Friday 13 September 2013

संधी ...............

एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकोप्तर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो.

तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकोप्तर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या.

मित्रानो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका.

Thursday 12 September 2013

तो बाप चक्कर येऊन तिथेच थंड पडला...





समुद्र किनाऱ्यावर छोटे बहिण
भाऊ वाळूचं घर बनवण्यात मग्न
होते..
"थांब दादा असं नाही...
इथे आपण
गाडी ठेवायची.."

त्यांचा खेळ कल्पना पाहताना त्यांच्या आईला फार
बर वाटत होत...

"आई बघ हं,,
ही रूम माझी,,
ही ताई ची,,
आणि ही तुझी..
किती छान आहे
ना आपलं घर...??.."

आपण बनवलेलं घर आपल्या आईला कौतुकाने दाखवत
मुलगा म्हणाला..

इतक्यात त्याचे
बाबा मुलांसाठी आईस क्रीम घेऊन
आले,,
आणि विचारल
"आणि माझी रूम
रे..??
मी कुठे राहायचं..??"

निरागसपणे त्या छोट्या जीवांनी उत्तर दिलं,
"बाबा तुम्हाला कशाला हवीये रूम..??
तुम्ही कसं आजोबांना वृद्धाश्रमात
पाठवलंत,,
आम्ही पण
तुम्हाला पाठवणार..
बाबा म्हातारे झाले कि त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात
ना..??.."

हे ऐकून
त्या बापाला आपल्या केलेल्या कर्माची फळ
दिसू लागली....
विचार चक्र जोरात फिरू
लागलं...

'हे आपण काय शिकवलं..??'

विचार चक्राची गती वाढत
गेली आणि तो बाप चक्कर येऊन
तिथेच थंड पडला...

सिगारेट....?







प्रेयसी :- तुला कित्ती वेळा सांगितले रे सिगारेट ओढत नको जाऊस म्हणून ........... तू ऐकत का नाहीस ?
प्रियकर :- अग ...... सोडण्याचाप्रयत्न करतोय, पण सुटतच नाहीये ...त्यात आपल्या घरचेtension देत आहेत ....लग्नाला नाही म्हणत आहेत .....!!
प्रेयसी :- हे tension मला पणआहे ............ पण म्हणून मी पिते का सिगारेट ?
प्रियकर :- अग मग कसे समजावयाचे ह्या घरच्यांना......... !!!
प्रेयसी :- अरे म्हणून काय, सिगारेट, दारू, चीडचीडपणा......हि आपल्या समस्ये वरील औषधे आहेत का ?
प्रियकर :- हे बघ .... उगीच मला lecture देऊ नकोस ...... त्यापेक्षा घरच्यांना कसे समजावयाचे त्याचा विचार कर!!
प्रेयसी :- घरच्यांच्या आधीतुला समजावणे जास्त जरुरीचे आहे ............... ...
प्रियकर :- म्हणजे ?
प्रेयसी :- चल माझ्या बरोबर..
प्रियकर :- कुठे ?
(तिथेच शेजारी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात ती प्रेयसी त्याला घेऊन जाते............... . मंदिरात आल्यामुळे त्याला सिगारेट फेकून द्यावी लागते, तो नाराजीने हाथ जोडून कपाळावर आठ्या आणून तिच्या बरोबर उभा राहतो)
प्रेयसी हाथ जोडून त्याला ऐकू जाईल अशा आवाजात गणपती बाप्प्पा ला म्हणते :- हे विघ्नहर्ता, ह्याची एक सिगारेट म्हणजे माझ्या आयुष्यातील एक दिवस .......... ह्याप्रमाणे हा जेवढ्या सिगारेट पिल तेवढे माझ्या आयुष्यातील दिवस तू कमी कर......... हि माझी तुझ्याकडे प्रार्थना, ...... कारण सिगारेट तो पितो पण धूर माझ्या हृदयातून निघतो हे ह्याला कदाचित कधी कळणारच नाही ......!!

शेवटचा क्षण .........................

पहिला मित्र : एक प्रश्न विचारू?

दुसरा मित्र : हा विचार ना?

पहिला मित्र : समज जर तुला असे कळले कि,
तुझ्याकडे जगण्यासाठी आता फक्त एकाच क्षण उरलाय.
आणि या क्षणात तू कोणत्याही पण फक्त एकाच आवडत्या व्यक्तीला भेटू शकतोस, तर तू कुणाला भेटशील?

दुसरा मित्र : अअअअअअ......
असे असेल तर मी त्या क्षणात कोणालाच भेटणार नाही....

पहिला मित्र : असे का?सांगशील?

दुसरा मित्र : सांगतो ना.....
हे बघ,
जर मी तुला म्हटले कि,मी त्या क्षणात माझ्या आईवडिलांना भेटेन.
तर तू म्हणशील कि,फक्त एकालाच भेटायचं......एकतर आई नाहीतर बाबा....एकाचच नाव सांग
मग मी म्हणेन कि,"आईला भेटेन,खूप प्रेम आहे तिचे माझ्यावर...."
मग तू म्हणशील,"म्हणजे तुला असे म्हणायचेय का कि तुझ्या बाबांचे तुझ्यावर प्रेम नाही....
अरे ते दाखवत नाहीत पण आई एवढीच त्यांना पण तुझी तितकीच काळजी आहे...
मग मी पुन्हा कोड्यात पडेन आणि म्हणेन कि,ठीक आहे मग मी त्या क्षणात माझ्या बाबांना भेटेन.
मग तुझा पुढचा प्रश्न असेल कि,"आई वडिलांचे नाव घेतलेस,पण तुझ्या प्रेयसीचे नाव नाही घेतलेस.
ती पण इतकी प्रेम करते तुझ्यावर.तिला भेटावेसे नाही वाटणार का?"
मग मी पुन्हा कोड्यात पडेन.
पण खरे सांगायचे तर
नात्यांमध्ये असा क्रम नाही लावता येत,
हे नाते आधी आणि ते नाते नंतर.......
मला जरासा क्षण मिळाला तर मी कोणालाच प्रत्त्यक्ष कोणालाच भेटणार नाही
त्या क्षणात मी माझे डोळे बंद करून घेईन आणि
माझ्या सगळ्या आवडत्या व्यक्तींना मनातल्या मनात आठवेन...माझी आई,बाबा,ती आणि माझे मित्र मैत्रींनी........आणि सगळेच
कारण
तो यम माझ्या त्या शेवटच्या क्षणावर ताबा ठेवू शकतो
पण माझ्या मनावर नाही".........

.....................ओढणी ..................

......................ओढणी ..................

ट्रेनची चौथी सीट पकडून प्रवास केल्यावर चेहऱ्यावर 'एक गड' जिंकून 'एक योद्धा' आल्याच्या
अविर्भावात मी चाळीत प्रवेश केला....
चाळीच्या दाराशी लोकांची गर्दी दिसली."मी 'चौथ्या सीटची लढाई' जिंकली हि खबर चाळीत पण पोहोचली कि काय?".
हे लोक माझी आता आरती ओवाळणार..."यावे यावे राजे....आप आई बहार आई....."
पण मी चाळीत प्रवेश केला तरीही कुणी ढुंकूनही पाहिले नाही माझ्याकडे....मग मात्र मला थोडा संशयच आला....

आम्हा चाळीतल्या लोकांना जरा सवयच असते गर्दी करायची.
'स्वत:च्या घरात काय चालू आहे' या ज्ञानाबरोबर 'इतर शेजारांच्या घरात काय चालू आहे' हे माहित असणं आमच्यासाठी
अतिमहत्त्वाचं असतं...जसे ते तसा मी...मग मी हि मागच्या एकाला हळूच कानात विचारले,
"काय झालं रे मंग्या? अन्याच्या घरात काही झालंय काय? कुणी गचकला कि काय?"...मी अशीच मस्करी केली.
"गचकला नाही....गचकावला...अन्याने स्वत:च्या बायकोला गळा घोटून मारले"...

ऐकल्याच क्षणी माझा हात माझ्याच गळ्याशी गेला....थोडा भूकंप झाल्यासारखे वाटले...योद्धा थोडा हडबडला होता....
अनिकेत अशी काही हरकत करेल हे माझ्याच काय तर इतर कुणाच्या हि बुद्धीला पटणारे नव्हते.
कारण अनिकेत म्हणजे तसा सुजाण माणूस होता.सगळ्यांत मिळून मिसळून राहणारा.माझा यार....
दिसायलाही राजबिंडा.नोकरी चांगली होती.स्वत:चे राहते घर होते....आई बाबांचा लाडका नसला तरी दोडका पण नव्हता.
जशी इतर घरात होतात तशी त्यांच्या हि घरात भांडणं व्हायची....शेवटी काय...?
दोन पिढ्या एकत्र वावरताना दोनच गोष्टी गरजेच्या असतात....एकतर 'संवाद' नाहीतर 'शांतता'...
दोन्ही नसेल तेव्हा फक्त युद्धं होतात....रक्त नाही सांडली तरी भांडी पडतात....त्यांना पोकं येतात....

