' याची जाणीव होते...
अश्या क्षणी कुणी तिसरंच माणूस धावून येतं...उब देतं....सांभाळून घेतं.
ज्या मागे आजवर धावलो ते माणूस हे का नव्हतं ?
आधी आलेली व्यक्ती हि ह्या नंतर आलेल्या व्यक्तीला भेटवून देण्यासाठीच आपल्या आयुष्यात आली होती का?
हा प्रश्न पडतो...

कधी कधी परक्यात आपलं आणि आपल्यात परकं सापडतं...
दोन्ही क्षण धक्याचेच...एक सुखद आणि एक दुखद...

-- क्षण तुझे अन् माझे

Thursday 26 July 2012

वाट बघणं ...





वाट बघणं ....
प्रत्येक जण बघतच असतो ... कुणाची ना कुणाची ...
कधी कधी, कोणी तरी येणार आहे ही 'आशा' घेऊन ... तर कधी कधी कुणीही येणार नाहीये हे 'माहित' असून ...

कशातच मन लागत नाही, एक अनामिक हुरहूर ... नक्की काय होतंय ते कळत नाही ...
सारखं काही तरी चुकतंय .. काहीतरी राहतंय असं वाटतं राहतं ...

का बघतो आपण एवढी वाट कोणाची ?? काय हवं असतं नक्की आपल्याला ??
काय घेऊन जाते जाणारी व्यक्ती अन काय सोबत आणते ??

जाणारी व्यक्ती असंच जात नाही ... जातांना ती देखील आपल्या आठवणींचा, आपल्या अस्तित्वाचा एक हिस्सा आपल्या सोबत घेऊन जाते ...
हाच तो एक हिस्सा असतो जो आपलं चित्र पूर्ण होऊ देत नाही ...
सारखं काही तरी चुकतंय .. काहीतरी राहतंय असं जे वाटतं राहतं त्याच कारण हेच !!!

पण जसं एकीकडे वाट बघणाऱ्याच चित्र त्या एका हिस्स्यापायी अपूर्ण असतं ...
तसंच गेलेल्या व्यक्तीच चित्र देखील 'मागे सुटलेल्या' त्या एका हिस्स्यापायी अपूर्णच असतं !!!
Photo: वाट बघणं .... प्रत्येक जण बघतच असतो ... कुणाची ना कुणाची ... कधी कधी, कोणी तरी येणार आहे ही 'आशा' घेऊन ... तर कधी कधी कुणीही येणार नाहीये हे 'माहित' असून ... कशातच मन लागत नाही, एक अनामिक हुरहूर ... नक्की काय होतंय ते कळत नाही ... सारखं काही तरी चुकतंय .. काहीतरी राहतंय असं वाटतं राहतं ... का बघतो आपण एवढी वाट कोणाची ?? काय हवं असतं नक्की आपल्याला ?? काय घेऊन जाते जाणारी व्यक्ती अन काय सोबत आणते ?? जाणारी व्यक्ती असंच जात नाही ... जातांना ती देखील आपल्या आठवणींचा, आपल्या अस्तित्वाचा एक हिस्सा आपल्या सोबत घेऊन जाते ... हाच तो एक हिस्सा असतो जो आपलं चित्र पूर्ण होऊ देत नाही ... सारखं काही तरी चुकतंय .. काहीतरी राहतंय असं जे वाटतं राहतं त्याच कारण हेच !!! पण जसं एकीकडे वाट बघणाऱ्याच चित्र त्या एका हिस्स्यापायी अपूर्ण असतं ... तसंच गेलेल्या व्यक्तीच चित्र देखील 'मागे सुटलेल्या' त्या एका हिस्स्यापायी अपूर्णच असतं !!!

Monday 23 July 2012

मग मुलगी का नको…?


….मग मुलगी का नको…?

स्रीभ्रूण हत्येचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचं एक कारण म्हणजे आमीर खानच्या बहुचर्चित “सत्यमेव जयते” या कार्यक्रमात या सामाजिक विषयाला दिलेलं महत्व..खरं तर या कार्यक्रमामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला एवढचं…! कारण या विषयावर पूर्वीपासूनच जागृतीच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम सुरुच आहे. लेक वाचवा अशी आंदोलनही झाली. पण आमीर खानच्या कार्यक्रमामुळे तो विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. तसच या विषयाचं गांभिर्य, स्त्री भ्रुण हत्या केली जात असताना होणारा मातेचा कोंडमारा आणि वैद्यकीय क्षेत्रातली अपप्रवृती यावरही प्रकाश टाकण्यात आल्यानं हा विषय चर्चेत आला.
स्त्री भ्रुण हत्या करणा-या अनेक डॉक्टरांनी त्यांची दुकानंच थाटलेली आहेत. अनेक शहरात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरुय. बीड जिल्ह्यातला परळी तर या प्रकारात बदनाम झालय. परळीतलं डॉ. सुदाम मुंडे यांचे हॉस्पीटल तर ह्या गोरख धंद्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. ह्या हॉस्पीटलमध्ये स्त्रीभ्रुण हत्या होत असल्याचं उघड झालं होतं. त्याचा परवानाही रद्द करण्यात आला होता. पण पुन्हा तो धंदा राजरोसपणे सुरु होता. त्यातच मुलगी नको म्हणून गर्भपात करताना एका मातेचा मृत्यु झाला. त्यानंतर डॉ. मुंडेवर कारवाईसाठी हात उचलला गेला. तो डॉक्टर सध्या फरार आहे. पण हा गोरखधंदा त्या हॉस्पीटलमध्ये होत होता हे सर्वांनाच माहित असताना कोणतीही यंत्रणा त्याकडे का गेली नाही हे न समजण्यासारखे नाही. कारण याच प्रशासकीय यंत्रणा अशा डॉक्टरांना पाठीशी घालतात. हे सुद्धा त्यातलं एक प्रमुख कारण आहे. परळीतला डॉक्टर मुंडे हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारचे डॉक्टर मुंडे जागोजागी आहेत आणि त्यांच्याकडे अशा स्त्री भ्रुण हत्या राजरोसपणे होत आहेत. काही हजार रुपयांच्या मोबदल्यात गर्भपात करण्याचा हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात २५० अधिकृत सोनोग्राफी सेंटर आहेत. यावरुन महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या सोनोग्राफी सेंटरची संख्या आणि तिथं होत असलेले प्रकार याची व्याप्ती लक्षात येते..
मुलगी नको म्हणून जन्माला यायच्या आतच तिला मारण्याचं पाप करण्याचा हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. त्याला जबाबदार असणा-यांनी विचार करायला हवा. हा प्रकार खेडेगावात, आदिवासी भागात जास्त प्रमाणात चालतो असा आतापर्यंत समज होता. पण मागच्या काही दिवसात प्रकाशात आलेल्या माहितीनुसार मोठ्या शहरातून तसच सुशिक्षीत लोकांकडूनही हा प्रकार होत असल्याचं पुढं आलय. म्हणूनच हा विषय आणखी गंभीर होत चाललाय. कारण मुलगी नको, मुलगाच हवा ही मानसिकता सगळीकडे घर करत चालल्याचं यावरुन दिसून येतय. त्यामुळे शहर असो की गाव, सुशिक्षित असो अडाणी, कमी शिकलेला या सर्व स्तरातून मुलगी नको हा विचार नष्ट होणं गरजेचं आहे.

