Monday 2 January 2017

एकट असाव अस वाटत



एकट असाव अस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

अवती भोवती रान सगळ
मुक मुक असत
वाट दिसु नये ईतक
धुक धुक असत
झाडाखाली डोळ मिटून बसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

येते येते हूल देते
सर येत नाही
घेते घेते म्हणते तरी
जवळ घेत नाही
अशा वेळी खोट खोट रुसावस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

कुठे जाते कुनासठाउक
वाट उन्च सखल
त्यात पुन्हा सगळीकडे
निसरडीचा चिखल
पाय घसरुन आदळल्यावर ह्सावस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

पाखर जरी दिसली नाहीत
ऐकु येतात गाणी
आभाळ कुठल कळ्त नाही
इतक निवळ पाणी
आपल्या डोळ्यात आपल रूप दिसावस वाटत

ओळीमागुन गाण्याच्या
थरारत जावस वाटत
आभाळतुन रन्गाच्या
भरारत जाव
सुराच्या रानात भुलुन फुलावस वाटत


कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत ............

"आई तुम्ही ..... म्हणून आम्ही..."

 तीन जानेवारी 1831 पासून 10 मार्च 1897 हे त्यांचे आयुष्यमान देशासाठी आधुनिक जगण्याचा, बनण्याचा महामंत्र देणारे ठरले. नायगावच्या सावित्री खंडोजी नेवसे पाटील पुण्याच्या सावित्रीबाई जोतिराव फुले झाला. तेथून त्यांच्या जीवनाला आणि देशाच्या इतिहासाला वेगळे वळण मिळाले. भारतीय समाजात वेगळेच स्थित्यंतर घडून आले. सा-या जगाला वंद्य ठरलेल्या जोतिरावांच्या कार्याला सक्रिय साथ-संगत देत त्यांनी कार्यकर्तृत्व घडवले ही साथसंगत केवळ ‘मम’ म्हणणारी आणि उखाण्यात सांगणारी कधीच नव्हती. अंत:प्रेरणांसह परिवर्तनाचे मैदान त्यांनीही निवडले. परिवर्तनासाठी समाजभूमी तयार करणारी भूमिका घेतली.जात, वर्ण, वंश, लिंग, धर्म या आधारावर विषमता पोसणा-या समाजाला छेद दिला. भेदाभेद करणा-या तथाकथित संस्कृतीला आव्हान दिले. शोषितांच्या उत्थापनाचा ध्यास आणि शोषकांच्या स्वार्थी प्रवृत्तीविरुद्धचे युद्ध जोतिराव गोविंदराव फुले आणि सावित्रीबार्इंनी पुकारले. परिणामी, आज भारतभर अनेक सावित्री विविध क्षेत्रांत आपली मुद्रा उमटवीत आहेत. जोतिराव फुले आणि सगुणाबाई उपाख्य आऊ यांच्या संगतीने सुरू झालेला त्यांचा चैतन्यमयी कार्यप्रवास आश्चर्यकारक आहे. स्त्रियांना कोणतेच स्वातंत्र्य नव्हते त्या काळात स्त्रियांसाठी परिवर्तनाचे प्रशस्त मार्ग त्यांनी निर्माण केले. शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्या सामाजिक, धार्मिक कौटुंबिक स्वातंत्र्यासाठी नवा विचार, नवे कार्य आरंभिले आणि पूर्णत्वास नेले. आपल्या आयुष्यातील पन्नास वर्षे सामाजिक युद्धात घालविली. या युद्धात झालेले आघात, छळ सहन केला. मात्र, आपला मार्ग आणि शेवटी अपले यश कायम ठेवले. सा-या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या. विविध वर्गांसाठी अभ्यासक्रम तयार केले. असंख्य मुलींना प्रेरणा देऊन ज्ञानक्षेत्रात आणले. शिक्षण नव्हे, ज्ञान दिले. त्यातूनच मुक्ता साळवेंचा विद्रोही आविष्कार घडला. आधुनिक भारताच्या शिक्षणाचे नायकत्व सावित्रीबाई फुले यांच्याकडे जाते. वस्ताद लहुजी साळवे, रानबा महार, धुराजी अप्पाजी चांभार, गणू शिवा महार, फातिमा शेख, उस्मान शेख हे त्यांचे शाळेतील सहकारी आधुनिक भारताच्या शिक्षणाचे शिल्पकार ठरले. जोतिराव व सावित्रीबाई फुले यांनी आपल्या शाळेत शिकवलेल्या धुराजी अप्पाजी चांभार आणि रानबा महार या दलितांना भारताच्या इतिहासात शिक्षक होण्याचा मान मिळाला. मुलींना शिक्षण देण्याच्या परिश्रमपूर्वक प्रयत्नातून अभूतपूर्व समता पर्व निर्मिण्याचे प्रेरक कार्य त्यांनी केले. शोषितांचे जग बदलायचे आहे म्हणून शिक्षण अपरिहार्य होते. त्यासोबतच शूद्रातिशूद्रांच्या छळाचा इतिहास बदलायचा होता. जातिव्यवस्था संपवायची होती. स्त्रियांचे जगणे माणसात रूपांतरित करायचे होते. शासनयंत्रणेचा जाच संपवायचा होता. सहस्रावधी मार्गांनी होणारे शोषण बंद करण्यासाठी अनेकविध विवेकनिष्ठ चळवळींची मालिकाच त्यांनी उभी केली होती. स्वत:च्या वाड्यातील विहीर पिण्याच्या पाण्यासाठी दलितांना खुली करण्याचे धाडस केले. विधवांच्या पुनर्विवाहाच्या चळवळीत सहभाग दिला. विधवांचे केशवपन होऊ नये म्हणून न्हाव्यांचा संप घडवून आणण्यासाठी नेतृत्व केले. बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करून अशा स्त्रियांची बाळंतपणे स्वत: केली. आधुनिक भारतात जाती संपल्या पाहिजेत म्हणून आंतरजातीय विवाह लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला. काशीबाई या विधवा ब्राह्मण स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेत आणि जोतिरावांच्या नंतर हा समाज चालविण्यात महत्त्वाचे योगदान दिले. 1875-1877 या काळातील दुष्काळात दुष्काळग्रस्तांना मदत आणि अन्नछत्रे चालविली. त्यांनी जोतिरावांच्या भाषणांचे संपादन केले. स्वत: काव्यलेखन केले. विविध ठिकाणी भाषणे देऊन समाज जागृतीचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा झाल्या. शेतकरी आणि मजूर स्त्री पुरुषांसाठी रात्रीच्या शाळा काढल्या. ब्राह्मणांशिवाय सत्यशोधकी पद्धतीने विवाह लावण्याची चळवळ उभारली. अशा असंख्य कार्यांची यादी आहे. माणूस, जमीन, नवे प्रयोग (मॅन, लँड, लॅब) यांचा अनुबंध सामाजिक परिवर्तनाच्या प्रयोगशाळेतून घडविला गेला.
1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. डॉ. यशवंत फुले यांच्या दवाखान्यात सावित्रीबाई सेवा करीत होत्या. पांडुरंग बाबाजी गायकवाड यास प्लेगची लागण झाली तेव्हा सावित्रीबार्इंनी त्यास उचलून दवाखान्यात आणले. त्यातच सावित्रीबार्इंना प्लेगने गाठले आणि देशाच्या परिवर्तनाच्या चळवळीतील 50 वर्षे चाललेले वादळ थांबले...आणि तेथूनच समता पर्वाची मागणी करणारे नवे वादळ सुरू झाले. आजही हे वादळ जिवंत आहे. उत्थापनाचा, उन्नतीचा आशय अधिक व्यापक झाला आहे. खोट्या, दांभिक मुखवट्याचे बुरखे फाडले जात आहेत. सामान्यांच्या आशा-आकांक्षांचे, शोषितांच्या संपन्न स्वप्नांचे जग निर्मिण्याची मागणी होते आहे. सावित्रीबार्इंच्या कार्य-विचारांना व्यापक, विशाल, अथांग अर्थ प्राप्त झाला आहे. नवा समाज आणि नव्या समाजाची नवी संस्कृती याचा ध्यास या कार्य-विचारातून प्रकट झाला. त्यासाठीच सावित्रीबार्इंच्या विचारांची, कार्याची वर्तमानाला गरज आहे. त्यातून भविष्य निर्माण होईल. गर्भातच स्त्री संपविणा-या या वर्तमानाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे, विचाराचे सरण अटळ आहे. आज जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!

Monday 28 November 2016

*नक्कीच वाचा..मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??

*नक्कीच वाचा..मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??
1) आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा..
2) मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा..
3) आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा..
4) मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत.. हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा..
5) मित्र असे का वागला हे त्याला न विचारता.. आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा..
6) आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल.. असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा..
7) मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ.. आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा..
8) भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे.. असे आपण ठरवतो तेव्हा..
9) मित्र श्रीमंत झाल्यावर.. आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा..
10) आपला मित्र आता बदलत चालला आहे.. अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा..
11) मित्र बिझी असेल.. त्यालाही त्याच्या अडचणी असतील.. हे आपण विसरायला लागतो तेव्हा..
12) आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा..
13) आपण जसा विचार करतो.. तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे.. असा दुराग्रह बनतो तेव्हा..
14) आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे.. हे लोकांना सांगायला हवे.. अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा..
15) खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा..
16) कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा..
17) आपले मित्रांशिवाय काही अडत नाही.. हे आपण नकळतमित्राला दर्शवायला लागतो तेव्हा..
18) आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा..
19) मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही.. याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय.. असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा..खरं तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते.. तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात.. असे असेल.. तसे झाले असेल.. असे काल्पनिक विचार करीत आपण मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो.. मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.. पण कुठेतरी गैरसमज, अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते.. चांगली मैत्री बनायला अनेक काळ जावा लागतो.. पण मैत्रीमधील धागे तुटायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही..तेव्हा मित्रांनो..!!तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्यालामाफ करा.. आणि तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राची क्षमा मागायला लाजू नका..!*


धन्यवाद ...... 

आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन*

रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.
तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी...ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.
थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.
एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.
एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, "बाळ, नाव काय तुझं...?"
मी नाव बोललो
कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?
मी पुन्हा बोललो
त्या हसत हसत बोलल्या "अच्छा . छान आहे नाव"
त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं? नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, "डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?" मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, "नाही ओ आजी". का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, "काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा"
हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.
घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, "आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील"
मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.
दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.
संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.
मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, "आजी काय करताय हे ?"
त्या हसल्या आणि बोलल्या...बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.
कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.
त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.
कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.
जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या "आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू... मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो....साहेब होशील मोठा तू "
मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.
पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.
मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.
मी जवळच्या टपरीवर गेलो
आणि विचारलं, "इथल्या आजी कुठे आहेत ?" त्याने मला पाहिलं आणि बोलला, "अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.
मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.
अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!
*आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन*