अनिकेतची बायको म्हणजे 'काव्या'...काव्या नावासारखीच होती...कवितेसारखी....रेंगाळणारी....
दिसायला नक्षत्र....वागायला नम्र..... नजर लागायची १००% शक्यता होती.....आणि लागलीच....
डोळ्यांत खूप स्वप्न घेऊन अनिकेतसोबत एका वर्षापूर्वीच तिने 'थोरातांची सून' म्हणून घरात प्रवेश केला होता.
मोठ्या कौतुकाने अनिकेतने बायकोचे नाव 'काव्या' ठेवले होते.तेव्हापासून 'पूजा शिंदे' ची 'काव्या थोरात' झाली होती.
माझी काही जास्त ओळख नव्हती तिच्याशी पण बोलून चालून ओळख होती.

तिचे प्रेत बाहेर आणले गेले.तिचा चेहरा अजूनही हसरा होता.
'सुंदर लोक कोणत्याही क्षणी कोणत्याही वेशात सुंदरच दिसतात' याची खात्री पटली.
मागून अनिकेतला आणले गेले.त्याच्या चेहऱ्यावर भाव विचित्र होते.कळत नव्हते...
छोटासा का होईना लेखक मी.....पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला शब्दात पकडता येत नव्हते.
पोलीस आले आणि अनिकेतला घेऊन गेले.....आणि काव्याचा देह सुद्धा....
गुन्हा अनिकेतने कबूल केल्याने पोस्ट-मार्टम करण्यास जास्त वेळ लागणार नव्हता....

गर्दीची सर्व कारणं गेल्यावर गर्दी करण्यात अर्थ नव्हता....बाकी सगळे गेले...
माझी आई अनिकेतच्या आईची समजूत काढत होती....
"असा नाही आहे हो आमचा अनिकेत.आम्हाला वाटलं दोघांचा संसार सुरळीत चालू आहे....कुणाची नजर लागली हो..?"

बाहेरून अनिकेतच्या आईचे रडणे आणि डोळ्यांसमोर काव्याच्या देहाकडे बघणारा अनिकेत....
श्या....जेवण जात नव्हते...झोप हि उडाली होती....
"का रे अनिकेत असे का केलेस मित्रा?....मित्रा ???? तुला मित्र म्हणू की नको हा विचार करावासा वाटतोय..
इतका नाजूक गळा दाबताना तुला अजिबात कीव नाही आली का रे?...का?? का केलेस?
श्या....प्रश्न प्रश्न....आणि प्रश्न.....
पण उत्तरं नाहीत....उत्तरं देणारा कुठेय???....हे करून तो खुश असेल का?..
हे घडल्यावर ती खुश असेल का? गळा घोटताना तिला किती दुखले असेल...?
पण तरीही तिचा चेहरा हसरा कसा होता....?....अनिकेत...अन्या....सांग मला....असे का केलेस?"

माणसाला आयुष्यात काय काय हवे असते?...मान्य आहे कि मागितलेले सगळेच मिळत नाही...
नाही मिळणारा माणूस रडत राहतो....
पण मिळाले कि असे स्वतःच्या कर्माने घालवून बसतो....

कधी कधी स्वत:च्या संसाराला स्वतःचीच नजर लागते.....
हा 'आरंभ' आहे कि 'शेवट' आहे हें सांगणं कठीण होतं...

उद्या जाऊन सकाळी सकाळी अनिकेतला भेटल्याशिवाय मला राहवणार नव्हते.....
उद्याच सकाळी अग्नी दिल्यावर त्याला न्यायालयात सादर करणार होते.त्या आधी मला त्याला भेटायचे होते.
पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचा होता..आमच्या ऑफिसच्या जोश्याचा चुलत भाऊ....
म्हणून बोलायला वेळ मिळाला.नाहीतर पाच मिनिटात उरकायला लागणार होते....

मी लॉक-अप जवळ गेलो.अनिकेत शांत बसला होता.....गुन्हा केलाय असे वाटतच नव्हते....
मला पाहून तो धावत धावत लॉक-अपच्या दाराशी आला....
लॉक-अपच्या दाराशी येऊन लोखंडी सळयांमधून अनिकेतने माझा हात धरला....
आणि म्हणाला...."संपवलं...संपवलं मी सगळं.बघ आता कुणालाच त्रास नाही.
श्री....शांत झालंय बघ सगळं...ती आनंदात आहे बघ आता."
"अन्या....अन्या...काय बोलतोयस हे...कोण आनंदात असेल?..वेडा झालायस का?काय करून ठेवलंस हे?..काय बिनसलं होतं रे तुझं?
काव्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं रे मित्रा...गमावून बसलास सगळं.."
"गमावलं.????कोण बोलतं असं...?मी तिला गमावून....कमाव
लंय...श्री....
'काव्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं' खरं बोललास.तो नशीबवान मी...पण आंधळा होतो मी...
नक्षत्र होती माझी काव्या....हिऱ्यासारखी होती...पण कोंदण चुकलं होतं.इतकं तेज सांभाळायची लायकी नव्हती रे श्री माझी.
काय काय भोगलं रे तिने माझ्यासाठी?
तिचं हसणं वेड लावणारं होतं...पण मी तिचं वेड होतो...खूप उशिरा कळले मला ते.

काल हि भांडून झोपलो मी.जाग आली तेव्हा काव्याही झोपली होती...तिचा ओला गाल पाहिला मी...
रडली होती ती...खूप खूप रडली होती...रोजच्या सारखीच...मग बसलो आणि विचार केला....
सगळं सगळं उलघडत होतं....मी दोषी ठरत होतो....
स्वतःच्याच विचारात स्वतःला दोष आला कि स्वतःच्याच विचारांचा राग येतो...मलाही येत होता स्वतःचा राग..

मनाच्या जवळचं माणूस जवळ असलं कि गर्दीची भीती वाटत नाही...पण...
तेच माणूस जवळ नसलं कि स्वत:च्या सावलीचीही भीती वाटते.
मित्र मला 'बायकोचा बैल' म्हणतील म्हणून कधी गर्दीत कुणासमोर हात नाही धरला मी तिचा.
नेहमी एकट सोडलं...तिची नजर शोध्याची मला...पण यातच 'पुरुषार्थ' वाटायचा मला...
पुरुषार्थ....मोठा शब्द आहे ना?अर्थ तरी कळतो का रे आपल्याला त्याचा?घरातली बायको हवी तशी राबवता आली म्हणजे पुरुषार्थ मिळतो का?
संसार फुलवायला जे लागते ना त्याला म्हणतात 'पुरुषार्थ'.विस्कटता सगळ्यांना येतं.आवरायला हिंमत असावी लागते."

अनिकेतच्या डोक्यातली भूतकाळाची पानं पटापट पटापट पलटत होती...मी प्रयत्न करत होतो.
पण त्यांच्या पलटण्याचा वेग खूप जास्त होता...माझी घाई होत होती...त्या पानांवरचं सगळं वाचता येत नव्हतं
"श्री...'नांदा सौख्यभरे' असा आशीर्वाद घेऊन संसार फुलत नसतो रे.साथीदाराचं सौख्य कळायला मनात डोकवावं लागतं.
पण मला कधीच नाही जमलं ते.'वेळ'...खूप मोठी गोष्ट आहे रे श्री....नात्यासाठी....
माझ्याकडे वेळ होता....पण तो तिच्यासाठी नव्हता...तो माझ्या मित्रांसाठी होता...
मित्रांसोबत दारूच्या बाटल्या फोडून Get Together करताना घरातली सर्वात जवळची मैत्रीण एकटी पडलीय हे विसरलो होतो मी.
आपल्या निर्णयात आपल्या जोडीदाराची साथ असली कि हुरूप येतो..पण मी नेहमी ग्राह्य धरलं तिला.
पण तिने तोंडातून 'ब्र' नाही काढला श्री....दुनियेला एक शब्द नाही कळला.तिने कळूच नाही दिला.

आपण हसलं कि जग फसतं...
तिनेही हेच केलं..नेहमी हसऱ्या चेहऱ्याने जगाला फसवलं.स्वतःचा त्रास कधी नाही दाखवला कुणाला?
का राहावं तिनं माझ्यासोबत?लायकी तरी आहे का माझी?...
कोणत्या विश्वासाने माझ्या हातात तिचा हात दिला होता त्या बापानं?"सांभाळ माझ्या पोरीला" असे म्हणाले होते ते.काय तोंड दाखवू त्यांना आता?
मी ओळखतो स्वतःला....दोन दिवस सुधारीन आणि पुन्हा माज चढेल मला...पुन्हा तीच सहन करणार...

