Monday 30 July 2012

ती:एक विचारायचे होते.विचारू?
तो:तुला कधी पासून परवानगी घ्यायची गरज वाटू लागली?
ती:तसे नाही रे... केलेल्या गोष्टीतून नेहमी चुकीचंच हाती लागलं कि बरोबर गोष्ट करताना हि भीती वाटते.
म्हणून विचारलं.असो.मला एक सांग...
आपलीच एखादी गोष्ट आपल्यालाच अजिबात आवडत नसेल तर ती गोष्ट दुर कशी करायची?
आरसा आपल्याला हिणवू लागला तर काय करायचं?
स्वतःला बघताना स्वतःचीच लाज वाटू लागली तर काय करायचं?
तो: ओहो....इतके प्रश्न एकत्र..?बरी आहेस ना?... :-)... असो.. ऐक...
माणूस म्हणजे कोण ?सवय कि स्वभाव?
एखादी गोष्ट सारखी सारखी करून लागते ती म्हणजे 'सवय'
आणि एखादी गोष्ट वाटूनही हवी तेव्हा हवी तशी बदलता येत नाही तो म्हणजे 'स्वभाव'.
स्वतःच्या स्वभावाची लाज वाटू नये...सवयीची जरूर वाटू दे...
माणूस कसा असतो..एका इंद्रधनुष्यासारखा...ते हि त्याच्या नकळत...
त्याच्या सात रंगातला कोणता रंग,कुणाला आणि का आवडत असेल ते सांगणं कठीण...
आपल्याला आवडत नाही म्हणून एखादा रंग वेगळा करायचा नसतो.
इंद्रधनुष्यातला रंगांचा क्रम असाच का?हेच रंग का?दुसरे का नाहीत? असे प्रश्न विचारायचे नसतात.
आणि
मुळात आरसा काय दाखवतो?....दृश्य दाखवतो....
पण खरंतर दृश्याचा अर्थ मन ठरवतं...जे मनात असतं ते दृश्यात दिसतं..
न्यूनगंड आपल्यातच असतो.जगाने आठवण करून दिली कि,तो दृढ होतो.
तुझ्यात काही कमी आहे असं तुला वाटतं...का माहित नाही..
दिलेलं सगळं 'पूर्ण' असतं...पण 'पूर्ण' ची व्याख्याच 'पूर्ण' नाहीयेय....त्यामुळे सगळं अपूर्ण ठरतं...
त्यामुळे काही बदलू नकोस..आहेस तशी रहा...
सवय हवी तर बदल...स्वभाव तोच ठेव...
स्वतःला बदलून प्रश्न बदलत नाही...कधी ना कधी ते पुन्हा डोकावतातच....
ती: तू पण ना... कधी बदलू देणार नाहीस मला....मंद... :)

-- क्षण तुझे अन् माझे

No comments:

Post a Comment