Tuesday 5 April 2016

गरज नाही


डॉ. रुईकर ह्या प्रिन्सिपॉल होत्या. समोर बसलेल्या काव्याच्या वडिलांना त्या कोर्सची माहिती देत होत्या. काव्याही उत्सुकतेने ऐकत होती. काव्याचे वडील एका स्मॉल स्केल युनिटचे मालक होते. आर्थिक परिस्थिती उत्तम होती.
"काय आहे मॅ'म, ग्रॅज्युएशन नंतर हा कोर्स करण्याचे कारण हे आहे की काव्या बिझी राहावी. प्लस तिला त्यातून काही चांगले शिकता आले, ज्याचा पुढे काही फायदा झाला, यू नो, म्हणजे .... काही प्रोफेशनली करता आले तर.... असे बघतोय आम्ही. हा जमाना मल्टिटास्किंगचा आहे तुम्हाला माहीतच आहे. माणसाला वेगवेगळ्या गोष्टी यायला हव्यात असे मी मानतो. त्यामुळे त्या दृष्टीने काही सुचवलंत तर.... म्हणजे.... ते तिला उपयोगीही पडेल आणि तिचा वेळही.... यु नो.... सत्कारणी लागेल"
"शुअर शुअर! मी अ‍ॅक्च्युअली म्हणूनच हा कोर्स सांगतीय तुम्हाला! ह्यात खरे तर एका विशिष्ट विषयाचे किंवा शाखेचे असे सिलॅबस नाहीये. वेगवेगळे विषय आहेत. पार्ट ऑफ धिस, पार्ट ऑफ दॅट! इन फॅक्ट हा कोर्स केल्यानंतर पर्सनॅलिटीमध्ये फार पॉझिटिव्ह फरक पडतो. कॉन्फिडन्स वाढतो. कारण विशिष्टच शाखेच्या अभ्यासामुळे पर्सनॅलिटीवर एक परिणाम झालेला असतो. आता तुम्ही बघत असाल की कॉमर्सची मुले यूझ्वली कोणत्याही घटनेमधील अर्थकारण आधी बघतात. सायन्सची मुले सहसा असे दिसेल की लॉजिकली विचार करण्याचा प्रयत्न करतात. हे वाईट अजिबात नाही. पण एकाच प्रकारची पर्सनॅलिटी होणे हे थोडेसे लिमिटेशन आहे. वन शूड नो बेसिक हिस्टरी, सायन्स, मॅथ्स, लँग्वेजेस, सॉफ्ट स्किल्स आणि बरेच काही काही! इव्हन ह्याचा उपयोग इन्टरव्हिव्ह देतानाही खूप होतो. मी सांगते ना, आमच्याकडच्या सगळ्या मुली प्लेस होतायत गेली तीन वर्षे सलग! ८०% तर कँपसलाच"
"नाही नाही, एक मिनिट, आय बिलिव्ह तुमच्याकडची प्लेसमेन्ट ही बेसिक ग्रॅज्युएशनवर बेस्ड असते, होय ना?"
"ऑफ कोर्स! ते ग्रॅज्युएशन आहे म्हणूनच आम्ही कंपनीजना इन्व्हाईट करू शकतो. पण त्यानंतर हा कोर्स केलेला असल्याने एन्ट्रीच्या बेसिक लेव्हल्स मुली सहज पार करतात. त्यामुळे प्लेसमेन्ट ही निव्वळ ग्रॅज्युएशन देऊ करणार्‍या कॉलेजेसपेक्षा संख्येने आणि दर्जाने, दोन्हीने चांगली असते. वुई आर डीलिंग विथ द बेस्ट एम्प्लॉयर्स इन द इन्डस्ट्री!"
"दॅट इज फाईन मॅ'म, पण समहाऊ आय अ‍ॅम नॉट कन्व्हिन्स्ड!"
"सी वुई हॅव मेनी अदर कोर्सेस. यू कॅन चूझ एनी वन ऑफ देम. पण हा खास मुलींसाठी डेव्हलप करण्यात आलेला कोर्स आहे."
"खरं सांगू का? मला नीट क्लॅरिटीच आलेली नाहीये"
"ओके. हे सिलॅबस! तुम्ही जर बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल की सायन्स, मॅथ्स, लॅन्ग्वेजेस, हिस्टरी आणि पर्सनॅलिटी डेव्हलप्मेन्ट, सॉफ्ट स्किल्स, आर्ट अश्या सर्व फिल्ड्समधील बेसिक्स ह्यात पक्की करून घेण्यात येतात. किंबहुना, मी तर म्हणेन की आयुष्याची निश्चीत दिशा ठरवायला हा दोन वर्षांचा कोर्स सुटसुटीत आणि उपयोगी ठरतो. आपला कल कोणीकडे आहे, ह्यापुढे काय करता येईल हे नीट समजू शकते"
"आय....आय डोन्ट गेट यू! ती ह्यानंतर काही करणार नाही आहे. शी विल बी एन्गेज्ड अ‍ॅन्ड विदिन मन्थ्स शी वूड गेट मॅरिड"
"हो पण लग्नानंतर ती काहीतरी करेलच ना?"
"हां म्हणजे तो तिचा निर्णय असेल! तिचा आणि तिच्या नवर्‍याचा! हा हा! आम्ही काय सांगणार?"
"मिस्टर ओम, आमच्या इथल्या मुलींचे करिअर लग्नानंतरच सुरू होते कारण बहुतांशी मुली त्यांच्या लग्नाच्या वयाच्या असतानाच इथे अ‍ॅडमिशन घेतात. आय अ‍ॅम शुअर, तुमच्याही मुलीला लग्नानंतर काही नुसते बसायचे नसेल"
"नाही नाही, ती काहीतरी नक्कीच करेल, पण ...."
"तेच म्हणतीय मी, ती जे करेल ते काय असायला हवे हे ह्या कोर्समधून समजेल"
"नाही पण आत्ताही तिच्या आवडीनिवडी आहेतच की? डान्स आहे, फ्रेंच लँग्वेज आहे, बॅडमिन्टन आहे"
"हो बरोबर, पण...."
"एक मिनिट मॅ'म, एखाद्या विशिष्ट प्रोफेशनकडे कल असलेली अशी मुलगी सासरी धाडून आम्ही किंवा ती काय मिळवणार आहोत? शेवटी ती आणि तिचा नवरा जे काय ठरवतील तेच महत्त्वाचे असणार ना? आमचा आत्ताचा हेतू केवळ ती बिझी राहावी आणि जमल्यास काहीतरी प्रोफेशनल डिग्री मिळावी इतकाच आहे"
"हो मग ते तर शक्य आहेच की? इतर कोर्सेस जे मी दाखवले ते प्रोफेशनलच आहेत. त्यातही प्लेसमेन्ट आहेच."
"बट दे आर टू डिमान्डिंग"
"म्हणजे?"
"म्हणजे वेळ, पैसा, येणे जाणे, अटेन्डन्स, प्रॅक्टिकल्स, आऊट डोअर प्रोजेक्ट्स वगैरे"
"वेल, प्रत्येक कोर्सचे तुम्हाला काही ना काही फायदे आणि काही तोटे वाटणारच"
"ठीक आहे. आम्ही चर्चा करतो घरी, एक दोन दिवसात सांगतो"
"ओह येस, शुअर, प्लीज टेक यूअर टाईम"
वडिल जायला उठले आणि काव्याने प्रथमच तोंड उघडले. तिने थेट रुईकरांनाच विचारले.
"मॅ'म, कोणत्या प्रकारच्या मुली ह्या कोर्सला येतात सहसा?"
काव्याच्या चेहर्‍यावरील कुतुहल पाहून वडिलांना पुन्हा बसावे लागले. रुईकर मॅडम म्हणाल्या:
"पहिली गोष्ट म्हणजे, हा एखादा सबस्टँडर्ड कोर्स आहे असे समजू नकोस. हा खरे तर अतिशय अवघड कोर्स आहे. ह्यातून पुढे गेलेल्या मुलींमधील फरक आम्हाला ठळकपणे जाणवलेले आहेत. इतकेच काय, ड्युरिंग द कोर्सही त्यांच्या आचार-विचारात फरक पडत जातात. आता हेच बघ, ह्या तिसर्‍या सेममध्ये क्रिटिकल थिंकिंग, इन्डिपेन्डन्ट थिंकिंग, डिसीजन मेकिंग हे असे जे विषय आहेत ते शिकवायला बाहेरून तज्ञ येतात. तिसर्‍या सेमनंतर आमच्या मुलींच्या वागण्यात आम्हाला चक्क खूपच पॉझिटिव्ह फरक जाणवतो:
पुन्हा काव्याचे वडील मध्ये पडले. सौम्य पण ठाम स्वरात ते म्हणाले:
"आय हॅव अ प्रॉब्लेम विथ दॅट इटसेल्फ! मुलींच्या विचारसरणीत पॉझिटिव्ह फरक पडणे हे चांगलेच आहे. पण हे क्रिटिकल थिंकिंग, इन्डिपेन्डन्ट थिंकिंग वगैरे हे नेमके काय प्रकार आहेत? माझ्या मुलीला एका जोडीदाराबरोबर सहजीवन जगायचे आहे. कोणताही निर्णय असा स्वतंत्रपणे, एकटीच्याच मताने घेण्याची परिस्थिती तिच्यावर ओढवणार नाहीये. लग्नाआधीपर्यंत आम्ही दोघे तिच्या सोबतीला आहोत आणि लग्नानंतरही आम्ही दोघे प्लस तिचा नवराही आहे"
"तुम्हाला असे वाटते की तिच्या सोबतीला कोणीतरी कायम असणे बरे हेच चुकीचे आहे मिस्टर ओम! ती स्वतः परीपूर्ण असायला हवी असा ह्या कोर्सचा हेतू आहे"
"हो पण सासरी जाऊन हे असे स्वतंत्र विचारसरणीने वागणे वगैरे आम्हाला...."
"स्वतंत्र विचारसरणी म्हणजे नेहमी मतभेदच असतात असे नाही. पण निदान आपले विचार हे तर्कसुसंगत आणि व्यवहारी असायला हवेत ना? कोणावर कोणत्या वेळी काय परिस्थिती ओढवेल हे थोडीच सांगता येते?"
"अहो ते बरोबर आहे मॅडम पण आता काय बोलू ह्याच्यावर? आम्ही, म्हणजे तिचे आई वडील समर्थ आहोत तिचे सगळे करायला"
"आपण तुमच्य अमुलीला समर्थ करायचे आहे, तुम्ही समर्थ आहात म्हणून मुलीला दोन वर्षे कुठेतरी चिकटवायचे आहे असे नाही ना?"
"ते ठीक आहे हो, पण स्वतंत्र विचारसरणी झाली आणि वैवाहिक आयुष्यात मतभेद व्हायला लागले तर काय?"
"ते तसेही होऊ शकतातच की?"
"हो पण त्याला आणखी एक कारण का निर्माण करायचे?"
"कारण हे कारण निर्माण करतानाच तुमची मुलगी आत्मविश्वासाने काही योग्य आणि लाँग टर्मसाठी उचित असे निर्णय घेऊ शकण्यास समर्थ होते"
"अपब्रिंगिंगमध्ये ह्या बर्‍याचश्या गोष्टी कव्हर होतातच की?"
"नाही होत, अगदी कोणत्याही स्तरातील मुले मुली पाहिली तरी ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत तश्या कव्हर होत नाहीत. हा कोर्स डिझाईन करण्यामागे तज्ञांनी प्रचंड विचार केलेला आहे."
"ठीक आहे, आम्ही सांगतो विचार करून"
एकमेकांना अभिवादन करून ओम आणि काव्य हे दोघे रुईकरांच्या केबीनमधून बाहेर आले.
गाडीतून घरी जाताना काव्याला तिचे वडील सांगत होते.
"काही नाही ही सगळी ह्या लोकांनी काढलेली नवी नवी फ्याडं आहेत. एक सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्टचा कोर्स केला की इट इज इनफ! हे फी घेऊन मोकळे होणार आणि मुलींना अर्धवट वयातच स्वतंत्र विचारसरणी वगैरे शिकवणार! म्हणजे आई वडिलांनी शिकवलेले गेले कुठेच! क्काय? त्यात मुलींचा प्रॉब्लेम म्हणजे लग्न करून आणखी तिसर्‍याच कल्चरमध्ये जायचे असते. तिथले सगळे वेगळेच असते. तिथे ना ह्यांचा कोर्स उपयोगी ना माहेरची शिकवण! तिथे काय उपयोगी पडेल तर ऐनवेळी सून पैसे कमवून आणू शकेल की नाही हा मुद्दा! आणि असा लक्षणीय वगैरे फरक म्हणजे काय पडतो म्हणे मुलींमध्ये ह्या कोर्समुळे? ते काय मेझरेबल थोडीच आहे? कोर्स जॉईन करण्यापूर्वी ह्या मुलीचा कॉन्फिडन्स तीस युनिट्स होता आणि तिसर्‍या सेमिस्टरनंतर तो सेव्हन्टी फाईव्ह झाला वगैरे? ज्या मुलींना एकटेच राहायचे आहे, लग्नच करायचे नाही आहे वगैरेंसाठी ठीक आहे"
काव्याला वडिलांचे विचार पटत होते. ती होकारार्थी मान हालवत होती. तिला ते विचार पटतील अश्याच पद्धतीने तिला वाढवले गेलेले होते.
डिप्लोमा इन लिबरल आर्ट्स हा कोर्स जॉईन न करून त्यांनी स्वतःचे जेवढे नुकसान करून घेतले असेल त्यापेक्षाही जास्त नुकसान त्यांनी त्या कोर्सवर एकमेकात चर्चा करताना टीका करून, करून घेतलेले होते. कारण ह्या टीकेतून काव्याचे आणि तिच्या वडिलांचे तेच तेच विचार त्यांच्याच मनात पुन्हा पक्के होत होते जे चुकीचेही असू शकतील ह्याची त्यांना कल्पनाच नव्हती. काव्याने तर मनात ठरवलेलेही होते की मैत्रिणींना सांगायचे. 'नवीन कोर्सच्या नावाखाली स्टुडन्ट्सना जॅक ऑफ ऑल ट्रेड्स करून वाया घालवण्याचा प्लॅन आहे नुसता, पैसे वाया जातील त्या कोर्सला गेलीस तर'!
नवीन विचारांना क्षणभरही मनात स्थानही न देणारे लोक हे कितीही संपन्न असले तरी प्रत्यक्षात मागासच समजले जायला हवेत.
===========