स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी जिल्हातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना सायलंट ऑब्जर्व्हर हे यंत्र बसवण्याचा आदेश दिला होता. त्यातून कोणत्या सोनोग्राफी केंद्रात काय प्रकार चाललाय हे स्पष्ट होण्यास मदत होते. तसच सोनोग्राफी करताना त्या महिलेकडून एक अर्ज ऑनलाईन भरुन घेण्याचा आदेशही काढलाय. पण त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. पण मुंबई हाय कोर्टांनं तो अर्ज फेटाळून लावला. कोल्हापूरात मुलींचं प्रमाण हे दरहजारी ८३९ पर्यंत खाली घसरलंय. थोड्या फार फरकानं मुलींचं हे प्रमाण इतर जिल्ह्यातही असंच घसरत चाललय. त्यामुळे मुलगी वाचवणं ही काळाची गरज बनलय.
स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. तसच प्रसुतीपूर्व व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदाही आहे. पण कायद्याच्या पळवाटा तसच घरातूनच वंशाचा दिवा हवा म्हणून होणारा हट्ट यामुळे अनेक ठिकाणी स्त्री भ्रुण हत्या केली जाते. हे थांबवायचे असेल तर त्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. जोपर्यंत मुलगी नको फक्त मुलगाच हवा ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हा प्रकार थांबणं शक्य नाही. फक्त डॉक्टरांनाही दोष देऊन काही उपयोग होणार नाही. स्त्री भ्रण हत्या रोखण्यासाठी लोकांच्या मानसिकेत बदल होणं गरजेचं आहे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुलींना जन्माला येण्यापूर्वीच त्यांना संपवण्याचा हा प्रकार थांबणं अवघड आहे. कारण सर्वांना मैत्रिण हवी आहे, बायको हवी आहे, आई हवी आहे, बहिण हवी आहे..मग मुलगी का नको…? मुलीला जन्माला येऊ दिलं जात नसेल तर आई, बायको किंवा बहिण कुठून येणार याचा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळेच लेक वाचवा असं म्हणण्याची वेळ आपल्या सर्वांवर आलीय..

अपत्यः मुलगा की मुलगी - एक वादंग!


अपत्यः मुलगा की मुलगी - एक वादंग!

चालु पिढीमध्ये "एकच मुल" ही कल्पना ( नक्की कल्पना की योजना? ) बर्‍यापैकी जम धरतेय. विषय तसा वैयक्तिक आणि सेन्सिटीव्ह आहे. मी ही त्याच त्याच विचाराचा. त्यात बायकोही त्याच मताची मिळाली. मग काय - आम्ही दोघं - आमचं एकच! मात्र आजकाल बर्‍याचदा मित्रमंडळी - पाहुणे - यांच्याकडुन "अरे, वेदिका पाच वर्षाची झाली ना? मग अजुन काय विशेष?" अशी विचारणी चालु असते. आता ते "विशेष" म्हणजे "दुसरा चान्स कधी घेताय?" याचा शॉर्ट कट!

अपत्यः मुलगा की मुलगी [फोटो - अनिकेत समुद्र]
अपत्यः मुलगा की मुलगी [फोटो - अनिकेत समुद्र]

तर - दुसर्‍या अपत्याबद्दल बोलुत. मी जेंव्हा "एकच" या विषयांवर ठाम राहिलो तेंव्हा खालील प्रश्नांची देवाण - घेवाण झाली. आता हे प्रश्न कुणी आणि का विचारले हे न विचारलेलं आणि सांगितलेलं बरं!

ते - वंशाला दिवा हवा!
मी - म्हणजे दुसरं अपत्य मुलगाच हवा - असंच ना?
"तुम्हाला मुलगाच होईल - हे खा - ते प्या - असं करा - तसं करा" या थोतांडावर माझा विश्वास नाही. जर आम्हाला मुलगा व्हायचा होता - तर तो पहिल्यांदाच झाला असता! आता वंशाच्या दिव्याच्या नावाखाली चक्क "मुलगाच पाहिजे" असं सांगताहात. शिवाय मुलगा की मुलगी हे चेक करण्याचीही आपली तयारीच असेल. [ - हो, काही ठिकाणी आजही अशा चाचण्या होतात - शोधल्यावर देवही सापडतो - डॉक्टर का नाही? ] आणि मग जर या चाचणींत "मुलगी आहे" असं कळालं तर अ‍ॅबॉर्शन करा असंही म्हणायचा तुम्ही मागं - पुढं पाहणार नाही!

ते - नाही.. असं नाही - दुसरीही मुलगीच झाली तर हरकत नाही!
मी - असं कसं नाही. उद्या तुम्ही तिला - मुलाच्या जागी जन्मली - असा टोमणा कशावरुन नाही मारणार? शिवाय दोन मुलं सांभाळण्याची आमची तयारी आणि परिस्थितीही नाही! दोघांना चांगल्या परीनं वाढवणं - चांगलं शिक्षण हे मला शक्य नाही.

ते - ज्यांन चोच दिलीय तोच दानापण देईल! गरीबाची मुलंही खेड्यात राहुनही डॉक्टर - इंजिनिअर होतातच ना? तु झालासच ना?
मी - झालं - पुन्हा देवावर भार टाकुन मोकळं! माझी व बायकोचीही यासाठी मनाचीच तयारी नाही. जिथं कुटुंब फक्त माझ्या एकट्याच्या कमाईवर चालतं तिथं - दुसरं अपत्य करुन दोघांनाही उगाच मारुनमटकुन जगवायचं नाही. त्यापेक्षा एकालाच आम्ही चांगलं वाढवु - शिकवु! गरीबाची मुलं - गावी खेड्यात राहुन - तालुक्याच्या ठीकाणी शिकुन डॉक्टर - इंजिनीअर होतात, पण त्या खेड्याचं नाव "पुणे" किंवा "मुंबई" असं नसतं ना!
मी शिकलो ना - पण त्यासाठी - नातेवाईकाकडे शिकायला रहावं लागलं. लहाणपणीच आई-वडिलांपासुन दुर राहणं मी अनुभवलंय. माझ्या अपत्यांनं तेच पुन्हा अनुभवावं असं मला मुळीच वाटत नाही. शिवाय हेच वाक्य त्यांन मला पुन्हा ऐकवावं हे तर मुळीच वाटणार नाही.

ते - राखी-पौर्णिमा/ भाऊबीज यासारख्या प्रसंगी मुलीनं भाऊ म्हणुन कुणाकडं पहावं?
मी - [ हा जरा सेंटी प्रश्न! ] आता एकच मुलगी असणारा मी काय जगातला एकमेव बाप आहे का? काहींनी तर मुलगा - वंशाचा दिवा पेटवता पेटवता - मुलींची अगदी रांगच लावलेली असते ना!
ठीक आहे - मी एक मुलगा दत्तक घेतो. त्यालाच राखी बांधेल.

आता मात्र "दत्तक" विधानासाठी "त्यांची" अजिबात तयारी नसते. त्यामुळं हा प्रश्न इथंच कट् करण्या येतो.

ते - म्हातारपणी मुलगाच सांभाळेल ना? मुलगी लग्न करुन निघुन जाईल!
मी - हो - मुलगी लग्न करुन जाईलच. मात्र मुलगा सांभाळेच कशावरुन? मुलानंच वार्‍यावर सोड्लेले आणि मुलीनं आधार दिलेले आई-वडिलही मी पाहिलेत. आणि महत्त्वाचं म्हणजे - म्हातारपणी आमची कुणी सेवा करणारं [करणारा!] असावं यासाठी मुलगा जन्माला घालणं हे नात्यांपेक्षा - एक बिझनेस डील वाटतं- नाही का? म्हातारपणाची मी तयारी करीनच. मुलीला वाटलं तर ती देईल लक्ष - नाही तर नाही! मात्र तीनं ते करायलाच पाहिजे अशी आमची तरी अपेक्षा नाही.

.... विषय बंद!

 अपत्यं कधी आणि किती असावीत हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र होणार्‍या अपत्याच्या आयुष्याचाही विचार करा ना! करीयर - सेटलमेंट च्या नावाखाली पस्तीसी पर्यंत टोलवा-टोलव करताना आपण खाली दिलेले मुद्दे लक्षात घेताहात का:
अ. आपलं अपत्य जेंव्हा ग्रॅज्युएट होईल तेंव्हा त्याच्या पदवी वितरणात तुम्ही त्यांचे आजोबा - आजी तर वाटणार नाही ना? कारण आता तुम्ही ३०-३५ असाल तर २० वर्षांनी तुम्ही ५०-५५ चे असाल!
ब. आपलं अपत्य शिकुन कमवते व्हायला अंदाजे २५-३० वर्षे धरली तर तुम्ही त्याच्या लग्नात हजर असाल का?