घटस्फोट दिला तर जग मला सोडून तिलाच दोष देईल...एकच उपाय...मरण...
माझं नाही....तिचं...मी आत्महत्या केली तर जग तिलाच टोचून टोचून मारेल.."
तशीच ओढणी उचलली मी तिची....
तिचीच ओढणी हातात घेऊन तिच्या गळ्याभोवती गुंडाळली.गच्च खेचत गेलो ती.
तिच्या ओढणीतून तिचा सुंदर चेहरा चंद्रासारखा दिसत होता.चांदणं पडलं होतं.पण फक्त माझ्यावरच.
दोन क्षण वाटले कि, इतका निर्दयी कसा होऊ मी?इतकी नाजूक...इतकी गोड काव्या माझी...
नाही...नाही...नाही जमणार हे मला...
पण श्री.....पण पुढच्याच क्षणी मला रोज रात्री रडणारी, गालावर सुकेलेलं पाणी घेऊन तशीच झोपनारी
काव्या दिसली.तिच्या मनातलं ऐकू येत होत मला..ती म्हणत होती,
"फक्त जेवलं,पाणी पिलं,पोट भरलं इतकीच असते का रे माणसाची भूक?
मनाचं काय?त्याला काय हवं असतं रे...दोन सोबतीचे क्षण,जिव्हाळ्याची एक हाक,मायेचा एका स्पर्श....
आणि तितकं द्यायला हि आपल्या माणसांकडे वेळ नसावा.
असण्याला 'असणं' कसं म्हणावं?इथे शांती मागितली कि एकांत मिळतो...एकांतात आणि अंतात फक्त एकाचाच फरक...
आम्ही जगासाठी दोन नसून 'एक' आहोत...आम्ही खरंच 'एक' आहोत...पण आमचा 'एक' आणि जगाचा 'एक' वेगळा आहे.
आम्ही एक-एकटे आहोत."

गळा आवळला ना तसा तिला थोडा त्रास झाला.पण माझ्या डोळ्यांत पाणी होतं तिच्यासाठी.
प्रेम होतं तिच्यासाठी.तिने ते पाहिलं माझ्या डोळ्यांत आणि गोड हसली.हसतच राहिली.
माझा हात गच्च होत होता.ओढणी ताणली जात होती आणि ती सुंदर हसत होती....
तिच्या प्रत्येक हसऱ्या क्षणासोबत माझा हुंदका वाढत होता....मी आजवर काय काय त्रास दिला,किती छळलं हे आठवत होतं...
नाही...नाही....या पुढे नाही द्यायचा त्रास....
माणूस आहे रे ती...सहन तरी किती करावं?...ओढणी ताणली...गळयाजवळचा माझा धरलेला हात तिने घट्ट केला.
खूप ओढ होती रे त्या स्पर्शात...पण मी म्हणालो तिला,"नको लावूस इतकी ओढ...मी नाहीयेय या ओढीच्या लायकीचा..तू छान आहेस काव्या.चुकलो मी माफ कर मला."

गोड हसली रे ती....
पुढच्या क्षणी बोटं तिची सैल पडली.डोळे झाकले तिने सुखाने.पण चेहऱ्यावर तेच हास्य होतं...तेच वेड लावणारं हास्य.
तिच्या जिवंतपणी जे पाहून नाही शकलो ते सुख होतं तिथं तिच्या डोळ्यांत,चेहऱ्यात,स्पर्शात.."
पोलिसांनी जीपमध्ये बसवून आम्हा दोघांना स्मशान भूमीवर आणलं.काव्याच्या बाबांनीच अग्नी दिला होता..
अनिकेत वेड्यासारखा पुन्हा पुन्हा धावत धावत जात होता त्या आगीतल्या काव्याजवळ....
आणि अडवत होतो आम्ही त्याला...तो किंकाळत होता...
"बघ बघ....श्री....मी जळतोय आणि ती विझतेय....."

प्रेमात आणि मैत्रीतकाय असतो फरक?





अदित्य आणि अमर हे दोन बालपणीचे मित्र.शाळेत असताना एकमेकांचे टिफीन आणि मास्तरांचा मार दोघेही वाटुनच खायचे.हायस्कुलम ध्येअदित्याला कोणी मारलं की अमरत्याच्याअंगा वर धावुन जायचा.त्यांची उत्तरपत्रिकातर इतकी सेम
असायची की कधीकधी सरही बुचकळ्यात पडायचे की यातली अदित्याची उत्तरपत्रीका को
णती नि अमरची कोणती?
कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्यातला खोडकरपणा प्रचंड वाढला होता.पण त्यांची जोडी कॉलेजमध्ये पुर्णपणे फेमस झाली होती.पुर्ण कॉलेज अदित्य अमरच्या मैत्रीचे उदाहरण द्यायचे.आणियाचा त्या दोघांना फारच हेवा वाटायचा.
पण आता या दोघांच्या मैत्रीमध्ये एक ट्विस्ट आला आहे.त्या ट्विस्टचं नावआहे . अक्षदा new admission आहे.दोघेही तिला बघताच तिच्या प्रेमात पडतात.हळुहळु ही बातमी सर्वकॉलेजमध्ये पसरते.पण या love triangle ची जाणीव जराहीत्या तिघांना नसते.दोघेही आपण अक्षदाला Impress करण्यासाठी आपल्या स्वभावाविरुद्ध आपण जसे नाही आहोत तसे भासविण्याचा प्रयत्न करु लागतात.एकमेकांस ोबत प्रत्येक गोष्ट ते शेअर करायचे पण याबाबतीत त्यांनी एकमेकांना काहीही सांगितलं नव्हतं.पण अमर हा पुर्णपणे निर्मळ मनाचा होता.कोणतीही गोष्ट अदित्यापासुन लपवणं त्याला मान्यच नव्हतं मुळी.अदित्याला त्याने सांगितलं की माझं अक्षदावर खुप प्रेम आहे.आणिकोणत्याह ी किँमतीवर मला अक्षदाशी लग्न करायचं आहे.मला तुझी मदत हवी आहे,करशील ना?
हे ऐकल्यावर अदित्याला काय बोलावं आणि काय नको हेच कळेनासं झालं होतं.दाठलेल्या उराने त्याने अमरला सर्वतोपरी मदत करण्याचं वचन दिलं.ही बातमी पुर्ण कॉलेजमध्ये पसरली.अदित्याने अक्षदाचा विचार सोडुन दिला.आणि अमरलात्याच्यामध ल्याself confidance वाढवण्यामध्ये, अक्षदासमोर प्रेम व्यक्त करण्यामध्ये तो त्याची मदत करु लागला.
एखाद्या सस्पेन्स फिल्मच्याclimax चीप्रेक्षक ज्या आतुरतेने वाट पहात असतात त्याच पद्धतीने यांच्या प्रेमकहाणीतल्या होणार्या endची पुर्ण कॉलेज आतुरतेनंवाट पाहत होतं.
अमरने शेवटी हिंमत करुन अक्षदाला प्रपोज केलं. अक्षदा म्हणाली,मला माफ कर अमर पण माझी engagement राहुल नावाच्यामुलाशी झालीय.ही बातमी फारचकमी जणांना माहीतीये.तु माझा चांगला मित्र आहेस.मी तुला हे सांगायला हवं होतं पण मला हे इतक महत्त्वाचं नाही वाटलं.मी हे प्रपोजल नाही स्वीकारु शकत.
हे ऐकताच अमरच्या पायाखालची जमिनच सरकली.तो प्रचंड निराशझाला.आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी तो अदित्याच्या घरी गेला.घरी कोणीही दिसत नव्हतं.कदाचित तो bedroom मध्ये असेल म्हणुन तो तिथे गेला.तिथेहीकोणी च नव्हतं.समोर एक पुस्तक पडलं होतं,अमरनं ते पुस्तक उचललं,ते उघडलं तर त्यात अक्षदाचा फोटो होता ज्याच्यावर अदित्याने I love u असं लिहीलं होतं.ते बघुन अमरला प्रचंड निराशा झाली.आपण नकळत अदित्यावर केल्याअसलेल्या अन्यायाची त्यालाजाणीव झाली.त्याच्या डोळ्यात आपसुकच पाणी आलं.अदित्य सध्या कुठे असु शकतो याची अमरला कल्पना आलीतो गेला समुद्रकिनारी जिथे दुःखी असल्यावर नेहमी अदित्य जायचा.एका बँचवर समुद्रातल्या उफणत्या लाटांकडे बघत अदित्य बसला होता.अमरही त्याच्याजवळ जाऊन बसला.
अदित्य:अरे अमर तु इथे।
अमरःहो,तुला शोधत आलो.मला सगळं कळलंय.
अदित्य: काय कळलंय?
अमरःत्याने अक्षदाचा फोटो खिशातुन काढला,आणि त्याला दाखवला.
अदित्य:i m sorry yarrr
अमरःअरे तु का माफी मागतोयसखरं म्हणजे मीच तुझी माफी मागायला हवी.तुझ्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे.i m sorry...तुला ती नाव दिसतिये,तीसमुद्रातली?
अदित्य:हो दिसतिये पण तु असं का विचारतोयस?
अमरःसध्या आपण दोघेही अशाच नावात स्वार आहोत.फरक एवढाचआहे की,आपली नाव अशा समुद्रात तरंगतीये ज्याला किनाराच नाही.
अदित्य:म्हणजे?
अमरः अक्षदाचा साखरपुढा झालाय दुसर्याशी
अदित्य:केव्हा आणि कोणाशी?
अमरःजाउ दे ना यार.ते महत्त्वाचं नाहीये.प्रेम हे असंच असतं जे सच्चाईने करतात,त्यांना मिळत नाही,आणिज्यांना ते मिळतं ते कधी खरं प्रेम करत नाहीत.पण मैत्री,मैत्री ही सर्वांनाच नसीब होते.
अदित्य:खरंय यार.
अमरःआपली मैत्री ही कधीही कोणत्याही कारणामुळे तुटणारनाही असं आज मी तुलावचन देतो.
यानंतर ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात.....
friend कोण असतो ?प्रेमात आणि मैत्रीतकाय असतो फरक?