सावट

सावट

प्रथमला निरोप द्यायला चित्रा दारात येऊन उभी राहिली. तो फाटकातून बाहेर पडेपर्यंत ती तिथेच थांबली. मनात बरीच कामं घोळत होती. प्रथम आता दोन तीन दिवस येणार नाही म्हणजे निवांतपणा होता. शांतपणे राहिलेलं काम हातात घेता येणार होतं. दार लोटून ती आत जाणार तेवढ्यात फाटकाच्या दिशेने परत येत असलेल्या प्रथमकडे तिचं लक्ष गेलं. पटकन पायर्‍या उतरत ती पुढे झाली.
"काय रे? काही राह्यलं का?"
प्रथमने तिचे दोन्ही हात हातात घेतले. त्याच्या नजरेतल्या व्याकुळपणाने तिचाच जीव घुसमटल्यासारखा झाला.
"प्रथम?" ती पुटपुटली.
"चित्रा, शक्य झालं तर मला माफ कर." झटकन मान फिरवून तो पुन्हा वळला. ती तशीच उभी राहिली. गोठल्यासारखी. हे काय नवीन? प्रथम काय म्हणाला? माफ कर? का पण? ओढणी सावरत ती फाटकाच्या दिशेने धावली. पण उशीर झाला होता. प्रथमची गाडी धुरळा उडवीत नाहीशी झाली होती. अंगातलं त्राण गेल्यागत ती मागे वळली. प्रथमच्या शब्दांचा काही केल्या अर्थ लागत नव्हता. फोन करावा? की तो येईपर्यंत वाट पाहायची? त्याचं बाहेर काही? दुसरा संसार? मूल? तिला त्याचा रागच आला. हे काय, माफ कर म्हणे. काहीतरी तुटक बोलून डोक्याला भुंगा लावून द्यायचा.
ती वेगाने प्रथमच्या खोलीत शिरली. टेबलावरचे कागद उलट सुलट करून त्यातून काही मिळतंय का शोधत राहिली. हातात येईल तो कागद पाहून ती भिरकावून देत होती. विचारांच्या नादात खोलीत झालेला कागदांचा पसाराही तिच्या लक्षात आला नाही. टापटिपीच्या बाबतीत काटेकोर असणारी चित्रा उन्मळून गेल्यासारखी खोलीतल्या कागदांवर स्वत:ला झोकून देत हमसून हमसून रडत राहिली. काहीवेळाने तिची तीच स्वत:ला सावरत उठली. खोलीचं दार बंद करुन पसारा नजरेआड टाकत दिवाणखान्यात आली. निरर्थक इकडे तिकडे पाहात राहिली. तिचं लक्ष कोपर्‍यातल्या टेबलाकडे गेलं. तिने दागिन्यांच्या नक्षीचे नमुने ठेवले होते त्यावर व्यवस्थित ठेवलेला लिफाफा उठून दिसत होता. चित्राला हसायला आलं. चित्राच्या हातात सहजासहजी पडावा या हेतूने त्याने तिच्या कामाच्या जागी तो लिफाफा ठेवला होता. तिने मात्र त्याच्या खोलीचा नक्षाच बदलून टाकला. तिचा अंदाज खरा होता तर. प्रथमला लेखणीचा आधार घ्यावा लागला होता. म्हणजे पुढचं सारं तिला शंका आली होती तसंच? कधी लिहिलं असेल त्याने हे पत्र? माफ कर म्हणाला म्हणजे काहीतरी अस्वस्थ करणारंच असणार. त्याची मनोवस्था जाणवली कशी नाही? तिने घाईघाईने पत्र उघडलं. उभ्या उभ्या वाचायला सुरु केलेल्या पत्रातल्या ओळी तिच्या नजरेसमोर अंधुक व्हायला लागल्या. चित्रा खुर्चीचा आधार घेत बसली. अंदाज चुकला म्हणून आनंद मानायचा की जे घडत होतं ते थांबवायचा प्रयत्न करायचा? खरंच होतं ते तिच्या हातात? तिचं तिलाच समजेना. पण मन मात्र घडत असलेल्या, घडून गेलेल्या घटनांचा, प्रसंगांचा आपोआप पुन्हा धांडोळा घ्यायला लागलं.
चित्रा पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. कथेतले प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहत होते. एकदम कुणीतरी पुस्तक ओढलं तसं तिने दचकून पाहिलं. प्रथम वैतागून तिच्याकडे पाहत होता.
"किती हाका मारायच्या चित्रा?"
"लक्षातच आलं नाही." ती एकदम ओशाळून म्हणाली.
"चल ना, भटकून येऊ या कुठेतरी." रविवारची दुपारची निवांत झोप काढून तो ताजातवाना झाला होता. घेतलेली गोष्ट वाचून तिला खरं तर पूर्ण करायची होती. पण तिने मोडता घातला नाही. पुस्तक बाजूला ठेवून ती उठली. स्वत:चं आवरुन प्रथम बरोबर निघाली. बाहेर पडल्या पडल्या प्रथमला कुणी ना कुणी ओळखीचं भेटत राहिलंच. चेस्मित हास्यहर्‍यावर  ठेवून चित्राही प्रत्येकाबरोबर होणार्‍या त्याच्या गप्पा ऐकत होती. प्रथम गपिष्ट तर चित्रा तशी अबोलच. त्याचं धबधब्यासारखं कोसळत राहणं तिला मनापासून भावायचं, त्याच्या लोकसंग्रहाचं कौतुक वाटायचं. त्याच्या प्रत्येकाती कौतुकाने शी होणार्‍या गप्पा कान देऊन ऐकत होती. रहदारीचा भाग काही वेळात संपून दृष्टीक्षेपात येणारा गडनदीचा पूल गप्पागोष्टींमुळे नजरेत यायला दहा पंधरा मिनिटं लागली. तो दिसायला लागल्यावर मात्र कधी एकदा पुलाच्या कठड्याला टेकतो असं होऊन गेलं चित्राला. प्रथमच्या बरोबरीने ती चालत असली तरी आता तिला त्या पुलाचीच ओढ लागली. नदीजवळच्या पुलाजवळ येऊन दोघं उभे राहिले. पुलाखालून वाहणार्‍या गडनदीच्या पाण्याकडे चित्रा पाहात राहिली. नदीच्या पाण्याचा आणि पाठीमागून रस्त्यावरुन जाणार्‍या एखाद्या गाडीचा आवाज इतकंच काय ते संगतीला आहे असं वाटत होतं. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. प्रथमने तिच्या तंद्रीचा भंग केला,
"उभ्या देवापर्यंत जाऊ या?" वाहणार्‍या पाण्याचा खळखळाट, डाव्या हाताला वळत गेलेल्या रस्त्यावर झाडामधून नजरेला पडणारी पण झटकन नाहीशी होणारी एखादी सायकल, आणि मध्येच संध्याकाळच्या येणार्‍या प्रकाशाची तिरीप डांबरी रस्त्यावर पडून काहीतरी चकाकल्यासारखा भास हे सारं अनुभवण्यात ती गुंग होती. प्रथमच्या शब्दांनी ती भानावर आली.
"चालेल." ती लगेच वळून चालायला लागली. प्रथमच्या हातात हात गुंफून मावळतीचा प्रकाश अनुभवत संथपणे चालत राहिली.
"काय काय येतं नाही नजरेच्या टप्प्यात या पुलावरुन? गडनदी, हळवलला जाणारा रस्ता, आर्यादुर्गेचं देऊळ. मला आवडतं हे दृश्य पाहायला. पण पुलावरुन भरधाव वेगाने जाणार्‍या गाड्यांची भिती वाटते. फार जोरात चालवतात." तिने नुसतीच मान हलवली. प्रथमनेही गप्पा मारण्याची इच्छा आवरली आणि शांतपणे तो तिच्याबरोबरीने चालत राहिला.
गर्द झाडीच्या रस्त्यावरुन पायवाटेवरुन थोडं आत चालत गेलं की विस्तीर्ण वृक्षांच्या सावलीतला उभा देव तिला आजूबाजूच्या वातावरणात गूढता निर्माण करणारा वाटायचा. पायाखालच्या पानांची सळसळ, लांबवरुन ऐकू येणारी एखादी हाक, नदीच्या आसपास कपडे धुण्याचा येणारा अस्पष्ट धपधप आवाज असं सगळं कानावर झेलत दोघं तिथल्या भल्या मोठ्या शीळेवर बसले. हाताच्या अंतरावर शांतपणे वाहणार्‍या गडनदीच्या पाण्याकडे दोघं मूकपणे पाहत राहिले.
"तुला पश्चाताप होतोय का चित्रा?" अचानक प्रथमने विचारलं. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं.
"कशाबद्दल?"
"या आडगावात येऊन राहिल्याचा." चित्राने हसून मानेने नकार दिला.
"नक्की?" त्याने पुन्हा विचारलं.
"नाही रे. पश्चाताप कसला. तुला आवडतंय ना मग झालं तर."
"हेच, हेच मला आवडत नाही तुझं. मला आवडतं म्हणून तू करतेस का सारं?"
"नाही, असंच काही नाही."
"तू आनंदी दिसत नाहीस. चित्रा, मला ठाऊक आहे तुला यायचं नव्हतं रत्नागिरी सोडून. माझ्यासाठी म्हणून आलीस तू. खरं ना?"
ती काहीच बोलली नाही.
"इतका त्याग, कुढेपणा बरा नव्हे चित्रा."
"अरे, काहीतरीच काय बोलतोस?"
"मन मारुन तू काही करावंस अशी माझी इच्छा नाही. मी हे पहिल्यापासून सांगतोय. पण तुझ्या मनाचा थांगच लागत नाही कधीकधी."
काही न बोलता चित्राने त्याच्या हातात हात गुंफला.
"तुझं काहीतरीच. आणि आता आलोय इथे आडबाजूला तर बसू या नं निवांत. डोळे मिटून इथला शांतपणा अंगात अलगद झिरपू द्यावा असं वाटतंय. आपणही ह्या शांततेचा, गूढतेचा भाग व्हावा असं काहीसं." तिने त्याच्या खांद्यावर मान टेकून डोळे मिटलेच. तो ही नाईलाज झाल्यासारखा संथ वाहणार्‍या पाण्यावर नजर खिळवून बसून राहिला. एकमेकांना चिकटून बसलेल्या त्या दोघांची मनं मात्र दोन दिशेला भरकटली होती. प्रथमच्या मनात चित्राला बोलतं कसं करायचं याचा विचार चालू होता तर चित्राच्या डोळ्यासमोर कणकवलीला कायमचं यायचं ठरायच्या आधीचे दिवस तरळत होते.
त्या दिवशी कणकवलीहून तो आला संध्याकाळी. चित्राने नुकतंच काही दागिन्यांचं काम पूर्ण केलं होतं. त्यातली रंगसंगती, आकार ती पुन्हा पुन्हा निरखून पाहत होती. दुबईतल्या व्यावसायिकाला दागिने आवडले तर वर्षभर पुरेल इतकं काम हाताशी येणार होतं. ते काम तिलाच मिळेल याची तिला खात्री होती. थोडेफार बदल सुचवले तर ते करायची तयारी तिने मनात आधीच केली होती. आता फोटो काढून पाठवून द्यायचं एवढंच राहिलं होतं. प्रथम आल्या आल्या उत्साहाने ती बांगडी आणि हाराची नक्षी दाखवणार तितक्यात घरात शिरल्या शिरल्या तोच म्हणाला.