अपत्यं किती असावीत हाही तसाच गहण प्रश्न. माझ्या परिस्थितीच्या [ आर्थिक - सामाजिक सर्व बाबतीत ] मानानं मला एकच अपत्य हवं होतं - आहे. पाहिजे तर माझी लायकी तेवढीच आहे असं समजा. आजचा काळ - आणि १५-२० वर्षांनी येणारा आपल्या मुलांचा काळ यांचा विचार करुनच प्रत्येकानं निर्णय घ्यावा. " उगाच एक ना धड - भाराबर चिंध्या " करुण्यात काय अर्थ आहे. उद्याच्या परिथितीला - अपत्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची ठेवुनच निर्णय घ्या!

प्रश्न बरेच असतात - आहेत - त्यांना उत्तरेही असावीत. मात्र काही प्रश्न अनुत्तरीतच चांगले वाटतात!
ते दोघे मार्केट मध्ये गेले होते...,त्याच्या साठी शर्ट घ्यायचा होता.... ती त्याच्यासोबत होती. त्याने तिचा हात पकडला होता.... अचानक तिचा हात निसटला... त्याच्या हातातून... खूप गर्दी होती.. त्याच्या थोड्यावेळाने लक्षात आला कि तिचा हात सुटला आपल्या हातातून....




तो कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे तिला शोधू लागला.... त्याला काही सुचेचना... घाम फुटायला लागला होता. इतक्यात त्याला ती एका ज्वेलरी च्या दुकानात दिसली.... एक लोकेट बघत होती.... तो त्या दुकानात आला.... त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला..,

ती वळून म्हणाली," छान आहे ना...?? " आणि तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं..., त्याचे डोळे पाणावले होते.....

तिने विचारलं.., " काय झालं...? " त्याने तिला आवेगाने मिठी मारली.... आणि लगेच सावरून म्हणाला..," तुला आवडली आहे का ती चेन ..? "

ती म्हणाली..," हो, खूप...."

तो म्हणाला..," मग हि तुला माझ्याकडून गिफ्ट...."

" कसलं गिफ्ट ....? अरे माझा वाढदिवस खूप दूर आहे अजून.....

" तो म्हणाला...," हे माझा पहीला valentine गिफ्ट तुला."

ती म्हणाली...," are u proposing me...?? "

तो म्हणाला...," हो..., कारण आज जेव्हा तुझा हात माझ्याहातून सुटला तेव्हा मला जाणवला कि..., तुझ्याशिवाय किती एकटा आणि अपूर्ण आहे मी.. प्लीज पुन्हा मला अशी सोडून जाऊ नकोस..., मी... मी..

" ती लगेच म्हणाली...," नाही जाणार....कधीच नाही...... नेहमी तुझ्या सोबत
राहील, शेवटच्या क्षणापर्यंत..." I ♥ You..

मी..माझ्या बाबाला मी रडताना पाहिलंय

आज माझा बाबा मी रडताना पहिल| .
..आज माझा बाबा मी रडताना पहिला .." .
.
माझा बाबा "शांत... चेहरा अन डोळ्यात प्रेम..तो माझ्याशी नेहमी डोळ्यानीच बोलत राहिला ..मी नेहमी त्याला रागीट आणि कठोर समजायचो ..
.
.अन दु:ख झाले कि आईच्या कुशीत लपायचो ..तो मात्र माझेसाठी रक्ताचं पाणी करत राहिला ....!स्वतः च्या हातून ..मी त्याचे...स्वप्नं तुटताना पाहिलंय ..आहो ..
.
.खरच हो..!आज माझ्या बाबाला मीरडताना पाहिलंय ..!.
.
आई मला सहलीस ज...ायचे ..आई बोलायची जायचे नाही... सहलीची फी बाबाने सकाळीच भरलेली असायची...! आई मला सायकलहवी ,,आई बोलायची पैसे नाही ..
.
.दुसरया दिवशी माझे हातात सायकलची चावी असायची ..आईला मी मिठी मारायची ..आई मला जवळ घ्यायची ..तिच्या डोळ्यातील अश्रू ती पदरामागे लपवायची...
.
कारण त्या सायकल साठी बाबाने ..त्याची भाकरी सुद्धा त्यागलेली असायची...!मला हसताने पाहून...उपाशी पोटाने ..मी त्याला शांतहसताने पाहिलंय ..आज ..खरच हो..!माझ्या बाबाला मी रडताना पाहिलंय ..!.
.
मी आता मोठा झालो ..खर्च वाढला .मी हि खूप मज्जा करायचो..
.
.सिनेमा , सिगारेट , मुलींसोबत फिरायचो..पैसे कमी पडले तर आईला मागायचो ..तो थरथरनाऱ्या हातानी राब राबराबायचा ..पण कधीच मला काही कमी पडू ना द्यायचा..!त्याच्य ा निघणाऱ्या प्रत्येक घामाच्या थेंबात..माझाच विचार ..अन माझंच सुख पाहिलंय..पण आज .. खरच हो..माझ्या बाबाला मी रडताना पाहिलंय ....!.
.
तो जळत राहिला दिवा बनून.. माझ्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी ..पण मी त्याचे रक्त न रक्त शोषले . .माझे शौक पुरे करण्यासाठी ..आज चूक कळली मला ..त्याच्या स्वप्नांना पूर्ण करावसं वाटतंय..त्याच्या कुशीत डोकं ठेवून रडावसं वाटतंय ..पण ... आज तू या जगात नाही ..पण तरीही..माझ ्या प्रतेकसंकटात ..मी त्याला माझाविश्वा स बनून उभं राहताना पाहिलंय..होय ..आज मी..माझ्या बाबाला मी रडताना पाहिलंय 

Sunday 22 July 2012







आई-बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी
... तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी ?


अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते
स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते


अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का ?
तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का ?

कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे
वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे

भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने
स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे

"साडी मस्त शोभतीये आज" मनमोकळी दाद दे
आठवणीने सुवासाचा कळीवाला गजरा दे

सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने
खमंग कणीस खातानाचा आनंद मनात टिपून घे

हॉटेलातील मेनू कधीतरी तिच्या चॉईसचा घेऊन दे
आईस्क्रीमची आवड सोडून तिच्याबरोबर कॉफी घे

मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे
वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे

वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे
पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे

झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे
जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे

हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे
नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे
अशी काहीशी साथ दे
मित्रत्वाचा हात दे............

कवी..................





त्या कवीची पोटदुखी काही केल्या थांबत नव्हती ओवा-चुना उपचार घरगुती कश्यालाच दाद देत नव्हती नाईलाज म्हणून डॉक्टर कडे गेले सोबत म्हणून बायकोला नेले डॉक्टर ने नाव ,काय करता विचारले कवी नाव सांगत म्हणाले , कवीआहे मी बायकोच्या कपाळावर सूक्ष्म आठी अन डोळ्यांत दिसली थोडी नाराजी डॉक्टर म्हणाले काल काय खाल्लंय?ओशाळवाण्या नजरेने एकमेकाकडे पाहायल बायकोच्या डोळ्यांत दिसला राग ,कवीच्या लाजअन डॉक्टर ने काढलं खिशातून पाकीट काही नोटा कवीच्या ठेवत हातात ,हळूच वाकले पायावर ठेवलं डोक काही समजायच्या आत कवी पैसे घ्यायला देत होते नकार "गुरुदक्षिणा "आहे स्वीकारा म्हणाले डॉक्टर मी जेव्हा खूप थकतो,उदास होतो ....तुमच्याच कविता वाचत असतो ........नव्या उभारीने मग कामाला लागतो ...शरीर स्वास्थासाठी जशी आमची ...तशी मनशांती ,मन स्वास्थासाठी खरंच समाजाला गरज आहे तुमची कवीच्या डोळ्यांत नवी चमक दिसली बायकोला पहिल्यांदाच नवर्याची महती कळली .

थोडासा समजूतदारपणा,थोडी जाण आणि आनंदाला उधान ......................................

थोडासा समजूतदारपणा,थोडी जाण आणि आनंदाला उधान ......................................

कधीही आपल्या जोडीदारावर लहान -लहान गोष्टीवरून टीका करू नका वा त्याला जबरदस्तीने बांधून ठेवण्याचा प्रयत्न करू नका.कारण कोणतीही व्यक्ती आपले स्वातंत्र्य गमाऊ इच्छित नसते.जेह्वा दोन माणसातील समज एकसारखी असेल तर त्यांचे संबंध जास्त मजबूत होतात . एखाद्या नात्यातील कटूपनाची अनेक कारणे असू शकतात.