♥ प्रियकर :- आपले प्रेम हे हाथ आणि डोळे ह्या मध्ये असणाऱ्या नाजूक नात्या सारखे आहे.

प्रेयसी :- म्हणजे कसे ?

प्रियकर :- म्हणजे असे कि बघ........♥
जेव्हा हाथ दुखतात तेव्हा डोळे रडतात
आणि जेव्हा डोळे रडतात तेव्हा तेच हाथ त्याचे आश्रू पुसतात. ♥ 

ते दोघे.............





ते दोघे मार्केट मध्ये गेले होते,
त्याच्या साठी शर्ट घ्यायचा होता. ती त्याच्यासोबत होती. त्याने तिचा हात पकडला होता. अचानक तिचा हात निसटला... त्याच्या हातातून... खूप गर्दी होती.. त्याच्या थोड्यावेळाने लक्षात आला कि तिचा हात सुटला आपल्या हातातून. तो कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे तिला शोधू लागला. त्याला काही सुचेचना. घाम फुटायला लागला होता. इतक्यात त्याला ती एका ज्वेलरी च्या दुकानात दिसली. एक लोकेट बघत होती. तो त्या दुकानात आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, ती वळून म्हणाली,"छान आहे ना??" आणि तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं, त्याचे डोळे पाणावले होते.
तिने विचारलं, "काय झालं?" त्याने तिला आवेगाने हग केलं, आणि लगेच सावरून म्हणाला," तुला आवडली आहे का ती चेन?" ती म्हणाली," हो, खूप." तो म्हणाला," मग हि तुला माझ्याकडून गिफ्ट." "कसलं गिफ्ट? अरे माझा वाढदिवस खूप दूर आहे अजून." तो म्हणाला," हे माझा पहीला valentine गिफ्ट तुला." ती म्हणाली," are you proposing me " तो म्हणाला," हो, कारण आज जेव्हा तुझा हात माझ्याहातून सुटला तेव्हा मला जाणवला कि तुझ्याशिवाय किती incomplete आहे मी.. प्लीज पुन्हा मला अशी सोडून जाऊ नकोस, मी... मी.." ती लगेच म्हणाली," नाही जाणार.कधीच नाही...... नेहमी तुझ्या सोबत राहील, शेवटच्या क्षणापर्यंत..."

एका मुलाची कथा ७ वी ला असताना ...

एका मुलाची कथा
७ वी ला असताना ...


मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..
ती माझी"बेस्ट फ्रेंड"होती ...
मला ती खरच खूप आवडायची I
पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत
आणि ते मला माहित होत....
वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या
मी तिला दिल्या
ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही
"माहित नाही का.....??":(((

 कॉलेज ला असताना

माझ्या फोन वर call आला...
तिचा चा होता तो ...
ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती
आणि ती मला सांगत होती तिचा ज्याच्या वर प्रेम होता त्याने कसा त्रास दिला तिला...
तिने मला भेटायला बोलवलं होत
मी तिला भेटायला गेलो...
मी तिच्या समोरचं बसलो होतो
मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो...
२ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं...
मी तिच्या साठी आणि माझ्या साठी चित्रपटाची तिकीट काढली...
पण तिने मला म्हटलं मी झोपते..
तिने म्हटलं"बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..."
खूप वेळा शांत उभे होतो...
मग मी निघालो...
आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ...
माहित नाही का???
.

सिनियर वर्षाला

आमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडी त जायचं
ती माझ्या locker जवळ आणि म्हणाली...
माझ्या सोबत कोणी नाही आहे... रु माझ्या सोबत येशील...
माझ्या सोबत हि कोणी नव्हत...
आम्ही दोघांनी"बेस्ट फ्रेंड्स"ह्या नात्याने जाण्याचा नित्नय घेतला ...

PROM निघत ला ...

prom NIGHT ला सगळ काही नित झाल..
आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो...
ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिली
आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही..
पण मी खुश होतो... कि ती खुश आहे...

GRADUATION दय ला ...

दिवसा मागून दिवस गेले...
आठवडे लोटले किती तरी महिने गेले
तिला काही बोलण्या आधीच was graduation दय आला ...
मी तिला पाहिलं ...
तीनेव साडी नेसली होती... खूप छान दिसत होती..
माझा तिच्या वर एका तर्फी प्रेम होत पण काय करणार तिचा जमत नव्हत ना
आमची शेवरी ची भेट होणार होती...
ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही...
तिने माझ्या चेहर्या वरून हात फिरवला ...
आणि म्हटली"आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."
बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायला

काही वर्षांनी

मी लग्नात आलो होतो...
आणि ते लग्न होत तीच .. तिचा दुसर्या सोबत लग्न ठरलं होत ..
माझं प्रेम कधी व्यक्त चा नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंत होत आणि मी तेव्चा निभावल....
"तू आज हि माझ्या सोबत आहेस"असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले ..
आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे..

खूप वर्षांनी...
मी आमच्या शाळेत एकदा गेलो ...
तिथे आमच्या वर्गातले सगळे जन आले होते...
ती हि...
तिथे प्रत्येकाने आपली लहान पाणी लिहिलेली पत्र ठेवली होती...
मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो...
7th:"वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... किती वेडा आहे हा मुलगा"
college year:"आज हि मी त्याला खोत सांगितलं कि माझं ब्रेअक उप झाला तरी हा वेडा माझ्या साठी आलं"
prom night"आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे .... मी वाट बगहातेय,...
मला त्याला सांगावस वाटतंय कि माझा हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..."
graduation year:"किती लाजाळू आहे हा साडीत पाहून नाही काही बोलला नाही"
marriage day:"आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील....."

हे सगळं वाचल्या नंतर तो तिथेच रडायला लागला...
आणि त्याने पाहिलं तर समोर तीही आज रडत होती...
कारण एकाचा दोघांचा असीम प्रेम पण जमल नाही व्यक्त करायला..

एक हृदयस्पर्शी प्रेमकथा ♥♥♥

एक हृदयस्पर्शी प्रेमकथा:-
एक मुलगा तिच्या GF
च्या रोजच्या SMS
( I LOVE YOU ,I MISS YOU ) ने
त्रासला होता .
एके दिवशी तो एक SMS RECIVE
करतो पण न वाचताच झोपतो......
दुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन
येतो ...♥♥♥
कि काल रात्री तिची मुलगी कार
अपघातात मरण पावली ....
..तो गोंधळतो आणि
तो मुलगा फोन मधील SMS
वाचतो....."DEAR PLEASE तुझ्या घरासमोर
ये ,माझा अपघात
झाला आहे........
♥♥♥ आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ....PLEASE ..."
पण तो कमनशिबी मुलगा
तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो.............♥♥♥
यावरून मला तुम्हाला एवढाच
सांगावेसे
वाटते कि
आपल्या जवळच्या ,
आपल्यावर प्रेम
करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका.....
कारण ती व्यक्ती आपल्यावर
मनापासून
प्रेम करत
असते.........♥♥♥

Thursday 23 May 2013

प्रेयसीच्या चेहर्‍यावर हास्य पाहू इच्छित असाल


प्रेयसीच्या चेहर्‍यावर हास्य पाहू इच्छित असाल तर खाली दिलेल्या टिप्सचे पालन करा. त्यामुळे तुमची प्रेयसी आनंदीत होईलच शिवाय तिला आनंदी पाहून तुमचाही आनंद द्विगुणित होईल.

* तिच्या सौंदर्याची स्तुती करा.

* काही सेकंदांसाठी तिचा हात हातात घ्या.

* प्रेमळ चुंबन द्या.

* झोपेतून उठविण्यासाठी तिच्याच आवाजातली रेकॉर्ड केलेला आवाज ऐकवा.

* तुम्ही तिच्यावर प्रेम करता याची तिला वेळोवेळी जाणीव द्या.

* जर ती नाराज असेल तर तिला बाहूपाशात घेऊन ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे याची तिला जाणीव द्या.

* तिच्या छोट्या-छोट्या गोष्टीही लक्षात ठेवा. कारण प्रेमात हाही महत्त्वाचा भाग आहे.

* कधी कधी तिच्या आवडीची गाणे तिलाच ऐकवा. (तुमचा आवाज कितीही खराब असला तरी)

* तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतही काही वेळ घालवा.

* आपल्या कुटुंबातील व्यक्ती, आपले मित्र यांच्याशीही तिची ओळख करून द्या. यामुळे तिचा तुमच्यावरील विश्वास वाढेल.