"चित्रा, खूप दिवसांपासून मनात काही घोळतंय. तुला केव्हा वेळ असेल तेव्हा बोलूया."
"महत्वाचं आहे? त्याच्या स्वरातला गंभीरपणा तिला जाणवला. तिने हातातले नक्षीचे कागद आणि दागिने बाजूला ठेवले.
"अगदी तसंच नाही. पण थोडी धाकधूक, शंका आहे मनात. तुझ्याशी बोलता बोलता मलाच उत्तरं सापडत जातात."
"मग बोल की आत्ताच. आहे वेळ मला. पण निदान हात पाय धू, काहीतरी खाऊन घे. यमुनाबाईंना सांगू का काहीतरी करायला?"
"नको. निघायच्या आधी खाल्लंय."
"ठीक आहे." चित्राने यमुनाबाईंना त्याचं सामान आत नेण्याची खूण केली आणि ती बसली.
"मी कणकवलीला कायमचं जायचं ठरवतोय." एक क्षणभर चित्राला तिचे कान लाल झाल्यासारखे वाटले. पण स्वत:ला सावरुन तिने विचारलं,
"असं अचानक? म्हणजे कधी ठरलं तुझं? आणि माझं काय?" तिच्या स्वरात शांतपणा असला तरी नकळत आवाज किंचित उंचावलाच. पण तिचं तिलाच जाणवल्यासारखं ती म्हणाली,
"नाही म्हणजे शेवटी तू विचार करुनच काय ते ठरवलं असशील म्हणा."
"आबा थकलेयत. विश्वासू माणसाच्या शोधात आहेत पण मलाच वाटायला लागलंय मीच घ्यावं आता हातात काम." तिच्या चेहर्‍यावरचे भाव निरखीत प्रथम बोलत होता,
"म्हणजे कुणाचाच तसा आग्रह नाही. अजून एखादं वर्ष रेटतील ते कारभार सुरळितपणे. पण कामं स्वीकारुन बसले आहेत. फक्त कणकवलीतली नाही तर आजूबाजूच्या गावातली. त्यांच्यासारखं काम कुणी करत नाही अशी ख्याती आहे ना त्यांची. आपल्या दृष्टीने साध्या नावाच्या पाट्या बनवायच्या असल्या तरी त्यात कलात्मकता पाहिजेच यावर ठाम आहेत ते. खरं सांगायचं तर हातात घेतलेलं काम झेपेल की नाही या विचाराने त्यांच्या मनावरचा ताण वाढतोय असं जाणवलं मला. तसाही मी अधूनमधून मदतीला जात असतोच. मग तिथेच बस्तान हलवलं तर? माझ्याशिवाय आहे कोण त्या दोघांना? आणि मुख्यं म्हणजे तू पण त्यांना काही कल्पना देऊ शकशील."
चित्रा काही बोलली नाही. एकदा वाटलं आपल्या कामाचं कारण पुढे करावं. पण कशाला? त्याबाबतीत काय करता येईल हे तिलाही ठाऊक होतंच की. पण त्याने हे ठरवूनच टाकलं आहे की तो विचारतोय? तिच्या मनातलं कळल्यासारखं प्रथम हसला.
"मी काही ठरवलेलं नाही. पण आज परत येताना जो अस्वस्थपणा आला त्यातून मोकळं व्हायचं होतं मला. तुझं म्हणणं ऐकायचं होतं. जो निर्णय घेऊ तो दोघांनी मिळून घेतलेला असेल. मी म्हणतोय म्हणून ते झालं पाहिजे असा माझा मुळीच अट्टाहास नाही. आणि लगेच काही ठरवायचं आहे असंही नाही. तू विचार कर. मग बोलूच आपण. जे माझ्या कामाच्या बाबतीत तेच तुझ्याही. तुझं काम सुदैवाने तिथेही करु शकतेस." त्याने तिच्या केसावर थोपटल्यासारखं केलं. आतून यमुनाबाईंची ताटं वाढल्याची हाक ऐकू आली तसं दोघंही उठलेच.
नकार द्यायचा? रत्नागिरीतलं सुरळीत आयुष्य सोडून पुन्हा घडी बसवायला जायचं कणकवलीला? तो जसा त्याच्या आई वडिलांचा विचार करतोय तसा मलाही माझ्या करायला नको का? आई तर एकटी राहतेय. कधी ना कधी आपल्याकडे येऊन राहायचा विचार तिच्या मनात डोकावला तर? येईल ती कणकवलीला? का जाईल बाबांकडे? पण नाही म्हणणं इतकं खरंच सोपं आहे? त्याच्या मनात जायचं असेलच तर मग वाद, भांडणं सुरु होतील. टोक गाठलं जाईल. म्हणजे अजून पर्यंत तसं कधी झालेलं नाही. समजूतदार आहे प्रथम. पण आई, वडिलांसाठी तो हा निर्णय घेतोय आणि आपण नाही म्हणायचं? उगाचच अडवण्यात काय अर्थ? ती एकदम लहान मुलीसारखी रडायला लागली. मुंबईच्या घरातल्या एक खणी खोलीत असल्यासारखा तिचा जीव गुदमरायला लागला. त्या खोलीत वावरणारे आई, बाबा दिसायला लागले. आसपास वावरायलाच लागले ते तिच्या.
"गेंड्याचं कातडं पांघरलंय तुम्ही. किती काही बोललं तरी आपलं तेच खरं." बाबांच्या हातातलं वर्तमानपत्र खेचत आई म्हणाली.
"उत्तर दिलं नाही म्हणजे गेंड्याचं कातडं? तेच तेच ऐकून कंटाळतो म्हणून काही बोलत नाही. "
"बोलू नका हो. करुन दाखवा."
"ते दाखवतोच आहे. तुला दिसत नाही त्याला मी काय करु?" दोघांचे आवाज वाढायला लागले तसं तिथेच अभ्यास करत बसलेल्या चित्राने वहीत जोरजोरात काहीतरी खरडायला सुरुवात केली. आईने तिच्या पाठीत धपाटा घातला, हातातली वहीदेखील ओढली.
"चित्रा, काय हे गिरमिट करुन टाकलं आहेस. आणि किती जोर लावायचा तो. वही फाटेल." चित्रा तिथून पळालीच. स्वयंपाकघरात जाऊन तिने पाण्याचं भांडं तोंडाला लावलं. घशाला पडलेली कोरड गेली तरी पडद्याच्या आडून ऐकू येणार्‍या आवाजांनी तिच्या काळजाचे ठोके वाढले. ओट्याच्या बाजूला कोपर्‍यात भिंतीला टेकून ती शरीराचं मुटकुळं करुन बसली. आई इतकी का चिडते? बाबा सगळं शांतपणे ऐकत राहतात. बाबा नक्की काय चुकीचं करतात म्हणून दोघांचे सारखे वाद होतात? खरं तर नेहमी आईच त्यांच्यावर चिडते. याचा अर्थ तेच चुकत असणार. आई चिडली की तेही वाद घालतात. आई ऐकून घेत नाही हे लक्षात आलं की दारामागच्या खुंटीवर अडकवलेला शर्ट घालून निघून जातात. आई ते दाराबाहेर पडेपर्यंत बडबड करत राहते. आताही चित्राला माहीत होतं त्याचक्रमाने सारं पार पडलं. चित्रा आई स्वयंपाकघरात कधी येईल त्याची वाटच पाहत होती. तिने आल्याआल्या प्रश्न विचारायला सुरुवात केली. न चिडता, आदळआपट न करता आई तिच्याकडे पाहत राहिली. रोजच्या वागण्यापेक्षा आईचं हे वागणं वेगळं होतं. ती चित्राच्या बाजूला येऊन बसली आणि गुडघ्यात डोकं खुपसून रडायला लागली. चित्रा बावचळली. आईला रडताना ती प्रथमच पाहत होती. ती एकदम शांत झाली. मोठं होत तिने आपल्या आईला कुशीत घेतलं.
"रडू नको ना." स्वत:चे डोळे पुसत चित्रा आईला समजावीत होती. चित्राच्या केविलवाण्या चेहर्‍याकडे पाहात आईने अश्रू रोखले. काही न बोलता ती तशीच बसून राहिली.
"तू बाबांवर का चिडतेस? मला नाही आवडत."
"माझं चिडणं डोळ्यावर येतं. त्यांचं वागणं नाही दिसत कुणाला."
"काय करतात ते?"
"पिल्लू, तू फार लहान आहेस गं. नाही समजायचं तुला आता काही."
"सांग ना."
"तुझे बाबा कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेत नाहीत म्हणून चिडते मी."
"म्हणजे?"
"हे बघ, आजोबा मदत करतात आपल्याला. त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. तु्झे बाबा दर दोन चार वर्षांनी वेगवेगळ्या कल्पना मनात घेऊन नवीन काहीतरी व्यवसाय करायला निघतात. एकाचवेळी दोन तीन गोष्टी. त्यासाठी पैसे गुंतवावे लागतात. धंद्यात पैसा खेळता ठेवायला लागतो हे मान्य. पण हाताशी पैसा नसताना दुसरं काहीतरी सुरु करायचं कशाला?" चित्राला काडीचंही समजलं नाही. पण तरी तिने विचारलं.
"बाबा सांगतात आजोबांकडून पैसे आणायला?"
"नाही. जाऊ दे. तुला नाही समजायचं." आईने विषय संपवला. चित्राचा गोंधळ आणखीनच वाढला. तिने बाबा नाहीतर आजोबांनाच आईच्या म्हणण्याचा अर्थ विचारायचं ठरवलं.
पण ठरवलं तरी तसं झालं नाही. बाबा खूप उशीराच यायचे घरी. त्यात हल्ली हल्ली आणखी उशीर व्हायला लागला होता. आले की इतके कसल्यातरी विचारात असायचे की समोर जायलाच भिती वाटायची चित्राला. बर्‍याचदा चित्रा झोपेतून जागी व्हायची ती दोघांच्या आवाजाने. आजही तसंच झालं. मात्र आईच्या ऐवजी बाबांच्या आवाजाने ती दचकून उठली. आणि तशीच पलंगावर बसून राहिली. पडद्याच्या आडोशातूनही बाबा काय बोलतायत ते स्पष्ट ऐकू येत होतं.
"घरी आलो की तुझं सुरु. तुझ्या करवादण्याने सतत भेदरल्यासारखी वागत असते चित्रा. मी तिच्यासाठी गप्प बसतो. "
"खरं वाटेल कुणाला." आई खिजवल्यासारखी हसली. म्हणाली,
"माझा शब्द खाली पडू देत नाही तुम्ही."
"वाटतं ते सांगायचा प्रयत्न करतो. पण तुझं चालूच राहतं. मग गप्प बसतो. पण सततची धुसफुस, भांडणं, वाद याचा चित्रावर परिणाम होतोय ते कसं लक्षात येत नाही तुझ्या?"
"इतकी काळजी आहे तर ही वेळच येऊ न देण्याची खबरदारी का नाही घेतलीत? सगळे धडे मला."
"मी काही केलं तरी तुला समाधान मिळायला हवं ना."
"समाधान मिळेल असं कर्तुत्व गाजवा की. कुणी नको सांगितलंय."