Ex - वागण्यातील बदल,जु...न्या गोष्टी उगाळणे,जर या गोष्टी आपल्या जीवनापासून दूर राखण्याचा प्रयत्न केला तर जीवन अधिकच सुंदर होते .

कधीही जोडीदारावर आपला एकाधिकार समजू नका.आपल्या जोडीदाराला लहान सहान गोष्टी वरून नाव ठेऊ नका. प्र्तेकजण आपल्या परीने जीवन जगू इच्छितो.त्यामुळेच जर आपण आपल्या जोदिदारला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल .

झाले गेले विसरून जा - घडून गेलेल्या गोष्टीबद्दल वाद घालून वर्तमान बिघडू नका जर भूतकाळाची एखादी समस्या आपल्या नात्यात विघ्न उत्पन्न करीत असेल तर चर्चेने ती सोडविण्याचा प्रयत्न करा . आपल्या भूतकाळातील गोष्टी जोडीदारापासून लपवू नका . कारण जर चुकीच्या पद्धतीने त्याला समजल्या तर आपल्या सुखी जीवनात विघ्न आणू शकतात.

नात्यात असावा मोकळेपणा - आपले नाते निरोगी राहण्यासाठी लैगिक समस्याही मनमोकळेपणाने बोलाव्यात .याविषयी गप्प राहिल्यास हळूहळू आपण कटू लागता .आपल्या समस्या दीर्घकाळ दाबून ठेवाल तर आपला जोडीदारही गमवाल.

तु तिथं मी.................

तु तिथं मी
(एक प्रेमकथा)














शारदा किती उशीर कितीवेळ तुझी वाट पाहायची.रात्रीचे साडेअकरा वाजुन गेले की गं...अरे हो रे,आज थोडा उशीरच झाला.पण तुझ्यासाठी काही आणलंय मी?
काय?
उकडीचे मोदक तुला खुप आवडतात ना??
हो खुपच आवडतात.रवी डब्यातला एक मोदक खातो.आणि तिच्याकडे बघुन विचारात पडतो..तिला विचारतो,शारदा तुला भिती नाही का गं वाटत?गेली सहा महीने रोज रात्री आपण या झाडाखाली भेटतो.तु माझ्यासाठी कायम काही ना काही घेऊ...न येतेस.
कशाची भीती?
भुताखेतांची?
बावळटच आहेस भुत वगैरे काही नसतं रे..
आणि एकदिवस खरंच भुताने वाटेत तुला आडवलं तर?
तर ते भुत तुच असशील!
चेष्टा पुरे हं आता!
ok sorry,sorry तु असलास की मला कसलीही भीती वाटत नाही रवी!
असं,मग मी तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे सांग ना मला?
पुन्हा कधीतरी सांगेन,आत्ता उशीर होतोय मला जायला हवं.
अगं पण जाताना ते एकदा म्हणुन जा ना जे ऐकायसाठी मी इथे आलोय!
तुच म्हण ना मग.
i love u sharada.
mi 2...
.12 HOURS AFTER....
शारदाला वाचनाची खुपच आवड आहे.पण कामाच्या ओघामुळे तिला गेले कित्येक दिवस वेळच मिळाला नाही वाचनासाठी.पण आज तिला वेळ मिळालाय.म्हणुन ती स्वातंत्रपुर्व काळापासुन असलेल्या एका ग्रंथालयात गेलीय.तिथल्या धुळखात पडलेल्या बर्याच पुस्तकांच्या कपाटामध्ये ती सत्यकथांवर आधारीत असलेली पुस्तके शोधतीये...त्यामध्ये तिला एक पुस्तक मिळतं जे पंचवीस वर्षापुर्वी घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारीत पुस्तक आहे.जेव्हा ती ते पुस्तक उघडते तेव्हा तीच्या पायाखालची जमिनच सरकते.तिच्या तोंडचं पाणी पळतं.अंगाचा थरकाप होतो.ती त्या पुस्तकातली काहीच पाने उलगडतीये.त्यानंतर ते पुस्तक घेउन या पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याची इच्छा ती तिथल्या ग्रंथपालांसमोर व्यक्त करते.त्यांच्याकडे ऊपलब्ध माहीतीद्वारे ते शारदाला त्या लेखकाचा योग्य पत्ता देतात.तो लेखक इथुन फक्त दोन तासाच्या अंतरावर असतो.शारदा लवकरच त्यांच्या घरी पोहोचते.एक पंच्याहत्तर वर्षाचे वृद्ध दरवाजा उघडतात.दारात उभ्या असलेल्या शारदाला पाहुन ते खुपच घाबरतात.त्यांना जब्बर मानसिक धक्का बसतो.त्यांची ही अवस्था पाहुन शारदाला वाटतं की ते आपल्याला आधीपासुनच ओळखतात आणि तिला खुपच घाबरताहेत।हे पाहुन शारदा त्यांना आपली व्यवस्थित ओळख करुन देते.तेव्हा कुठे जाऊन त्यांची परिस्थिती स्थिर होते.तेच त्या पुस्तकाचे लेखक होते.त्यांनी लिहीलेल्या पुस्तकातील या सत्यघटनेविषयी शारदा त्यांना विचारते.ते सांगु लागतात;पंचवीस वर्षापुर्वीची गोष्ट आहे.जेव्हा मी पार्किन्सन कंपनीतल्या रिसर्च कमिटीत काम करायचो.एका खेडेगावात आमचा प्लांट लागणार होता म्हणुन आमची कमिटी तिथलं निरीक्षण करायला गेली होती.पण त्या दिवशी तिथले गावकरी एका युवकाला जबर मारहाण करत आणत होते.एक मुलगी जीवाच्या आकांताने रडत होती.त्याला मारु नका,त्याला मारु नका।असं म्हणत होती पण कोणीही ऐकलं नाही आणि सर्वाँसमोर त्याला एका झाडावर लटकवण्यात आलं आणि त्यातच त्याचा मृत्यु झाला..
पण हे कसं शक्य आहे या पुस्तकात जो फोटो दिलाय तो तर माझ्या प्रियकराचा आहे त्याला तर मी रोज भेटते आणि आम्ही दोघं एकमेकांवर खुप प्रेम करतो.मी तर या पुस्तकातला याचा फोटो बघुनच तुमच्याकडे आलेय..
पोरी ही निसर्गाची किमया म्हण किँवा आणखी काही पण हा तोच मुलगा आहे,ज्याच्यावर तु प्रेम करतेस.
पण तुम्ही हे खात्रीने कसं सांगु शकता.?त्यांनी एका जुन्या कपाटातुन फोटो काढला आणि तिला दाखवला तो फोटो तिचाच होता..ही आहे ती मुलगी जी त्या मुलावर प्रेम करायची आणि जिने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला।तो फोटो शारदाचाच होता.म्हणुनच तर मी तुला पहील्यांदा दाराशी पाहीलं तेव्हा घाबरलो होतो.
मन सुन्न झालेल्या अवस्थेत शारदा तिथुन निघाली.मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते.रवी मेलेला आहे ही गोष्ट गृहीत धरुन चालल्यास घडलेल्या बाकी सर्व गोष्टीँचा योग्य तो मेळ बसत होता.शारदाला ही गोष्ट पुर्णपणे पटली की,रवी जिवंत नाहीये.
रात्र झाली शारदा पुन्हा रवीला भेटण्यासाठी त्याच झाडाजवळ आली होती.
आज पुन्हा उशीर,अगं कितीवेळा तु उशीर करतेस?आणि हे डाव्या हाताला कापड कसलं बांधलयस?
रवी मला तुला काही विचारायचंय?मला खरं खरं सांगशील?
हो,विचार नक्की खरंखरं सांगेन
तुझा जन्म केव्हाचा आहे?
रवीःशेवटी तुला सगळं कळलंय तर..अगं मग मला असं तिरक्याने का विचारतेयस.सरळ विचार ना.होय मी एक आत्मा आहे.मी तुला सगळं खरं खरं सांगतो!
त्याची गरज नाहीये.मला सगळं ठाऊक आहे.मला फक्त एवढंच सांग तु मला तुझ्याबरोबर नेणार आहेस की नाही?मी फक्त तु जिथे जाशील तिथेच जायचंय?सांग मला सोबत नेशील ना?
शारदा काय बोलतेयस तु?मी तुझा जीव नाही घेउ शकत.तुला कळत कसं नाही.असं काय करतेस तु?
जे काय करायचं ते तासाभरापुर्वी केलंय मी...
.काय?काय केलंयस तु?
शारदाने आपल्या डाव्या हाताला बांधलेलं कापड काढलं.आणि त्याला दाखवलं.तिच्या हाताची नस कापलेली होती.अगं हे काय केलंस?याने तुझा जीव जाईल.चल..
थांब रवी माझा जीव मी आधीच दिलाय तासाभरापुर्वीच.मी ही आत्ता जीवंत नाही.माझं शरीर मी मागे ठेवुन आलेय.आत्ता तरी मी तुझी होईल ना.आता तरी मला तुझ्यासोबत नेशील ना?
रवीने शारदाला एक घट्ट मिठी मारली.त्या मिठीतला ओलावा दोघेही अनुभवत होते.दोघांच्याही डोळ्यात अश्रु भरुन वाहत होते.पण ते जमिनीवरही पडत नव्हते,हवेतच विरुन जायचे.जसं काही त्यांचं अस्तित्वच संपलंय.शारदा आणि रवीसारखं......
विकी आणि प्रिया दोन्ही एकाच
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारेविद्यार्थी.
कॉलेजात सोबतच जायचं, यायचंही सोबत
हा त्यांचा जणू नित्यक्रमच झाला होता. तसे
ते दोघेही समजूतदार होते. एकमेकांच्या सुख दुःखात
सहभागी होणं,आलेल्या अडचणी
सोडवणं एवढंच नव्हे तर आर्थिक सहकार्य देखील ते
एकमेकांना करत असत. कोणालाही
अभ्यासात काही अडचणी आल्यात तर ते
एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा करत असत.
प्रियाला सगळ्या मित्रामध्ये सर्वांत आधी आठवण
यायची ती विकीची आणि विकीचा इतर
मित्रापेक्षा प्रियावरच अधिक विश्वास होता.
विकी व प्रियाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरूच
असायचे. विकीवरही प्रियाच्या
आईवडीलांचा चांगलाच विश्वास बसला होता तर
विकीच्या घरी त्याच्यापेक्षा
प्रियाचेच जास्त लाड केले जात होते. त्यामुळे दोघांचे
एकमेकांसोबत एकाच गाडीवर
फिरणे, सोबत सिनेमा पाहणं नेहमीचेच झाले होते.
दोघंही सिन्सियर असल्यानेगेल्या
सात वर्षांपासून कुठलेही भांडण न
होता त्यांची मैत्री कायम होती.
कॉलेजात विकी व प्रिया नेहमीच सोबत फिरत
असल्याने त्याच्या गैरहजेरीत त्यांच्या
इतर मित्र-मैत्रिणींमध्ये त्यांच्याविषयी निरनिराळे
तर्क-वितर्क लढवले जायचे.
प्रिया दिसली रे दिसली की, विकीचे मित्र
तिला चिडवायचे‍. मात्र, प्रियाला
कॉलेजातील वातावरण चांगलेच माहित असल्याने
ती त्याकडे फारसे लक्ष देत नव्हती.
मात्र, विकीच्या मनात प्रियाविषयीच्या प्रेमाचे
बी पेरले गेले होते. त्यात
मित्र त्याला हरभर्याच्या झाडावर चढवत होते.
मग काय विकी चांगलाच फॉर्ममध्ये आला होता.
नेहमीपेक्षा प्रियाची तो जरा जास्त
काळजी घेत होता. विकीच्या मनात काय विचार सुरू
आहेत, याचा थांगपत्ता प्रियाला
नव्हता. विकीच्या वागण्या बोलण्यात कमालीचा बदल
झाला होता.
एकदा विकी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता.
त्या दरम्यान प्रियाला
पाहण्यासाठी मुलाकडचे आले होते व
त्यांनी प्रिया पसंत असल्याचे सांगितले.
प्रियालाही तो मुलगा आवडला होता. पाहुणे गेल्यानंतर
लागलीच प्रियाने विकीला
मोबाइल करून लग्न
ठरल्याची बातमी त्याला सगळ्यात
आधी त्याला सांगितली.प्रियाचे
लग्न ठरल्याचे ऐकून विकीच्या पायाखालची वाळूच
सरकली. सात वर्षापासून प्रियाच्या
निस्सिम मैत्रीला विकी प्रेम समजून बसला होता.
मोबाईलवर तिच्याशी संवाद साधत
असताना विकीची जीभ अडखळत होती. मोठ्या हिमतीने
त्याने प्रियाचे अभिनंदन केले. मात्रबाहेरगावाहून
आल्यानंतर विकी प्रियाला
टाळू लागला. कॉलेजातही तो आता तिच्यासोबत न
फिरता त्याच्या मित्रांमध्येच वेळ
घालवू लागला. मुकेश, मोहम्मद रफीची दुःखद
गाणी ऐकायला लागला. एकांतात रहायला
लागला. प्रियाने
आणि त्याच्या घरच्यांनीही त्याला खूप समजावले. पण
काहीही उपयोग
झाला नाही.
प्रियासोबत घालवलेले 'मैत्री'चे क्षणविसरण्यासाठ
ी विकीला सिगारेट ओढण्याची सवय
जडली. प्रिया रस्त्याने दिसली की, तिच्यासमोर
सिनेस्टाइलमध्ये सिगारेट ओढून
मित्रांमध्ये दर्द भरे नगमे मोठमोठ्याने गायचा. त्याचे
प्रियाला खूप वाईट
वाटायचे. जणू त्याचा 'देवदास' झाला होता.
मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
विकीने आधीच प्रियाजवळ आपली
प्रेमभावना व्यक्त केली असती तर त्याच्या मनातील
गैरसमज वेळतच दूर झाला असता.
सात वर्षांच्या मैत्रीची फुललेली वेल क्षणात गळून
गेली नसती.