* कधी-कधी तिच्यासोबत थोडी मस्तीही करा. (गुदगुल्या करणे, बाहूपाशात घेणे आदी)

* तिच्या केसांमधून तुमचा हात फिरवा. यामुळे तिला तुमच्या प्रेमाची जाणीव होईल.

* हसविण्यासाठी काही जोक्स ऐकवा.

* अर्ध्या रात्री तिच्या खिडकीजवळ एक छोटा दगड फेका आणि तिला सांगा की तुम्हाला तिची किती आठवण येते.

* तिच्याशी एकांतात वागता तसेच मित्रांसमोरही वागा.

* तिच्यावरील प्रेम नेहमी तिच्यासमोर व्यक्त करीत जा.

समोरच्याला वागण्याची एक संधी द्या!


आपण सगळ्यांपेक्षा वेगळेच आहोत, असे लग्न झाल्यानंतर प्रत्येकालाच वाटत असते. आपणच जगात सर्वात आनंदी, सुखी आहोत आणि आपल्यात कधी भांडण होणे शक्यच नाही; पण कालांतराने दोघांचे खरे रूप समोर यायला लागते. कडू गोळी साखरेच्या मुलाम्यात लपेटलेली, आणि साखरेचा मुलामा हळू हळू संपतोच. जिभेवर रेंगाळतो तो फक्त कडवटपणाच. नाती ही अशीच असतात का? दोघांमधले सामंजस्य का संपते? ती कुठे कमी पडते? त्याला का हे सगळे सांभाळून घेता येत नाही?

खूप कमी पुरुषांमध्ये सांभाळून घेण्याची ताकद असते. हळव्या मनाचे पुरुष फार कमी सापडतात. इतरांची काळजी घेणे हा गुण त्याच पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो. गमतीचा विषय म्हणजे असे पुरुष सगळ्यांचीच काळजी घेतात. त्यांना असंख्य मैत्रिणीसुद्धा असतात.

निसर्गाची कमाल म्हणा किंवा देवाची कृपा, जोड्या या परस्परविरोधीच तयार झालेल्या असतात. अती काळजी करणारी स्त्री असली की तिच्या वाट्याला नेहमी हेळसांडच येते. नव-याचे दुर्लक्ष, प्रेमाचा आणि काळजीचा अभाव. तिची अपेक्षा मात्र त्याच्याकडून कायम अशीच असते की त्याने कधी तरी माझ्यासाठी काळजीचे शब्द तोंडातून काढावे; पण कितीही प्रयत्न केले तरी तो आपला निर्विकार.

असेही पुरुष असतात जे घराची, मुलांची, बायकोची आपल्या सर्व कामात तडजोड करून काळजी घेत असतात. आणि त्यांच्या जोडीदाराच्या बाबतीत विचार केला तर त्या बायका ढिम्म असतात. जाऊद्या ना, तो करतोय ना, मग आपल्याला लक्ष द्यायची काय गरज? मजेची गोष्ट म्हणजे असे पुरुष सगळ्यांच्या आजारपणात स्वत:हून लक्ष देतात, काळजी घेतात. पण जेव्हा स्वत: ते आजारी पडतात तेव्हा त्यांच्या पार्टनरकडून त्यांना काळजीचा हात मिळत नाही.

love station
अति काळजी करणारी व्यक्ती स्वत:ला नेहमी सर्वगुणसंपन्न समजत असते. त्या व्यक्तीच्या मते तिला सर्वच जमत असते. अशा वेळेस समोरच्याने काही सांगितलेले त्याला पटत नसते. त्या व्यक्तीला आपल्या कार्यावर शंका घेतल्यासारखे वाटते. परिणामी या व्यक्तीचा पार्टनर अजूनच अलिप्त राहायला लागतो.

नको बाबा, मी केलेले काहीच हिला /याला पटत नाही. त्याच्यापेक्षा काही न केलेले बरे आणि हा / ही दुर्लक्ष करतात म्हणून हे आपले मनातल्या मनात धुसफूस करत बसतात. तात्पर्य काळजी घेणारी व्यक्ती स्वत:च्या हातात सर्व अधिकार घेऊन बसते आणि त्याच्या अधिकारक्षेत्रात पार्टनरने केलेली लुडबूड त्याला चालत नाही. त्याला सल्ला किंवा मदत नको असते; पण सहकार्य मात्र हवे असते.

अंतर्मुख होऊन विचार करून तसेच एकमेकांशी संवाद साधून अनेक प्रश्न सोडवता येऊ शकतात. पण संवाद हा केवळ संवादच असला पाहिजे, त्या संवादात एकमेकांच्या त्रुटींवर बोट ठेवताना खूप काळजीपूर्वक वागले पाहिजे. नाहीतर याचा उलट परिणाम होऊ शकतो.

भारतात नाती तशी कमीच तुटतात; पण सर्वात मोठे स्वीकारण्याचे सत्य म्हणजे आपल्या भारतात दोघे एकमेकांबरोबर खूप तडजोड म्हणून किंवा घरगुती अडचणीमुळे एकमेकांच्या नुसते बरोबर राहत असतात. एकमेकांच्यात साथसोबत राहत नाही. हे असे नाते कायदेशीररीत्या तुटलेले नसले तरी मनाने ते फार आधीच तुटलेले असते. मन मारून लोकलाजेस्तव ते एकत्र राहत असतात. काही थोड्या लोकांनाच प्रेम अनुभवायला मिळते; पण त्यातही गडबड होणार नाही, याची शाश्वती नाही.

आपल्या जीवनसाथीचे आपल्यावर प्रेम आहे; अन्यथा ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करतच नाही, हा आपल्या सोयीने अर्थ काढून मोकळे होण्यापेक्षा समोरच्याला वागण्याची एक संधी द्या!

सत्य कथा

थोडा time काढून हि सत्य कथा नक्की वाचा..
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये आलेल्या भूकंपामध ये्
एक हृदयाला स्पर्श करून जाणारी घटना घडली.,
भूकंपानंतर बचाव कार्य ची एक
तुकडी एका स्त्री च्या पूर्णपणे उध्वस्त
झालेल्या घराची पाहणी करीत होते,
एका बारीक फटीमध्ये त्या स्त्री च मृतदेह दिसत होता पण
ते एका विचित्र अवस्थेमध्ये होत..
ती स्त्री तिच्या पायावर अशी बसलेली होती कि आपण
जसेमंदिरात देवासमोर बसून प्रार्थना करतो.,
आणि
तिने तिच्या हातात काही तरी वस्तू पकडलेली होती..
भूकंपाने त्या माऊलीची पाठ आणि डोक पूर्णपणे कामातून
गेलेले होते..
खूप मेहनत करून त्या बचाव
तुकडीच्या काही सदस्यांनी थोडी जागा करून आपला हात
पुढे केला या उमेदीने कि.,
ती जिवंत असावी परंतु त्या स्त्री च शरीर पूर्णपणे
थंडपडलेल होत..!!
ज्यावरून ते लोक समजले कि हि स्त्री मृत झालेली आहे..
त्या तुकडीने ते घर लगेच सोडले आणि शेजारच्या घराकडे
चालायला लागले..
बचाव कार्य करणाऱ्या तुकडीच्या प्रमुखाचे असे म्हणणे होते
कि.,
"माहित नाही मला त्या स्त्री च घर मला त्याच्याकडे
का ओढत होत.,
तिथ अस काही होत कि ते मला म्हणत होत
कि मी या घराला सोडून जाऊ नये मी माझ्या मनाच ऐकून
त्या घरी परत जायचं ठरवलं".
त्यानंतर पुन्हा सर्व तुकडी त्याघराकडे तो मातीचा ढीग
सरकवू लागली
आणि त्या प्रमुखाने त्या बारीक फटीमध्ये हात घालून पाहिलं
तर त्यांच्या हाताला काहीतरी जाणवल..!
आणि त्यांच्या तोंडातून शब्द निघाला..
"बाळ ...इथे एक लहान बाळ आहे"!!!
सर्व तुकडी सावधानतेने तो ढीग बाजूला करू लागली..
तेव्हा त्यांना त्या महिलेच्या शरीराच्या खाली एका टोपलीमध्ये
रेशमी कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं एक नाजुक बाळ दिसल..
तेव्हा त्यांच्या लक्षात आल कि या स्त्री ने
जीवनाच्या त्याग करून
आपल्या शरीराचा सुरक्षीततेखाली त्या गोंडसबाळाला जीवनदान
दिलं..
डॉक्टर पण तत्काळ आले तेव्हा ते बाळ शुद्धीत नव्हते..
मग त्याला त्या कपड्यामधून बाहेर काढताना त्यांना एक
Mobile दिसला त्याच्या Screen वर १ Massage
type केलेला होता..
तो Mobile एक एक करून त्या तुकडीच्या सर्व
सदस्याकडे फिरत होता प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येत
होत..
त्यात अस लिहिलेलं होत.....
.
.
.
.
.
.
.
"माझ्या बाळा तू जर वाचलास तर इतकच स्मरणात राहू दे
कि तुझी आई तुझ्यावर खूप प्रेम करत होती"
(आईच्या प्रेमापेक्षा या जगात दुसर कोणतच प्रेम नाही)
एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला.लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.

' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.

आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.

आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.

राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.

आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.

आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.

संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.

वडील स्तब्ध झाले.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.

पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?
आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना

Thursday 18 April 2013

एका युवकाची आणि एक मुलीची ओळख फुलांचा गुच्छ सांभाळत तो टॅक्सीत बसला. टॅक्सी त्याच्या इच्छित स्थळी पूढे चालू लागली, तसा तो आठवणींच्या प्रवाहात मागे वाहू लागला.

त्या दिवसांत तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. दिवसभर नोकरी करुन संध्याकाळी अभ्यासाला लायब्ररीत यायचं हा त्याचा नित्यक्रम. नेहमी पुस्तकांत रमणारा तो, अलीकडे मात्र तिच्या विचारांत अधिक रमत होता. ती सुध्दा अभ्यासाला लायब्ररीत यायची, मैत्रिणींसोबत सकाळच्या सत्रात न येता संध्याकाळी यायची. पुस्तकांच्या देवाण-घेवाणीमुळे झालेली त्यांची ओळख, मैत्रीच्या रुपात हळू हळू खुलत होती. लायब्ररीमध्ये यायची वेळ जरी ठरवलेली नसली तरी आल्यावर समोरासमोरच बसणं हे मात्र ठरलेलं.

अशाच एका संध्याकाळी ती आली. पण थोडी उदास होती.
“काय ग, झाली का ख्रिसमसची खरेदी?” त्याने तिला बोलतं करायला विचारलं.
“हो.” तिचा स्वरही जरा नाराजीचा वाटत होता.
“काय काय घेतलंस?”
“नथिंग.”
“काय झालं? चेहरा का पाडून आहेस असा?”
काही क्षण थांबुन ती म्हणाली “आम्ही आज रात्री गोव्याला जातोय. परवा ख्रिसमस आहे ना.”
तिची उदासी घालवायला निघालेला तो आता मात्र स्वतःच उदास झाला होता, पण त्यातही आपल्यापासून दूर जाणं हे तिच्या उदासीच कारण आहे हे ध्यानात येताच क्षणभर सुखावलाही.
“अगं मग उदास होण्यासारखं काय आहे त्यात?”
“अरे.. दॅट मिन्स आता 4-5 डेज आपण…..... ” अस म्हणून तिने शब्द आवरते घेतले. “ hmm,....... तुला काहीच वाटत नाहिये ना?” ती पुढे म्हणाली.
“मला? मला काय वाटयच त्यात?..... किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही मस्त एंजॉय करणार ना.” तिच्या मनात नक्की काय चाललंय हे चाचपडून पहायची संधी त्याने दवडली नव्हती. चेहर्‍यावर खोट्या हास्याची एक रेघ उमटवत तिने पुस्तकात डोकं खुपसलं. काही वेळातच पुस्तकं एकवटत ती म्हणाली “आय एम लिव्हींग नाऊ.”
“इतक्या लवकर?”
“हो जाते, उशीर होईल.” तिची नजर आज उठत नव्हती. कदाचित डोळ्यातलं पाणी लपवत असावी.
उदास तर तोही फार झालेला. तरिही ती जाण्याआधी एकादा तिचा गोड हसरा चेहरा पहावा म्हणून जरा आनंदाचं अवसान आणत तो म्हणाला “मेरी ख्रिसमस! एंजॉय!”
ती हसली खरी, पण अश्रु मात्र डोळ्यांची कडा ओलांडू पहात होता. पण पापण्यांच्या हालचालीत तिने लकबिने तो परतावलाही.
“बरं मग, भेटु नंतर. बाय.” ती म्हणाली.
“बाय. मी तुझी वाट..” अस म्हणत तोही थबकला. त्याचे डोळेच अधिक बोलत होते.
ती निघली. त्याचं उदास मन अभ्यासात तर नक्कीच लागणार नव्हतं. जरा वेळाने तोही निघून गेला.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी लायब्ररीत येण्याचं त्याचं मन नक्कीच नव्हतं पण कारण तर होतं. अभ्यासात स्वतःला गुंतवून घेऊन ४-५ दिवस काढावेत असं ठरवून तो लायब्ररीत आला. आज मात्र कुणाची वाट पहायची नव्हती आणि समोरची खुर्चीही रिकामीच असणार होती. त्याचे डोळे पुस्तकांमधल्या अक्षरावरून फिरत तर होते, पण मन मात्र तिची सुरेख छ्बी रेखाटत होतं. तिचं ते खळखळून हसणं, गालातल्या गालांत गोड लाजणं, तो वाचनात गुंग असताना त्याच्याकडे एकटक पहात रहाणं, आणि त्याचं लक्ष जाताच लगबगिने नजर पुस्तकांत वळवणं. कधीतरी मनातल्या भावना चुकून ओठांवर आल्याच तर बोट दातांमध्ये दाबत तिथुन गडबडीने निघुन जाणं. या त्यांच्यामधल्या सगळ्या मखमली आठवणी ती समोर नसताना त्याच्या मनात दाटिवाटी करत होत्या. अशाच सगळ्या आठवणींची उजळणी करत असताना त्याची नजर सहज वर गेली आणि पहातो तर काय.. ती समोर बसली होती. त्याला स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
“अगं तू गोव्याला जाणार होतीस ना?” त्याने आश्चर्याने विचारलं.
“नाही गेले.”
“का?”
“नाही जावसं वाटलं.”
“अग पण..”
त्या क्षणी काही समजलं नसलं तरी ती कदाचित आपल्यासाठीच गेली नसावी हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिच्या अशा अनपेक्षित येण्याने त्याच्या मनात आनंदाच्या लहरी उमटत होत्या. उठून नाचावं इतका उत्साह संचारला होता त्याच्या शरीरात, पण त्याने मनाला आवर घातला. पुस्तकावर त्याची नजर टिकत नव्हती सारखी फिरून तिच्या चेहर्‍यावर जाई. ती मात्र शांतपणे वाचत बसली होती.

दिवस असेच उलटत होते. पण अलीकडे तिचं लायब्ररीमध्ये नित्याच येणं कमी झालं होतं आणि आली तरीही शांत असायची, कमी बोलायची, तिच्या नजरेतून सतत तिच्या मनावर कसलं तरी दडपण असल्यासारखं जाणवायचं. फार गंभीर वाटायची. तिचं हे असं वागणं त्याला खटकत होतं. त्याने अनेकदा तिचं शांत रहाण्यामागचं कारण विचारण्याचा, तिच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्नही केला होता पण ती प्रत्येक वेळी “काही नाही.” सांगुन टाळायची. बरेचदा तो बोलत असताना त्याच्याकडे फक्त बघत बसयची.

हा हा म्हणता एक दिड महिना उलटला.
‘तिला अपेक्षित असेल माझाकडून तिच्यावरच्या प्रेमाची कबूली?…… हो, असेल कदाचित.’
‘मला जे तिच्याबद्दल वाटतं, तेच तिला माझ्याबद्दल वाटतं असेल?…… हो, मला आहे खात्री.’
‘पण जाती धर्माचं काय? मला काही फरक नाही पडत, पण तिला?…… नाही पडणार.’
एका मनाने प्रश्न विचारले…. आणि दुसर्‍याने सोईस्कर उत्तरंही दिली...!

त्याची चलबिचल थोडी कमी झाली, त्याने ठरवलं की ‘व्हेलेंटाइन डे’ला आपल्या मनात ज्या काही भावना आहेत तिच्याबद्दल, त्या तिला सांगायच्या.


तो दिवस येऊन ठेपला. आज ते पहिल्यांदाच लायब्ररीबाहेर एका नवीन रम्य ठिकाणी भेटणार होते. तो फार आतुरतेने तिची वाट पहात येरझार्‍या घालत होता. एवढ्यात ती समोर आली.
“खुप सुंदर दिसतेयस तू आज.” ती शरमली आणि तिने मान पायाच्या अंगठ्यावर वळवली.