"अगं बाई, तुझ्या या अशा बोलण्याचं सतत दडपण असतं माझ्या मनावर. दोन तीन व्यवसाय एकावेळी मी नीट सांभाळतो तरी सतत टोचून बोलतेस. बरं आपल्याला काही कमी आहे का? नाही. पण एकहाती तू मागशील तेवढी रक्कम ताबडतोब हजर करता येत नाही या एकाच मुद्यावर सतत कटकट असते तुझी. व्यवसायात पैसा फिरता राहतो हे कितीवेळा तुला सांगायचं तेच समजत नाही."
"तो फिरता पैसा पुरवावा लागतो माझ्या वडिलांना."
"मी गेलोय कधी त्यांच्याकडे मागायला? गेलोय कधी?"
"तुम्ही नसाल गेला. पण वापरता ना त्यांनी दिलेले पैसे."
"मी वापरत नाही. तुझ्याकडे असतात ते पैसे. मी घेऊ नको सांगूनही तू घेतेस. पुन्हा सांगतोय, माझ्या अंगात संसार चालवण्याची धमक आहे."
आई काही बोलली असली तरी चित्राच्या कानापर्यंत ते पोचलं नाही. पण एकदम ओरडण्याचा आणि रडण्याचाच आवाज यायला लागला. कधी नव्हे ते बाबा तारस्वरात ओरडत होते.
चित्रा घाबरुन थरथरायला लागली. तिला बाबांच्या कुशीत शिरावंसं वाटत होतं. ती जवळ असली की बाबा एकदम शांत होतात ते ठाऊक होतं तिला. पण बाबांचा इतका चढलेला आवाज ती पहिल्यांदाच ऐकत होती. ती तशीच बसून राहिली. बाजूची चादर तिने अंगावर ओढून घेतली. भिंतीला टेकून ती कानावर आदळणारे शब्द झेलत राहिली. कितीवेळ गेला कुणास ठाऊक पण आई खासकन पडदा बाजूला करुन बाहेर आली. कपाट उघडून तिने आतल्या साड्या बाहेर फेकायला सुरुवात केली. चित्राच्या मुसमुसण्याचा आवाज कानावर पडला तसं तिच्याकडे न पाहताच आई ओरडली,
"ऊठ लगेच. आपल्याला जायचंय इथून."
"कुठे जायचंय?"
"आजोबांकडे."
"बाबा पण येतायत?"
"नाही. एकही प्रश्न विचारु नकोस आता. कृपा कर." चित्रा बाबांच्या दिशेने धावली. बाबा खुर्चीत मान खाली घालून बसले होते. तिने त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. त्यांनीही तिला आवेगाने जवळ घेतलं.
"मला नाही जायचं आजोबांकडे." ते काही न बोलता तिला थोपटत राहिले. आई पायात चप्पल घालून दारात उभी राहिली तसं बाबांनीच चित्राला खूण केली. तेही उठले.
"जाऊ नकोस. उद्या शांतपणे बोलू आपण. इतक्या रात्री आलेलं पाहून घाबरतील घरातली." आई सरळ पायर्‍या उतरायला लागली तसं बाबाच त्या दोघींबरोबर खाली आले. रिक्षा थांबवून दोघींना बसवून देत ते तिथेच उभे राहिले.
"तुम्ही उद्या मला न्यायला या बाबा. शाळा चुकवायची नाहीये मला." रिक्षा सुरु झाली तसं तिने बाहेर डोकं काढत रडत म्हटलं. बाबांनी मान डोलावली. आईने हाताने तिला आत ओढलं आणि ते घर कायमचं सुटलं.
बाबा न्यायला येतील या आशेवर होती चित्रा. तिला वाटलं तसं बाबा आलेही दुसर्‍यादिवशी. पण तिच्याकडे लक्ष देण्याच्या मन:स्थितीत कुणीच नव्हतं. बाबा सतत आजोबांशी काहीतरी बोलत होते. आई मध्ये पडली की आवाज चढत होते. आजी मात्र तिला तिथे फिरकूच देत नव्हती. त्या दिवशी चार पाच तास तरी असेच गेले असावेत. निघायच्या आधी बाबा तिला भेटले ते आता ती इथेच राहील, तिची शाळा बदलेल पण ते तिला भेटत राहतील हे सांगण्यापुरतं. बाबा गेल्यानंतर कितीतरी दिवस आईने रडून काढले. चित्राचंही नवीन शाळेत लक्ष लागत नव्हतं. ती शाळेतून आली की पुस्तकात डोकं खुपसून बसे. गोष्टींमध्ये जीव रमवायचा प्रयत्न करी. मनात आई, बाबांबद्दलचा राग साठत चालला होता. तो वागण्यातही डोकावायला लागला. उलट उत्तरं, निष्काळजीपणा हे नित्याचं झालं. कधी घरकोंबड्यासारखं वागायचं तर कधी शाळेतल्या वाचनालयात जितक्या उशीरापर्यंत बसता येईल तितका वेळ तिकडेच काढायचा. वाचनालयात झालेल्या ओळखीतून बाहेर उंडारत रहायचं. विचित्र वळणावर चित्राचं आयुष्यं खेचलं गेलं. घरातलं वातावरणही बदललं. सुरुवातीला रडून दिवस काढणारी आई, आजोबांच्या व्यवसायात मदत करायला लागली. बराचसावेळ ती तिकडेच घालवे. चित्रामधलं लक्ष काढून घेतल्यासारखं वागत असली तरी चित्राच्या सार्‍या गरजा भागवत होती ती, मागेल ते देत होती. फक्त तिचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न आईकडून होत नव्हता. लेकीसाठी वेळ देता येत नव्हता. बाबा अधूनमधून उगवत. तिला घेऊन बाहेर जात. बाहेर जेवण, आइसक्रीम ती जे मागेल ते मिळे. चित्राला आत्तापर्यंत जे मिळालं नव्हतं ते विनासायास हजर होत होतं, म्हटलं तर भौतिक सुख कधी नव्हे ते आपणहून चालून येत होतं. पण अधूनमधून मिळणारा सुखाचा घास तेवढ्यापुरता आवडला तरी आई, बाबांच्या सहवासाला ती आसुसली होती. प्रत्येकवेळी बाबा सोडायला आले की तिला वाटायचं, सगळ्यांनी मिळून पहिल्या घरी जावं. पुन्हा तिथल्या शाळेत जावं, मैत्रिणींना भेटावं. पण आई, बाबा स्वतंत्ररीत्या कितीही तिला पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करत असले तरी एकत्र आले की वाद विवादाच्या फैरी झडत. आता यात आजोबांचाही समावेश झाला होता. आजी या सगळ्याला कंटाळली आणि एक दिवस नेहमीचं नाटक सुरु झाल्या झाल्या तिने चित्राला बोलावलं.
"हिच्या समोरच ठरवा काय करणार आहात पुढे. फार झाली ओढाताण तिची. इथे येऊनही वर्ष होऊन जाईल. दोन्ही डगरीवर पाय देऊन उभं राहणं दोघांनीही थांबवा." काही वेळ कुणीच काही बोललं नाही. मग बाबाच म्हणाले,
"चित्रा, तुझ्यावर अन्याय होतोय याची कल्पना आहे. माफी तरी कुठल्या शब्दांनी मागू? पण याला अंत नाही. आतापर्यंत म्हटलं तर आम्ही दोघंही प्रयत्न करत राहिलो. पण प्रेम, तडजोड यापेक्षा अहंकार वरचढ झालाय. या क्षणी माघार कुणीही घेतली तरी ती तात्पुरतीच असेल. प्रत्येक वेळच्या यातनामरणापेक्षा एकदाच सोक्षमोक्ष लागणं उत्तम. आमचे मार्ग इतके बदलले आहेत की ते पुन्हा एकत्र येतील असं वाटत नाही." बाबांचं बोलणं समजायला कठीण जात असलं तरी त्यातला अर्थ चित्राला व्यवस्थित कळला. घटस्फोट. आई - बाबा घटस्फोट घेणार. तिला रडावंसं वाटत होतं. पण घरातल्या मोठ्यांसमोर रडण्यात अपमानही वाटत होता. ती बाबांच्या नजरेला नजर देत तशीच बसून राहिली. आईने काही न बोलता चित्राचा हात हातात धरला. चित्राने तो झिडकारलाच. धावत ती आजीच्या खोलीत शिरली. धाडकन पलंगावर अंग टाकून रडत राहिली. पाठीवर फिरत असलेल्या हातानेच आजी खोलीत आल्याचं तिला कळलं. हळूहळू ती शांत झाली.
"वेगळे होणार का गं आई बाबा?"
"तेच या परिस्थितीत योग्यं नाही का चित्रा? वर्षभर वाट पाहिली. पण काही बदलेल असं वाटत नाही. घरी तेच इथे येऊनही तेच. कुणालाच सुख नाही."
"आजी, माझ्या संसारात मी नाही असं वागणार. ही वेळच येऊ देणार नाही. का असं वागतात गं दोघं? माझं चुकलं की ओरडायचे, मला फटके मिळायचे लहान असताना. ठाऊक आहे ना?"
"हो."
"मला पण दोघांवर आरडाओरडा करावंसं वाटतंय. फटकावून काढलं पाहिजे दोघांनाही."
"चित्रा..." आजीच्या स्वरातला कठोरपणा जाणवला तशी चित्रा गप्प झाली.
"कुणाचं आणि काय चुकलं, चुकतंय ही चर्चा निरर्थक आहे. टाळी एका हाताने वाजत नाही हेच खरं. पण यातून सर्वांनाच मार्ग काढायचा आहे. तुझी आई, आजोबांना मदत करेल. तिला आता स्वत:च्या पायावर उभं राहणं जितकं गरजेचं आहे तितकीच आवश्यकता तुझं वागणं बदलण्याची आहे चित्रा."
"मी काय केलं? चुकतंय ते त्या दोघाचं."
"त्यांच्या चुकीची शिक्षा तू त्यांना भरकटल्यासारखं वागूनच द्यायला हवी असं आहे का?"
"पण मी..."
"लहान नाहीस तू आता. तुला चांगलं कळतंय मला काय म्हणायचं आहे ते." चित्रा काही न बोलता बसून राहिली. आजी उठून पुन्हा बाहेर निघून गेली. पण नाकारायचं म्हटलं तरी आजीचं बोलणं तिला पटत होतं. निदान स्वत:च्या आयुष्याचा ताबा तिने स्वत:च घ्यायला पाहिजे होता. पण म्हणजे काय करायचं? ती जास्तीत जास्त आजीच्या आसपास घालवायला प्रयत्नपूर्वक शिकली. विस्कटलेली घडी सुरळीत व्हायला चार पाच वर्ष लागली. प्रत्येकाची दिशा वेगळी असली तरी निदान मार्ग हाती गवसले होते. इथपर्यंत पोचेतो सर्वांनीच बरंच काही गमावलं होतं त्यामुळे आता हातातून काही निसटू न देण्याची खबरदारी मन आपोआप घ्यायला शिकलं होतं. आजीच्या पंखाखाली चित्राला सुरक्षित वाटत असतानाच अचानक आजी गेली. काहीही हासभास नसताना गेलेल्या आजीचं जाणं चित्राला पचवणं फार जड गेलं. पण जाता जाता आजीने विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवून दिली होती. चित्राही प्रयत्नांची पराकाष्ठा करुन ती घडी आता विसकटू देणार नव्हती. बाबा अधूनमधून घरी येत राहिले. आले की आजोबांशी बोलत बसायचे. आईच्या स्वतंत्र बाण्याचं कौतुक करायचे. थकल्या डोळ्यांनी आजोबाही बाबांच्या यशाचं कौतुक करायचे. आई फारशी बोलत नसली तरी बाबा आले की तिचा चेहरा खुलायचा. गुण दिसायला, कर्तुत्व पटायला खरंच लांब जावं लागतं एकमेकांपासून? चित्राच्या घराबाबतीत तरी निदान तसं झालं होतं. पाहताना चित्राला वाटायचं, आजी हवी होती. खूश झाली असती. हल्ली हल्ली तर तिला वाटायला लागलं होतं आई, बाबांनी पुन्हा एकत्र यावं. नाहीतरी आता किती छान जमतं दोघांचं. मनातला विचार ओठावर येईतो आजोबांनी आजीच्या वाटेवर पाऊल टाकलं. आता तर चित्राला आईला बाबांच्या आधाराची खरी गरज आहे असं प्रखरतेने वाटत होतं. शेवटी एकदा धाडस करुन तिने विषय काढला.