Saturday 21 July 2012

ए ग्रेट लव स्टोरी ..

ए ग्रेट लव स्टोरी ..


एक मुलगा आपल्या girlfriend ला पार्क मध्ये रोज भेटला जात असे ...
मुलगा रोज वेळेवर जात होता,पण ती मुलगी नेहमी उशिरा येत असे..
पण तो कधीही तिच्यावर नाराज होत नव्हता..
पण एके दिवशी तो मुलगा पार्क ला येत नाही म्हणून ती मुलगी रागाने घरी जाते ..
तिथे गेल्यावर समजते कि त्याला ब्लड कॅन्सिर आहे ...आणि तो फक्त ५ ते ६ दिवसच जगणार आहे ....
ती मुलगी रडत आपल्या घरी येते आणि ती आत्महत्या करून त्याच्या साठी एक लेटर ठेऊन जाते ..
त्या लेटर मध्ये असे लिहले असते कि,

"तू माझी वाट पाहत होता तेंव्हा मी दररोज उशिरा येत होते, आणि आता आज मी तुझ्या पेक्षा लवकर जात आहे आणि तिथे मी तुझी वाट पाहीन "

तर ते आहे प्रेम....!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,


तर हे प्रेम नाही हा तर मोह...!






तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,

तर हे प्रेम नाही ही तर वासना...!



तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,

तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...!



तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,

तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...!



जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,

तर ते आहे प्रेम...!



जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता...,

तर ते आहे प्रेम...!



जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता...,

तर ते आहे प्रेम....!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!



जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही

आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल...,

तर ते आहे प्रेम...

जीवनात ह्या ७ गोष्टी नक्की आत्मसात कराव्यात


१ तुमच्या सुखाचे तुम्हीच अधिकारी आहात
ते कोणीही हिरावू शकत नाहीत
२ तुमच्याबद्दल इतर लोक काय म्हणतात हे
ह्याचे आपल्याला काही देणे घेणे नसावे
३ कितीही वाइट किवा चांगली परिस्थिती असुदेत
ती एका नं एक दिवस नक्कीच बदलणार आहे
४ तुमचे काम हे तुम्ही आजारी असल्यावर
जबाबदारी घेणार नाही
तेव्हा लाखमोलाचे मित्र उपयोगी पडतात त्यांना जपा .
५ तुम्ही कसे दिसत किवा इतरांना काय वाटत ह्यापेक्षा
तुम्ही आहे तसे जगासमोर या ते जास्त भावते .
६ आयुष्य हे खूप थोडे आहे
तेव्हा ते थोडेसे आयुष्य इतरांचा दुस्वास करण्यात
वाया घालू नका
७ कोणतीही गोष्ट अति करू नका
सदैव आनंदी राहा ......

