Monday 30 July 2012

-व.पु काळे

१)कोणताही स्वार्थ नसतो ,तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो.
२)आपल्या वाचून कुणाचं तरी अडतं हि भावना सौख्यदायक असते.
३)सगळी उत्तरं आपल्याजवळच असतात.समस्या आपली आणि त्याचं उत्तरं मात्र इतरत्र असे घडत नाही.
उत्तराची मागची बाजू म्हणजे समस्या.आपण फक्त आपली बघण्याची दिशा बदलायची.स्वतःकडेच नीट पाहायचं.
'पिंडी ते ब्रह्मांडी' असं म्हणतात ते सत्य आहे.
४)लपून राहणं हा प्रकाशाचा गुणधर्म नाही.
५)सगळे प्रॉब्लेम्स चांगुलपणातूनच निर्माण होतात.
६)परदु:ख नेहमी शीतल असतं.
७)"काळजी नको करूस" असं कुणी सांगणारं असलं म्हणजे माणूस जास्त काळजी करायला लागतं.
८)बर्फ हा नेहमी नऊ दशांश पाण्याखाली असतो आणि एक दशांशच वर दिसत असतो.संसारातल्या अडचणी, मानापमान
आणि दु:ख पण अशीच असतात.नऊ दशांश न सांगता येण्यासारखी.सांगितली तर खोटी वाटणारी.एक दशांश न सांगता दिसणारी
किंवा सांगितलं तर लगेच पटणारी!
९)एखाद्या बाईच्या प्रेमात पडण्याचा एखादाच क्षण असतो.तसाच उबग येण्याचा क्षणही एकाच असतो.

१०) ज्याच्याबद्दल नाना कल्पना करता येतात, विरंगुळा मिळवता येतो असा एकंच दिलासा म्हणजे 'उद्याचा दिवस'.

११)"तुम्ही बायका अशाच असता.वरून लावलेले रंग तुम्ही वरच्या वर वागवू शकता.वरच्या वर झटकू शकता.
तुम्ही बायका कमळाच्या पानासारख्या असता.अंगाला काही चिटकू न देणाऱ्या.पुरुषाचं तसं नसतं.
तोंडाला फासलेल्या रंगाचीच त्वचा कधी होते ते त्यालाही काळात नाही.तो रंग तेलानं जात नाही,साबणानं निघत नाही.
ओरबाडून काढावा तेव्हा प्राण कासावीस होतात.
मग कळतं कि, रंग म्हणून आपण खरबडत होतो, ती कातडीच होती.

No comments:

Post a Comment