"बाबा, आता तुम्ही इकडेच का राहत नाही? आईला मदत हवीच आहे तिच्या कामात." आईने आश्चर्याने चित्राकडे पाहिलं.
"अगं काय बोलतेयस तू चित्रा? तुझ्या बाबांना वाटेल मीच बोलले हे तुझ्याशी. कुठून हे वेड घेतलंस?"
"वेड? नाही गं. मला तीव्रपणे वाटलं तेच करतेय. आई, मला तुम्ही दोघंही हवे आहात गं. आता काही मी लहान नाही. लवकरच शिक्षणही संपेल माझं. जुने दिवस आठवते तेव्हा तुमच्या दोघांचं वागणं, माझं तुमच्याबरोबर बदलत गेलेलं नातं हे जसं लक्षात येतं तसं त्यावेळची तुमची मन:स्थिती, तुमच्या दोघांची ओढाताण हे मला आता कळतं. बाबांच्या मनातलं कायमचं एक अपराधीपण आणि तुझं सततचं वैतागलेपण. कोण बरोबर, कोण चुक याचा हिशोब या नात्यात नाहीच करता येत. तुम्ही वेगळं व्हायचं ठरवलंत त्याची नक्की कारणं माहीत नसली तरी अंदाज आहे मला. दोघांची बाजूही आता समजू शकते मी. नात्याचा ताण तुम्हाला झेपला नाही हेच खरं. घटस्फोट झाल्यावर, दूर गेल्यावर कसं सगळं सुरळीत झालंय. तुमचं तुम्हालाही हे जाणवलं असेलच ना? तुमच्या दोघांच्या वागण्याची झळ मला लागत होतीच, तुम्हालाही ते समजत असणारच. बाबा, तुम्ही माझ्या वाट्टेल त्या मागण्या पूर्ण करायचात ते त्यावेळेस आवडायचं मला. आई, तुला वेळ द्यायची इच्छा असूनही जमायचं नाही आणि त्यामुळे आणखीनच चिडचिड व्हायची तुझी. त्या त्या वेळेस राग यायचा पण आता तुम्ही एकमेकांना समजून घेताना दिसता ना, तेव्हा सगळं विसरुन जावंसं वाटतंय. आणि आई, मी इथून गेले की तू अगदी एकटी पडशील गं." चित्रा आईकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहात राहिली. पोटच्या मुलीमध्ये आलेलं प्रौढपण पाहता पाहता आईच्या चेहर्‍यावर हसू उमटलं,
"तुझं तू जमवलं आहेस का कुठे? ते सांगण्यासाठी हा मार्ग?" चित्रा गडबडीने म्हणाली.
"नाही गं. म्हणजे ते ही सांगायचं आहेच. पण आत्ता जे बोलले नं मी ते खरंच आतून आतून जाणवलेलं मला. आजी, आजोबा गेल्यानंतर तुमच्यातला सुसंवाद जाणवतो, आवडतो मला म्हणून मी मागे लागले आहे."
"बरं, बरं, आता मुद्यावर या." बाबा हसून म्हणाले.
" हो, प्रथमशी तुमची भेट कधी घालून देऊ ते दोघांनी सांगा मला." चित्रा पुटपुटली.
"हं, आता खरं बाहेर पडलं. चित्रा, प्रथमला भेटूच आम्ही. पण आमचं दोघाचं पुन्हा एकत्र येणं अशक्य आहे बेटा. आहे तेच चालू राहणं योग्यं. आता तुझी आई काय, मी काय पुन्हा लग्न करु असं वाटत नाही. पण तुटलेला संसार, मनं सांधताना जी कसरत करावी लागते त्याची तयारी नाही माझी. तुझी आई आता माझी मैत्रीण आहे. ती तशीच राहू दे. त्यातच जास्त सुख आहे. हे माझं मत. तुझ्या आईला काय वाटतं ते नाही ठाऊक मला."
"अगदी तेच म्हणणं आहे माझं." दुजोरा देत आई म्हणाली.
"आता पुन्हा हा विषय नको. प्रथमला केव्हा आणते आहेस भेटायला? त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला." प्रथमचं नाव काढल्यानंतर चित्रा त्या दोघांची झालेली भेट, त्याच्या घरची मंडळी या बद्दल बोलण्यात रंगून गेली.
प्रथमला चित्रा घरी घेऊन आली आणि तो मग येतच राहिला. शिक्षण पूर्ण होऊन, स्वत:च्या पायावर उभं राहिल्यावर लग्न होईतो मध्ये तीन चार वर्ष गेली. लग्न झाल्यावर मुंबई सोडून रत्नागिरीला जायचं आहे हे ठाऊक असूनही प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा चित्रा थोडीशी भांबावली पण वाटलं तितकं रत्नागिरीत स्थिर होणं जड गेलं नाही. रत्नागिरीला येऊन दोन वर्ष झाली आणि प्रथमने कणकवलीला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. अर्थात तिच्याच संमतीने. कणकवलीला येऊनही वर्ष झालं होतं. प्रथमच्या आई, बाबांनी त्या दोघांचा संसार स्वतंत्र राहिल याची काळजी घेतली होती. गावातच पण वेगळा संसार होता दोघांचा. असं सगळं सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच प्रथमने असं का करावं? लाल झालेले डोळे चोळत ती त्याने लिहिलेलं पत्र पुन्हा वाचायला लागली.
प्रिय चित्रा,
गेलं वर्षभर मी झगडतोय. नक्की काय करावं ते समजत नाही. तुझ्याशी बोलायचं धाडस नाही म्हणून हे पत्र. पत्र लेखन बरं असतं. एकतर्फी असतं. मनातलं सारं लिहिता येतं. चेहर्‍यावरचे भाव निरखीत शब्द बदलावे लागत नाहीत. जे शब्द मी अनेकदा ओठावर येऊनही गिळून टाकले ते इथे लिहितोय. लिहिताना तुझा चेहरा समोर येतोय. तुला माझ्या शब्दांमुळे किती धक्का बसेल याची कल्पनाही करवत नाही. पण मला वाटत नाही आपलं जमेल. मला कल्पना आहे मी किती दुखावतोय तुला. जे आपल्या दोघांच्या बाबतीत कधीही होऊ नये याची तू आपल्या संसारात दक्षता घेत आलीस त्याच परिस्थितीत मी तुला ढकलतोय. मला ठाऊक आहे, तुझ्या आई वडिलांचा घटस्फोट झाला त्या वाटेवर कधीही पाऊल टाकायचं नाही असा तुझा निर्धार आहे पण त्या निर्धाराचं सावट आपल्या संसारावर पडतंय हे लक्षातच आलं नाही तुझ्या. खूप प्रयत्न केला मी. पण आहे या परिस्थितीत बदल होईल असं वाटत नाही. तू स्वत:ला हरवून बसली आहेस चित्रा. म्हणजे तसं सगळं छान आहे. पण जिथे मतभिन्नतेचा प्रश्न येतो तिथे सारं बदलतं. मतभेद होताच कामा नयेत याची काळजी घेण्याचा तुझा खटाटोप असतो. विचार करतो तेव्हा वाटतं, तुझ्या आई, वडिलांच्या सततच्या वाद विवादाला कंटाळली होतीस तू. त्याचाच हा परिणाम असेल का? म्हणजे तसं तू कधी सांगितलं नाहीस त्यामुळे कदाचित ठरवून नसेलही होत तुझ्याकडून पण वाद टाळतेस तू हे अगदी स्पष्ट जाणवतं. एक दोन वेळा मी विचारलंही तुला कारणांबद्दल. पण धड उत्तर नाही देता आलं तुला. कुठल्याही निर्णय प्रक्रियेत मला तुझा सहभाग हवाय. नुसतं हो ला हो नको चित्रा. आपण एकमेकांचे जोडीदार आहोत. तू माझी गुलाम नाहीस. लग्न झालं म्हणून प्रत्येक गोष्टीला मान तुकवलीच पाहिजे असं कुणी सांगितलं तुला? गेल्या दोन वर्षात एकही गोष्ट मला आठवत नाही ज्याला तू विरोध केलायस. तुझ्या डोळ्यात नाराजी उमटते पण ती तू शब्दात व्यक्त होऊ देत नाहीस. असं का? मी नाना तर्‍हेने हे तुझ्यापाशी खरं तर बोललोय. कितीतरी वेळा अगदी सष्टपणे. असं वागू नकोस म्हणून बजावलं आहे, समजावलं आहे. जर माझं ऐकायचं असंच ठरवलं आहेस तर मग हे का ऐकत नाहीस? भांड ना कडकडून माझ्याशी. आवडेल मला. कितीतरी वेळा तू वाद घालावास म्हणून मी निरर्थक विधानं केली पण आपल्या दोघांमध्ये वादाला जागाच द्यायची नाहीस हे तुझ्या मनात पक्कं ठसलेलं आहे. चुकीचं आहे ते. सांगून सांगून थकलो मी आता. दोन माणसं एकत्र आली की तडजोड करावी लागतेच पण त्यालाही मर्यादा असते. अस्तित्व हरवून गेलेली कळसूत्री बाहुली नकोय मला चित्रा. हाडामांसाचं माणूस हवंय. चिडणारं, रडणारं, हट्ट करणारं, वेळ प्रसंगी कान उपटणारं. आणि नेमकं तेच या लग्नाने मी हरवून बसलोय आणि म्हणूनच चित्रा, मला वेगळं व्हायचंय. मला घटस्फोट हवाय.
चित्राने हातातल्या कागदाचा बोळा केला. रडत रडत ती ओट्याच्या बाजूला कोपर्‍यात गुडघ्यात डोकं घालून बसली. मुंबईच्या घरातल्या एक खणी खोलीत असल्यासारखा तिचा जीव गुदमरायला लागला. चुरगळलेल्या कागदाचा बोळा तिने थरथरत्या हाताने पुन्हा उघडला. ज्या शब्दाला आयुष्यात कधीच थारा नाही असा विश्वास होता चित्राला तोच शब्द तिच्या डोळ्यासमोर पुन्हा नाचत होता, प्रथमचा पत्रातून उतरलेला आवाज पुन्हा पुन्हा कानावर आदळत होता. घटस्फोट. मला घटस्फोट हवाय!