Friday 20 July 2012

अखेरचा डाव…

अखेरचा डाव….!








बेल वाजली तिनं दार उघडलं ! धाप आवरत तो घरात आला. तिनं पटकन आत जाऊन पाण्याचा ग्लास आणला.
“तो’ पाणी पित असताना तिनं खुणेनंच चहाविषयी विचारलं! त्यानं होकारार्थी मान हलविली.
आता त्याची धापही थांबली! त्यानं शर्ट काढला. तिथंच खुर्चीवर टाकला. त्याच खुर्चीवर रेलून पाय लांबविले आणि “ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही…’ ची मस्त शीळ देत डोळे मिटले.
चहा घेतोस नं!
तिच्या हाकेनं तो भानावर आला. त्यानं कप घेतला आणि चहाचे घोट घेऊ लागला.
ती समोरच्या खुर्चीवर बसून चहा घेऊ लागली आणि त्याच्या “हॅपी मूड’मुळे सुखावली.
आजारपणामुळे त्याचं हास्य विरलंय हे तिला माहित होतं, त्यामुळेच त्याचा आजचा मूड पाहून तिला बरं वाटलं.
न राहवून तिनं विचारलंच,”"आज एकदम मूड चेंज, काय भानगड?’
“”ह्या, भानगड-बिनगड काहीही नाही! असंच! बरं पटकन आवर. बाहेर जायचंय. किशोरीच्या कार्यक्रमाची दोन तिकिटं आणलीत!”
तिच्या परवानगीची वाट न पाहता तो उठून आवरू लागला!
क्षणभर तिला काही कळेचना. तिनंही झटपट आवरलं! त्याला आवडणारी गुलाबी रंगाची साडी नेसून ती तयार झाली.
तिला पाहताच पुन्हा एकदा त्याच्या ओठांवर “ए मेरी जोहराजबी…’ची शीळ आलीच.
“चलायचं!
दोघेही रस्त्यावर आले. नेहमीप्रमाणे तिची पावलं बसस्टॉपकडे वळली, तोच “टॅक्‍सी’ या त्याच्या हाकाऱ्याने ती उडालीच. आज टॅक्‍सी!
दोघे टॅक्‍सीत बसले! तिला आज तो नेहमीपेक्षा वेगळा-वेगळा भासला! आज त्याचा मूड एकदम कसा काय बदलला?
थिएटरच्या गेटसमोर टॅक्‍सी उभी राहिली आणि तिची विचारांची श्रृंखला खंडित झाली.
त्यानं टॅक्‍सीवाल्याला पैसे दिले. तिच्या हातात कार्यक्रमाची तिकिटे देऊन तिला पुढे जाण्यास सांगितले.
तिकिटं घेऊन ती अँपी थिएटरच्या पाठीमागील बाजूस गेली. समोर उभ्या स्वयंसेवकाच्या हातात तिकिटं दिली आणि बसण्याची जागा विचारली!
त्यानं तिकिटं हातात घेतली आणि मागून येण्याविषयी खुणावलं! ती पाठोपाठ चालू लागली. “किशोरी’ मंचावर जेथे बसणार त्याच्या बरोबर समोर भारतीय बैठकीकडे त्या स्वयंसेवकाने खूण केली! काहीशी अवघडून ती त्या बैठकीवर जाऊ बसली! आत्तापर्यंतचे पाहिलेले सर्व कार्यक्रम थिएटरच्या शेवटच्या कोपऱ्यात बसूनच पाहिलेले असल्याने एकदम पहिल्या रांगेत जाऊन बसणे ही कल्पनाच ती करू शकत नव्हती आणि आत्ता तर खास बैठकीवर. तिचं लक्ष तिकिटांकडे गेलं. पहिल्या रांगेतील खास तिकिटे होती.
एवढ्यात तो ही आलाच!
“”जरा तिकडं बघतेस!’ असं म्हणून त्यानं तिच्या केसांत मोगऱ्याचा गजरा माळला.”
अपूर्वाईने मोहरलेल्या तिच्या श्‍वासांत मोगऱ्याचा गंध काठोकाठ भरला! ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली.
तिची नजर चुकवत तो कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहू लागला!
तब्बलजीने तबला ठीक केला, तानपुऱ्यावरील मुलीनं तारांना ताण दिला. सतारीचे स्वर ठीक केले गेले आणि त्याच वेळी किशोरी मंचावर आल्या…
स्वरांच्या एकेक लडी उलगडल्या आणि मैफलीत रंग भरू लागला.
“जाईन विचारीत रानफुला…’ किशोरींनी सुरू केलं आणि… वाह।।। च्या उत्स्फूर्त प्रतक्रिया उमटल्या!
त्यानंही तशीच दाद दिली. तल्लीन होऊन किशोरी ऐकत असताना त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या स्पर्शाचं गाणं तिच्याभोवती फेर धरून नाचू लागलं!
ती गाणं विसरली. भूतकाळात गेली. पाच वर्षांपूर्वी अखेरच्या स्टेजच्या कॅन्सरशी झगडत असताना “तो’ आयुष्यात आला!
ंसह घरातील सर्वांनी जेव्हा आपल्याला दूर लोटलं तेव्हा त्याने आधार दिला. जगण्याची उमेद जागवली. वर्षभर सेवा केली! मरण लांबवलं! सहवासानं ओढ वाढली!
एक दिवस चहाला म्हणून रेस्टॉरंटमध्ये गेलो, तेथे लग्नाविषयी विचारलं! स्वतःविषयी सांगितलं! दोन मुलं अमेरिकेत! त्यांना बापाची गरज नाही. नातवंडांसाठी आजोबा अनोळखी. पत्नी दहा वर्षांपूर्वीच गेली! घरी एकटाच राहतो. कॅन्सरग्रस्तांच्या रुग्णालयात सेवाभावी वृत्तीनं काम करतो आणि आता आधाराची गरज आहे.
“नाही म्हणूच शकले नाही!’
सहजीवन नव्याने सुरू झालं. सुखाचे दिवस आल्याचं वाटत असताना “त्याला’ही ब्रेन ट्यूमर असल्याचं समजलं आणि आशेच्या पालवीने नव्याने फुललेल्या झाडाला दुःखाची वाळवी लागली! गेले वर्षभर दोघेही एकमेकांच्या आधाराने जगत अखेरच्या दिवसाची वाट पाहत असताना… आज अचानक?
टाळ्यांचा गजर झाला आणि तिची विचारमालिका भंगली.
दोघेही उठले…बाहेर आले…
त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवले! तेथून बाहेर पडले आणि चालत चालत नदीकाठी आले.
नेहमीप्रमाणे अनेक जोड्या बसलेल्या.
दोघेही एका ठिकाणी बसले… बराच वेळ कोणीच काही बोलले नाही!
पाण्यावर उमटणाऱ्या तरंगावर चांदणप्रकाशाचा खेळ रंगलेला.
तिनं मौनाला बोलतं केलं!
“काय विशेष? स्वारी आज एकदम वेगळ्या मूडमध्ये…घरात शीळ घालून गाणं काय?, येताना टॅक्‍सी, मग “किशोरी’ तीही पहिल्या रांगेत बसून…गजरा…रेस्टॉरंट आणि आता इथे… काय दोघांच्या मरणाची तारीख समजली की काय?
तो काहीच बोलला नाही! फक्त नदीकडे पाहत राहिला!
“बोल ना काही तरी! नाही तर जाऊ या घरी’ म्हणून ती उठू लागली!
आता त्याचं मौन सुटलं! तो आश्‍वासक हसला!
हसतोस काय? आपण अवघ्या काही दिवसांचे पाहुणे आहोत हे विसरलास काय?
काहीही विसरलो नाही! असं म्हणत त्यानं शर्टाच्या आतून छानसा गुलाब आणि पाकीट काढलं आणि तिच्या हाती दिलं, म्हणाला, “हॅपी व्हॅलेंटाईन!’
आता तिला दिवसभराच्या त्याच्या वागण्याचा अर्थ उमगला! तिचे डोळे भरले! जाता जाताही तो आपल्याला आनंदाचे क्षण देतोच आहे! तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला!
बराच वेळ रडल्यानंतर तिनं डोळे पुसले आणि पाकीट फोडून पाहिले.
कसली तिकिटं आहेत?
“पुढच्या आठवड्यात आपण लंडनला जातोय!’
“कशाला?’
“दोघांवरही शस्त्रक्रिया करायची आहे. दोघांचेही कॅन्सर शेवटच्या स्टेजला असले तरी होप्स आहेत! मग निदान जाता जाता दोघांसाठी एक डाव खेळून बघायला काय हरकत आहे! त्याचीच ही गिफ्ट! हॅपी व्हॅलेंटाईन!
त्यानंतर दोघे कितीतरी वेळ भविष्याविषयी बोलत राहिले!