हातातलं ते लाल गुलाबाचं फुल पुढे करत तो म्हणाला.
“श्रावणी,
मला काही सांगायचं तुला ...."
"हं, सांग न..."
"श्रावणी....
माझं.....
माझं.... खुप प्रेम आहे तुझ्यावर......
आय लव्ह यु श्रावणी .... आय लव्ह यु सो मच..... !!! ”
तिने चमकून वर पहिलं. हळुवार हात पुढे करत ते गुलाब तिने हातात घेतलं. याच क्षणासाठी आसुसलेल्या त्या नजरेने ती एकटक त्याच्याकडे फक्त पहात होती. तिच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं होतं. त्याचीही नजर तिच्या चेहर्‍यावरून हटत नव्हती.
“बोल ना काहीतरी.” तो तिचा हात हातात घेत म्हणाला.
ती लगेच भानावर आली, “ मीही खूप प्रेम करते तुझ्यावर.....
आय लव्ह यु टू श्रेयस ” लाजत तिने म्हटले...
त्याच्या आयुष्यातील सर्वात रोमांचित क्षण तो अनुभवत होता.
श्वासांना सांभाळत तो पूढे म्हणाला “कधी पासून?”
“पहिल्याच भेटीपासून..... ” ती म्हणाली.
त्याला आकाश ठेंगणे झालं होतं. त्याने रंगलवलेली स्वप्नं पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर होती. ती स्मितहास्य करत डोळे भरून त्याच्याकडे पहात होती.
“आपण लग्न पुढल्या वर्षी करु.” स्वप्नपूर्तीच्या दिशेने त्याने पहिलं पाऊल टाकलं “तोपर्यंत माझी डिग्री पण पूर्ण होईल आणि तुझी पण. चालेल ना तुला?”
ती नुसती त्याच्याकडे बघत होती, तिला त्याच्या चेहर्‍यावरचा आनंदाचा एकही क्षण हरवायचा नव्हता. पण दुसर्‍याच क्षणी कशाची तरी आठवण झाल्यासारखा तिच्या चेहर्‍यावर अचानक गांभिर्य आलं
“पण.. पण..”
ती खालच्या आवाजात म्हणाली.
“पण काय?”
“मी लग्न नाही करू शकणार तुझ्याशी.”
“काय?”
तिच्या या अनपेक्षीत नकाराने तो गोंधळून म्हणाला. जी स्वप्न काही क्षणांमागे पाहिली होती त्यांच अस्तित्व धोक्यात होतं.
“म्हणजे? पण प्रेम करतेस ना तू माझ्यावर?”
“हो. खुप, इतकं की कदाचितच कुणीतरी करू शकलं असेल.”
“जर, इतकं प्रेम करतेस माझ्यावर तर मग..
मग.. लग्न का नाही करू शकत माझ्याशी?”
त्याने आवंढा गिळला आणि जरा गंभीर आवजात म्हणाला
“मी गरीब आहे म्हणून, की आपली जात वेगळी आहे म्हणून?”
त्याचेही डोळे ओलावले होते.
“अस काय कारण आहे तुझ्या नकाराचं?”
तिच्या नजरेतून प्रेम ओसांडत होतं, तरी पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पहात ती स्तब्ध ऊभी होती. तिच्या डोळ्यातील आता अश्रू गालांवर ओघळत होते
“अग बोल ना काहितरी, की अजून काही वेगळं कारण आहे?”
आता मात्र त्याच्या आवाजाचा रोख चढत होता. तिच्या या अशा गप्प रहाण्याने त्याला अधीक चीड येत होती. तरीही स्वतःला सावरत तो परत एकदा प्रश्न करणार, तेव्हढ्यात ती म्हणाली “जाते मी.”
“जाते? मला हे असं कोड्यात टाकून?”
“मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवय श्रावणी”
“मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केलंय,
अँड विल ऑल्वेज लव्ह यु.”
त्याचा चेहरा आपल्या हातांमध्ये भरून घेत ती म्हणाली. तिच्या नजरेतले हे असे भाव या आधी त्याने कधीच पाहिले नव्हते.
“पण मी नाही देऊ शकत तुझ्या प्रश्नाचं उत्तर.
आणि आता मला जायला हवं खुप उशीर झालाय. मी जाते.”
म्हणत ती वळली, त्याने तिचा हात पकडून तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण त्याची पकड सोडवत पाणावलेल्या डोळ्यांनी तिची पावलं मागे मागे पडत होती.
तिच्या या अशा वागण्याने त्याच्या मस्तकाचा पारा चढत होता.
“काय अर्थ घ्यावा मी तुझ्या या अशा वागण्याचा? माझ्या प्रेमाचा असा अपमानच करायच होता तर आलिसंच का माझ्या आयुष्यात? का दाखवलीस मला इतकी स्वप्न? जी तुला कधी पुर्ण करायचीच नव्हती.
जा तू इथुन. निघुन जा.”
असं म्हणत त्याने तिच्याकडे पाठ वळवली. घडला प्रकार त्याला सहन होत नव्हता. त्याच्या चेहर्‍यावर अश्रुंची धार लागली होती.
तरी स्वतःच्या रागावर आवर घालत तिला परत एकदा समजवण्यासाठी म्हणून तो वळला, पण तिथे कुणीच नव्हतं. ती गेली होती. तो तसाच काही क्षण स्तब्ध उभा होता. तिच्या प्रेमाचा होकार मिळाला म्हणून आनंदून जावं की तिच्या लग्नाच्या नकाराने दुःखी व्हाव हे त्याचं त्यालाच समजेनासं झालं होतं. तो तसाच निराश, निर्विकार, शुन्यात नजर लावून एका दगडवर बसून राहीला.
हळू हळू अंधार वाढू लागला, शेवटी जड पावलांनी तो घरी परतला.

रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागला नाही. गेली संध्याकाळ त्याच्या डोक्यात थैमान घालत होती. मनात विचारांच काहूल माजलं होतं. ‘का केलं असावं तिने अस? मग इतक्या महिन्यांमध्ये जे आमच्यामध्ये घडत होतं ते काय होतं? मी तिला ओळखायला चुकलो का?…. नाही.. ती अशी नाही. पण मग तिचा हा असा लग्नाला नकार, काय कारण असेल? तिला कुणीतरी दुसरं…. नाही…नाही…’ त्याला मनातही या गोष्टिंचा विचार करवेना. पण तिच्या आजच्या वागण्याचं गुढ त्याला उलघडत नव्हतं. एका क्षणासाठीही या विचारांतून तो आपली सुटका करून घेत नव्हता. ती परत कधी एकदा समोर येते असं त्याला झाल होतं. परंतु दुसर्‍या दिवशी तिच्या येण्याची वाट बघेपर्यंत त्याच्याजवळ पर्यायही नव्हता.

दुसर्‍या दिवशी तो वेळेत लायब्ररीत आला, मात्र वेळ उलटून गेली तरिही ती आली नव्हती. त्याच्या जीवाची घालमेल वाढत होती. तिच्या वाटेवरून त्याची नजर क्षणासाठीही हटत नव्हती. पण ती नाही आली. पुढील ४-५ दिवस असच चालू होतं. ‘ती का येत नाहीये? का अस वागतेय ती माझ्याशी?’ त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी वाढत होती. सततच्या विचाराने तो फार हैराण झाला होता. पण त्याचा निर्णय पक्का होता, काहिही झालं तरी तिच्या नकाराचं कारण त्याला जाणून घ्यायचं होतं आणि कसही करून लग्नासाठी तिचा होकार मिळवायचाच हे मनाशी त्याने पक्कं ठरवलं होतं.

मागचा पुढचा काहीच विचार न करता त्याने सरळ तिच्या घरचा रस्ता धरला. पण आता त्याच्या समोर एक नवीन प्रश्न होता तो, अचानक त्याला समोर पाहून ती कसं वागेल याचा.
‘जर तिला माझं असं घरी अचानक येण आवडलं नाही तर, आणि तिच्या घरचे? पण माझ्याजवळ दुसरा पर्यायही नाहिये.’
जस जसं तिचं घर जवळ येत होतं त्याच्या मनावरचं दडपण वाढत होतं आणि तिला बघायची आसही. एव्हाना तो तिच्या घरी येऊन पोहोचला. बेल वाजवणार तेव्ह्ड्यात त्याचं लक्ष दारावरच्या कुलूपाकडे गेलं. काही क्षण विचार केल्यावर त्याला शेजार्‍यांना विचारून पाहणं सोईस्कर वाटलं. त्याने शेजारच्या दरवाजा खटखटवला. एका वयस्कर स्त्रीने दरवाजा उघडत प्रश्न केला. “कोण पाहिजे?”
“हे तुमच्या शेजारी राहणारे कुठे बाहेर गेले आहेत का?” त्याने श्रावणीच्या घराकडे बोट दाखवत विचारलं.
“तू कोण?”
“मी श्रेयस, श्रावणी चा फ्रेंड, ४-५ दिवसांपूर्वी ती भेटली होती, त्यानंतर लायब्ररीत आली नाही म्हणून आलो तर घर बंद.”
“काय? किती दिवसांपूर्वी?”
“साधारण ४-५ दिवसांपूर्वी.”
“तू कोणत्या श्रावणीबद्दल बोलतोयस नक्की? पत्ता बरोबर आहे ना?” त्या स्त्रीने खात्री करायला विचारलं.
“हो काकू तिनेच पुर्वी सांगितला होता मला.” त्याने विश्वासाने सांगितलं.
“तू काहितरी चुकतोयस. हे घर श्रावणीचेच आहे पण तुझी फ्रेंड श्रावणी कोणीतरी वेगळी असावी.”
“नाही काकू हाच पत्ता आहे. ती एम. ए. करतेय ना आणि रोज लायब्ररीत यायची अभ्यासाला.”
“हो पण...... पण, हे कस शक्य आहे?” ती स्त्री जरा विवंचनेत पडली.
“का? काय झालं? असं का म्हणताय तुम्ही?”
“हे घर गेले दिड महिना बंद आहे. श्रावणी आणि तिचं कुटुंब ख्रिसमससाठी गोव्याला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला, फार भिषण अपघात होता. सगळे जागीच ठार झाले. मग कशी भेटेल ती तुला?”
“ क.... काsssय?”
असं मोठ्याने ओरडत त्याने हाताच्या मुठी आवळल्या त्याचा श्वास त्याच्या कंठात अडकला, त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्या बाईचे शब्द त्याच्यावर आभाळ होऊन कोसळले होते. त्याच्या हातांनी बाजूला असलेल्या खांबाचा आधार घ्यायचा प्रयत्न केला पण त्याची पकड निसटून तो खाली कोसळला. त्याला सावरायला ती स्त्री पुढे आली पण तो आधार नाकारत कसातरी उठून उभा राहीला... त्याला धड बोलताही येत नव्हते, तो कसातरी अडखळत बोलला,
"तुम्ही खोटे बोलताय का? .....
हे असं होणं कसं शक्य आहे?..... अहो आम्ही गेले दीड महिने झाले भेटतोय केवळ गेले चार पाच दिवस झाले ती नाही भेटली.... म्हणून तर आलोय मी.... " ती स्त्री त्याच्या कडे तो कदाचित वेडा आहे अशा नजरेने बघत होती..... ती म्हणाली "हे बघ, मला वाटतेय तुला काहीतरी भास झाला असावा, मी खरे तेच सांगितले आहे तुला.... त्यांना जाऊन आता दीड - दोन महिना होत आलाय...... आता तर त्यांचे कोणी नातेवाईक पण इथे राहत नाहीत " त्याची अवस्था पाहून त्या स्त्री ने त्याला पाणी आणून दिले... पण, तो ते नाकारून जड पाऊलांनी परत तिच्या घराजवळ आला. फाटका आडून ते बंदिस्त घर पहाताना त्याच्या पापण्या लवत नव्ह्त्या. मन सुन्न झालं होतं शरीर गोठून जावं तसा तो एका जागी खिळून उभा होता. त्या स्त्रीचे आघाती शब्द त्याचं मन स्विकारू पाहत नव्हतं, पण ते सतत परावर्तीत होऊन त्याच्या कानावर आदळत होते. एकाएकी वास्तवाची जणीव व्हावी तसा एका जोराच्या हुंदक्यासरशी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले
“श्रावणी ss….”
आणि तो ओक्साबोक्षी रडू लागला...."