Saturday 24 October 2015

एक फुल कोमेजलेलं.........

एक फुल कोमेजलेलं.........

हि एक हळूवार प्रेमकथा तर आहेच पण सोबतच सध्याच्या
एका ज्वलंत सामाजिक प्रश्नावरही भाष्य करून जाते.
मुंबईच्या धावपळीचा बसचा प्रवास म्हणजे
एक मोठं दिव्यंच!! त्यात वरूणचा आज पहिला दिवस होता
बसच्या प्रवासाचा !! प्रवाश्यांनी खचाखच भरलेल्या
बसमधे तो चढला. बसमधे बसण्यासाठी जागा मिळेल हि
अपेक्षा करणंच चुकिचं होतं, म्हणून तो हँडलला पकडून
उभा राहिला.
वरूण मुळचा नाशिकचा पण आता नोकरीसाठी त्याची
मुंबईला आला होता. मुंबईतल्याच एका नामांकित कंपनीत
एका चांगल्या हूद्यावर त्याची नियुक्ती झाली होती.
आणि आज त्याचा पहिला दिवस होता. त्याला अंधेरीला
उतरायचं होतं. कसाबसा गर्दीत उभा राहून तो स्वत:ला
सांभाळण्याचा प्रयत्न करत होता, इतक्यात मागून
त्याला एक आवाज ऐकू आला.
"excuse mi !!! आता जर का तुझ्या हातांनी limits
cross केले तर बघंच!! खुप महागात पडेल" एक साधारण
२६-२७ वर्षाची तरूणी तिच्या मागे उभ्या असलेल्या
तरूणाला दरडावत होती. तो तिची छेड काढत होता बहूतेक
.... हे पाहून वरूणलाही थोडा राग आला व तो त्या मुलाला
म्हणाला, "lediesची रिस्पेक्ट करता येत नसेल तर किमान
त्यांचा अपमान तरी करू नका!!"
यावर तो तरूण वरमून मागे सरकुन उभा राहिला.
"thanx ..... पण हा माझा प्रॉब्लेम आहे मी स्वतः हँडल
करीन प्लीज तुम्ही यात पडू नका!! " ती तरूणी म्हणाली.
तिचं बोलणं वरूणला थोडं विचित्रच वाटलं 'अजीब आहे
यार!!! स्त्री दाक्षिण्य म्हणून हिच्या बाजूने बोललो तर
हिने मलाच लेक्चर दिलं' वरूण मनातल्या मनात बोलला.
पण त्याची नजर वारंवार तिला पाहण्यासाठी धडपडत
होती, चोरट्या नजरेनेच का होईना पण तो तिला
पाहण्याचा प्रयत्न करत होता. गडद निळ्या जिन्सवर
हलक्या पिवळ्या रंगाचा कुर्ता डाव्या खांद्यावर लाल
रंगाची बॅग, पिवळ्या क्लिपने अर्धे केस बांधलेले, तरपकिरी
रंगाच्या टपो-या डोळे काजळाच्या हलक्या रेषेनेही
आकर्षक दिसत होते. पण कपाळावर उजव्या बाजूला मात्र
कसलीतरी जखमेची खूण होती. पण डोळ्यातल्या
काजळाव्यतीरिक्त कसलाच मेकअप तिच्या चेह-यावर
नव्हता. इतक्यात केसांची एक बट तिच्या चेह-यावर आली
आणि आपल्या नाजूक बोटांनी त्यांना बाजूला करत होती व
त्या हाताखालून तिचा खोचक कटाक्ष वरूणकडे गेला.
"आता तुम्ही का असे एकटक पाहताय!! " तिने नाराजीने
विचारलं, तशी वरूणने खाली मान घातली. यावर तो काही
बोलणार इतक्यात कंडक्टरने बेल वाजवली "अंधेरी कोण?
उतरा लवकर चला चला." मागे वळून ती
तरूणी उतरली, तिच्या मागोमाग वरूणही उतरला. जाता
जाता तिच्या तोंडून "idiot!! " हि उपाधी त्याच्या
कानावर पडल्याशिवाय राहिली नाही. यावर वरूण
कमालीचा अचंबीत झाला होता, पण तिची नजर मात्र
त्याला कुठेतरी मनात खोलवर टोचली होती.
ऑफिसमधे पोहोचताच वरूण बॉसच्या कॅबीनमधे गेला. मग
काहि वेळाने बॉस त्याला घेऊन ऑफिसच्या स्टाफकडे गेले.
आणि वरूणची ओळख करून देत म्हणाले,
"डिअर स्टाफ, हे मि. वरूण देशमुख आजपासून हे तुमच्या
टिमचे हे हेड आहेत, I hope यांच्या guidance ने तुम्ही
आणखी प्रभावीपणे आणि एकत्र काम कराल! "
अचानक वरूणची नजर स्टाफमधे उभी असलेल्या एका
तरूणीकडे गेली, हि तर तीच होती.... जी त्याला बसमधे
भेटली होती. पण तिने मात्र त्याला पाहून नजर खाली
घातली. त्यानंतर बॉस निघून गेले. मग वरूण स्टाफजवळ
गेला आणी म्हणाला, "guys!!! मी तुमचा हेड आहे हे
विसरून जा आणि मोकळेपणाने तुमच्या ideas माझ्याशी
शेअर करा, काही प्रॉब्लेम्स असतील तर तेही शेअर करा
ok!! सर्वात आधी मला तुमच्या सर्वांचं introduction
द्या " सगळ्यांचं intro घेतल्यानंतर त्याला कळलं कि तिचं
नाव 'निधी' होतं. एकंदरीत ऑफिसमधल्या सर्वांनाच
वरूणचा स्वभाव व काम करण्याची पद्धत फार आवडली.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर सर्वजण निघून गेले. निधी
व तिची मैत्रिण दिपालीही निघतच होत्या कि वरूण ने
त्यांना थांबायला सांगितले.
मग निधीला तो म्हणाला, "मिस. निधी तुमच्या जुन्या
हेडची work staterji काय होती ते जरा मला सांगशील
का?" तीने काहीच उत्तर दिले नाही यावर तिची मैत्रीण
म्हणाली." निधी खुप हूशार आहे, आधीच्या सरांची तिने
खुप मदत केलीय. हि बघा फाईल!! " वरूणने ती फाईल
घेतली मग निधी दिपालीला बाहेर खेचतच घेऊन गेली आणि
म्हणाली, "अगं पागल!! हा तोच आहे ज्याला सकाळी मी
ओरडले होते."
इकडे वरूण एक एक करून त्या फाईलीची पानं चाळू लागला.
तिकडे कॉरीडोअरमधून निधी त्याला पहात उभी होती.
हळूहळू वरूण ऑफिसमधे ब-यापैकी रूळला होता.
ऑफिसच्या स्टफचा तो आवडता झाला होता आणि त्याचे
बॉसही त्याच्या कामावर खुश होते शिवाय निधीच्या.....
ती शक्यतो त्याच्यापासून दूर रहायची.जणू ती त्याला
टाळायचा प्रयत्न करत होती. हाक मारतानाही ती त्याला
इतरांप्रमाणे 'वरूण' न म्हणता मि. देशमुख म्हणायची,
त्यावेळी त्याला तिचं बोलणं असं खुप खोचक वाटायचं,
नेमकी तिची हिच गोष्ट वरूणला खटकायची.
एक दिवस निधी वरूणच्या कॅबीनमधे आली आणि म्हणाली,
"मि. देशमुख!! "
" निधी!! तु इथे ? ...काही काम...." वरूण म्हणाला.
"मि. देशमुख ..... त्या दिवशी ...... बसमधे मी तुम्हाला
rudely बोलले त्याबद्दल खरंच I'm really very sorry
" ती म्हणाली.
"It's ok निधी... तु plz sorry म्हणू नकोस ... मी तर
कधीच त्या गोष्टिला विसरलोय " तो म्हणाला.
"तरीपण .... मला असं बोलायला नको होतं" निधी
"निधी ..... plz no sorry " वरूण म्हणाला.
त्यानंतर निधी तिथून निघून गेली.
वरूणला ऑफिस जॉइन करून आता ८ महिने झाले होते, पण
त्या दिवसा व्यतीरिक्त पुन्हा त्या दोघांमधे कधीच बोलणं
झालं नाही. निधी, वरूणकडे नेहमी अनोळखी
असल्यासारखी बघायची. काही काम असेल तरच
तेवढ्यापुरतं बोलून निघून जायची, याच गोष्टीचं त्याला
वाईट वाटायचं. वरूणप्रमाणेच निधीही ऑफिसमधे सर्वांची
feourite होती
एकदा वरूण काही कामानिमित्त निधीच्या समोरच्या
टेबलवरच्या स्टाफकडे गेला त्याचवेळी दिपालीने निधीकडे
वेगळ्याच नजरेने पाहिले आणि हळूच तिला कोपराने
खुणावले. हि गोष्ट वरूणच्या नजरेतून सुटली नाही. पण
त्याने बघून न बघीतल्यासारखे केले. त्याने अनेकवेळा
दिपालीला तसं करताना पाहिलं होतं. त्या या गोष्टीची
गंम्मत वाटायची.
एक दिवस ऑफिसच्या कँटिनमधे वरूण चहा घेत होता.
दिपालीही तेव्हा तिथे चहा घेण्यासाठी आली होती. तिला
पाहून वरूण उठून तिच्या टेबलजवळ गेला.
"hi दिपाली can I join you?" तो म्हणाला.
"ohh! वरूण तू .. plz have sit" दिपाली हसून म्हणाली.
"हम्म्म..... काय मग कसं चाललंय तुझं काम?" तो
म्हणाला.
"एकदम छान..... त्यात तू उत्तम सर्वांना सांभाळून
घेतोस त्यामुळे काहिच टेन्शन नाही येत" दिपाली
म्हणाली.
"तुझी मैत्रीण निधी नाही आज बरोबर तुझ्या "
निधीबद्दल काही जाणून घेण्याच्या उद्देशाने तो
म्हणाला.
"नाही अरे.... तिला थोडं काम होतं so..... ती ऑफिसमधेच
थांबलीय.. "दिपाली म्हणाली.
इतके दिवस मनात चाललेली घालमेल त्याला आज
संपवायची होती म्हणून तो म्हणाला, " दिपाली!! मला
तुझ्याशी निधीबद्दल थोडं बोलायचंय..... ती का वागते
अशी माझ्याशी ...... म्हणजे अशी तुटक तुटक ...."
त्याचं बोलणं ऐकून आता दिपालीही थोडी गंभीर झाली
कारण तिला याचं कारण माहित होतं तरीही उसनं हसू चेह-
यावर आणत ती म्हणाली," वरूण!! निधी माझी
कॉलेजपासूनची मैत्रीण आहे ... एकदम Best Freind ...
त्यानंतर माझं लग्न ठरलं आणि आम्ही वेगळ्या झालो .....
पण तरीही इतक्या वर्षांनी आजही आम्ही एकत्र
आहोत.खुप छान स्वभाव आहे तिचा!! " दिपाली म्हणाली.
"मग ती माझ्याशीच अशी का वागते?..... ऑफिसमधेही
सर्वांशी बोलते पण मग माझ्याशीच का मोकळेपणाने बोलत
नाही ती?" वरूण म्हणाला.
"वरूण तिचा स्वभाव मुळात असा नाहिये रे.....बाहेरच्या
जगात तर तीसुद्धा मोकळा श्वास घ्यायला आसुसते रे
पण....... भुतकाळाच्या आठवणी तिला तसं नाही करू
देत..... जणू काही त्या आठवणी तिच्या पायातल्या
बेड्याच बनून राहिल्यात...." दिपाली उदास होऊन
म्हणाली.
"म्हणजे मला काही कळलं नाही .. दिपाली.... काय असं
काय घडलंय तिच्या आयुष्यात?" वरूण काळजीने म्हणाला.
"सॉरी वरूण तिच्याबद्दल यापेक्षा आणखी जास्त काही
मी नाही सांगू शकत तुला... मला माहित आहे वरूण तू
तिला पसंत करतोस.... पण प्लिज... जमलं तर विसरून जा
तिला " आणि बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला अन् ती
तिथून उठून निघून गेली.
वरूणला काहीच कळेना कि काय झालं असावं निधीच्या
आयुष्यात..... तो पुरता गोंधळून गेला होता.
एक दिवस वरूण त्याच्या केबीनमधून बाहेर आला असता
समोर त्याला निधी उभी असलेली दिसली, तिने जांभळ्या
रंगाचा पंजाबीसूट घातला होता, फारंच गोड दिसत होती
ती....
"निधी तू?.... काही काम होतं का? " त्याने विचारलं.
"हो......या फाईलमधे काही doubts होते ते clear करायचे
होते " निधी
"ठिक आहे चालेल , तु हो पुढे मी आलोच बॉसशी थोडं
बोलून " वरूण म्हणाला आणि तो बॉसच्या केबीनकडे निघून
गेला. थोड्या वेळाने बाहेर आला तर निधी अजूनही तिथेच
उभी होती. मग दोघेही त्याच्या केबीनमधे गेले, काम करता
करता वेळ कसा निघून गेला, कळलंच नाही. अजुनही थोडं
काम बाकी होतंच, इतक्यात lunchtime ही झाला होता.
शेवटी वरूणच्याच आग्रहाखातर निधी त्याच्याबरोबर
कँटिनमधे गेली. आज शनिवार असल्यामुळे कँटिनमधे जास्त
गर्दीही नव्हती. एक मोकळा टेबल बघून दोघेही तिथे
बसले. बसल्यानंतर काहीवेळ कुणीच काही बोललं नाही,
शेवटी
"कामात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही ना? निधी "
काहीतरी बोलायचं म्हणून वरूणनेच सुरवात केली.
"हम्म.... आता काही प्रॉब्लेम नाहिये " निधी म्हणाली.
न रहावून वरूण म्हणाला, " निधी!! तुझ्या डोळ्याजवळ हि
खुन कसली गं? काही लागली होतं का तुला?"
हे ऐकताच निधी बावरली, तिला खरं तर वरूणला सगळं
काही सांगायचं होतं पण अचानक तिने वेटरला हाक मारली,
"वेटर!! एक प्लेट फ्राइड राइस? आणि तूम्ही काय घेणार?
" तिने वरूणला विचारलं
"हो मी ही ऑर्डर करतो पण एका अटीवर..... तु मला
'तुम्ही' न म्हणता 'तू' म्हणालीस तरच " वरूण हसून
म्हणाला.
"ok .... तू काय घेणार?" तिने पुन्हा विचारलं.
"माझीही same order " वरूण म्हणाला.
ऑर्डर आल्यानंतर दोघांनीही लंच केला. नंतर दोघेही
कँटिन बाहेर पडले.
इतक्यात वरूण म्हणाला, " थांब निधी!! मला तुझ्याशी
आणखी थोडं काही बोलायचं आहे ..."