कुठेतरी छानसे वाचलेले ……

♥ हृदयस्पर्शी कथा... ♥ ♥ ♥

♥ हृदयस्पर्शी कथा... ♥


दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेज मधे होते. इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची.


ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार.
तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा.

सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची, ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा.. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची.. आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं.."अरे! आज मला युनिव्हरसिटीत थोडं काम आहे. येतोस का बरोबर?"
असा नुसता तिचा फोन आला.. आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला. त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, "अरे, निदान जेवण तरी संपव..." पण त्याला कुठे भान होता... बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची. आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही. ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तीचे केस वाऱ्यानी उडायचे, हलकेच त्याच्या गालवर बसुन त्याला गुदगुली व्हायची.
लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं.
तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं. त्या करता ती मेहनतही तशी घेत होती. तास न तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसुन रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा.
परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्या करता तो खरं जास्तीच होता. आणि ती? तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं..

त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.
हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या.
तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही, तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन.
"आज मी खूप खुष आहे. एक गंमत झाली.
तुला विनय आठवतोय? दादाचा बेस्ट फ्रेंड? अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.
परवाच आला तो १५ दिवसांकरता.
आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला. आणि त्यानी मला चक्क प्रपोज केलं!! म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन! मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल.
आई-बाबांना सुद्धा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगीतलं. येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर परत जायचं आहे ना...म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.
तुला पण कोणी आवडत असेल, तर तु मलाच पहिलं सांगशील ना?"

तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच "हं" केलं..
तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी.. ती त्या गुलाबाकडेच बघत होती..

एक सुंदर प्रेमकथाः





अंकीता आणि शुभम हे लायब्ररीत बसलेत.अंकीताला वाचनाची आवड आहे तर शुभमला मोबाईल चॅटची..वाचचाना तिचं थोडं लक्ष शुभमवर जातं.तो मोबाईलमध्ये डोळे घालुन बसलाय.अंकीता त्याला सहजच म्हणते,i love u.हे ऐकताच शुभमने समोर बघत फोन कडेला ठेवुन दिला.आणि म्हणाला,हो मला माहीतीये.पण,तु मला सारखी सारखी याची जाणीव का करुन देतेस..
अंकीताःयाची दोन कारणं आहेत,एकतर तुला माझ्या प्रेमाची जाणीव झाली पाहीजे.आ...णि दुसरं म्हणजे तु अशावेळी तुझा फोन बाजुला ठेवुन माझ्याशी बोलु लागतोस.जे मला हवं असतं.आणखी एक कारण आहे ते म्हणजे,या तीन शब्दात एक जादु आहे.जेव्हा भविष्यात कधीतरी आपण वेगळे व्हायची वेळ आली तर हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील.
शुभम तिच्या हातातलं.पुस्तक हिसकावुन घेतो.आणि म्हणतो,मला तेवढे टोमणे मारशील मोबाईल या मुद्द्यावरुन.पण तु तेवढं तेच तेच हे रोमियो ज्युलीएटचं पुस्तक कितीवेळा वाचशील?
अंकिताःहे पुस्तक माझ्यासाठी खुपच खास आहे.आणि तुलाही भविष्यात याच पुस्तकाची गरज पडेल कधीतरी.
शुभमःछे छे कधीच नाही पडणार गरज..,bt i love 2
अंकीताःi know...
मित्रांनो या भेटीनंतर तर तुम्हाला कळलंच असेल की,त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते.bt कहानीमेँ twist जरुरी है बॉस..तोच इथे सुरु होतोय.चला तर मग तोच अनुभवुया.काही दिवसांनंतर
रोज कॉलेजला वेळेवर येणारी अंकिता आज कॉलेजवर आलीच नाही गेली दोन तास शुभम तिची वाट पाहतोय.तिचा फोनही स्वीच ऑफ आहे.
तो तिच्या घरी जातो.पण तिच्या घराला कुलुप आहे.शुभमला काही सुचत नाही.आजपर्यँत कुठेही पहीला मला सांगुन जाणारी अंकीता आज मला न सांगताच कुठे निघुन गेली.या चिँतेने शुभम खुपच व्याकुळ झाला.त्याला काही सुचतच नव्हते.त्याला ही गोष्ट पटतच नसते की,अंकिताने माझ्यासाठी काहीच मॅसेज सोडला नाही.थोडा विचार केल्यावर त्याला एक गोष्ट आठवते.तो बाईक स्टार्ट करतो आणि लायब्ररीवर जातो.तिथे चौकशी केल्यावर कळतं की,अंकीता सकाळी लवकर इथे येऊन गेलीय.त्याला ती वाचत असलेल्या रोमियो ज्युलिएट या पुस्तकाची आठवण होते.तो ते पुस्तक उघडतो.पुस्तकात त्याची शोधाशोध सुरु होते.पण त्यात काहीच त्याला सापडत नाही.तेवढ्यात त्याला अंकीताची ती लाईन आठवते जेव्हा तिने म्हटलं होतं,कि जेव्हा भविष्यात आपण वेगळे होण्याची परिस्थिती येईल तेव्हा i love you हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील.त्याला काहीतरी सुचतं.तो पुन्हा तेच पुस्तक उघडतो आणि बरोबर त्यातलं 143(I LOVE YOU=143)नं चं पान उघडतो.ते पान चिकटवलेलं असतं.ते पान तो एका बाजुने फाडतो.त्यात एक चिठ्ठी असते.त्यात लिहीलेलं असतं,
मला माहीती होतं शुभम तु येथवर पोहोचशील.कारण हे माझ्या प्रेमाचं नशीब होतं.आता तुझ्या प्रेमाच नशीब काय आहे ते पाहायचंय.जेव्हा तुझ्या हातात हे पत्र पडेल तोपर्यँत कदाचित मी कलकत्याला पोहोचलीही असेन.माझी 11:30ची ट्रेन आहे.काल पप्पांचं पत्र आलं होतं त्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहीलाय.आज तातडीने यायला सांगितलंय.मला माझं नशीब आजमावायचंय.तु माझ्या नशीबात आहेस की तो मुलगा माझ्या नशिबात आहे....तुझी अंकीता
साडेअकरा वाजायला फक्त पंधरा मिनिटे कमी असतात.रेल्वेस्टेशनपर्यँतचं अंतर अर्धा तासाचं असतं.शुभम आपल्या बाईकवर बसुन भन्नाट वेगाने रेल्वेस्टेशनकडे निघाला.अर्ध्या तासाचं अंतर त्याने फक्त सतरा मिनिटांत पुर्ण केलं.त्याने बाईक तिथेच सोडली आणि धावत धावत रेल्वेस्थानकावर अंकीताला शोधु लागला.चौकशीअंती कळालं की कलकत्याची रेल्वे दोनच मिनिटांपुर्वी निघालीय.तो खुपच निराश झाला.त्याचं दुःख अश्रुरुपाने डोळ्यात भरुन आलं.त्याचं नशीब त्याला दगा देऊन गेलं होतं.तो त्याच नैराश्यावस्थेत तिथल्या एका बँचवर बसुन राहीला.तेवढ्यात एक अलगद हात त्याच्या खांद्यावर पडला त्याने मागे वळुन पाहीले.तर ती अंकीताची एक मैत्रीण होती.ती म्हणाली अंकिता तुझ्यासाठी काहीतरी देउन गेलीय.
तो म्हणाला,काय?
तीःते तु अंकीतालाच विचार..ती बाजुला झाली तिच्या मागे अंकिताच उभी होती.अंकिताला पाहताच त्याचे हुंदके अनावर झाले आणि तो अंकीताला मिठी मारुन रडु लागला.
अंकिताने योग्य तो निर्णय घेतला होता.शुभमला सोडुन न जाण्याचा,कारण तिने बुद्धीनं नाही.मनाने निर्णय घेतला होता,म्हणुनच तर ट्रेन निघुन गेली पण,अंकीता नाही...