“साहेब ह्या समोरच्या रस्त्याने घेऊ ना गाडी?”
टॅक्सी ड्राइव्हरच्या प्रश्नाने तो एकदम भानावर आला, डोळे पुसत त्याने होकारार्थी मान हलवली. .... "
माझ्या प्रेमाची कबुलीच तिला माझ्यापासून दूर घेऊन गेली,
ती केवळ माझ्या प्रेमाच्या कबुली साठीच मृत्यूनंतर देखील परत आली होती....."
" जर त्या दिवशी मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं नसतं तर…..
पण तेच ऐकायला तर तिचा जीव माझ्यात अडकून राहीला होता....
श्रावणी.... परत ये एकदाच....
" नेहमीप्रमाणे त्याच्या मनाचे तेच खेळ सुरु झाले.....

“बस, थांबव इथे.. .
” स्मशानभूमी येताच पाकिटातील पैसे काढत तो म्हणाला.
“साहेब, रीटर्न साठी थांबू का?”
“नको, मला वेळ लागतो,
भरपूर बोलयचं असत तिच्याशी.
” म्हणत तो टॅक्सीबाहेर उतरून तिच्या ग्रेव्हच्या दिशेने चालू लागला.
मी-"हेलो",
तो-"हाय जानू"काय ग निघालीस
का ऑफिस मधून
"हो मी निघाली आहे
आणि मला आताच्या आता तुला भेटायचं
आहे लगेच जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर तू येणार आहेस
बाकी मला काहीच ऐकायचे नाही"
अग हो हो हो जरा दम तर घे
किती घाईघाई...
(मधेच त्याच बोलन तोडून मी)
"तू काही सांगू नकोसलवकर ये" "येतोय ग मीपण काय झाल ते तर सांग
आणि आपण सकाळीच भेटलोना आज मग
परत"
"तू नाहीच कारे ऐकणार
माझ"(मी अगदी राड्याला येऊन )
"ठीके येतोय10मीन तूथाब". तो सारसबागेजवळ आला गाडी पार्क
करणार तो पर्यंत मी जाऊन त्याला घट्ट
मिठी मारली एक क्षण
त्याला काही समजलच नाही काय झाल काय
कराव हे सुधा त्याला समजल नाही.
तो मनात विचार करू लागला आजूबाजूला एकमाणस
जरी असली तरी हि मलाहात सुधा न धरू
देणारी आज चक इतक्या लोकां समोर
मला मिठी मारली.
मी त्याला इतक घट्ट कि हवेने
सुधा आमच्या मधून जाण्याची चूक नाही केली.
"अग काय झाल सांगशीलका?"
(मी नुसतीच मान हलवली काही नाही अस
सांगण्यासाठी)
"ए पिल्लू बोल न ग काय झाल?"
(मी जरा हुंदकेदेतच)"काह ­ी नाही"
"अग सगळे बघत आहेत आपल्याला"
"बघू दे मला नाही फरक पडत
आणि मला जमले तितकी घट्ट
मिठी मारली" नक्कीच
काहीतरी बिनसलं आहेत्यच्या शिवाय हि अस नाही करणार हा विचार करून
त्याने सुधामग मलाघट्टजवळ घेतल.
काही क्षण सर्व जगाचा विसर
आम्हला पडला.
मी तर ऐकणार नाही हेत्याला समजले मग
त्याने स्वतालाच सावरून त्यांना मला"एक जरा माझ चाल आपण जाऊया इथून
"हम्म चल"(स्वताला थोडीशी सावरत मी)
त्याची मिठी तर मी सोडली पण लगेच
तितकाच घट्ट मी त्याला हात धरून घेतला.
त्यांनी मग एक हात माझ्या गळ्यात
टाकला आम्ही चालू लागलो थोड पुढे जाऊन मग
आम्ही एका झाडाखालीजाऊन बसलो आजू
बाजूला कोणीच नव्हतआमच्या.
तिथे बसल्यावर तर मला राहावालच
नाही मी पुन्हा त्यला जवळ घेऊन
रडायला लागली. मग त्यान हळूच माझी मान वर करत
मला विचारलं
"शोनू बास आता सांगशील का मला काय
झाल आहे ते?"
"अरे ती रेखा आहे ना ती आज सकाळ पासून
खूप रडत होती" तिच्या घरचे तिच्यासाठी मुलगाशोधात
आहे
आणि ती म्हणत
होती ती घरी सुधा नाही सांगू
शकतकि तीच एका मुलावरप्रेम आहे
आणि राज  शिवाय ती राहू नाही शकत.

Friday 29 March 2013

*एक छोटीशी सुंदर कथा*



एकदा एक १० वर्षाचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला.

तो टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारलं,

" आईस्क्रीम कोन केवढ्याला आहे...?"

वेटर म्हणाला,
" ५ रुपये, "

तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला.

नंतर...

त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला,
असं विचारलं.

वेटरने ञासिकपणे उत्तर दिलं,
" ४ रूपये, "

तो मुलगा म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कप द्या,

त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं,
बिल दिलं आणि तो गेला.

वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला...

आणि...

त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेलं...

कपाजवळ १रुपया त्याने टीप म्हणून ठेवला होता...

आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वीत्या लहान मुलाने त्या वेटरचा विचार केला होता...

त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती...

स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता.

मी प्रत्येक वेळी नाही म्हणत,

पण...

कधीतरी दुसऱ्यांचा विचार करावा...
सर्वजण एकसारखे नसतात ते आपापल्या परिस्थिती नुसार असतात...

म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं .................

*आयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं...
म्हणतात,प्रेम करणं सोप असतं ते व्यक्त करणं कठीण असतं,प्रेम पहाणं सोप असतं,ते समजून घेणं कठीण असतं..
आणि हेच समजून घ्यायचं होतं,
म्हणून,आयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं

असतो का प्रेमात खरच आनंद का नुसतच "I Love U" म्हणायच असतं?
विरहात त्याच्या  बुडून मरायच असतं की फक्त "I Miss U" म्हणायच असतं?
हेच बघायच होत  म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं

म्हणुनच त्याच्याजवळ  व्यक्त करणं ठरवल
आणि व्यक्तही केल होतं पण..............
त्याला "माझ तुझ्यावर प्रेम नाही" असं म्हणायला काहीच वाटल नव्हतं ,
असतात खरच अशी माणसं या जगात हे कधी मी पाहिलं नव्हतं...

झगडत होते त्याच्याकडून  ते 'I Love You" हे तीन शब्द ऐकण्यासाठी
कधी त्याच्या  आठवणीतं मरतहोते ,तर कधी मरुनच जगत होते ....
आणि कदाचित हेच माझ्या मनाला अनुभवयाच होतं .....
म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं!!!!!!