तशी निधी जागेवरच थांबली आणि मागे वळून तिने
त्याच्याकडे पाहिलं अन् म्हणाली, "माझ्याशी? .......
काय?"
"निधी मला तुझ्याविषयी जाणून घ्यायचंय .... तू का अशी
तुटक तुटक वागतेस माझ्याशी ? .... माझं काही चुकलंय
का? .... काही प्रॉब्लेम असेल सांग मला मन मोकळं कर
तुझं पण प्लिज अशी मनातल्या मनात कुढत राहू नकोस.."
वरूण म्हणाला.
आता निधीला त्याच्याशी बोलणं भाग होतं.... तिलाही
तिच्या मनाच्या होणा-या घुसमटीतून मोकळं व्हायचं होतं.
मग दोघेही एके ठिकाणी जाऊन बसले. एक लांब उसासा घेत
तिने सांगायला सुरवात केली त्यावेळी तिने ने जे काही
वरूणला सांगितलं वरूणने त्याचा स्वप्नातही विचार केला
नव्हता.
निधी म्हणाली," ४ वर्षापुर्वी .... म्हणजे २०११साली
...माझं लग्न ठरलं होतं ... वैभवशी.....माझा मित्रच
होता तो..... माझं त्याच्यावर प्रेम होतं अश्यातला भाग
नव्हता .... पण आमची खुप चांगली friendship होती.....
त्यामुळे त्याने जेव्हा मला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा मी
कसलाही मागचापुढचा विचार करता त्याला होकार
दिला........ आमच्या घरच्यांनाही याबद्दल कळवण्यात
आलं..... माझ्या घरच्यांनाही तो आवडला....... मग पुढे
बोलणी होऊन आमच्या लग्नाची तारीखही ठरली.......
लग्न ठरल्यामुळे मीहि खुप आनंदात होते..... भावी
आयुष्याची स्वप्न रंगवू लागले होते......आमच्या लग्नाला
काहीच दिवस शिल्लक होते.... त्यामुळे एक दिवस मी
दिपालीला घेऊन माझ्या लग्नाची खरेदी करण्यासाठी
गेले..... आम्ही खुप खरेदी केली... साडी, दागिने,
बांगड्या... खरेदी करता करता कधी रात्र झाली कळलंच
नाही..... दिपालीलाही तिच्या घरून फोन आला होता आणि
माझ्याही .... त्यामुळे आम्ही दोघी खरेदी आटपून लगेच
निघालो..... रात्रीचे ८ वाजले होते....दिपालीची बस
आल्यामुळे नाइलाजाने तिला निघून जावं लागलं......आता
बसस्टॉपवर मी एकटीच सगळ सामान घेऊन उभी होते.....
तास दोन तास झाले तरी माझी बस यायचं नावंच घेत
नव्हती....... आता तर रात्रीचे १० वाजले होते, आणि
बसस्टॉपवरची गर्दीही हळूहळू कमी होऊ लागली होती....
मग मात्र माझा धीर खचू लागला. शेवटी नाईलाजाने मी
एका ऑटोरिक्षाने घरी जायचे ठरविले.......
म्हणून मी एका ऑटोवाल्याला थांबविले, " डोंबिवली
जाणार का?"
त्याने एकवार माझ्याकडे आणि माझ्या हातातील
सामानाकडे न्याहळून पाहिले. मग म्हणाला, " हा!! ....बैठो
अंदर!! "
मलाही त्याचं वागणं जरा विचित्रच वाटलं.... पण
माझ्यासमोर दुसरा पर्यायही नव्हता म्हणून मीसुद्धा
ऑटोमधे बसले, आणि ऑटो सुरू झाली, "कुठल्याही
परीस्थित मला घरी पोहोचायचं आहे बस्स एवढाच विचार
माझ्या डोक्यात सुरू होता." मनात तर प्रचंड धाकधूक सुरू
होती, काही अंतर पुढे गेल्यानंतर त्या ऑटोवाल्याने
अचानक ऑटो दुस-या रस्त्यावर वळवली आणि एका
निर्जन रस्त्याने ऑटो घेऊन जाऊ लागला..... हि गोष्ट
लगेच माझ्या लक्षात आली.... आणि मी त्याला ऑटो
थांबविण्यासाठी ओरडू लागले ...... पण त्याने माझं
काहिच न ऐकता रिक्षा आणखी वेगाने दामटवायला
सुरवात केली...... आता मात्र मला चांगलाच दरदरून घाम
फुटला..... मला काय कराव तेच सुचत नव्हतं .... भितीने
डोकं एकदम बधीर झाल्यासारखं वाटत होतं....... मला रडू
यायला लागलं होतं..... इतक्यात त्या ऑटोवाल्याने एका
निर्जन ठिकाणी ऑटो थांबवली आणि उतरून माझ्याजवळ
येऊन उभा राहिला...... मला ओरडायचं होतं पण गळ्यातून
आवाजच फुटत नव्हता...... एखाद्या भेदरलेल्या
सशासारखी माझी अवस्था झाली होती...... तो नराधम
मात्र क्रूरपणे माझ्याकडे पाहून हसत होता......... मग
त्याने कचकन माझा हाथ धरला आणि मला ऑटोबाहेर
खेचून काढलं व फरफटत मला तिथून लांब नेलं........ मी
त्याला खुप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण.....
त्या नीच माणसापुढे माझा निभाव नाही लागला......
माझ्या डोळ्यांदेखत त्याने माझ्या अब्रूच्या चिंधड्या
चिंधड्या केल्या........ क्षणात माझ्या सगळ्या स्वप्नांचा
चक्काचूर झाला होता.... शरीर वेदनेने बधीर झालं
होतं..... " हे सांगत असतानाही निधीच्या डोळ्यांसमोर ती
रात्र व तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला होता.
आणि ते आठवून ती थरथर कापत होती.
"वरूण!!!! ४८ तास ..... मी त्या भयाण दहशतीच्या
छायेखाली घालवले.... दोन दिवसांनंतर त्या निर्जन
ठिकाणी पोलीसांना बेशुद्धावस्थेत मिळाली
होती.....माझ्यासकट माझ्या घरच्यांनाही ह्या घटनेचा
जबर धक्का बसला होता.....किमान महिनाभर मी माझ्या
आजूबाजूच्या लोकांपासून स्वतःला तोडून टाकलं होतं......
या दरम्यान वैभवने एकदाही माझी विचारपूस करण्यासाठी
मला कॉल केला नाही..... भेटायला येणं तर खुप लांबची
गोष्ट होती....... एक दिवस मात्र त्याने माझ्या घरी
फोन केला. माझ्याशी तर तो बोललाच नाही पण माझ्या
बाबांना मात्र म्हणाला कि, "मी निधीशी लग्न नाही करू
शकत"... जेव्हा माझ्या बाबांनी त्याला समजावण्याचा
प्रयत्न केला तर उलट त्याने रागाने असं म्हणून फोन ठेवून
दिला कि,"जी मुलगी स्वतःची इज्जत नाही वाचवू शकत,
स्वतःला सांभाळू नाही शकत ती घरातल्या जबाबदा-या
काय सांभाळणार, तिच्याशी लग्न करून उद्या मी
कुणाकुणाची तोंड बंद करू?"
आधीच्या भयानक प्रसंगातून मी अजून धड सावरलीही
नव्हती कि वैभवने हा दुसरा आघात माझ्यावर केला
होता....... मला स्वतःचीच लाज वाटू लागली होती.......
असं वाटत होतं कि संपवून टाकावं स्वतःला, नष्ट करून
टाकावं हे विटाळलेलं शरीर...... पण त्याही परीस्थितीत
माझ्या आई-वडिलांनी आणि दिपालीने मला धीर
दिला....... त्यावेळी जर या तिघांनी मला सावरलं नसतं
तर कदाचित आज मी जिवंतही राहिले नसते....... त्या
नीच नराधमाविरोधात मी कोर्टात लढा दिला....... त्याला
१० वर्षांची शिक्षा झाली...." निधीच्या डोळ्यातून
घळाघळा अश्रू वहात होते व तिच्या हातावर ठेवलेला
वरूणचा हात भिजवत होते....... .
"I'm rape victim वरूण!!! प्लिज मला विसरून जा......
मी तुझ्या लायक नाहिये रे.... माझ्या सुखांचा तर कधीच
अंत झालाय.......तुझ्या आयुष्यात अजून खुप सुखं यायची
आहेत...... ..... खरं तर मी तुझ्यापासून दूर जाण्यासाठी
पुढच्याच महिन्यात resign करू जाणार होते. " हे सगळं
ऐकून वरूणही हादरून गेला होता, नकळत त्याच्याही
डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. त्याच्याही मनात विचार
आला कि असे कसे पुरूष इतके निर्दयी असू शकतात, एक
म्हणजे तो तो नीच ऑटोवाला ज्याने स्वतःच्या वासनेपोटी
निधीचं आयुष्य बरबाद केलं आणि एक वैभव ज्याने
निधीवर आलेल्या संकटात तिची साथ सोडली व
लग्नाआधीच आलेल्या पहिल्या जबाबदारीपासून हाथ
झटकले." त्याला त्या दोघांचीही चीड आली.
आज निधीने आपलं मन वरूणसमोर मोकळं करू टाकलं होतं
ज्याच्यावर तीने गेल्या ८ महिन्यांपासून मनोमन खुप प्रेम
केलं होतं. काही क्षण शांततेत निघून गेले
मग वरूण स्वतःच तिला म्हणाला, "निधी चल आपल्याला
आता निघायला हवं खुप उशीर झालाय."
निधीला त्याचं हे वागणं आधीपासूनच अपेक्षित होतं.
दोघेहि आपापल्या मार्गाने निघून गेले. जाता वरूणने
कुणाला तरी कॉल केला.
त्या रात्री निधीही खुप रडली. न जानो गेल्या कित्येक
दिवसांपासून तिने हे अश्रू डोळ्यांत साठवून ठेवले होते.
दुस-या दिवशी निधी नेहमीप्रमाणे ऑफिसला आली. तिला
वरूण कुठेच दिसला नाही, इतक्यात तिला दिपालीचा कॉल
आला, "निधी कुठेयस तू? ..... लवकर मला बिल्डिंगखाली
येऊन भेट!! "
"अगं पण का? ... काय काम आहे?" निधीने विचारलं.
"तू जास्त प्रश्न करू नकोस गं .... प्लिज लवकर ये खाली
" दिपाली म्हणाली आणि तिने फोन ठेवून दिला.
निधी तिला भेटायला ऑफिसमधून बाहेर गेली. समोर
दिपाली दिसताच ती म्हणाली, "हं... बोल का इतक्या
घाईने बोलावलंस मला?"
दिपाली तिला म्हणाली, "१मिनट थांब!!", "वरूण!! " तिने
मागे वळून हाक मारली. तसा वरूण निधीसमोर येऊन उभा
राहिला. आणि दिपाली तिथून हसून निघून गेली.
"वरूण तू?... काय चाल्लंय हे सगळं?" निधीने गोंधळून
विचारलं.
"निधी!! .... तुझ्या बाबतीत जे काही घडून गेलं त्यात तुझा
काहीच दोष नव्हता..... U'r not a victim निधी , U'r a
Fighter ... या घटनेनंतर खचून न जाता स्वतःला न्याय
मिळवून देण्यासाठी तू कोर्टात लढा दिलास ...... अशी
हिंम्मत फार कमी मुली दाखवतात...... मला नेहमीच तुझा
अभिमान वाटेल निधी...... माझ्याशी लग्न करशील
का?....."
"काय?." निधी त्याच्याकडे आश्चर्याने पहातच राहिली.
"होय निधी!! ... खरंच विचारतेय मी तुला ... करशील
माझ्याशी लग्न?....... पण तू असं नको समजूस कि
तुझ्याशी लग्न करून मी तुझ्यावर उपकार करतोय .....उलट
तू माझ्याशी लग्ग केलंस तर मी स्वतःला भाग्यवान
समजेन.....माझं खरंच मनापासून खुप प्रेम आहे
तुझ्यावर..... आणि मला तुझ्यासारख्या शौर्यवान मुलीचा
नवरा म्हणवून घ्यायला नक्किच आवडेल." वरूण तिच्या
डोळ्यात पहात होता. आणि निधीच्या डोळ्यात आनंदाचे
अश्रू तरळले व तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं,
अश्रूंवाटे तिचं सगळं दुखं आज कायमचं वाहून चाललं होतं.
आणि दूर कुणाच्यातरी मोबाईलवर गाणं सुरू होतं :
मिला हू अब जो तुमसे, है दिल को मेरे कसम से सुकून
मिला....सुकून मिला
तुझे है पाया रब से, है दिल को मेरे कसम से सुकून
मिला....सुकून मिला
हर पल हसी सा हुआ है, सांसों को तुने छुवा है ,
बढी तुझसे नजदीकीया ...सुकून मिला......
या कथेवरून एक प्रश्न सतत मनात येत राहातो... तो हा
कि अशा घटनांमधे खरच ती मुलगी जबाबदर असते
का? ..... जर नाही ...... तर मग का? आपला समाज
अश्या मुलींचा स्वीकार करत नाही. का? त्यांना डावलून
आणि झिडकारून हा समाज मोकळा होतो?........ अश्या
घटनेनंतर मुली मानसिकरित्या पुर्णपणे खचून जातात,
त्यांना ख-या आधाराची, धीराची गरज असते त्यात
लोकांच्या अश्या मानसिकतमुळे त्या स्वतःलाच अपराधी
समजून एक तर मनातल्या मनात घुसमटत रहातात किंवा
कुणाच्या आधाराअभावी स्वतःला न्याय मिळवून
देण्याएवजी मृत्यूला कवटाळतात. दिवसेंदिवस अश्या
घटनांचं प्रमाण वाढंतच आहे. मी एकच विनंती या
समाजाला करीन कि अश्या मुलींना झिडकारू नका, त्यांचा
ताठ मानेने जगण्याचा अधिकार हिसकावून घेऊ नका.....
ज्या दिवशी मुलींकडे -स्त्रीयांकडे बघण्याची समाजाची
'नजर' व मानसिकता बदलेल त्या दिवशी आपल्या
समाजात कुठल्याच मुलीवर "निर्भया" होण्याची वेळ
येणार नाही. उलट तिला पाठबळ दिलंत तर तिही "निधी"
प्रमाणे अन्यायाविरूद्ध लढा दे स्वतःलः न्याय मिळवून
देऊ शकते.