मित्रांनो आजवर घडलेल्या ९०% प्रेमकथांचा अंत यापेक्षा पुर्णपणे विरुद्ध होतो.मुली शेवटच्या क्षणी वडीलांचं ऐकुन किँवा त्यांचा विचार करुन बुद्धीने निर्णय घेतात.आणि मनातल्या भावनांना दाबुन टाकतात..कधीकधी याचा खुप मोठा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो.frnds मी कोणाविरुद्ध तक्रार करत नाही.मला फक्त एवढंच सांगायचंय."दिलके मामले में हमेशा दिलकी सुनो,ना की दिमागकी"...♥♥♥

एक हृदयस्पर्शी प्रेमकथा:-

एक हृदयस्पर्शी प्रेमकथा:- 


एक मुलगा तिच्या GF
च्या रोजच्या SMS
( I LOVE YOU ,I MISS YOU ) ने
त्रासला होता .
एके दिवशी तो एक SMS
RECIVE करतो पण न वाचताच झोपतो......

दुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन
येतो ...♥♥♥
कि काल रात्री तिची मुलगी कार
अपघातात मरण पावली ....
तो गोंधळतो आणि
तो मुलगा फोन मधील SMS
वाचतो....."DEAR PLEASE
तुझ्या घरासमोर ये ,माझा अपघात
झाला आहे........ ♥♥♥

आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ....PLEASE ..."
पण तो कमनशिबी मुलगा
तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो.............♥♥♥

यावरून मला तुम्हाला एवढाच
सांगावेसे
वाटते कि
आपल्या जवळच्या ,
आपल्यावर प्रेम
करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका.....
कारण ती व्यक्ती आपल्यावर
मनापासून
प्रेम करत
असते.........♥♥♥

Thursday 12 July 2012

जीवन एक गाणे...!!!





जीवन एक गाणे...!!!

जीवन म्हणजे काय...??? हा प्रश्न जर आपण केला तर असे दिसेल कि या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुरूप बदलत असते. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन,आकलन, संस्कार ते संकल्पना भिन्न आहेत. कारण प्रत्येकाला स्वतःची दृष्टी आहे आणि त्याच प्रमाणे त्याला तशी सृष्टी भासत असते. मानले तर जीवन म्हणजे एक मुक्त विद्यापीठ....कारण अजूनही आपण विध्यार्थी आहोत

दृष्टीकोन, आकलन, संस्कार तसेच संकल्पना यांच्या मर्यादा ज्ञात आहेत. आपल्याला आपल्यातील अपूर्णत्वाची जाणीव तसेच भान असते ज्ञानाची तसेच अज्ञानाची कल्पना-जाणीव सुद्धा आहे. सामान्यतः ज्ञान मिळाले म्हणजे अज्ञान नाहीसे झाले असे समजण्यात येते कारण ज्ञान व अज्ञान यांना विरुद्धार्थी शब्द समजण्यात येते. मात्र विरुद्धता त्याठिकाणी परस्पर पूरकता देखील आहे.

ज्ञाना विना अज्ञान तसेच अज्ञान विना ज्ञान यांचे आकलन होत नाही. ज्ञानाला प्रकाशाची उपमा देण्यात येते तसेच अज्ञानाला अंधाराची उपमा देण्यात येते. प्रकाश आला म्हणजे अंधार नाहीसा होतो का ...?? असा जर का प्रश्न केला तर उत्तर एकच अंधार कधीही नाहीसा होत नाही तर प्रकाशामुळे त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही इतकेच तसेच प्रकाश किरण जिथे पर्यंत पोहचतात त्याच ठीकाणाचा अंधार आपल्याला जाणवत नाही. प्रकाशामुळे अंधार अप्रत्यक्ष स्वरूप धारण करतो ...तसेच प्रकाश नाहीसा होताच पुन्हा अस्तित्व प्रकट करतो प्रत्यक्ष स्वरूप धारण करतो हे अगदी निर्विवाद.

आपलं जीवन अर्थपूर्ण असावं, जीवनात काही तरी चांगले- वेगळं करावं, ही प्रेरणा आपल्याला जात्याच उपजत असते. पण तरीही बहुसंख्य माणसांना खऱ्या खुऱ्या आनंदाचा- सुखाचा शोध लागत नाही आणि आपल्या जीवनाचे प्रयोजन समजत नाही, ही पण एक वस्तुस्थिती आहे. आज भौतिक संपन्नतेच्या जगात लौकीकार्थानं सुखोपभोगाला तोटा नाही. तरीही मग आज आपण इतके अस्वस्थ का..???माणसाला जर खरं सुख मिळायचं असेल तर सर्व प्रथम माणसाचे निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते हवे. ...प्रत्येकानं आपल्या आवडीचं काम केलं पाहिजे व काही प्रमाणात अंगमेहनत केली पाहिजे. तरच शांत सुखाची झोप लागते. आणिक एक गोष्ट म्हणजे, जिव्हाळ्याचे समाधानी कौटुंबिक जीवन शेवटची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ‘जीवाचे मैत्र’. वेगवेगळ्या लोकांशी स्नेह-मैत्रीचे संबंध ठेवणे. व्यक्ती व समाजाचे सुख एकमेकांत गुंतले आहे व निसर्गाशी समरस होऊन त्याचा विध्वंस न करता एकरूप होण्यात आहे.

जीवनाचा प्रवास सकारात्मक असावा पण त्या बरोबर नैतिक आणि पारमार्थिक सुद्धा असावा मग तो नक्की सुखाचा आणि समृद्धीचा होतोच कारणं जिथे प्रेम जिव्हाळा भावना असतात तोच तर खरा संसार........!!!
अवघाची संसार सुखाचा..

स्त्रोत -श्री.शिरीष दातार.

Monday 9 July 2012

- व.पु.- व.पु.

स्वतःची विचारसरणी कशी असावी हे ही काही माणसं इतरांवर अवलंबून ठेवतात ...
असं का ???
स्वतःची विचारसरणी देखील ज्याची त्याच्या मालकीची नसावी ... लोग काही का बोले ना ...

किती बोललं गेलं यापेक्षा किती ऐकलं गेलं याला महत्व आहे ...
किती खाल्लं यापेक्षा किती पचलं... किती पाहिलं यापेक्षा किती उमटलं.. याला महत्व आहे ...
हे ज्यांना कळत नाही त्यांना मग आपल्याला थकवा कशाचा आलाय याचाही पत्ता लागत नाही ...
मग सगळ्या चिंता विसरण्यासाठी ही माणसं चौपाटीवर येतात ... नाहीतर एखाद्या रम्य स्थळी जातात ...
पण तिथे जाऊन ही ती शांत होतात का ... चौपाटीवर जाणारी माणसं केवळ समुद्र किंवा आकाश पहायला जातात ??
तिथे सुद्धा ही माणसं हेवा, मत्सर अश्या क्षुद्र गोष्टी घेऊन येतात ... निसर्गाच्या जवळ येऊन देखील निसर्गाच्या लांब असतात ...
स्वतःच्या भविष्याचा विचार करतात ...

ते वाईट आहे अश्यातला भाग नाही ...
पण त्यात ती संपूर्ण हरवतात का ?? नाही ...
त्यांची भविष्यकाळातील मनोराज्य देखील क्षुद्र असतात ... स्वार्थामध्ये गुरफटलेली असतात ...

जो माणूस कशातच हरवत नाही तो माणूस कसला !!!!

- व.पु.